थोडे तांदूळ ,थोडे गहू
चला . . . कविता लिहू !
शब्द हाताशी, कल्पना मनाशी
जमते का ? .. पाहू !
सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले
अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू !
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले
येते का बाहेर ! ? .. . पाहू !
काव्य गतीचा न्याय विचित्र
मनातले लपलेले चित्र
सहज निघते बाहेर का, पाहू !
सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ?
सहज टाकला, आला नकाशा !
आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ?
----------------------
अतृप्त
प्रतिक्रिया
11 Apr 2024 - 2:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जा...! शुभेच्छा. :)
थोडे शेंगदाणे, थोडे चणे,
चला...... बसून पाहू
बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी
जमते का ? पिऊन पाहू.
-दिलीप बिरुटे
( शीघ्र कवी) :)
11 Apr 2024 - 5:07 pm | माहितगार
व्वा क्या बात है!
11 Apr 2024 - 5:19 pm | माहितगार
थोडी मटकी, थोडे पोहे
ईडली कुस्करून घालू
पिण्यास मर्री, बिअरची तर्री
चढल्यावर तसेही काय कळते
चला कॉकटेल मिसळ खाऊन पाहू
- कॉकटेल मिसळप्रेमी माहितगार
11 Apr 2024 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त...! :)
-दिलीप बिरुटे
11 Apr 2024 - 5:36 pm | Bhakti
थोडा चक्का...थोडी साखर
उठा चला श्रीखंड करा पाहू...
आमची जैरात..
https://misalpav.com/node/52059
11 Apr 2024 - 5:50 pm | माहितगार
थोडी साय.. थोडी भक्ती माया
थोडा फरसाण फक्का...सोडी पुदिना
एसपीडिपीत जरा श्रीखंड भक्तीचे घालून पाहू.. :)
कॉकटेल एसपीडिपी प्रेमी माहितगार
.
11 Apr 2024 - 8:41 pm | अत्रुप्त आत्मा
लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा
आता हिते येत नै नै नै ! :(
11 Apr 2024 - 11:00 pm | माहितगार
भरभरून दळण
येवढी तळणं
होऊन राहीली
गरम तळणात
ईतरांनी पण
त्यांच्या जिलब्या
तळून घेतली.
11 Apr 2024 - 9:32 pm | कर्नलतपस्वी
थोडे तांदूळ, थोडे गहू
थोडे उडीद, थोडे मुग
थोडे धणे ,थोडे चणे....
....................चला थोड्या
चकल्या पाडून पाहू
11 Apr 2024 - 9:42 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्तच
12 Apr 2024 - 9:08 am | कंजूस
प्रतिभा गेली.
तांब्याही गेला.
-------------
लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा
आता हिते येत नै नै नै !
आगोबाही पाहात नाही . हन्त हन्त नलिंनी गज उज्जहार का काय ते म्हणतात.
14 Apr 2024 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत, तांब्या पाणी ब्रॅंड होता.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2024 - 10:45 am | प्रचेतस
थोडे पाणी, थोडे पीठ
चला... तांब्या भरू
कढई हाताशी, जिलब्या मनाशी
पडतात का? पाहू
14 Apr 2024 - 12:23 pm | कर्नलतपस्वी
नीं पेरणा घेऊन कवीता पाडली म्हणजे महान कवीता आहे.
व्याध,क्रौंच आणी वाल्मीकी असे चित्र समोर आले.
14 Apr 2024 - 12:23 pm | कर्नलतपस्वी
नीं पेरणा घेऊन कवीता पाडली म्हणजे महान कवीता आहे.
व्याध,क्रौंच आणी वाल्मीकी असे चित्र समोर आले.
14 Apr 2024 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
-दिलीप बिरुटे
13 Apr 2024 - 10:29 am | प्रचेतस
कविता उत्तम, पण तांदूळ आणि गव्हाचा कवितेशी काय संबंध आहे हे कळाले नाही. बहुधा कवीला धान्यफराळ झाल्यावरच कविता सुचतात असे म्हणायचे आहे असे वाटते.
14 Apr 2024 - 3:38 am | चित्रगुप्त
अरे अतृप्ता,
ही कविता वाचून 'ह्यांना' दोन गोष्टी आठवल्या:
१. "दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे" -- गंगाधर गाडगीळ.
२. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" -- स.तं. कुडचेडकर ('केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक)
-- तस्मात आपली प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी केलेला, काहीसा 'दुर्बोध' वाटणारा हा 'प्रयास' प्रशंसनीय आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे.
-- ताईसाहेब फुर्सुंगीकर.
14 Apr 2024 - 7:43 pm | कंजूस
अहो कवी,
अशी हाणा की टीकाकारांची ***** बंद होईल.
14 Apr 2024 - 8:58 pm | प्रमोद देर्देकर
ऑ चक्क इतक्या दिवसांनी कवी महाराजांनी काव्य प्रसवले.
ऍक्टिव्हधारी बुवा काडी टाकू का?