लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत.
असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत.
तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही.
जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा.
त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा. पण शहरी वातावरणात कार्यबाहुल्यामुळे
रहाणं अपरिहार्य होत असल्याने,त्या जून्या दिवसातला निसर्ग सहवास मिळणं जास्त कठीण होत गेलं आहे.असं मला वाटतं.
मला सुद्धा माझं कोकणातलं बालपण आणि तरूणपणातलं जीवन मला आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.निसर्गाच्या सौंदर्याचं कौतुक करत परिपूर्ण जीवन जगल्याचं आठवतं.
माणसं जगण्यासाठी,काम करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतताना पाहून अगतिकेची
किंव येते.माझ्या अनुभवातून मला हे सर्व जाणवतं.
जंगलातल्या शांततेला मुकणं, समुद्राकाठच्या वाळूत फिरताना, हवेची झुळूक आणि फुटत्या लाटांचा लयबद्ध आवाज ऐकताना,खाडीच्या काठावरून चालताना हवेचं चेहऱ्यावर आपटणं,आणि त्यातून मिळणारी ओठांवरची खारट-गोड चव चाखताना, पावसाळ्यात नदीच्या काठावर बसून,जोरात वहाणारा पाण्याचा ओघ उत्सुकतेने पहात असताना,एका गावातून दुसऱ्या गावात जाताना वाटेत लागणाऱ्या डोंगर-घाटीचा प्रथम चढ आणि मग उतार चालुन जात असताना अशा अनेक गोष्टी अनुभवण्यापासून वंचित झाल्याने माझ्या मनाला खंत होते.
निरोगी, समृद्ध जीवन शेवट पर्यंत जगता येत नाही याचं वाईट वाटतं.
मला वाटतं की ज्या व्यक्तीने निसर्गाच्या सौंदर्याचं परिपूर्ण जीवन जगलं आहे त्याच्यासारखा नशिबवान तोच.
प्रतिक्रिया
13 May 2024 - 12:34 am | भागो
अगदी पटलं.