"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक's picture
भम्पक in जे न देखे रवी...
23 Aug 2024 - 4:58 pm

न करीशी व्यर्थ चिंता तू
ठाऊक मज सामर्थ्य माझे !

कुणाशी कसे वदावे कसे वागावे
काय केल्याने काय होईल....
हि चिंता तयास
ज्याने क्रमिला पथ दुहेरी
माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ
कण भारही किंतु तयात नाही !
नकोत सला-मशवरा मजला
ठाऊक मज मार्गक्रमण माझे !
मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !
का कशाचीही बाळगावी मी भीती
ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2024 - 11:49 am | चौथा कोनाडा

छान कविता ! विवेकवादी रचना, आवडली रचना !

मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !

या ओळी विशेष आवडल्या !
ही कविता बर्‍याच संदर्भात भाष्य करते !

जो विचाराने परिपक्व असतो त्याला कुठल्या बाह्य उपदेशाची गरज नसते किंवा वारंवार देवाची आळवणी करण्याची गरज नसते.
पण आजुबाजूचे लोकं नावं ठेवतात... हा देवाचे करत नाही .. याला पुण्य कसं मिळणार ?
अस्सल्या साचल्या विचारसरणीला फाट्यावर मारणारी रचना खरंच छान आहे !