लेखक-असीम अमोल चाफळकर
सध्याच्या युगात जैविक संशोधन हे येणार्या पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे.त्यासाठी नवीन तंत्रज्ञान त्यांचा वापर कसा केला जातो हे पुस्तकात सांगितले आहे.
ज्याप्रमाणे भाषा हे संवादाचे, माहितीचे साधन आहे.जी मानवनिर्मित असते.तसेच निसर्गनिर्मित भाषा डीएनए जिची मुळाक्षरे AGCT/U आहेत.या मुळांपासून संपूर्ण सजीवांचा उत्क्रांती पासूनचा ग्रंथच जीनोम स्वरूपात लिहिला गेलाय.जो अभ्यासाठी सिक्वेन्सिंग, डेटाबेस हे महत्त्वाचे टप्पे आहेत.जे या पुस्तकात रोचक पद्धतीने सांगितले आहे.
सर्वप्रथम डीएनए म्हणजे काय कसा बनतो.त्यापासून पुढे प्रथिने वगैरे सांगितले आहेच पण जंक /रद्दी डीएनए बद्दल भरपूर उहापोह केला आहे.पुढे संगरने रचिला पाया थर्ड जनरेशन सिक्वेन्सिंग झाला कळस उक्ती सार्थ करणारा सिक्वेन्सिंग/अनुक्रमण पद्धती स्पष्ट केली आहे.ते तंत्रज्ञान इतके प्रगत होत गेले की काही लाखांचा खर्च काही हजारांत आणि हातावर मावेल इतक्या छोट्या यंत्रापर्यंत पोहचला आहे.पुढच्या प्रकरणात ही जनुक अनुक्रमण माहिती एकत्रित करण्याची पद्धत डेटाबेस जीनबैंक एनसएंबल कसे काम करतात हे सांगितले आहे.
पुढील तीन प्रकरणात शास्त्रज्ञांच्या मुलाखतीद्वारे जनुककोशशास्त्र आणि समावेशी सजीवसृष्टी, कृषिक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रातील त्याचे उपाययोजना अनेक उदाहरणं सहित वाचण्यासाठी मनोरंजन आहे.
जसे मुंगी कशाप्रमाणे कित्येक कोटी वर्षांपासून बुरशीची शेती करते.
कशाप्रकारे 'क' जीवन सत्व करण्याची क्षमता मानव हरवून बसला.
लुकाचा जनुककोश शोधायचे प्रयत्न ,काही अंतराळात,रेडिएशन मध्ये जगू शकणार्या सर्वशोशिक जीवांचे जनुककोश कसे फायदेशीर होऊ शकतील.
कृत्रिम जनुककोश -न्यूनतम जनुककोश तयार करतानाच प्रवास म्हणजे केवळ आवश्यक प्रथिने/घटक तयार करणरेच जनुकं वापरत जास्तीचे जनुक कमी करत जाणे.
QTL अनुक्रमण हे जीबी आणि जनुककोशशास्त्र द्वारे सहज होऊन नवीन वाण तयार होण्याचा काळ ८-१० वर्षांहून कमी होत २-३ वर्षे होऊ शकतो हे स्पष्ट करतना भारतीय हरभरा पिकाचे संशोधन खोलवर सांगितले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात सार्स चे वेगवेगळे ७३ प्रकार COVIDSeq पद्धती कशी विकसित केली गेली दिसून येते.
लेखक असीम चाफळकर यांनी सद्य स्थितीतील जनुककोशशास्त्रातील संशोधन,त्यातील भारतीय संशोधक केंद्र CSIR,PUSA तेथील संशोधकांचे यांचे मोलाचे योगदान समजतेने दृष्टीस पाडले आहे.
पुस्तकात इंग्रजी शब्दांसाठी अनेक मराठी शब्द लीलया सुंदर पद्धतीने वापरले आहेत.जनुकोशशास्त्र हा शब्द आधी जनुकसंचित जरासा क्लिष्ट होता.तसेच क्लाऊड साठी माहितीमेघ,म्युटेशनसाठी उत्परिवर्तन,मैक्रोमोलिक्यूल महारेणू ,बेसपेअर स्केल-जनुकीय मोजपट्टी,प्रायमेट कपीकूळ. आकर्षक मुखपृष्ठ पुढेही योग्य अशी असंख्य छायाचित्रे, तुलनात्मक तक्ते यांची रेलचेल आहे.
खुप दिवसांनी आधुनिक संशोधनपर पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले.
-भक्ती
प्रतिक्रिया
7 Feb 2024 - 8:26 pm | भागो
पुस्तकाचा परिचय आवडला. पुस्तक वाचणार विशेषतः मराठी प्रतिशब्दांसाठी.
11 Feb 2024 - 7:38 am | प्रचेतस
थोडक्यात पण चांगला परिचय.
11 Feb 2024 - 11:41 am | टर्मीनेटर
पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, ई-बुक स्वरूपात मिळाल्यास वाचतो!
11 Feb 2024 - 11:58 am | कंजूस
परिचय आवडला.
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये.
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?
11 Feb 2024 - 10:16 pm | Bhakti
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल.
मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.
12 Feb 2024 - 3:04 pm | Bhakti
कोणती?
बहूप्रतिक्षित युवाल हरारीचं सेपियन्स वाचतेय.आपल्या पूर्वजांविषयीच आहे.छान आहे.
17 Feb 2024 - 7:29 am | कुमार१
परिचय आवडला.