मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
20 Dec 2008 - 4:06 pm

मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !
मैत्रीण मैत्रीण नाव आहे.
माझ्या मनाच एक गाव आहे
तिच्याशिवाय कुणासासाठीही न उघड्णारं
या गावाला एक दार आहे !

नको शब्द नको यमक
तिची साथ फक्त हवी आहे
लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात
आमच वेगळ विश्व आहे !

निर्मळ मनाचे पाप नको अन
वासनेच्या कुशीतल पुण्यही नको
आमच्या दोघान्च्या मैत्रीला
चंद्रावरल्या हरणाचाही डाग नको !

ह्या विश्वाच्या अंतापर्यंत
आपली मैत्री माझ्या ह्रदयात राहणार आहे
आणी कल्पांतानंतर माझ मन
आपल्या अम्रुतमयी मैत्रीची
गाणी गाणार आहे !

< अनिरुद्ध>

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 6:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चंद्रावर हरीण आहे? :o

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2008 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

>>चंद्रावर हरीण आहे?
== आता ह्याचे उत्तर आपल्याशिवाय अजुन चांगले कोण देउ शकणार ?

>>लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे !
== बघा बघा अजुन पेज ३ , बघा अजुन दोस्ताना (हे अंमळ आपणास "खा खा मटार उसळ खा, शिकरण खा" अशा पु.ल. शैलीची आठवण करुन देईल पण त्यास आमचा नाइलाज आहे. आमचा जन्म उशिरा झाला नाहितर ... )

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

20 Dec 2008 - 10:10 pm | संदीप चित्रे

मला वाटतं अनिरूध्दला लहानपणीची आठवण आली असावी... माझ्या काकाचे मित्र दोन्ही कानांच्या इथे डोक्याला धरून मला उचलायचे.. चंद्रावरचं हरीण दाखवतो सांगून !! मग चंद्रावर हरीणच काय पूर्ण प्राणिसंग्रहायलय दिसायचं !!! :)
---------
बाकी -- अनिरूद्ध ... कविता चांगली आहे.. हमें उम्मीद है कि आपको एक अच्छी सहेली जल्दही मिल जायेगी... तबतक कविता पढेंगे .. हम लोग :)

चतुरंग's picture

21 Dec 2008 - 8:55 am | चतुरंग

हमें उम्मीद है कि आपको एक अच्छी सहेली जल्दही मिल जायेगी... तबतक कविता पढेंगे .. हम लोग

'हमलोग' मालिकेच्या सुरुवातीला दादामुनी ज्या प्रकारे पॉजेस घेऊन म्हणायचे ना त्या थाटात म्हणायचं आहे! ;)

चतुरंग

अमोल जाधव's picture

20 Dec 2008 - 6:33 pm | अमोल जाधव

खरच सुन्दर कविता आहे.

साखरांबा's picture

20 Dec 2008 - 6:46 pm | साखरांबा

लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे !

लिंगभेद नसता तर प्रजोत्पादन झाले असते काय? :>
लिंगभेद हाच मानवी जीवनाच्या पुनरुत्पादनाचा पाया आहे. L)
खरेतर समागम हेच जीवनात सर्वांत मोठे तत्वज्ञान आहे. गांधीवाद, अद्वैतवाद वै. सगळे झुट आहे. :B

सुंदर ललनांचा,
साखरांबा

प्राजु's picture

20 Dec 2008 - 10:31 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

21 Dec 2008 - 8:51 am | विसोबा खेचर

वा! एक वेगळीच कविता. वाचतान अंमळ मौज वाटली..

तात्या.

मदनबाण's picture

21 Dec 2008 - 8:57 am | मदनबाण

व्वा.मस्त कविता.. :)

(विश्वामित्र) ;;)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -