इकिगाई
अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे.
*दीर्घायुषी ठणठणीत राहण्यासाठी भूकेपेक्षा ८० % च जेवा.जेवणामध्ये ताट रंगबिरंगी भाज्या फळ नैसर्गिक आंन्टीओक्सिडेंट यांनी भरू द्या.
*कार्यमग्नता देणारे काम म्हणजे ईकिगाई.आवडणार्या कामात आनंद तर मिळतोच आयुष्य सहज पूर्ण जगण्याचा फ्लो पण मिळतो.
*मल्टीटास्किंग न करता एका कार्यावर लक्ष केंद्रीत करा.
*काम अगदीच सोपे नको की आळस येईल जरा आव्हानात्मक कार्य करा पण क्षमतेच्या बाहेरचे काम घेऊन काळजीही वाढवू नका.
*सामाजिक जीवनात यशस्वी करा.मित्रांत,आप्तीयांमध्ये जा.खेळ, सामूहिक खाणपान साजरे करा, एकांतवास दीर्घ नको.
*भारतीय योगा प्रमाणेच जपानमध्येही फार महत्त्वाचे व्यायाम महत्वाचा आहे.रेडिओ ताईसो, ताई ची,क्विगोंग असे जपानी व्यायाम प्रकार लोकप्रिय आहेत जे सोपेही आहेत.
*विशेष बुद्धिझम ,कन्फुशियन्स यांचा जपानवर प्रभाव आहे,सर्वस्व त्यागाऐवजी वर्तमानात जगा!
*मूळ स्वभावापासून दूर नेणाऱ्या गोष्टी टाळा.
पुस्तक वाचताना जपान आणि भारत तुलना करता जपानमध्ये संन्यास दिसला नाही.तसेच एक
रोचक उदाहरण म्हणजे तिथली घरं लाकडाची आहेत.सर्व काही क्षणभंगुर आहे.कशातही जीव गुंतवू नका म्हणून तिथे पिढ्यांपिढ्या दिसणाऱ्या वास्तू फार कमीच आहेत असं पुस्तकात लिहिले आहे.
म्हणजेच आपली जीवनशैलीच आपले आयुष्यमान ठरवते
-भक्ती
प्रतिक्रिया
12 Apr 2024 - 7:40 pm | कुमार१
परिचय आवडला.
15 Apr 2024 - 4:36 pm | Bhakti
धन्यवाद.
12 Apr 2024 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली
छान.
15 Apr 2024 - 4:36 pm | Bhakti
धन्यवाद.
14 Apr 2024 - 10:36 pm | भागो
<<जेवणामध्ये ताट रंगबिरंगी भाज्या फळ नैसर्गिक आंन्टीओक्सिडेंट यांनी भरू द्या.>> हे वाचून माझ्या मुलीने आज "रेनबो शार्द्स" नावाची रंगी बेरंगी पालेभाजी आणून खाऊ घातली.
15 Apr 2024 - 4:36 pm | Bhakti
रेनबो शार्द्स
हे काय आहे,मी नाही पाहिली...
15 Apr 2024 - 11:14 pm | भागो
नेटवर चित्र पहा. गुगल करून. rainbow chards करा गुगळ.
14 Apr 2024 - 11:13 pm | रामचंद्र
पुस्तक वाचलेले नाही पण सतत कार्यमग्न राहणे हा एक खास जपानी स्वभावविशेषही दीर्घायुष्यासाठी कारणीभूत ठरत असावा.
15 Apr 2024 - 4:34 pm | Bhakti
होय कार्यमग्नता,हे पुस्तक वाचल्यावर मला परत एकाग्रता नव्याने मिळाली :) इकिगाई_/\_
15 Apr 2024 - 9:59 am | नचिकेत जवखेडकर
रेडिओ ताईसो(जपानीमध्ये राजीओ ताईसोs) हा प्रकार आम्ही ज्या सोसायटी मध्ये राहायचो तिकडे असायचा. बाकीही बऱ्याच ठिकाणी दिसतो. सकाळी ५:३० ला बरेच जण (विशेषतः आजी आजोबा) करायचे. एक तर सोसायटी खूप मोठी होती त्यामुळे ठिकठिकाणी स्पीकर्स असायचे त्यावरून सूचना द्यायचे ते.
15 Apr 2024 - 4:32 pm | Bhakti
हो तिथे रेडिओहून सूचना द्यायचे तसा व्यायाम करायचा,केवळ ३-४ मनिटे म्हणून रेडिओ/राजीव ताईसो s.