आयटीवाले....

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
23 Dec 2008 - 11:52 am

गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात.

आक्षेप क्र.१. तुमच्यामुळे सगळं (घरांच्या किमती, भाजीपाला, इत्यादि) महाग झालं...
जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की २ बीएचके घरासाठी १० लाख फार कमी होतात. आमचे पगार जरा जास्त आहेत तेव्हा तुम्ही जर २५ लाखाला देत असाल तरच आम्ही तुमच्याकडून फ्लॅट घेऊ. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर असावं असं वाटतं, तसच ते आयटीवाल्यांनाही वाटतं. बिल्डरनी ठेवलेली किंमत ज्यांना परवडते ते घर घेतात. ती काही फक्त आयटीवाल्यांची मक्तेदारी नाही. अवाच्या सवा किमती बांधकाम व्यावसायिकांनी वाढवल्या. ज्यांनी पूर्वी जमिनी किंवा घरं किरकोळ किमतीत विकत घेतली त्या सर्वांना नंतर बक्कळ फायदा झाला. पण ठणाणा मात्र आयटीवाल्यांच्या नावानी.

आक्षेप क्र.२. तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.

आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्‍यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.

दुसरी गोष्ट अशी की आयटी मधला बेसिक पे (पगारातला एक महत्वाचा भाग) मॅन्युफॅक्चरींग तसेच इतर क्षेत्रांत मिळणार्‍या बेसिक पे पेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे साहजिकच पी.फ. आणि एच.आर.ए. कमी मिळतो. पर्यायाने उत्पन्न कर जास्त बसतो. महिन्याच्या शेवटी जो पगार मिळतो तो कॉस्ट टू द कंपनी पेक्षा भरपूर कमी असतो.

मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. इतर क्षेत्रांचं म्हणाल तर सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रिय कर्मचार्‍यांचे पगार चिकार वाढणार आहेत. सरकारी अनुदानं लाभलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही पगार बक्कळ वाढणार आहेत.

आक्षेप क्र.३ बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे.

इथे बसून तर असता म्हणजे नेमकं काय अभिप्रेत असतं लोकांना देव जाणे!!! इतर क्षेत्रांतील कामांप्रमाणेच आयटीमधेही आव्हानात्मक स्वरूपाची कामं असतात. कामं म्हणजे फक्त प्रोग्राम लिहीणं नाही. देश-विदेशातील लोकांशी बोलावं लागतं, त्यामुळे संभाषण कौशल्य आवश्यक असतं. ठराविक कालांतराने प्रोजेक्ट बदलतो त्यामुळे नवनवीन संगणकीय भाषा सतत शिकत रहाव्या लागतात. विविध देशांतील कंपन्यांचे प्रोजेक्टस असल्यामुळे कधी कधी शिफ्ट्स मधे काम करावं लागतं.

मला तरी प्रामुख्याने वरील तीन आक्षेप ऐकायला मिळाले. मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणीमत

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 12:03 pm | विसोबा खेचर

मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गुड! :)

चालू द्या..

ते आयटीवाले
गोडवे तयांचे
गाणे हे नित्याचे
तात्या म्हणे!

भिडू's picture

23 Dec 2008 - 3:37 pm | भिडू

प्रा ०५०३....काय हि भाषा???

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 3:32 pm | विसोबा खेचर

tumhala naukri nahi ka?

Nahi.. mi bekaar aahe..! :)

अवलिया's picture

23 Dec 2008 - 3:33 pm | अवलिया

आणि बेक्कार पण आहे हे ही सांगा तात्यानु
डुप्लिकेट आय डी बर का तात्या ह्यो...

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

23 Dec 2008 - 3:52 pm | सखाराम_गटणे™

डुप्लिकेट आय डी बर का 'तात्या' ह्यो...

'विसोबा खेचर' हा डुप्लीकेट आय डी आहे का?

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

भिडू's picture

23 Dec 2008 - 3:33 pm | भिडू

अहो "प्रा०५०३"......बोलतानां भाषा निट वापरा हो.... निदान कोणाशि बोलत आहत याचे तरि भान ठेवा....तात्या कोण आहेत हे तरि माहित आहे का तुम्हाला.. त्या मुळे प्रतिसाद देतानां विचार करा. आणी मगच प्रतिसाद द्या

यशोधरा's picture

23 Dec 2008 - 12:04 pm | यशोधरा

चला, कोणी तरी आयटी वाल्यांची पण बाजू मांडली म्हणायची!
थ्यांक्यू, थ्यांक्यू :)

The only opinion about your dream and your work that really counts is yours !!
The NEGATIVE COMMENTS of others merely
REFLECT THEIR OWN LIMITATIONS - NOT YOURS

:-) insha-allah हे ही दीवस जातील !
~ वाहीदा

मदनबाण's picture

23 Dec 2008 - 12:04 pm | मदनबाण

मी सुध्दा नॉन आयटी मधुन आयटी मधे आलेलो आहे,,,त्यामुळे आयटीवाले किती मेहनत करतात याची जाणिव झाली !!!
तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
हे म्हणजे बी.ई वाल्या माणसाने एम.बी.ए केल्याला माणसाला म्हणावे की तुझा पगार जास्त आहे..तो का जास्त आहे याचा आधी विचार करण्याची तसदी घेण्याची इच्छाच नसते मुळी...
ज्या कस्ल्टंट चे बिलींग दर तासाचे असते आणि ते सुध्दा डॉलर किंवा युरो मध्ये त्याला महिन्याचा पगार मिळतो तो सुध्दा रुपयांमधे...
बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे.
कॉस्ट कटींगमुळे गेली २ वर्ष शनि आणि रवि या दोन दिवसांनमधे काम करताना आमच्या इथे साध्या टेबल फॅनचा उपयोग होतो त्यामुळे नो एसी ऍट ऑल..एसी कायम असण्याचे दिवस कधीच गेलेत..

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

यशोधरा's picture

23 Dec 2008 - 12:16 pm | यशोधरा

ऩकळे कशास
दुस्वास करीती
बोटेही मोडती
नावे आयटीच्या

आयटीच्या योगे
मिपाचा संसार
सुहृदही सारे
जमती जेथे

धरा बोध मनी
उमगो हे सत्य
आयटीची साथ
'रौशनी' जगात!

:D

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

हम्म!

सुंदर उत्तर..!

मानना पडेगा.. :)

तात्या.

भिडू's picture

23 Dec 2008 - 12:35 pm | भिडू

वरचे सगळे मुदद्दे पटलेच शिवाय डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). आहो कुठ्ल्याही कंपनि चा मेन उद्देश नफा हाच असतो. मग अशा कुठ्ल्या कंपनि ला पैसे वर आले असतात जे असे सहजासहजि भरभक्कम पगार देतिल. जेव्हा आम्हि त्यांना कोट्यावधी रुपये मिळवुन देतो तेव्हाच त्यातला काहिसा भाग ते पगार म्हणुन आम्हाला देतात्.एका CMM ५ लेवल च्या कंपनि मधे (मी स्वतः या कंपनि मधे २ वर्ष कामे केले आहे) सर्व साधारण पणे per day ,per employee १०,००० रुपये charge(Billing) करते कंपनि क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(avrage). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात. त्यामुळे पगार जास्त मिळतो हा मुद्दा चुकिचा आहे.
दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे.
आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.

मदनबाण's picture

23 Dec 2008 - 12:45 pm | मदनबाण

पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.
अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!!
त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो...
आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! :(

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुनील's picture

23 Dec 2008 - 3:35 pm | सुनील

कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच

(सतत दोन दिवाळ्या घर-कुटुंबापासून दूर, एकट्याने काढलेला) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 12:56 pm | विसोबा खेचर

बरं बुवा! आयटीवाले गिरेट!

झालं समाधान? खुश? :)

अवलिया's picture

23 Dec 2008 - 1:28 pm | अवलिया

बरं बुवा! आयटीवाले गिरेट! झालं समाधान? खुश?

छयां ! तात्या तुम्ही पोपट केलात!
चांगला तिकडे बेटींग घेत होतो... कोण जिंकणार... आयटी की नॉन आयटी ...

चला रे चला! पळा घरी ! सामना रद्द.
नॉन आयटी च्या कप्तानाने मॅच फिक्स केली.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

अनिल हटेला's picture

23 Dec 2008 - 1:07 pm | अनिल हटेला

डीस्क्लेमरः मी आयटीवाला नाही..

आधी मी पण असाच विचार करायचो की हे लोक म्हणजे फुल्ल टू ऐश..
बक्कळ पैसा ,एकदम जीवाची मुंबई..
पण नंतर एक मित्र आय टीत गेला .आणी त्याच्या कडे बघुन कळालं की घी देखा ,लेकीन बडगा नही देखा...
जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती....
असो...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अमोल केळकर's picture

23 Dec 2008 - 1:38 pm | अमोल केळकर

मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.
अहो विसरा आता ते सगळं
इथं दर महिन्याला मिळतो पगार फक्त

आपला
मॅन्युफॅक्चरींग कामगार
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मराठी_माणूस's picture

23 Dec 2008 - 3:42 pm | मराठी_माणूस

आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता?

कुंदन's picture

23 Dec 2008 - 4:00 pm | कुंदन

असेच म्हणतो.
मग, याच प्रमाणे , ज्यांना वाटते की आय टी वाल्यांना बसल्या जागी भरपुर पैसा मिळतो , त्यांनी आय टी मध्ये नोकर्‍या शोधाव्यात की.
त्याला तर कोणी बंदी घातलेली नाही ना.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Dec 2008 - 4:04 pm | बिपिन कार्यकर्ते

कुंद्या, लेका तोडलंस, जिंकलंस मित्रा....

=D>

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

23 Dec 2008 - 3:48 pm | अनिल हटेला

आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता?

ये बात सही है !! :? :-?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्मिता श्रीपाद's picture

23 Dec 2008 - 4:16 pm | स्मिता श्रीपाद

आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता?

कारण दिवसभर इंटरनेत वापरायला मिळते आणि ते सुद्धा भारी स्पीड आणि छान कनेक्टिवीटी...
आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते :-)

सखाराम_गटणे™'s picture

23 Dec 2008 - 4:18 pm | सखाराम_गटणे™

>>आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते
आम्ही तर नाही खेळत

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विजुभाऊ's picture

28 Dec 2008 - 9:51 am | विजुभाऊ

पुर्व लेखी परवानगीशिवाय याचा अर्थ काय?

लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

वरील वाक्य पूर्ण चुकले आहे
लेखकाची पूर्व परवानगी लेखी असू शकते
त्याच्या लेखी ती परवानगीच असते.
अनुल्लेखापेक्षा पूर्वलेख वेगळा ठरतो

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

यशोधरा's picture

23 Dec 2008 - 4:20 pm | यशोधरा

स्मिताताई, अन् बिन आयटी वाल्यांना पण आयटीच्या कृपेनेच येता येतं बर का मिपावर :)

मराठी_माणूस's picture

23 Dec 2008 - 4:54 pm | मराठी_माणूस

बरोबर आहे.
रंग / ब्रश बनवणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच सुंदर सुंदर चित्र काढली जातात, मुद्रण करणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच उत्तोमत्तम साहित्य बनते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2008 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आज आय.टी.वाले जी काही कामं करतात (असं ऐकून आहे) त्यातून इंटरनेट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, यांचा शोध लागला नाही. माझ्या माहितीत हा प्रकार उसाच्या सैन्यातल्या लोकांनी काढला.

यशोधरा's picture

23 Dec 2008 - 5:30 pm | यशोधरा

अगं अदिती ते तर मलाही माहित आहे :)
पण आजकाल प्रत्येक हापिसातून आयटी च वेगळं डिपार्ट्मेंट असतं, जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत, अस म्हणायच होत मला. एकदम उसात कुठे शिरतेस?:)

कुंदन's picture

23 Dec 2008 - 5:34 pm | कुंदन

>>जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत

व्यवस्थित (???) =))
त्यांनी मि पा ब्लॉक करुन ठेवल तर खेळता येईल का तुम्हाला मिपा मिपा?

यशोधरा's picture

23 Dec 2008 - 5:40 pm | यशोधरा

त्यांनी म्हणजे कोणी रे भाव? >:P

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Dec 2008 - 4:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

त्यानी म्हनजे आम्ही आय् टी वाल्यानी जर हपिसात मिपा ब्लॉक केला तर तुम्हाला मिपा उघडता येनार नाहि
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

इंटरनेट, www हे शोध उसाच्या सैन्यात लागले हे खरं आहे. आत्ताच्या लोकांना AARPA म्हणजे काय, इतकं प्रिमिटीव्ह होतं ते. ( :? www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?)

पण आज त्याचा जसा वापर होत आहे ते आय. टी. ईजिनियर्समुळेच होत आहे.
तसचं आय. टी. म्हणजे फक्त इंटरनेट, www एवढचं नाही.

आय्. टी वाले या गोष्टींच्या शोधाच क्रेडीट घेत आहेत हे तुला कुठे दिसलं (तसा जर कोणी घेत असेल तर तो अर्धवट म्हटला पाहिजे). त्यामुळे वरील वाक्याचा उद्देश कळला नाही.

अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?(होत असावी असा अंदाज हा.. मी स्वःत बघितलं नाही त्यामुळे ठोकून देता येत नाही.) जर तसं असेल तर ते लिहिणारा कोणीतरी फोकलीचा, पैशाला पासरीभर मिळणार्‍यांपैकी असलेला, प्रोग्रॅमरच असला पाहिजे..

खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा.

आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत..
१९९८-९९ साला पर्यंत संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स ला जाणारा म्हणजे मेकॅनिकल, मेडीकल यांसारख्या ग्लॅमरस शाखेला एडमिशन न मिळवता आलेला विद्यार्थी अश्या तुच्छतेने बघायचे. आता दुस्वास करतात.

काही काही प्रतिसाद बघितले तर हसायला येतं. आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.

चालायचच कभी उपर कभी निचे..

-इलेक्ट्रॉनिक्स-संगणक अभियंता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Dec 2008 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून जे काही ऐकलं आहे, त्यावरून माझे सगळे अंदाजः
(www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?)
असू शकेल, माझी माहिती फारच तोकडी आहे. पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही?

खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
पण त्यात मी पण येते ना?

अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?
अर्थातच! पण मी वापरते ती सगळी सॉफ्टवर्स खगोलशास्त्रज्ञांनीच लिहिलेली आहेत. खगोलसंशोधनात (किमान भारतातरी) एवढा पैसा नाही की जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून सॉफ्टवर्स लिहून घ्यावीत. (आमच्याकडे बर्‍याचशा तरूण, वय वर्ष <~ ४५, खगोलअभ्यासकांना संगणकाबद्दल किमान माहिती असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आपणच करु शकतो, अगदी ऑपरेटींग सिस्टम इंन्स्टॉल करण्यापासून ते स्पीकर्सची कनेक्शन करेपर्यंत! अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर उठल्या-बसल्या सिस्टम ऍडमिनवाल्याला बोलावून आणावं लागत नाही.)

जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा.
दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? आणि आम्हाला खगोलशास्त्रात शिकवतात तसं, तुलना समान गोष्टींची करावी, (Compare like to like!) असमान नाही!
तक्रार एवढीच आहे महिन्याला ५० हजार मिळवणार का १६ हजार असा प्रश्न वयाच्या तिसाव्या वर्षी विचारला तर माणूस ५० हजार असं उत्तर देतो. महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना?

प्रगती फक्त एकाच दिशेत, क्षेत्रात होत आहे आणि हे चांगलं आहे का? शरीरासाठी व्यायाम करताना फक्त दंडाचेच व्यायाम केले आणि तुंदीलतनू असेल तर ते कसं असेल?

हा प्रश्न जेनेरीक आय.टी.वाल्यांसाठी नाही, तर खरंतर "पॉलिसी मेकर्स"साठी आहे. ज्यांच्या हातात ससा नाही त्यांनी स्वतःला पारधी म्हणवून घेऊ नये.

अवलिया's picture

24 Dec 2008 - 12:33 pm | अवलिया

महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना?

तारे संपणार नाहीत बै.
पण
५०००० चे ५००० पण होवु शकतात... डॉलर.... कोसळ्णार आहे.
(हे भाकित आहे. जास्त सिरीयसली घेवु नये. आमची भाकिते खरी होतातच असे नाही)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

एक's picture

24 Dec 2008 - 11:40 pm | एक

>>खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
>>पण त्यात मी पण येते ना?

डिपेन्डस तुला ते लागू होत असतील तर तू त्यात येतेस..तुझा बाकिचा प्रतिसाद बघितला तर येत नसावीस पण मला ते आधी माहित नव्हतं म्हणून "जेनेरीक" वाक्य.

>>दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का?

धन्यवाद. पण ही मॅच्युरीटी मला इथल्या बर्‍याच प्रतिसादात आढळली नाही. इथे तर ब्लेम गेम सुरू झालेला दिसतो..
आय. टी खाली गेलं तर बाकिची फिल्ड्स (टाटा मोटर्स आठवड्यातून २-३ दिवस बंद असते..ते का?) पण खाली जाणार आहेत हे लोकांना कळत नसावं त्या शिवाय ""खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले "" अशी वाक्य दिसली नसती..

संदीप चित्रे's picture

25 Dec 2008 - 12:16 am | संदीप चित्रे

>> पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही?
हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. उदा. औषधांचा शोध जनरल फिजिशियनने लावला नाही तरी तो ती औषधं कशी / कधी वापरायची ह्याचा योग्य सल्ला देतो (किंवा तसं अपेक्षित असतं.) आता जनरिक डॉक्टर्सची फी आपण देतोच ना... तो जी म्हणेल ती ? !!!!
--------
दुसरं म्हणजे आयटीचे पगार वगैरे हा सगळा मागणी - पुरवठा खेळ आहे.
-------
महत्वाचं म्हणजे आयटी म्हणजे फक्त programming or systems analysis or sys admin or testing or implementation असं नसतं... हे सगळं एकूण मिळून कंपनीचा / उद्योगाचा खर्च कमी करणे आणि/किंवा उत्पन्न वाढवणे ह्यासाठी कसं वापरलं जातंय ह्यावर आयटीचे खरं यश आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Dec 2008 - 9:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही.
हे थोडं मान्य आहे. पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. शिवाय आय.टी. मुळे (च ला महत्त्व आहे) हे शक्य आहे असा जो सूर वाटला तो आंतरजाल, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू इत्यादींच्या संशोधकांवर अन्यायकारक वाटला म्हणून बोलले.

खुद के सांथ बातां: व्यवहारात उपयुक्त असणार्‍या अनेक गोष्टी, वस्तू, सेवांसाठी काम करणारे अनेक लोक आहेत, बहुतांश असेच लोक इथे (आणि समाजातही) आहेत. डोक्यातला किडा शमवायला म्हणून व्यवहारात संपूर्णपणे (?) अनुपयुक्त गोष्टींवर काम करून काय आवाज चाललेला आहे तुझा?

(संगणक वापरून तारे गणणारी) अदिती

सखाराम_गटणे™'s picture

31 Dec 2008 - 10:23 pm | सखाराम_गटणे™

>>पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं.

हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही.
सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच.

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jan 2009 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही.सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच.

गटणे, उलटा विचार करा, जेनेरीक आय.टी.वाले नसते तर काय इंटरनेट, इमेल, ब्लॉगिंग, शेअरवर्स, फ्री सॉफ्टवर्स हे काही नसतंच का? थोडा हातभार असणं वेगळं असतं, (त्याला खारीचा वाटा म्हणतात) आणि "शो स्टॉपर" असणं वेगळं असतं. मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं.
कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही.

आणि हो गटणे, तुमचा कॉपीराईट आतातरी रिन्यू करा, २००९ उजाडलं.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

तुझे इतर लेख / अभिप्राय वाचून वाटत होतं कि एखाद्या क्षेत्राची व्यवस्थित माहिती नसताना तू बेधडक विधानं करत नाहीस म्हणून.

पण खालच्या वाक्यांनी तडा गेला..
"..मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं.
कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही..."

यातला पहिला क्लॉज खरा आहे. पण..

"..पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं..."
????

हे असं बेधडक विधान करायला तू कधी ऍप्लिकेशन लेव्हल - सर्व्हर लेव्हल प्रोग्रॅमिंग केलं आहेस का? हे करायला अगदीच संशोधक लेव्हलच नाही पण नक्कीच टर्नर-फिटर पेक्षा थोडं जास्त नॉलेज लागतं.
दुसरा मुद्दा, इतके शोध लागत आहेत, पेटंट्स घेतली जात आहेत मग ती सगळीच्या सगळी कमर्शियल डोमेन मधे का दिसत नाही. म्हणजे कुठेतरी संशोधकांना सुद्धा "टर्नर्-फिटर, कोंबड्या" ची गरज आहेच.. नाहीतर त्या संशोधनाचा उपयोग काय?

साधं उदाहरण.. नॅनो टेक. चा शोध लागला आहे. पण जो पर्यंत सामन्य वापरात ते येत नाही तो पर्यंत त्याचा काय उपयोग?
अशी प्रॉडक्टस तयार करण्यासाठी कुठल्याही येरा-गबळ्याला "थोडसं" ट्रेनींग देवून जॉब मिळणार आहे का? असं असेल तर आपला रेझ्यूमे पहिला. नाहीतरी प्रोग्रॅमिंग करून थोडा बोअर झालोच आहे.

झकासराव's picture

23 Dec 2008 - 4:39 pm | झकासराव

आयटी विरुद्ध नॉन आयटी असा सामना ह्याआधीच एकदा रंगुन (?) गेला आहे.
धमाल ने चर्चा सुरु केली होती. बरेच महिने झाले त्याला.
काहि फायदे काहि तोटे सगळीकडेच.
ग्रे शेड लक्षात ठेवली तर चर्चा भरकटणार नाही.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अप्पासाहेब's picture

23 Dec 2008 - 5:20 pm | अप्पासाहेब

एक जमाना होता जेव्हा 'टेल्को' तल्या झाडुवाल्याला सुध्दा १०००० पगार होता आणि त्याच वेळी ईतरत्र मैनेजर असणा-यांना ५-६००० रु मिळत. त्यावेळी का नाही आरडा ओरड झाली?

विमानाच्या पायलट्स ना भरपुर पगार असतो त्या तुलनेत यस्टी च्या डायवर ला काय पगार मिळतो?

कामाचे स्वरुप, प्रशिक्षीत माणसांची उपलब्धता , कंपनीला मिळणारा नफा ह्यावर पगार ठरत असतो.

(आयटी वाला) आप्पा.

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

अवलिया's picture

23 Dec 2008 - 5:45 pm | अवलिया

जेव्हा सगळे गाव चोरी करते तेव्हा कुणीच चोर नसते.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

अंतु बर्वा's picture

23 Dec 2008 - 10:26 pm | अंतु बर्वा

आयटी मुळे झालेले फायदे पण लक्षात घ्यायला हवेत... आज रेल्वे ची जी Centralised Reservation System आहे ज्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातुन आरक्षण करता येतं, ते याचमुळे ना...

मान्य, की पगार बाकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त मिळतो, पण कामाचं स्वरुप पाहिल्यास का ते हि लक्षात येईल....

आणी भारत आज ज्या आर्थीक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्यात थोडाफार वाटा आयटी वाल्यांचा सुद्धा आहेच की....

उदय's picture

23 Dec 2008 - 11:19 pm | उदय

>> तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा.

दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा.माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?

>>१-२ उ.दा.माहीत आहेत

अशी ही उदाहरणे आहेत बी कॉम झालेला बी ई पेक्षा जास्त कमावतो. शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.

उदय's picture

24 Dec 2008 - 4:36 am | उदय

शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.
चूक. डिमांड-सप्प्लाय, योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे, साहेबाची मर्जी असणे, चांगला ब्रेक मिळणे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही स्वत:चे मालक असाल तरच उत्तम. नाहीतर नोकरदार आणी वेश्या यात काही फार फरक नाही. फरक इतकाच की एक जण शरीर विकतो आणि दुसरा बुद्धी. एकाची किम्मत अनुभवानंतर कमी होते तर एकाची वाढते. बस्स. (Sorry for such harsh words, but I think that is reality.)

>>योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे

हे केवळ आय टी च नव्हे तर सर्वच क्षेत्रांसाठी लागु होईल.

मराठी_माणूस's picture

24 Dec 2008 - 11:58 am | मराठी_माणूस

मालक असला तरी गिर्‍हईक सांभाळावे लगते. ह्या जगात कोणीही १००% आपल्या मर्जी नुसार वागु शकत नाही.

उदय's picture

24 Dec 2008 - 5:16 am | उदय

तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.

यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा.

दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा. भारतात माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?

आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्‍यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.

मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.

ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मार्केटिंगचा माणूस पण कमिशनवर अवलंबून असतो. माल विकला नाही तर खाणार काय? माझा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एखादी नोकरी घेतो तेव्हा आपण एक रिस्क घेतच असतो की आपला पगार कसा असणार आहे ते? (फिक्ड की बदलणारा). And you cannot claim a bonus as a matter of right. पण तरीही मी म्हणेन की आयटीमध्ये बक्कळ पैसा मिळतो. आणि कष्टाच्या तुलनेत तर खूपच जास्त.

डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच).

या मताशी १००% नाही तर २००% सहमत. पण हा आयटी प्रोग्रामर किंवा टेस्टर चा दोष नाही तर Project मैनेजमेंट चा दोष आहे.

कंपनी क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(average). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात.

मॅन्युफॅक्चरींगमध्ये खूप जास्त भांडवल लागते, आय.टी. मध्ये खूपच कमी. मग तू एखादी कंपनी का सुरू करत नाहीस? आपण ज्या प्रमाणात रिस्क घेतो त्या प्रमाणात पैसे मिळणार ना? २ रा जास्त पैसे कमावतो, म्हणून आपण बोलतो (आयटी आणी बिगर आयटी) पण आपल्याला फक्त १ च बाजू दिसते (किंवा आपण १ च बाजू बघतो). बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का?

कमी कष्टात सगळ्यानाच पैसे हवे असतात, पण ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत किंवा अजिबातच नाहीत त्याना पैशाचे महत्व जास्त कळते. ज्याला जे जमते, जे पटते, ते त्याने करावे.
आपण इथे चर्चा आणी वादावादी करत बसलेलो असताना ते हैदराबादी लोक ट्रेनिंग घेऊन, खोटे resume बनवून नोकरी कशी मिळेल ते बघत असतील. काही वर्षानी मग आपण "हे गुलटी लोक इतके पुढे कसे गेले" या विषयावर चर्चा करू.

(आयटी. वाला) उदय

सुचेल तसं's picture

24 Dec 2008 - 8:21 am | सुचेल तसं

>>सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो
काहीच्या काही... आयटीमधे असणार्‍याला जर ४००००/- पगार असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चार्टर्ड अकाऊंटंटला १/३ म्हणजे १३३३३/- रुपये मिळतात. आणि जरी असं क्षणभर मानलं की असेल एखाद्या सी.ए. चा पगार कमी, तरीही १-२ उदाहरणावरुन सरसकट असं विधान नाही करता येत की सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो.

>>बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का?

असं आत्तापर्यंतच्या प्रतिसादामधे कोणीही म्हटलेलं नाही.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

बट्टू's picture

24 Dec 2008 - 12:05 am | बट्टू

खर बोललात. बरोबर लिहील आहे.

वेलदोडा's picture

24 Dec 2008 - 12:21 pm | वेलदोडा

म.टा. वर वाचलं....

''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...
...
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''

ऍडीजोशी's picture

24 Dec 2008 - 1:18 pm | ऍडीजोशी (not verified)

समय से पहले और नसीब से ज्यादा, किसी हो कुछ नहीं मिलने वाला.
- भगवान श्रीकॄष्ण

चष्मा's picture

24 Dec 2008 - 3:46 pm | चष्मा

आय टी वाल्यांसाठी

डीलीव्हरी से पेहले और तेरे म्यानेजर से ज्यादा कुछ नही मिलता !!

अमोल नागपूरकर's picture

25 Dec 2008 - 4:44 pm | अमोल नागपूरकर

सफरचन्दची तुलना सन्त्र्याशी करू नये. आयटी वाले आणि बिगर आयटी वाले दोघेही जन आपल्याला आवश्य्कच आहेत.

पाषाणभेद's picture

29 Dec 2008 - 2:00 am | पाषाणभेद

समर्थांनी सांगीतल्याप्रमाणे आय. टी. वाल्यांनी सर्व (नाते, भावना, आनंद, सामाजीक संबंध) सोडुन दिलेले असतात.
-( सणकी )पाषाणभेद

आय टी मधला जास्त पगार हा बहुतेक ग्राहक विदेशी असून ते डॉलर मध्ये पैसे देतात त्यातले अर्धे जरी इथल्या कम्पनीने दिले तरी भारतातील इतर लोकान्च्या पगारापेक्षा तो खूप जास्त दिसतो.

मी पण एक आय टी वालाच आहे.

आय टी वाल्यान्मुळे महागाई वाढली हे म्हणणे एकदम मान्य.

नीधप's picture

29 Dec 2008 - 8:23 pm | नीधप

>>डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). <<
>>दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.<<
>>अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!!
त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो...
आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! <<
जामच ओळखीचे वाटतायत वरचे तीनही मुद्दे. अर्थात शेवटचा पैशाचा उल्लेख सोडून. कुठे बरं ऐकलंय? अरे हो माझ्याच क्षेत्रात की. माझ्या बदनाम क्षेत्रात आम्ही सगळेच यातून जात असतो हो. कौतुक काय त्याचं? फक्त यातून जात असलो तरी पैसा मात्र कुणाच्या डोळ्यावर यावा इतका नाही मिळत. अर्ध्याहून अधिक ठिकाणी बुडतोच. सुरूवातीच्या काळात तर हे सगळं अति होत असतं आणि पहिला महिना संपताना पगार नाही पडत हो हातात. आणि हे काही नवीन नाही. त्याबद्दल तक्रारही नाही. अंगवळणी पडलंय. सगळे खाचखळगे, सगळे धोके, त्रास ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनच आम्ही उतरतो या क्षेत्रात. कैक वर्षं हे असंच आहे. पण ते इतकं कौतुकाचं आहे हे आयटीवाल्यांमुळेच हल्लीच कळलं.

>>जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती.<<
इतका बिचारा सूर कशासाठी?

>>जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत.<<
आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले.
>>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.<<
माझा वरचा मुद्दा सोदाहरण सिद्ध...

>>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.<<
उदाहरण क्रमांक २

>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं......
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''<<
संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी?

कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. कारण अशी हार्डशिप करतानाही आपला उदरनिर्वाहच जेमतेम सावरू शकणारे, अत्यंत चांगल्या दर्जाचे, शिक्षित एडिटर्स, साउंड डिझायनर्स, कॅमेरामन, दिग्दर्शक मी सतत पहात असते. तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो. तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती.

(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुचेल तसं's picture

30 Dec 2008 - 9:32 am | सुचेल तसं

>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं......
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''<<
>>संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी?

ज्यानी कोणी हे लिहीलं होतं ते केवळ विनोद म्हणून. हा विनोद मागे म.टा.मधे आला होता आणि प्रतिसाद देणार्‍यानि तो इथे सगळ्यांसोबत शेअर केला. कोणाचाच असा दावा नाहीये की आयटीवाले संत असतात.

>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा.<<

कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे.

>>असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं.

तुम्ही केवळ एकच बाजु पहात आहात. आयटीवाले पैशाला पसारीभर मिळतात हे वाक्यही इथेच बोललं गेलं आहे. मी (आणि प्रतिसाद देणार्‍या मित्र-मैत्रिणींनी) केवळ त्यांना आपल्या क्षेत्राबद्दल काय वाटतं ते मांडलं आहे. कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधे कष्ट घ्यावे लागतात. बाकीच्या क्षेत्रांमधेही कौशल्य लागतचं की.

>>तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं.<<

ती सर्व नोकरदारांना असते. चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई)

>>आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो<<

आम्हाला तरी कुठे पेन्शन मिळतं? रिटायरमेंट प्लॅन कोणीही घेऊ शकतं. ती काही आयटीवाल्यांची मक्तेदारी आहे असं थोडचे? तुम्ही लोकंसुद्धा ह्यात पैसा गुंतवू शकता. त्यामुळे तुमचा हा मुद्दा अगदी निरर्थक आहे.

>>तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती.

त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती.

>>(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?)

तुमच्या उत्तरांना दिलेली प्रत्युत्तरं म्हणजं तुटून पडणं खचितचं नाही. संवाद दोन्ही बाजूनी व्हायला हवा. खरं ना?

अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

कॉमेंट केली आहे म्हणून विचारतो.

>>आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. <<
कुठल्या पोस्ट मधे कुठलं वाक्यात हे सूर दिसले. ते जरा नमूद करा प्लिज.

>>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.<<

यात तुच्छता का दिसली.? तुम्ही सोदाहरण वगैरे म्हणत आहात ते का? ते कळत नाही.
".."खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साल".." ही एका नॉन्-आय टी वाल्याची कॉमेंट आहे. मी एवढच म्हणालो की "
आपण सगळेच बुडणार्‍या जहाजात आहोत. सगळ्याच क्षेत्रात मंदी आली/येणार आहे. हे अश्या कॉमेंटस लिहणार्‍याला कळत आहे का?"

>>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.<<
>>उदाहरण क्रमांक २ <<

हे तर एक प्लेन स्टेटमेंट आहे..असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यात तुमची क्षमता, कौशल्य, काहीही असु दे, तुम्हाला मानधन एकच मिळेल?
मला माहित नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता, पण तुमच्या पेक्षा कमी मोबदला मिळणार्‍यात आणि तुमच्यात काय फरक आहे? कौशल्य, क्षमता हाच फरक असेल ना? आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काही कष्ट घेतले असतीलच ना? मग तसं म्हणण्यात तुच्छता कसली आली आहे? ती फॅक्टच आहे ना?
राहता राहिला, समान कष्टांना मिळणार्‍या पैशाचा प्रश्न..आय. टी वाल्यां ना मिळणार्‍या पैशाबद्दल तुम्हाला दुस्वास नाही हे तुम्हीच म्हणत आहात. मग तुमचा मुद्दा काय?

आय. टी. वाल्यांनी त्यांना जाणवणारे कष्ट, प्रेशर नमूद केले तर चुकलं काय? तुमचं क्षेत्र कुठलं, त्यात किती कष्ट आहेत हे आम्हाला कसं माहीत असणारं? ते तुम्हीच लिहिलं पाहिजेत.

का तुम्हाला असं म्हणायचं आहे? की आय. टी. वाल्यांना भरपूर मोबदला मिळत आहे ना मग त्यांनी त्यांच्या कष्टा-प्रेशर बद्द्ल ब्र सुद्धा काढू नये? हाच जर मुद्दा असेल तर हा वाद इथेच संपला.

नीधप's picture

30 Dec 2008 - 10:27 am | नीधप

>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा.<<
कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे.<<
ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका.

>>कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधेच कष्ट घ्यावे लागतात. <<
ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की.

>>चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई)<<
आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. आम्ही अनेक गोष्टी गृहित धरून उतरतो आमच्या क्षेत्रात आणि म्हणूनच तक्रार नसते पण वरती बघावं तर तुम्हा लोकांची कामाच्या वेळा आणि कामाचं प्रेशर याबद्दल तक्रार आणि उदात्तीकरण हेच चाललंय. त्यावर आक्षेप आहे. आणि केवळ तेवढ्यासाठी माझ्या क्षेत्राचं उदाहरण दिलंय. बर सेटल झाल्यावर रग्गड पैसा मिळतो हा विनोदच करताय तुम्ही. किती तंत्रज्ञांना मालिकांच्या जोरावर रग्गड पैसा मिळतो हे जरा सांगाल का? अक्षरशः २४ तास काम करतात ते हे बघता जो मिळायला हवा तसा फार कमी वेळा मिळतो. आणि त्यातही ४-४ महिने उशीर. पैसा बुडणे, दोन कामांच्या मधे बरेच महिने बिनाकामाचे बसून रहावे लागणे, पगारी रजा, इतर पर्क्स यातलं काहीही माहित नसणे हे सगळं धरून मग विचार करा रग्गड पैसा की काय ते. मराठी चित्रपट किती प्रदर्शित होतात आणि त्यातून कोणाचा नक्की किती फायदा होतो (तंत्रज्ञांचा तर नक्कीच नाही.) याचं गणित एकदा कधीतरी बसून सविस्तर समजावून सांगेन. तूर्तास ते तुम्हाला माहित नाहीये एवढं मान्य केलंत तरी पुरे आहे. कलावंत/ तंत्रज्ञ गुणी असेल तर यश मिळेल हे मला कळत नसेल कारण मी आयटीवाली नाही असा तर तुमचा समज नाही ना झाला? अहो गुणी माणूस यशस्वी होतो ते माहितीये. मुद्दा तो नाहीये ना. मुद्दा आहे आयटीवाल्यांनी 'आम्ही ग्रेट म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आमची हार्डशिप जास्त म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात' असं मिरवण्याचा. यात प्रत्येक आयटीवाला हा गुणी आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी असतो म्हणूनच त्याला एवढा पगार मिळतो असं गृहितक मांडलेलं दिसतंय. मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत.

>>त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. <<
धारेवर मी धरलेलं नाही. तुमच्या बाजूने येणारी अनेक विधानं ही इतरांसाठी तुच्छतापूर्वक आणि तुम्हीच ग्रेट अश्या स्वरूपाची यायला लागली तेव्हा बोललेय. मिळणार्‍या पगाराच्या बळावर समाजातला एक गट इतर सगळ्यांना कमी आणि तुच्छ समजू लागतो , आपल्यापेक्षा कमी पैसा मिळणारा आपल्यापेक्षा कमी दर्जाचा असतो असं म्हणू लागतो तेव्हा अशी प्रतिक्रिया येणारच. तुम्हाला १० पट काय १००पट पगार मिळाला तरी कुणाला वाईट वाटणार नाहीये पण त्या बळावर एखाद्या शास्त्रज्ञाला, एखाद्या प्राध्यापकाला, एखाद्या चित्रकाराला, एखाद्या विचारवंताला, एखाद्या समाजसेवकाला कमी लेखणार असाल तर धारेवर धरलं जाणारच ना. प्रत्यक्षात तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः असं वागत नसालही नव्हे नसालच पण आयटीवाले ह्या लेबलखालचे अनेक जण असे वागतात हे तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो आमचा अनुभव आहे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुचेल तसं's picture

30 Dec 2008 - 11:56 am | सुचेल तसं

>>ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. <<

कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली.

>>ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. <<

आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात.

>>आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान.<<

असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही.

>>मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत.<<

त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नीधप's picture

30 Dec 2008 - 12:19 pm | नीधप

>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. <<
या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं.

>>आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात.<<
वरती अनेक ठिकाणी हा सूर दिसून आलाय आणि अनेक असे भेटलेही आहेत पण तुम्ही म्हणता म्हणून केवळ माझा चष्मा इत्यादी!!

>>असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. <<
वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात

>>त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल<<
आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही.

>>Finally I will be so matured that I will react to nothing.<<
पलायनवादाचे उत्तम उदाहरण.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुचेल तसं's picture

31 Dec 2008 - 8:48 am | सुचेल तसं

>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली.
या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. <<

मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?

तसेच

>>Finally I will be so matured that I will react to nothing.
पलायनवादाचे उत्तम उदाहरण. <<

इथे देखील तुम्ही विषयांतर करत आहे. माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. केवळ विरोधासाठी विरोध ह्या भुमिकेतूनच तुम्ही अशी विधानं करत आहात.

१० वर्षात आयुष्यभराची कमाई करणं ह्यात काय वावगं आहे? आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.

>>वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात<<

जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...

>>आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही.<<

परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नीधप's picture

31 Dec 2008 - 10:08 am | नीधप

>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?<<
उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.

>>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही.<<
दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही.

>> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.<<
याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय.

>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.

>>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...<<
मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही.

>>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. <<
असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय.

असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Dec 2008 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.

ही सिग्नेचरची ओळ अनेक महिन्यांपासून वाचल्याचं स्मरतं, बाकी या वादावादीमधे मला काही रस नाही हे मी आधीच सकारण सांगितलं आहे; तेव्हा चालू द्या.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

सहज's picture

31 Dec 2008 - 10:21 am | सहज

ही सिग्नेचरची ओळ अनेक महिन्यांपासून वाचल्याचं स्मरतं

बाकी चालू द्या.

नीधप's picture

31 Dec 2008 - 10:10 am | नीधप

>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?<<
उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.

>>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही.<<
दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही.

>> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.<<
याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय.

>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.

>>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...<<
मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही.

>>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. <<
असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय.

असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुचेल तसं's picture

31 Dec 2008 - 12:16 pm | सुचेल तसं

>>उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.

मग (विषयबाह्य असलेल...) उदाहरण दिलं तर त्याचं सुयोग्य स्पष्टिकरण पण द्यावं.. त्यावर तुम्ही बोलूच नका वगैरे ही भाषा मग्रुरी दर्शवते.

>>दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. <<

हे तुमचं परसेप्शन झालं.. कोणीही श्रेष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव केलेला नाही.

>>याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. <<

नाही ना तुम्हाला असं म्हणायचं? मग १० वर्षात आयुष्यभराची कमाई वगैरे बेसलेस वाक्यं कशाला टाकता? कमाईवर टिप्पणी करायची आणि नंतर पैशावर डोळा नाही/ त्याचं काही वाईट वाटत नाही अशी सारवासारव करायची. कृपया तुमची स्वतःची विधानं परत एकदा तपासून पहा.

>>ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.

फक्त त्याच्या आधीच्या पोस्टमधून ते मिसिंग आहे. कारण ते चुकून डिलीट झालं होतं.. पण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक पोस्टमधे आहे.

>>मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. <<

आयुष्याची कमाई किती असावी हे व्यक्तिगणिक बदलतं... तुम्ही हे विधान कसं करु शकता की अमुक माणसानी आयुष्यभराचा पैसा १० वर्षात कमावला? हे गणित तुम्ही कुठल्या आधारे मांडलं?

>>असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. <<

माझ्या कुठल्या पतिसादात मी इतरांना तुच्छ लेखलं? ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात.

ह्या वाक्याला तर काहीही अर्थ नाही. सिनेमावाले लोक वाईट असतात असंही लोक म्हणतात पण ह्याचा अर्थ तुम्ही लोक वाईट होता का? स्वतःलाच पहा विचारुन. मिळेल उत्तर.

>>असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. <<

फालतूपणा करायला वेळ नाही तर मुळात पहिला प्रतिसाद दिलाच कशाला? ह्यातूनच तुमचा खोटेपणा दिसून येतो आणि तुमचं हे वाक्यच पलायनवाद दर्शवतं...

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नितिन थत्ते's picture

31 Dec 2008 - 3:07 pm | नितिन थत्ते

सगळं फार वैयक्तिक होतंय. आवरा आपल्या स्वत:ला.

नितिन थत्ते's picture

31 Dec 2008 - 3:12 pm | नितिन थत्ते

"जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की ..."

आय टी वाले जाऊन किम्मत वाढवा असे नाही म्हणाले पण त्यांनी मागणी फुगविण्याचे काम नक्कीच केले.

हुप्प्या's picture

3 Jan 2009 - 2:38 am | हुप्प्या

आयटी मधे खूप पैसा मिळतो हे खरे आहे. सिनेस्टार, राजकारणी, मोठे शेतकरी ह्यान्च्या तुलनेत आयटी मधे जास्त लोक असा रग्गड पैसा मिळवतात. त्याला सुरवातीची गुन्तवणूकही तुलनेने कमीच लागते. जसे प्रशिक्षण, सामग्री वगैरे. पण हा पैसा काही ते गादीत शिवून साठवून ठेवत नाहीत. त्याना मिळालेली समृध्दी वेगवेगळ्या मार्गाने उरलेल्या समाजालाही मिळते. तेव्हा त्याविषयी इतके वाईट वाटू नये.
पण आयटी उद्योगात बहुतेक काम मजूरी टाईपच असते. आपण आपली स्वतःची उत्पादने बनवत नाही. इन्फोसिस वा टीसीएस ह्या बड्या लोकानी कुठले स्वतःचे उत्पादन बनवले आहे का? मला माहित नाही. तुम्हाला माहित असल्यास सान्गा. गुगलचे सर्च इन्जिन, सनची जावा भाषा, याहूचा सर्च वा मेल, सिस्कोचे राऊटर उपकरण, नोकिया वा अन्य लोकान्चा मोबाईल असले काही स्वतःचे भारतीय उत्पादन का दिसू नये बाजारात?
जेव्हा चलती असेल तेव्हा आयटीतील मोलमजुरी पैसे मिळवून देईल पण दूरगामी गुन्तवणूक हवी असेल तर आपले स्वतःचे काहीतरी बनवले पाहिजे आणि ते विकता आले पाहिजे.