संकल्प : नव्या वर्षाचा !

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
4 Jan 2008 - 10:16 pm

समीरने बार मध्ये प्रवेश केला तेव्हा जवळजवळ सगळा बार संपूर्ण भरला होता. एक कोपर्‍यावरील टेबल तेवढे रिकामे होते. समीर तेथे जाऊन स्थानापन्न झाला. प्रथेप्रमाणे पाणीवाल्या पोर्‍याने पाण्याचा ग्लास समोर ठेवला आणि तितक्यात हातात नोंदवही घेऊन वेटरदेखील आला.

"तीन किंगफिशर स्ट्राँग", समीर उद्गारला.

वेटरला वाटले बहुधा ह्याचे दोन मित्र आता येतच असावेत. तो गेला आणि थोड्याच वेळात तीन बाटल्या, तीन ग्लास आणि पापड्-शेंगदाण्याच्या प्लेट घेऊन आला. तोवरही समीर एकटाच होता.

"साब, आपका बीयर अभी खोलू की...."

"हां हां. तीनो बॉटल खोलो."

वेटरने तीनही बाटल्या उघडल्या आणि तीनही ग्लास भरले. समीरने तीनही ग्लास स्वतःकडे ओढून घेतले आणि पहिल्या ग्लासातून एक घोट घेतला. शेंगदाण्याचा एक बकाणा तोंडात भरून खाल्यावर त्याने दुसर्‍या ग्लासातून एक घोट घेतला. नंतर पापडाचा एक तुकडा मोडून खाल्ल्यावर तीसर्‍या ग्लासातून एक घोट घेतला.

तीनही ग्लास संपेपर्यंत हा सिलसिला चालू राहिला. वेटर आश्चृर्यमुग्ध होऊन पाहात राहिला!

समीरने बील मागवले. वेटर बील घेऊन आला आणि शेवटी न राहवून त्याने तीन बीयर एकत्र पिण्याचे कारण विचारले.

आता तीन बीयर रिचवल्यामुळे समीर मायबोलीवर उतरला.

"त्याचं काय आहे. माझा एक भाऊ गेलाय दुबईला, दुसरा गेलाय लंडनला. आणि मी इथे मुंबईत. आम्ही नेहमी एकत्र पिणारे. जाताना एकमेकांना वचन दिले की आम्ही एकत्र असू वा नसू पण बियर मात्र एकत्र असल्यासारखीच पिऊ!"

बंधुप्रेम पाहून वेटरच्या डोळ्यात पाणी तरळले!

पुढे हा रोजचाच कार्यक्रम झाला. आणि बारमधील सगळेच समीरला ओळखू लागले.

होता होता ३१ डिसेंबरची रात्र उगवली! समीरने त्यारात्री तीन त्रीक नऊ बाटल्या बीयर ढोसल्या.

मग आला १ जानेवारी. नेहेमीप्रमाणे समीर जाऊन बसला आणि वेटरने न बोलता तीन बाटल्या आणल्या.

"सिर्फ दो बॉटल...", समीर म्हणाला.

वेटरच्या काळजात चर्र झाले.

समीर दोन ग्लासातून बियर पिऊ लागला आणि हॉटेलचा सगळा स्टाफ आडून आडून कुजबुजू लागला - कोणता भाऊ असावा? दुबईवाला की लंडनवाला?

शेवटी न राहवून मॅनेजर स्वतः पुढे झाला. समीरचा हात हातात घेऊन म्हणाला, "We are so sorry to learn about your brother....कालपर्यंत तर ठीक होता ना?...कोणता भाऊ?..."

समीरने शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला. "मी आणि माझे दोन्ही भाऊ सुखरूप आहोत हो...मी आजपासून दारू सोडली आहे!!!!"

टीपः नुकत्याच मला आलेल्या एका इ-मेलवर आधारीत.

कथालेख

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

5 Jan 2008 - 12:33 am | इनोबा म्हणे

सुन्या,
'पंच' चांगला आहे,पण यात संकल्प नावालाही दिसला नाही.

समीरने त्यारात्री तीन त्रीक नऊ बाटल्या बीयर ढोसल्या.
हा तर आमच्यापेक्षाही मोठा बियरप्रेमी दिसतो,एकदा आमचा टांगा पल्टी आणी घोडे फरार झाल्यापासून आम्हाला बियरची थोडी फियर वाटते.

"We are so sorry to learn about your brother....
ये कुछ पल्ले नही पड्या.असो!कधी कधी आम्ही ही अशा क्षुल्लक चूका करतो,बरं का!

बाकी सगळं ठिकठाक
(पारोचा देवदास) -इनोबा

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 2:45 am | क्रेमर

प्रतिसाद

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.