काय करावे तजवीज आहे
काय करावे मन उद्विग्न आहे
काय करावे काफिला मार्गस्थ
असताना स्तब्ध झाला आहे
काय करावे प्रसन्नता शोधीत
असताना अनुपस्थित झाली आहे
काय करावे मित्राची जरूरत
असताना नाराज झाला आहे
काय करावे संवाद मनस्थितीचा
असताना नियम लागू झाला आहे
काय करावे हर एक व्यक्ती
अपुला फायदा शोधीत आहे
काय करावे चोहिकडून फक्त
आश्वासन प्राप्त होत आहे
प्रतिक्रिया
14 May 2024 - 9:51 am | अहिरावण
काय करावे प्रतिसाद द्यावा की नको
लेखन हिट झाल्याचा संदेश जात आहे
14 May 2024 - 12:32 pm | अमरेंद्र बाहुबली
काय करावे? लेखन उचंबळून आले आहे,
पण लोक काहीबाही कमेंटत आहेत.
14 May 2024 - 12:42 pm | चौथा कोनाडा
काय करावे पुन्हा जिलेबी
एकेक जिलेबी वाढत आहे !
15 May 2024 - 8:49 pm | चित्रगुप्त
निरपेक्ष - निर्लिप्त रहावे
15 May 2024 - 10:53 pm | गवि
किती करावे, किती भरावे,
कितीदा संचित रिते करावे?
किती नडावे, किती रडावे,
कोणा द्यावे किती पुरावे?
किती फसावे, किती हसावे,
डोळ्यांचे दव किती पुसावे?
किती वळावे, किती पळावे,
आयुष्याला किती छळावे?
किती हरावे, किती स्मरावे,
तेल संपता किती जळावे?
किती जुळावे, किती गळावे,
शब्दांशी या किती जुगावे?