थेटरमध्ये पाहिलेेले इंग्रजी सिनेमा

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
13 Sep 2023 - 3:08 pm

दोन हजार सालापर्यंत चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागत. तिकिटांचे दर कमी असत. चित्रपट पाहणे, हे दुर्मीळ होते त्यामुळे त्याला सामान्य माणसाच्या भावविश्वात मोलाचे स्थान होते. मराठी, हिंदी चित्रपट चित्रपटगृहात खूप पाहिले. हा लेख चित्रपटगृहात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांवर व त्यावेळच्या भावविश्वावर.
Twenty thousand leagues under the sea हा लहानपणचा पहिला चित्रपट पाहायला माझे काका घेऊन गेले होते. युनिव्हर्सल सर्टिफिकेट असल्याने मुलांनी पाहायला हरकत नव्हती. त्यातला ऑक्टोपस हा प्राणी लक्षात आहे. Black stallion हाही चित्रपट नातेवाईकांसह पाहिला होता. खरं म्हणजे, पाहिला नव्हता कारण सुरवात झाल्यावर मला झोप लागली होती. घरी आल्यावर मी नातेवाईकांना ष्टोरी विचारली. काळा घोडा आपल्या मालकाचे प्राण वाचवतो, असे सांगण्यात आले. अजून मोठे झाल्यावर It is a mad mad world पाहायला आम्ही शाळकरी मुले मुले सायकलवरून गेलो होतो. तुफान हसवणारा हा सिनेमा पाहताना थेटरात मुलांचा हल्लागुल्ला सुरु राहिला. स्वतंत्रपणे सायकलवरून जाणं, मध्यंतरात गोळ्या चॉकलेट घेणं हेही तेव्हा जबरदस्तच होतं.
कॉलेजमध्ये गेल्यावर Home Alone पाहिला. चित्रपट तुफान गाजत होता त्यामुळे तिकिटांकरता रांगाच लागलेल्या होत्या. ब्लॅकने तिकीट विक्री सुरु होती. यातल्या बालकलाकाराने सुरेख काम केले आहे. याच सिनेमातल्या एका सीनवरून लक्ष्मीकांत बेर्डेच्या माझा छकुला सिनेमातला सीन तयार केला आहे, याच्याशी वाचक सहमत होतीलच. Jaws- 3, Jurassic Park, Mask, Volcano, Species, Twister, Golden Eye, Indecent Proposal, My fair lady हे सिनेमेही कॉलेजमधे असताना पाहिले. Jaws च्या वेळेस सुरुवातीला बराच काळ मासा येतच नाही. समुद्रकिना-यावरच्या एकवस्त्रांकित मुलामुलींची इंग्लिश पध्दतीची गंमत सुरु राहते. ज्यांच्यासोबत मी गेलो होते, ते उद्गार काढत होते – काय फसवणूक आहे. माशाचा चित्रपट आणि दाखवतात काय! Jurassic Park, Twister, Golden Eye यातली भव्यता पाहायला थेटरच हवे. Basic Instinct हीही त्याच काळातला. या सिनेमाच्या वेळी तीन मुली माझ्या रांगेपुढे एखादी रांग सोडून बसल्या होत्या. उबदार सीन्स सुरु झाल्यावर त्या अस्वस्थ व्हायच्या. अखेर, चित्रपट पूर्ण न पाहता त्यांनी थेटर सोडले. Mummy, Runaway Bride, Deep blue sea हे कॉलेज संपल्यानंतर पाहिले गेले. Mummy मधले किडे, Deep blue sea मधला माशाचा हल्ला विसरता येत नाही. नोकरी लागल्याने हाती थोडेफार पैसे असायचे. घरी पॉकेटमनी मागायची गरज राहिली नव्हती. अजूनही दोन तीन इंग्रजी थेटरमध्ये पाहिले गेले. Thin Red Line हा युध्दावरचा दर्जैदार सिनेमा होता. सैनिक देशासाठी लढत असतात पण त्यांचे माणूस म्हणून असलेले मनोव्यापार हा चित्रपटाचा गाभा होता.
हॉलिवूडने गांभीर्याने सिनेमा बनवलेले असतात व ते भव्य दर्शन आपल्याला केवळ दहा पंधरा रुपयांत होते याची जाणीव सतत होता आली. एक इंग्रजी चित्रपट पाहणे, ही साध्या प्रेक्षकाकरता तर खूप मोठी मिळकत असतेच असते पण अभ्यासकाच्याही हाती एक मोठे भांडार लागते.
पुढे इंटरनेट आले. घरबसल्या अनेक चित्रपट पाहता आले. पैसे वाचवणे, रांगेत उभे राहून आगाऊ तिकिटे काढणे, चित्रपट पाहायाला मिळणार आहे, या आनंदातले व पाहून आल्यानंतरचे आनंदी क्षण आता संपल्यात जमा आहेत

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2023 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता इंग्रजी सिनेमे थेटरात जाऊन पाहणे जवळ जवळ ना के बराबर. महाविद्यालयीन काळात आमच्या संभाजीनगरात क 'मोहन' टॉकीजला इंग्रजी चित्रपट असायचे. काही 'बघायला' मिळावं त्याचबरोबर, आपल्याला कोणी बघत तर नाही ना अशी भिती असायची. आता वयपरत्वे आवडी-निवडी बदलल्या. आंतरजालाच्या सुविधांमुळे ब-यापैकी डब सिनेमे बघायला मिळतात. इंग्रजी सिनेमांमधील 'अडकले सुटले' या टाइपचे सिनेमे आवडतात. माहिती असतील तर, लिंकवावे. काल असाच 65 बघितला. आवडला.

-दिलीप बिरुटे

इंग्रजी सिनेमांमधील 'अडकले सुटले' या टाइपचे सिनेमे आवडतात.

ऑ? काय हो हे सर.. !? अर्धवट वयातील तरुण मुलांच्या मनात शरीरशास्त्राविषयी गैरसमज निर्माण करणारे असे वक्तव्य?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2023 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अडकलं सुटलं' अशा शब्दांमुळे आपला गैरसमज झालेला दिसतो.
वयपरत्वे जालजेष्ठांना अशा शब्दजाणीवा 'आनंद' देतात,

इंजॉय करा. ;)

-दिलीप बिरुटे

वयपरत्वे जालजेष्ठांना अशा शब्दजाणीवा 'आनंद' देतात,

साहित्य संमेलनाचे वेध लागलेले दिसतात...!!! ?? यंदा काय रूपरेषा? जेवण वगैरे मेन्यू कसा असेल?

एक दिवस तर जिलबी मठ्ठा फिक्स असेल.

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:32 pm | अहिरावण

मसाले भाताचे काय?

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:31 pm | अहिरावण

कोणाला कसा आनंद वाटेल हे काय सांगता येत नसते.

प्रचेतस's picture

14 Sep 2023 - 11:31 am | प्रचेतस

तुम्ही 65 चं 69 असं वाचलेलं असावं कदाचित.

तो जोक महत्प्रयासाने टाळला होता रे प्रचु...

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 9:44 am | केदार पाटणकर

आभार.

सिरुसेरि's picture

16 Sep 2023 - 2:26 pm | सिरुसेरि

या लेखाच्या निमित्ताने आता अस्तंगत होत चाललेल्या एक पडदा थिएटर्सच्या आठवणी ताज्या झाल्या .

https://www.misalpav.com/node/36903

मीही इंग्रजी चित्रपट खूप पाहिले डोंबिवलीतच ('८५ पासून)मॅटिनीला. जाण्यायेण्यात वेळ जायचा नाही.१ रुपया तिकिट, जाहिराती नाहीत. सवा तासाचा चित्रपट. जुने गाजलेले . २०००साली नवी पिढी आली. त्यांना आवडणारे सिनेमे सुरू झाले. जाकी चानचे किंवा त्या टाइपचे. तीच टकाटक मारामारी. कंटाळा आला.
'७० ते '८५ मुंबईत रीगल,मेट्रो येथे पाहात असे. अर्धा दिवस वाया जायचा सवा तासाच्या चित्रपटासाठी.
हिंदी सिनेमा एक पाहिला. शोले. त्यातल्या पहिल्या रेल्वेसीनसाठी. म्हणजे स्टेरिओ साउंड साठी. मग उगाचच बसलो. पुढे कंटाळवाणा झाला. दुसरा गांधी सिनेमा. नाविन्य नव्हते. फक्त कसे दाखवले तेवढेच महत्त्वाचे. जेवढे दिग्दर्शक येतील तेवढे गांधी बनू शकतात. (महाभारत सारखे).

आता टिवीवरच सिनेमे पाहायला मिळतात. पण जेम्स बॉण्डचे पाहतो त्यातल्या पहिल्या धावपळीच्या सीनसाठी. इतर अमेरिकन साईफाई,हाईफाई,स्टारवार छाप काही आवडत नाहीत. होम अलोन आणि बेबी'ज डेआऊट म्हणजे कोणत्यातरी चानेलला सतत लूपमध्ये चालूच असतात. अगदी बोअरिंग. कार्टून आवडतात उंदिर मांजर आणि डॉ बदक स्क्रूज. कंजूस बदककाका.

हल्ली पिक्चर आवडत नाहीत. डॉक्युमेंटरी आवडतात. चानेलवाले यूट्यूबवर टाकतात नंतर. त्यामुळे कधीही पाहता येतात.

मुक्त विहारि's picture

17 Sep 2023 - 9:22 am | मुक्त विहारि

टिळक टाॅकीज मध्ये, Morning Shows असायचे

स्वस्त तिकीट आणि हिंदी चित्रपटांच्या पेक्षा उत्तम कथा आणि स्टंट सीन्स

आता,

हाॅट स्टार आणि नेटफ्लिक्स जिंदाबाद...

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2023 - 10:28 am | कर्नलतपस्वी

१९७७ साली बहिणीच्या लग्नाची खरेदी साठी पुण्यात आलो होतो ते व्हां थेटरात बघीतलेला शेवटचा चित्रपट. कलाकार :निळू फुले, सरला येवलेकर, रविंद्र महाजनी, उषा नाईक, रत्नमाला, वसंत शिंदे, राम नगरकर, माया जाधव.

नंतर मात्र थेटरात कधीच सिनेमा बघीतला नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2023 - 2:07 pm | अमरेंद्र बाहुबली

का हो काका? बाहुबली, ऊरी, तानाजी हे तरी पहायलाच हवे होते ना?

तिमा's picture

23 Sep 2023 - 7:32 am | तिमा

मी १९६० पासून इंग्रजी चित्रपट पाहाण्यास सुरवात केली. त्यावेळी गाजलेले, सॅमसन अँड डिलायला, क्वोवाडिस, द प्रिन्स हु वॉज ए थिफ, नाईटस ऑफ द राऊंड टेबल, बेनहर, ड्र्म्स ऑफ डेस्टिनी, नेकेड प्रे, क्लिओपात्रा, द मॅग्निफिसंट सेव्हन, हातारी आणि असे असंख्य अविस्मरणीय चित्रपट पाहिले. सुदैवाने त्या लोकांनी अजुनही ते चांगल्या स्थितीत जपुन ठेवले आहेत आणि नेटवर त्याचा पुनर्प्रत्यय घेता येतो.

अहिरावण's picture

23 Sep 2023 - 1:30 pm | अहिरावण

प्रत्येक जण आपापल्या काळात वावरत असतो आणि तेच त्याला हवे असते

मुक्त विहारि's picture

23 Sep 2023 - 5:19 pm | मुक्त विहारि

जेम्स बाॅन्ड (अभिनेत्यांची आवड कमी जास्त होणारच)

आणि

डाय हार्ड सिरीज

अपवादानेच नियम सिद्ध होतो, असे ऐकीवात आहे ..

तिमा's picture

24 Sep 2023 - 7:04 am | तिमा

१९६० पासूनचे (किंवा त्याही आधीचे)चित्रपट आवडतात म्हणजे आत्ताचे आवडत नाहीत असे नाही, टेक्निकसाठी आत्ताचेही आवडतात. काळाबरोबर राहिला नाहीत तर शेवटी पैलतीराला कसे जाणार ?

चित्रगुप्त's picture

23 Sep 2023 - 9:52 pm | चित्रगुप्त

प्रत्येक जण आपापल्या काळात वावरत असतो आणि तेच त्याला हवे असते

-- अगदी खरे. हा 'आपला काळ' काही बाबतीत बाळपणाचा, तारुण्याचा, अमूक एका जागी रहात असतानाचा वगैरे असतो, तर काही बाबतीत इतिहासातील आपल्या आवडत्या व्यक्तींचा, घटनांचा, कलेचा, संस्कृतीचा वगैरे असतो. काही बाबतीत भविष्याबद्दलच्या कल्पनांमधे रमणेही आपल्याला आवडत असते.

कॉमी's picture

25 Sep 2023 - 9:29 am | कॉमी

माझ्या लहानपणी हॅरी पॉटर चे सिनेमे येत होते. पाहिले तीन सिनेमे घरी DVD वर पाहिले, कारण ते मी अगदी लहान असताना आलेले. पण, घरी वडील आणि भावंडांना, आणि त्यानंतर मला पण, हॅरी पॉटरचा प्रचंड नाद होता. त्यामुळे हॅरी पॉटरचा सिनेमा आला की लागलीच पुढच्या रविवारी सिनेमाला जायचे हे ठरलेले असायचे. (अर्थातच हिंदी डब. आता नवीन सिनेमे डब बघायचे नसतात पण हॅरी पॉटर आजही हिंदीतच मस्त वाटतो.) GOBLET OF FIRE हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. काय तो ड्रॅगन, काय ती पाण्याखालची शोधाशोध, काय तो वोल्डी. अजूनसुद्धा वॉर्नर ब्रदरसचा मोठा मोठा होणारा लोगो बघून आपसूकच सरसावून बसायला होते.
गंमत म्हणजे माझ्या शाळेतली काही मुलं होती, वेगवेगळ्या वर्गातली, ते सुद्धा हमखास दर सिनेमाला आमच्याच शोला त्यांच्या आई वडिलांसह दिसत. शाळेत एकमेकांशी काहीही बोलणे व्हायचे नाही, पण एक कनेक्शन आपोआप तयार झाले होते हॅरी पॉटर सिनेमांनी.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2023 - 6:11 pm | मुक्त विहारि

जबरदस्त गारूड

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Sep 2023 - 9:27 pm | अमरेंद्र बाहुबली

द लेडी ओफ हीवन पहा. :)

का हो, तुमचा आवडता सिनेमा आहे का ?
बाकी ते हिवन नाही हेवन असते.