कावळ्यांची फिर्याद -२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
8 Sep 2023 - 6:16 pm

कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.

संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....

पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.

कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.

लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
हिन कर्म,पाप त्याचे,शाप आपल्या माथी गेला मारूनी.

काय कळते बाळकांना, काही बाही सांगतो,
घर आमुचे शेणाचे,म्हणूनी आम्हां हिणवतो.

कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाय,हिन आम्हां लेखतो....
कशाला शाप देवू गुरांना, अन्नदाते आमुचे, सदैव उपकृत मानतो

आवळा देऊन कोहळा....,थंड पिंड देऊनी पुण्य गाठी बांधतो !!!!.
मेल्यावर ही खाऊ न देतो,छळ आपुला मांडतो.

असलो एकाक्ष तरी नजर आमची तीक्ष्ण ती.
भविष्याला वेधणारे एक चाणाक्ष आम्हींच की !!!!.

माऊलींनी सन्मान केला,सोन्याने मढविले पाऊ......
उद्धरली कोटी कुळे आमुची,प्रेमाने संबोधले काऊ.

नव्या युगाचे,नव्या दमाचे,घडवून आणू क्रांती
भविष्य अपुले उज्ज्वल करूया, मिटवून पुराणातल्या भ्रांती

कावळ्यांची भरली होती सभा.....

उकळीकैच्याकैकविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 Sep 2023 - 6:20 pm | कंजूस

भारीच लिहिता.

कावळ्यावर कविता, ही कल्पना पण भारी, आणि कविता पण भारी.
कावळ्याबद्दल असलेल्या म्हणी, वाक्प्रचार वगैरे पण प्रतिसादात द्यावा की हो द्येवा.

अहिरावण's picture

9 Sep 2023 - 2:22 pm | अहिरावण

वा वा

अशीच एक सांप्रत इंग्रजी राज्य आणि त्यांच्या न्यायप्रियतेचे गुणगान करणारे काही कावळे आहेत त्यांच्यावर येऊ द्या असे सुचवतो.