हाथरस (उ.प्र.)सत्संग

बाजीगर's picture
बाजीगर in राजकारण
3 Jul 2024 - 11:18 am

Hathras Stampede:बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात, मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक
https://marathi.indiatimes.com/india-news/up-hathras-stampede-constable-...

बाबा नारायण साकार,
बाबा हा कारण फरार।।
सत्संग @ हाथरस,
121 मेले बेवारस।।

पाहून प्रेतांचा ढीग विक्राळ,
एक पुलीस मेला तात्काळ ।।

भयंकर चीख नंतर
श्मशानशांतता,
भक्तांची भीख नंतर,
जिवनअंतता।।

बाबा ची चरण-धूळ,
घेण्यासाठी भगदड,
हेच कारण मरण-मूळ,
121 चिरडूनी मूरदड।।

80,000 ची परवानगी,
अडीच लाखांचा सत्संग,
पूर्वपुलीसकर्मी आता,
सूटबूट भोले भजनदंग।।

अजून नाही केला FIR
कसा होणार गिरफतार।।

प्रतिक्रिया

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 11:23 am | पॅट्रीक जेड

योगीच्या गचाळ आणी भ्रष्ट कारभारामुळे हे झालंय. मागे महाराष्ट्रातही अश्याच गचालक कारभारामुळे भर उष्माघाताने २५ लोक मेले होते. हे भाजपेयी जिथे जिथे असतात तिथे माणसाच्या जीवाची किंमत शून्य असते.

चौकस२१२'s picture

3 Jul 2024 - 2:49 pm | चौकस२१२

अश्या गर्दीचच्या ठिकाणी अश्या दुर्घटना अनेकदा घडतात, चूक नियोजनाची / आणि लोकांची दोघांची असते ( दरवर्षी उष्मघाताने हाज ला किती मारतात किंवा गर्दीत चिरडले जातात )
दुर्दैव आहे हे आणि त्यातून जिथे लोकसंख्या जास्त तिथे हे जास्त दिसून येते...

दुर्दैव असं एकी या दुर्घटनेत हि काही लोकांनां राजकारण दिसते... जणू १९४७ पासून अश्या घटना घडल्याचं नाहीत ... आणि त्या आधीही नाहीत?

ज्यानं फक्त भाजप वर सतत खापर फोडणे यासशिवाय दुसरा उद्योग नाही त्यांनी सौदीत जाऊन राजकुमार एम बिल एल यांना असेच प्रश्न विचारण्याची तयारी दाखवावी असले हिंमत तर

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 6:35 pm | पॅट्रीक जेड

वाटलच होतं. भ्रष्ट योगी आणी भाजपची बाजू घ्यायला अजून कुणी कसं आलं नाही?
तिकडे ऑस्ट्रेलियात होते काहो अशी चेंगराचेंगरी?

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:10 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

परवाचा दिवस भूशी डैमचा साथ लोकांचा मृत्यूच्या चर्चेत गेला,काल प्लस व्हॅलीतल्या जवानाच्या अति उत्साहाने मरण ओढावून घेतला त्याच्या चर्चेत,आज हाथरस सत्संग कांडात..माणसाने अति करत आपला जीव स्वस्त केलाच आहे.सरकार नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवते.
80,000 ची परवानगी,
अडीच लाखांचा सत्संग,

अरेरे

फार वाईट घडले. त्याबद्दल दुःख व्यक्त करून एक प्रश्न विचारतो.

80,000 ची परवानगी,
अडीच लाखांचा सत्संग,
अरेरे

परवानगीची पत्रास न ठेवता धार्मिक आयोजकांनी भाविक लोकांच्या गर्दीचा पूर येऊ दिला (आणि अन्यत्र भक्तिपूर्ण डीजे लावून परवानगी दिलेली ध्वनी तीव्रता वीस पटीने ओलांडली, आणि परवानगी दिलेला वेळ रात्र संपून पहाट होईपर्यंत ताणला) तर सरकार, पोलीस यंत्रणा यांनी त्यावर वेळीच काय कडक अँक्शन घ्यायला हवी यावर स्पष्ट मत देता येईल?

ऐंशी हजार मोजून बाकी येणाऱ्यांना आपापल्या गावी परत पाठवणे... शक्य आहे,?

त्यांची दूर दूर लहान गटांत गावाबाहेर रवानगी करून राहायची जेवायची सोय करणे.. शक्य आहे? योग्य आहे?

धार्मिक गर्दीवर अश्रुधुर रबरी गोळ्या लाठ्या चालवून ऐंशी हजारच्या वरील गर्दीचे वेळीच दमन करणे. गोळीबार.
की मूळ परवानगीच नाकारणे. बळेच आयोजित केल्यास आयोजक धार्मिक गुरूला अटक?

काय म्हणता, हे शांतता प्रस्थापित करणारे उपाय ठरतील का?

प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यास कोणताही (घरगुती, धार्मिक , सामाजिक) कार्यक्रम रद्द करावा एवढा common sense पुरा असावा.शहाण्याने गर्दीतून पाय काढता घ्यावा.

प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यास कोणताही (घरगुती, धार्मिक , सामाजिक) कार्यक्रम रद्द करावा एवढा common sense पुरा असावा.

क्षमस्व ताई. तेवढे सोडून बोला.

कॉमन सेन्स... फारच अपेक्षा. इतर काही वर माग बालिके, असे ईश्वर म्हणेल

अमुकच धर्माची गर्दी दिसते तुम्हाला? जावा तिकडे तमुकस्तानात... असेही ऐकू येईलच. तयारी ठेवा.

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 1:53 pm | पॅट्रीक जेड

सहमत. आता अंधभक्त ह्यात योगीची काहीच फुक नाही जनतेचीच आहे हे सांगायला येतील. योगी फक्त टॅक्स घ्यायला
नी भ्रष्टाचार करायलाच बसलाय.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:09 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2024 - 5:12 pm | कर्नलतपस्वी

काहीही झालं तरी सरकारच्या नावाने खडे फोडायचे.

भुशी डॅम,पावसाळी धबधबे,समुद्र किनारे,डोंगरमाथे व तत्सम ठिकाणी दर वर्षी अनेक जण मरतात. सर्वच ठिकाणी धोक्याच्या सुचना फलक लावलेत. सरकारची काय चुक? कोणी सांगीतल असले स्टंट करायला. घडणाऱ्या दुर्घटना मधून जनता काहीच बोध घ्यायला तयार नाही. मग मरा येवढेच म्हणावे वाटते.
परवा काय म्हणे रिल बनवताना गाडी दरीत कोसळली व एक मुलगी मेली. कुणी सांगीतल रिल बनवायला?

भोंदू बाबाच्या दरबारात कुणी सांगीतल गर्दी करायला? एकविसाव्या शतकात एक भोंदू आपल्याच पायाची थुळ गोळा करायला सांगतो आणी त्याचे अंधभक्त..... कहर आहे मूर्खपणाचा. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये,म्हणतात ते खरं आहे.

कबीरदास म्हणतात,
अंधे गुंगे गुरु घणे, लगंड़े लोभी लाख।
साहिब से परचे नही, कॉव बणावे साख।

पुढे....
जाका गुर भी अंधला, चेला खरा निरंध।
अंधा−अंधा ठेलिया, दून्यूँ कूप पड़ंत॥

जीव तोडून संतानी सांगीतलं की बाबा रे देव कुठे असेल तर तो तुझ्या पाशीच.आहे...

मोको कहां ढूँढ़े रे बन्दे
मैं तो तेरे पास में
ना तीरथ में ना मूरत में
ना एकान्त निवास में
ना मंदिर में ना मस्जिद में
ना काबे कैलास में
मैं तो तेरे पास में बन्दे
मैं तो तेरे पास में

स्वतःच स्वताच्या मुर्खपणाने स्वताचा जीव धोक्यात घालायचा आणी सरकारला दोष द्यायचा.

गेलेल्या लोकांबद्दल सहानभुती एक माणुसकी म्हणून ठीक पण दहा लाख ,पाच लाख वगैरे देणे हा ही एक......

प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करते. जनता जनार्दन जर बोध घेत नसेल तर भगवान ही मालीक है....

एक कार्टून आहे,ते म्हणते...
जान है तो जहान है वरना दुनिया कब्रस्तान है

चौकस२१२'s picture

3 Jul 2024 - 5:18 pm | चौकस२१२

काहीही झालं तरी सरकारच्या नावाने खडे फोडायचे.
नाहीतर काय ,,, आणि त्यात सुद्धा एकांगी पणा , उद्या राहुल बाबा सत्तेवर येउदे मग एक जरी अपघात घडलला तर हे गुलाम ( दुसऱ्यानं अंधभक्त म्हणून हिणवणारे) त्याला एकट्याला जबादार धरतील का ?
काही लोकांना २०१४ नंतरच जाग आलेली दिसतिय सरकार ला धारेवर धरण्याची

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 6:38 pm | पॅट्रीक जेड

काही झाले तरी आमचे “भाजप” सरकार दोषी नाही. आणि आम्हाला अंधभक्तही म्हणायचे नाही.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:08 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

सरकारच्या प्रत्येक बाबतीत नावाने खडे फोडणे जितके सोपे (आणि चूक, आणि निरुपयोगी) आहे तितकेच जनता नामक एका प्रचंड समूहाच्या नावाने खडे फोडणे हेही तितकेच सोपे (आणि चूक, आणि निरुपयोगी) आहे.

काय ऍक्शन घेता येईल, जेणे करुन अशा गोष्टी टाळता येतील? लाखोंची गर्दी रोखणे आणि पांगवणे ही बळाने करण्यास सोपी गोष्ट आहे का? शक्य गोष्ट आहे का? त्यात ते धार्मिक भाविक अँगल असले की पुढे काय प्रतिक्रिया होतील आणि पोलिसांचे काय हाल होतील?

अशा वेळी काही उपाय असेल तर सुचवावा. किंवा लिव्ह विथ इट.

या तथाकथित अडाणी, गाढव किंवा आणि काही क्ष य झ असेल त्या "जनतेला" सुधारण्यासाठी काय करावे? आणि ते शक्य कोटीतले नसेल तर मग कोणालाही दोष लावण्यात काय अर्थ?

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2024 - 10:02 pm | कर्नलतपस्वी

एकदम सहमत. ज्यांचे विचार पक्के आहेत त्यांना बदली करणे म्हणजे उंटाला बाबा गाडीत बसवण्या सारखे आहे. किती तरी शिकले सावरलेले लोक या बाबां,बुवांच्या चक्कर मधे आडकले आहेत.

समजून उमजून असले प्रकार करतात तेव्हां नवल वाटते.

स्वधर्म's picture

8 Jul 2024 - 3:21 pm | स्वधर्म

इथे म्हणायचं
>> भोंदू बाबाच्या दरबारात कुणी सांगीतल गर्दी करायला? एकविसाव्या शतकात एक भोंदू आपल्याच पायाची थुळ गोळा करायला सांगतो आणी त्याचे अंधभक्त..... कहर आहे मूर्खपणाचा. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये,म्हणतात ते खरं आहे.
तसेच,
>> 
जीव तोडून संतानी सांगीतलं की बाबा रे देव कुठे असेल तर तो तुझ्या पाशीच.आहे...

आणि तिकडे जोर लावून राम मंदीराला पाठिंबा द्यायचा!
कर्नल साहेब तुंम्ही सुध्दा आनंदाने जाणार होतात:
https://www.misalpav.com/comment/1174278#comment-1174278
जे येतील त्यांच्या बरोबर जे नाही येणार त्यांच्या शिवाय. मी तर घरूनच, म्हणजे वाडीतुनच संजय चक्षू(TV) द्वारे पुजा अटेंड करणार.

धाग्यावर काय पण एकेक समर्थनाचे कारंजे आहेत तिथे:
https://www.misalpav.com/node/51865
22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
उदाहरणार्थ:
https://www.misalpav.com/comment/1174038#comment-1174038
धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतारी पुरुष जन्म घेतात. त्रेता युगात श्रीराम आणि हनुमान, द्वापर युगात कृष्ण आणि अर्जुन आणि कलयुगात मोदीजी आणि योगी जी.

धर्माच्या नावाने प्रचंड पैसे ओतून काही भव्य दिव्य करायला पाठिंबा द्यायचा पण लोकांनी गर्दी केली तर तो त्यांचा दोष? मंदीर स्थापना केली, तर बाबा लोकांचं प्रस्थ वाढणारच आहे.

म्हणूनच,

देवी आणि देवतांची मंदिरे हवीत...

"माणसाने कधीच माणसाची पूजा करू नये." , इति बाबा महाराज डोंबोलीकर

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2024 - 5:48 pm | चौथा कोनाडा

भाजून काढणारी अतिशय वास्तव दाहक रचना !

कलाकार व्यक्त होतात ते असे !

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2024 - 5:51 pm | चौथा कोनाडा

जय बाबा नारायण साकार,
BABAnarayanMPC007

जय बाबा नारायण साकार,
केले यमदेवाचे स्वप्न साकार !

आइए जानते हैं बाबा साकार हरि उर्फ भोले बाबा के बारे में-

https://www.amarujala.com/uttar-pradesh/aligarh/hathras-accident-news-to...

-----

रामचंद्र's picture

5 Jul 2024 - 12:40 am | रामचंद्र

किमान अशा दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सर्व लहानथोर अपराध्यांना सरकारकडून प्रतिष्ठा मिळणे बंद होऊन सदोष मनुष्यहत्येसाठीची शिक्षा बजावली जावी, एवढीच अपेक्षा. खरोखरच शिक्षा भोगावी लागत आहे हे दिसल्यावर तरी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना काही प्रमाणात आळा बसू शकेल.

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2024 - 10:02 am | धर्मराजमुटके

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. अतिशय ऐतिहासिक अशी ही मिरवणूक निघालेली पाहून सर्वचजण भारावून गेले. मात्र या मिरवणुकीनंतर आता त्याठिकाणी जमलेल्या कचऱ्याचेही फोटो समोर आले आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काही तासांत स्वच्छ केलेला परिसरही सर्वांनी पाहिला. ४ जुलैच्या रात्री मिरवणूक आटोपल्यानंतर चपला आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच मरीन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळाला. मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना ११,५०० किलोंचा कचरा या परिसरातून उचलला असल्याची माहिती दिली आहे.

नशीब इथे कोणती दुर्घटना झाली नाही.

श्रीगणेशा's picture

6 Jul 2024 - 12:43 pm | श्रीगणेशा

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणारी गर्दी हाही एक महत्वाचा विषय आहे. स्थानिक लोक, व्यापारी, स्थानिक प्रशासन, राज्य आणि केंद्र सरकार कोणालाही (मग कोणताही पक्ष असो) कोणतेही प्रश्न सोडवायची इच्छाशक्तीच नाही.
----
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गेलो होतो, म्हटलं आतापर्यंत एवढं काही ऐकलं आहे गोकुळाविषयी, प्रत्यक्षात तर किती सुंदर, निसर्गरम्य असेल, परंतु पूर्णतः भ्रमनिरास झाला.
अगदी अरुंद, गल्ली बोळातून फिरून मुख्य मंदिरात कसं बसं पोहोचल्यावर, तिथे चेंगराचेंगरी (stampede) कशी होईल, यासाठी सर्व व्यवस्था काटेकोरपणे करून ठेवली होती. कोणतीही रांग नाही, रेलिंग्ज नाहीत, सगळ्यांनी बांके बिहारीचं जास्तीत जास्त जवळून दर्शन घेण्यासाठी स्वतःला गर्दीत झोकून दिलेलं.
अक्षरशः आपण इथे आलोच का, असं सर्व कुटुंबीयांना अगदी दिल्लीत पोहोचेपर्यंत वाटत राहीलं. अगदी काही किलोमीटरवर असलेल्या, मथुरा आणि राधाराणी मंदिरात जाण्याचा विचारही, सर्वांनी एकमताने सोडून दिला.
----
विषयांतर होईल पण, एकंदरीतच, आपल्या समाजाला, आपला धार्मिक, सांस्कृतिक ठेवा जपून ठेवण्यात, त्याचं संवर्धन करण्यात काहीही रस नाही.
----

पॅट्रीक जेड's picture

6 Jul 2024 - 12:55 pm | पॅट्रीक जेड

सहमत. हेच मी जगन्नाथ पुरीच्या मंदिरात अनुभवलं. आत भयंकर गर्दी नियोजनाची कुठलीही व्यवस्था नाही, चेंगराचेंगरी होईल ह्याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवलीय. फक्त कधी होईल ह्याची वाट पहायची. तरी बर बाहेरून गर्दी आत सोडताना थोडी व्यवस्था केलीय. माझ्य पुढे एक स्त्री होती. खूप हाल झाले तिचे.
मंदिरात पावित्र्य तरी कुठे असते? विमल वगैरे गुटख्यांचे तंबोरे भरलेले पुजारी. तोंड उघडलं की लाल लाळ गळते त्यांची. किळसवाणा प्रकार. कुणाच्या हातात पैसे दिसताय ते ओढण्यासाठी जीव की प्राण करतात. हे मी उज्जैन, जगन्नाथ पुरी, काली मंदिर कलकत्ता इथे अनुभवलय.