पाहू

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
13 Dec 2023 - 3:53 pm

एकदा भेटून पाहू
ये पुन्हा बोलून पाहू

मागचे विसरुन सारे
भूमिका बदलून पाहू

क्रोध, मत्सर, मद वगैरे
षडरिपू टाळून पाहू

पावतो बाप्पा म्हणे हा
चल नवस बोलून पाहू

बस जरा साथीस 'नाहिद'
ही गझल गाऊन पाहू

gazalगझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2023 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात मस्त.

एकदा भेटून पाहू
ये पुन्हा बोलून पाहू

मागचे विसरुन सारे
भूमिका बदलून पाहू

सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू.
भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ?

-दिलीप बिरुटे
(भेटीगाठींची मोडतोड झालेला)

सामान्य माणूस's picture

13 Dec 2023 - 5:15 pm | सामान्य माणूस

ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल.

मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय.

एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले.

चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू
आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू
आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ

साधी आणि बंदिस्त! आवडली! पुलेशु.