सासरेबुवा

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
20 Dec 2008 - 11:18 am

सासरेबुवा

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची कथा,
अहो काय तुमची कथा?
तुमची होते गंमत
मात्र आमची होते व्यथा.
अहो काय तुमची कथा.

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची शिस्त,
अहो काय तुमची शिस्त?
एकावेळी नाश्त्याला
दोन कोंबड्या फस्त.
अहो काय तुमची शिस्त?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची करणी,
अहो काय तुमची करणी?
तुमच्या आकारापुडे
फिकी पडते बरणी.
अहो काय तुमची करणी?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची पोट,
अहो काय तुमची पोट?
एकावेळी लागतात तुम्हाला
चार जणांचे कोट.
अहो काय तुमचे पोट?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमच्या मिशा,
अहो काय तुमच्या मिशा?
आता कळले सासुबाई
घाबरतात कशा.
अहो काय तुमच्या मिशा?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमचा राग,
अहो काय तुमचा राग?
भुक लागली म्हणुन तुम्ही
भाजुन खाल्ला वाघ.
अहो काय तुमचा राग?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमचा रुबाब,
अहो काय तुमचा रुबाब?
आमच्या सुखी संसारात
तुम्ही हड्डी आम्ही कबाब..
तुम्ही हड्डी आम्ही कबाब...

यातिल काही ओळी मी एका नाटकामध्ये ऐकल्या होत्या, त्यांमध्ये आणखी काही ओळी जोडुन हे विडंबन केले आहे.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

20 Dec 2008 - 11:53 am | स्वाती फडणीस

मस्त..

मिंटी's picture

20 Dec 2008 - 1:02 pm | मिंटी

>>यातिल काही ओळी मी एका नाटकामध्ये ऐकल्या होत्या, त्यांमध्ये आणखी काही ओळी जोडुन हे >>विडंबन केले आहे.

अंकुश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यातिल काही ओळी या प्रशांत दामलेंच्या नाटकातील आहेत ( बहुदा चार दिवस प्रेमाचे )....पण त्या प्रशांत दामले त्यांच्या सासुला उद्देशुन म्हणतात - सासु बाई सासु बाई काय तुमचा तोरा......

असो.

पुलेशु

अंकुश चव्हाण's picture

20 Dec 2008 - 1:31 pm | अंकुश चव्हाण

अगदी बरोबर, म्हनुनच तर मि याला विडम्बन म्हणालो. हे संपुर्ण माझे नाही हे मी आधिच कबुल केले आहे.