ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
3 Jan 2008 - 12:53 pm

लोकहो,

आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत. ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय. या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा, ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत.

आज, याच विषयावर, ज्योतिषांकडे जातांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल सांगतो.

साधारणपणे ज्योतिषांकडे माणूस जातो, तेव्हा त्याच्या काही समस्या असतात. जसे डॉक्टरांकडे जाणार्‍या माणसाला काही आजार सतावत असतो, तसेच ज्योतिषांकडे जाणार्‍या माणसाला जीवनाच्या विविध अंगात काही समस्या भेडसावत असतात. त्या समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्याचे निराकरण व्हावे, अशी त्याची इच्छा असते. काही वेळा माणूस पेचात सापडलेला असतो. हे करू की ते करू? असे त्याला वाटत असते. अशा द्विधा मनस्थितीत त्याच्यासाठी योग्य गोष्ट कुठली हे जाणून घेण्यात त्याला स्वारस्य असतं म्हणून तो ज्योतिषाची वाट धरतो.

पण अनेकदा असे होते की, त्याला त्याच्या समस्यांचे योग्य उत्तर मिळत नाही. काही वेळा काही गोष्टी विचारायच्या राहून जातात. काही वेळा काही संदर्भ त्याला उमजत नाहीत. काही वेळा ते ज्योतिर्विद अत्यंत उथळ वक्तव्य करतात असे त्याला समजते, त्यांच्या एकूणच ज्योतिषविषयक ज्ञानाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते, असे होऊ नये, यासाठी ज्योतिषांकडे जातांना कोणत्य़ा गोष्टी पाळल्या पाहिजेत ते येथे थोडक्यात क्रमवार सांगतो म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल.

सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जातांना आधी त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या माणसाला आपली पत्रिका दाखवतो आहोत, त्या माणसाकडे ज्ञान आहे का? त्याचे समाजातील स्थान काय आहे? लोकांचा त्यांच्याबद्दलचा अनुभव काय आहे? याचा विचार करूनच त्या ज्योतिषाकडे जावे.

केवळ पेपरात किंवा दूरदर्शनवर जाहिराती दिल्या, म्हणजे कोणीही ज्ञानी होत नसतो. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

"बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे. " असे दादा (सुरेश भट) म्हणायचे.

तुम्ही जेव्हा एखाद्या ज्योतिषांचा सल्ला घेता, तेव्हा आयुष्याच्या अनेक महत्वाच्या बाबी त्यांच्यासमोर उघड करीत असता. त्या उघड करण्याइतपत तो माणूस विश्वासार्ह आहे का? याची आधी चाचपणी करा.

एकदा ही प्राथमिक चौकशी झाल्यावर, ते ज्योतिर्विद आपली पत्रिका दाखवायला "लायक" आहेत याची खात्री झाली ( आम्ही "लायक"हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे) की त्यांची रितसर भेटीची वेळ ठरवून घ्या आणि मगच त्यांना त्या वेळेत जाऊन भेटा. "आलं मनात की गेलं दुकानात" अशी भूमिका ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत चालत नाही. रितसर appointment घेतांना तुम्ही आधी स्वत:पाशी वेळेचे पर्याय निश्चित करून घ्या. तुम्ही कोणत्या वेळेस त्यांच्याकडे जाणार आहात हे groundwork तुम्ही स्वत: केले पाहिजे. ते कसे करायचे ते सांगतो.

ज्योतिषांची appointment घेण्याआधी आपण स्वत: पंचांग पहावे. ज्यांना पंचांग पाहता येत नसेल त्यांनी खेद मानण्याचे कारण नाही. कारण आता मराठी कॅलेंडरवर तिथी आणि इतर माहिती तारखेच्या रकान्यात दिलेली असते. त्यासाठी स्वत:चा फार मोठा ज्योतिषविषयक अभ्यास असायला हवा, असे काही नाही.

तर पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये तुम्हांला ज्या दिवशी जायचे आहे त्या दिवशी कोणती तिथी आहे ते पहा. कृष्ण चतुर्दशी, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदा या दिवशी आयुष्यात कोणालाही पत्रिका दाखवू नका.

याचे कारण हे दिवस अत्यंत अशुभ समजले जातात. कृष्ण चतुर्दशीचा उत्तरार्ध, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदेचा पूर्वार्ध या दिवसात शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तुघ्न अशी अत्यंत वाईट करणे सुरू असतात. (करण म्हणजे काय- स्थिर आणि चर करण काय असतं, याची माहिती आम्ही इतरत्र दिलेली आहे ती वाचावी). शुद्ध प्रतिप्रदेला केवळ घटस्थापनेसारखी देवकार्येच करायची मुभा आहे. पण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्या भानगडीत सर्वसामान्य माणसाने न शिरता, सरळ या तीन तिथी वर्ज्य कराव्यात, म्हणजे प्रश्न मिटला.

त्याचप्रमाणे हे दिवस सोडून इतर दिवशी जेव्हा विष्टि हे करण असेल तो दिवसही वर्ज करावा. विष्टि करणही अशुभ आहे. पंचांगात "भद्रा निवृत्ती" असे लिहून त्या समोर वेळ दिलेली असते ती हे विष्टी करण संपण्याची वेळ असते. त्यावरून विष्टि कधी संपते ते समजते.

त्याचप्रमाणे पंचांगात जेथे करिदिन असे लिहिलेले असते तो दिवसही वर्ज करावा. ग्रहण दिवस, अयन दिवस ( म्हणजे उत्तरायन आणि दक्षिणायन सुरू होते तो दिवस) भावुका अमावास्या आणि होळी यांच्या पुढील दिवसाला करिदिन म्हणतात. तो सर्व शुभकार्यास वर्ज्य आहे. त्या दिवशी पत्रिका घेऊन कोणाकडे जावू नये.

वरिल दिवस वगळता शुभ दिवस पाहून ज्योतिषांच्या भेटीची वेळ मागून घ्यावी. भेटीची वेळ मागतांनाच ज्योतिषांची दक्षिणा किती हे विनासंकोच विचारून घ्यावे. म्हणजे ती आपल्याला योग्य वाटते का नाही, हे ठरवून त्यांच्याकडे जायचे की नाही हे ठरविता येते. काही ज्योतिषी दक्षिणा किंवा मानधन आधी सांगत नाहीत. तुमच्या इच्छेप्रमाणे द्या असे मोघम उत्तर देतात. अशा वेळेस, "मला योग्य वाटेल आणि परवडेल एवढी मी दिली तर चालेल का?" असे स्पष्टपणे विचारावे. हे विचारण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही.

एवढे झाले की त्यांचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, इमेल इत्यादी गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. जाण्याच्या दिवशी सकाळी एकदा फोन करून आपल्या भेटीची वेळ सांगून "अमुक अमुक वाजता मी येतो आहे, तुम्ही वेळ दिली आहे", हे सांगून खात्री करावी. काही वेळा ज्योतिषी आयत्या वेळेस दुसर्‍या कामास जातात आणि आपली appointment बोंबलते. आता नवीन पिढीतले ज्योतिषी वेळेच्या बाबतीत बरेच काटेकोर झाले आहेत पण काही जुन्या लोकांना time management जमत नाही. त्यांच्यामुळे आपली खेप फुकट जायला नको, म्हणून सकाळी फोन करून खात्री करावी.

भेटीची वेळ घेतल्यावर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे प्रश्न तुम्हाला भेडसावत आहेत, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवे आहे, त्या गोष्टी एका कागदावर नीट क्रमवार लिहून ठेवा. हे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे कुणीही करीत नाही. हे लिहून झाल्यावरही तुम्हाला काही विचारण्यायोग्य मुद्दे सुचण्याची शक्यता आहे. मुद्दा सुचला की तो नमूद करून ठेवा. नाहीतर होतं काय, की लोक जातात, जे तिथे सुचेल ते विचारतात आणि मग तिथून बाहेर आले की विचार करतात, "अरेच्च्या, हे विचारायला हवं होतं, ते विचारायचं राहूनच गेलं" वगैरे वगैरे.

मग त्या राहून गेलेल्या गोष्टींसाठी ते ज्योतिषांना फोन करतात. ज्योतिषी एका दिवसात अनेक कुंडल्या पहात असतात. त्यामुळे तुम्ही फोन केल्यावर तुमची कुंडली त्यांच्या नजरेसमोर येईलच याची खात्री नाही. अशा वेळेस काहीतरी मोघम उत्तरे ऐकून घ्यावी लागतात. हा झाला एक भाग.

दुसरा भाग म्हणजे, तुम्ही जेव्हा या गोष्टींसाठी फोन करता, तेव्हा दुसरा कोणीतरी त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या घेऊन त्या ज्योतिषांसमोर बसलेला असतो. तुमच्या अनाठायी फोनमुळे ज्योतिषांचं लक्ष त्याच्या कुंडलीवरून विचलीत होतं. आणि त्या बिचार्‍याला उगाचच अप्रत्यक्षपणे तुमच्या फोनचा त्रास होऊ शकतो. कल्पना करा, तुम्ही ज्योतिषांसमोर तुमची पत्रिका घेऊन बसला आहात आणि आधी येऊन गेलेला माणूस तुम्ही तेथे असतांना, फोनवरून त्याच्या राहिलेल्या प्रश्नांविषयी विचारतोय. काय अवस्था होईल तुमची?
असे होऊ नये म्हणून सर्व प्रश्न एका कागदावर लिहून ठेवा.

एवढे केलेत म्हणजे ज्योतिषांकडे जाण्याची पूर्वतयारी झाली. ज्योतिषांकडे गेल्यावर काय करावे हे आता सांगतो.

वर उल्लेख केलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर ठरलेल्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमची पत्रिका घेऊन
ज्योतिषांकडे जाता, तेव्हा तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांची सूची , बरोबर काही रिकामे कागद आणि पेन इत्यादी गोष्टी अवश्य सोबत घेऊन जा.

कागद आणि पेन एवढ्यासाठी की समाजातील काही जणांचे हस्ताक्षर अत्यंत खराब असते. त्यांनी लिहिलेले आपल्याला वाचताही येत नाही. ही समस्या आमच्या बाबतीत नेहमी निर्माण होते कारण, आमचे हस्ताक्षर (देवनागरी, रोमन आणि उर्दू या तीनही लिपीतील) अत्यंत सुंदर असल्यामुळे, इतरांचे हस्ताक्षर थोडे जरी खराब असले तरी त्यांचे लेखन वाचणे आम्हाला फार कंटाळवाणे वाटते. म्हणजे तो मजकूर वाचायला सुरूवात करताच आमचा मूड़च जातो. त्यामुळे आपण आपल्या सुवाच्य हस्ताक्षरात ते ज्योतिर्विद काय सांगतात हे लिहून घेणे हेच श्रेयस्कर ठरते.

एकदा ठरलेल्या वेळी त्यांच्या स्थळी पोहोचल्यावर, सुरूवातीस परिचय, नमस्कार वगैरे सोपस्कार दोन तीन मिनीटात पूर्ण होतात. त्यावेळेस तेथे गर्दी नाही याची खात्री करा. फार लोकांच्या कोलाहलात पत्रिका दाखवणे हे जातकाला जड जाते. नाहीतर असेही ज्योतिषी आहेत की, आठदहा जण एकाच वेळी तेथे बसलेले असतात आणि त्यासर्वांना ते एकाच वेळी attend करत असतात. असे जर कोणी तिथे असेल तर त्यांना सांगा की, माझे वैयक्तिक विषय मला इतरांसमोर उघड करायचे नाहीत. एक तर त्यांना नंतर बोलवा किंवा मी थोडा वेळ थांबतो. पण हा वेळ केवळ माझ्यासाठी तुम्ही दिलेला आहे. त्यामुळे इथे इतर लोक असणे प्रशस्त नाही"

हे प्रकार सर्वांकडे होतात असे नाही. उत्कृष्ट time management ज्याला जमतं तो माणूस कोणाला कधी बोलवायचे याची योग्य आखणी करू शकतो. आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा जर एखाद्या व्यक्तिला सायंकाळी ४ ते ५ ही वेळ दिलेली असेल तर त्यावेळेस अन्य कोणालाही बोलावत नाही. आगंतुकासारखे कोणी आल्यास त्यांना योग्य त्या शब्दात या गोष्टीची आम्ही जाणीव करून देतो. त्यांना भेटीची दुसरी वेळ देतो. पण ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त आम्ही कोणालाही बोलवत नाही आणि इतरांना त्याच्या वेळेवर अतिक्रमणही करून देत नाही.

परिचय झाल्यावर, तुम्ही तुमच्या समस्या नेमक्या शब्दांत ज्योतिषांना सांगणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण आपले symptoms त्यांना सांगतो. तसे निश्चित काय स्वरूपाच्या समस्या आहेत या कुंडली पाहण्याआगोदर ज्योतिषांना सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांची line of thinking ही अधिक अचूक ठरते. कोणत्या स्थानाशी, कोणत्या ग्रहाशी समस्या निगडित आहे हे समजल्यावर त्या स्थानाकडे पाहण्याची सूक्ष्मता वाढलेली असते. समजा एखाद्या व्यक्तिला व्यवसायात काही समस्या आहेत, हे एकदा ज्योतिषांना सांगितले की सहाजिकच त्यांचे बारिक लक्ष द्वितीय षष्ठ आणि दशम स्थानावर असते. डॉक्टरना आपण अमूक ठिकाणी वेदना आहे हे सांगितल्यावर तो भाग ते जास्त काळजीपूर्वक तपासतात. असं कोणी डॉक्टरांना म्हणत नाही की, मी तुमच्यासमोर उभा आहे. आता तुम्हीच शोधून काढा मला काय होताय ते आणि त्याचा इलाज करा. नेमकेपणाने आपली समस्या सांगितली की त्यांच्या विचारांना दिशा मिळते. त्यांच्या उर्जेचा प्रवाह त्यावर केंद्रित होतो. तसेच पत्रिका पाहण्यापूर्वी आपल्या समस्या ज्योतिषांना सांगितल्या की त्यांची सूक्ष्मदृष्टी संबंधीत बाबींवर केंद्रित होते.

हे झाल्यावर तुम्ही तुमची कुंडली ज्योतिषांना द्या. आम्ही स्वत: इतर कुंडल्यांवर विसंबून रहात नाही. तर त्या व्यक्तिच्या जन्मवेळेचा तपशील सॉफ्टवेअरवर टाकून त्याची कुंडली आमच्या संगणकावर बनवतो. कारण सॉफ्टवेअरवर बनविलेल्या कुंडल्या अधिक अचूक असतात. त्या अधिक सूक्ष्मही असतात. त्यामुळे भाकितातील अचूकता वाढते. त्याचप्रमाणे ज्योतिषांनी त्याच्या संगणकावर तुमची कुंडली ठेवल्यामुळे, पुढे कधीही काही समस्या असल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास फोनवरून सर्व सल्ला देता येतो. फोनवर कुंडलीतील घरे त्यांच्या राशी त्यांच्यातील ग्रह हे सांगत बसणे वेगळे आणि मी अमुक अमुक जरा माझी कुंडली पहा हे सांगणे वेगळे. दुसरी गोष्ट म्हणजे जो ज्योतिषी संगणकासारख्या साधनांचा उपयोग करतो तो जास्त organised असतो. त्याची या शास्त्रावरील श्रद्धा, बांधिलकी आणि उत्तरदायित्व अधिक असतं. म्हणूनच तो त्याच्या क्षेत्रात अधिकाधिक उत्तम गोष्टी आणण्याचा प्रयत्न करीत असतो.

अचूकतेची कास धरल्यामुळे भाकितात फरक येतो. हाताने बनविलेल्या अनेक कुंडल्या चुकीच्या असल्याचे आम्ही पाहिलेले आहे. विशेषत: चंद्र २७ अंशाच्या पुढे एखाद्या राशीत असतांना अनेकदा रास चुकलेल्या पत्रिका आमच्या समोर आलेल्या आहेत. एवढेच काय आमची स्वत:ची रास आमच्या एका विद्वान नातेवाईक ज्योतिषांनी बनविलेल्या कुंडलीत सिंह दिली आहे, जी खरेतर कर्क आहे. आम्ही त्यांनाही दोष देत नाही कारण टिळक आणि इतर पंचांगात अश्विन्यारंभ बिंदूवरूनच मतभेद आहेत. असो.ते जाऊ द्या.

सांगण्याचा मुद्दा हा की, शक्यतो संगणकावर बनविलेली कुंडली आपण घेऊन जावी किंवा त्या ज्योतिषांना जन्मवेळेचा तपशील देऊन त्यांच्या संगणकावर आपली कुंडली बनविण्यास सांगावे. पण कित्येकांच्याकडे संगणक असेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे जातांना आपण आपली संगणकावर तयार केलेली कुंडली सोबत घेऊन जाणे इष्ट.

हल्ली दोनशे रुपयात संगणकावर "सखोल" कुंडली बनवून मिळते. साधी कुंडली पन्नास/साठ रुपयात करून मिळते. पण त्यात फक्त लग्नकुंडली, राशीकुंडली आणि ग्रहदशा एवढीच माहिती असते. तशी न बनवता अधिक पैसे देऊन एकदाच सखोल कुंडली बनवून घ्यावी ज्यात वरील गोष्टींसोबत इतर विविध कुंडल्या म्हणजे नवमांश, त्रिशांश, होरा, द्रेष्काण, विदशा, ग्रहयोग, षडवर्गबल यांची इत्यंभूत माहिती असते.

ही कुंडली एकदा त्यांच्यासमोर ठेवली की आपण गप्प बसावे. त्यांना ती बारकाईने अभ्यासण्यासाठी संधी द्यावी. यावेळेस वायफळ बडबड करून त्यांचे लक्ष विचलित करू नये. कारण इथे तुमच्या कुंडलीचा खरा अभ्यास सुरू झालेला असतो. तुमचे लग्न आणि तुमची रास यावरून तुमच्याबद्दल काही गोष्टी ते ज्योतिषी ठरवत असतात. मधूनच ते तुमच्याकडे पाहतात. तुमच्या लग्नस्थानात असलेल्या ग्रहाची खूण तुमच्या चेहर्‍यावर आहे का याची खात्री करतात. कोणत्या लग्नाला कोणते ग्रह तारक आहेत कोणते ग्रह मारक आहेत त्याचे आडाखे ते मनात बांधतात. पत्रिकेत कोणता ग्रह कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात आहे हे ते पाहतात. त्यानंतर स्थाने पहायची असतात. प्रत्येक भाव तपासायचा असतो. तो भाव, त्याचा कारक ग्रह कोणता, तो कुठे आहे, त्याची कुंडलीतील स्थिती काय आहे, त्या भावात कोणती रास आहे, त्या भावाचा भावेश कुठे आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे, त्याच्या सोबत कोणते ग्रह आहेत, तो मित्रराशीत आहे की शत्रूराशीत, त्याच्यावर कोणते योग आहेत, त्याचा कोणाशी परिवर्तन योग आहे, कुंडलीतील प्रत्येक ग्रहाचे इतरांशी योग कोणते आहेत, युती कोणाची, लाभयोग कोणात आहे, केंद्रयोग कोणात आहे, प्रतियुती कोणाची आहे, षडाष्टक कोणाचे आहे, जन्मनक्षत्र कोणते, जन्मत: महादशा कोणाची होती, त्यातील भुक्त किती, भोग्य किती, एक ना अनेक गोष्टी बघायच्या असतात.

या सर्व गोष्टी नीट पाहण्यासाठी किमान वीस मिनीटे लागतात. त्याकाळात ते काही प्रश्न विचारतात. त्यांची नेमकी उत्तरे आपण द्यायची असतात. त्यावरून त्यांना विचारांची दिशा गवसत असते. कुंडलीचा दर्जा समजत असतो. अशा वेळेस फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यापलिकडे आपण काहीही करू नये. आपण अनावश्यक बाबी बोलून त्यांच्या विचारप्रक्रियेत अडथळे आणत असतो याची जाणीव अनेकांना नसते.

गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना ते आम्हाला श्री. नारायण राणे यांनी केलेल्या विधानांबद्दल सांगत होते. एकदा झालं दोनदा झालं, तिसर्‍यांदा जेव्हा ते म्हणाले की, "पंत, नारायण राणे मुख्यमंत्री होतील का?"

तेव्हा आम्ही त्यांना सांगितले " अहो, तुम्हाला आम्ही तुमच्या कुंडलीबाबत सल्ला द्यावा की श्री. राणे यांच्या कुंडलीबाबत? त्यांना जे काही करायचे आहे, ते करायला ते समर्थ आहेत. तुम्ही कशाला ते प्रश्न इथे उपस्थित करता आहात? तुम्ही तुमची कुंडली घेऊन आमच्याकडे आला आहात, तर तिचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आवश्यक तेवढी एकाग्रता साधू द्या की". तर असे होते.

एकदा ज्योतिषांनी कुंडलीचा संपूर्ण अभ्यास केला की ते तुम्हाला सांगतात की, "विचारा आता". तेव्हा तुमची प्रश्नांची यादी काढून एक एक प्रश्न त्यांना विचारावा. प्रश्न विचारल्यावर ते काय सांगत आहेत ते नीट समजून घ्यावे. न समजल्यास पुन्हा पुन्हा विचारावे. महत्वाचे मुद्दे आपल्या अक्षरात लिहून घ्यावेत. एका एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले की पुढील प्रश्नाकडे जावे. अशा रितीने आपले सर्व प्रश्न त्यांना विचारून आपले संपूर्ण शंकासमाधान करून घ्यावे. पुन्हा पुन्हा त्यांना फोन करावा लागणार नाही याची काळजी घ्यावी.

शेवटी आपण काय काय करायला हवे ते विचारावे. ते जे काही थोडक्यात सांगतील ते नमूद करून ठेवावे. त्यांनी अमुक अमुक तारखेपर्यंत अमुक अमुक गोष्ट करू नका असे सांगितले असेल तर त्या तारखा आपण नीट नमूद केल्या आहेत याची खात्री करून घ्यावी.

सर्व शंकांचे समाधान झाल्यावर त्यांची ठरलेली दक्षिणा म्हणा वा मानधन देऊन त्यांचा निरोप घ्यावा. सांगितलेल्या गोष्टींचा पडताळा येईल तेव्हा त्यांना अवश्य फोन करून कळवावे. त्यामुळे ज्योतिषी आणि जातक यांच्यातील स्नेह वाढीस लागतो.

वरील गोष्टींबरोबर, आपल्या कुलदैवताचे आणि कुलस्वामिनीचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे. त्यांच्या नावाने घरात पूजापाठ करावा. सदगुरूंकडून जर मंत्र घेतला असेल तर त्याची साधना करावी.

या सर्व शक्ति अडचणीच्या वेळेस आपल्याला मार्गदर्शन करीत असतात.

आपला,
(साधक) धोंडोपंत

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

माझे त्यांनी(धोंडोपतन्नी) सांगीतलेले भविष्य जूळले नाही,M.D.मिळ्ण्यासाटी २०१२ डिसेंबर नंतर चांगला वेळ आहे,असे सांगीतले होते,पण मला जुने २०१२ मधेच चांगली, हवी असलेली ब्रांच मिळाली( rank बराच मागे असुनही,बहुदा पाचवा गुरुमूळे),आणी चेपू वर ते IPL match चा निकाल आधीच सांगत(बहुदा के.पी पध्द्तीप्रमाणे,काही वेळा चुकल्यावर्,त्यांनी त्याचे खापर match फि़कसींगवर फोड्ले होते....( "मूलाने सान्गंतलेले match फि़कसींग चे आरोप खरे असावेत असे आम्हस वाटु लागले आहे" हे त्यांचे शब्द होते)

अशी चुकलेली उदाहरणे कधीच समोर येत नाहीत तर गोमयवत् कारणे सांगून दडपली जातात. इथेच कौंटर एग्झांपल सांगितल्याबद्दल बहुत धन्यवाद.

माझे दीर्घ प्रतिसाद टंकण्याचे श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद!!

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2013 - 1:31 pm | पिलीयन रायडर

हो.. हे शक्य आहे की खापर फोडायला इतर बरीच कारणे मिळतात.. तुम्ही त्यांच्याकडे पैसे परत मागितले का? किमान स्पष्टीकरण तरी की का चुकले त्यांचे भविष्य? (विचारले असल्यास तुम्हाला काही तोडगा सांगितला असेल आणि तुम्ही तो केला नसेल म्हणुन तुमचीच चुक.. वगैरे उत्तर मिळाले का ?)

बाकी आपल्या बोलण्यातच आपल्या प्रश्नाचे उत्तर असते हे मात्र खरे. खुपदा त्याने हिंट मिळते. ते पट्ट्या पाहुन भविष्य सांगणार्‍या कडे एकदा काय सांगतात ते ऐकायला गेले होते (दुसर्‍याचे भविष्य..माझे नाही) तेव्हा ह्या प्रकाराची साक्ष पटली..
"तुमचे नाव ए, डी, एम पैकी कशाने सुरु होते का? "
नाही ..
"बर मगं.. के, पी, एल ??" & सो ऑन...
अरे काय चेष्टा आहे काय!!!

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 2:18 pm | बॅटमॅन

नाडी????????????? अरेरेरे....

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2013 - 2:42 pm | पिलीयन रायडर

भोग हो.. आणखीन काय?
माझा राहु / केतु वक्री असणार तेव्हा म्हणुन चांगले २ तास वाया गेले माझे...!!

vrushali n's picture

10 Oct 2013 - 2:25 pm | vrushali n

मी त्यांना ना पैसे परत मागीतले ना स्पष्टीकरण....उलट मी खूश होते,की त्यांच भविश्य चुकले आणी मला चांगली ब्रांच मिळाल्याने...पण मला मिलींद चितम्बर सरांचा खुप चांगला अनुभव आलाय्,त्यानी वर्तवलेले ९९% भविश्य खर निघालय्,आणी
तेहि चकटफु.....त्यामुळे मी तरी भविश्य कोण सांगत ह्यावर भर देते,काय सांगते पेक्शा...कारण ईन्टर्र्प्रीटेशन करणारा महत्त्वाचा अस्तो...

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2013 - 2:40 pm | पिलीयन रायडर

नाही.. मला अशासाठी विचारावं वाटलं की आपलं किती भविष्य बरोबर आलं हे जर कुणी इतकं डिट्टेलवार लिहीत असेल आणि "मला गरज नाही जातकांची" इतका जर आत्मविश्वास असेल तर असे लोक आपलं चुकलं हे कळाल्यावर काय करतात? तितक्याच बेधडकपणे त्याला सामोरे जातात का? आणि जी फिस घेतात *(जी पुष्कळ असेल असा माझा अंदाज आहे) ती परत देतात का?

vrushali n's picture

10 Oct 2013 - 3:03 pm | vrushali n

चांगले १६०० रूपये घेतलेत हो... फिस परत मिळणार नाही हे आधीच सांगीतले जाते..माझ खरच चुकले हो...त्यांना फीड बॅक द्यायला हवा होता....आता April 12 ची गोश्ट असल्याने आणी एण्ड भला तो सब भला असा विचार केल्याने राहूनच गेल हो..

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2013 - 3:09 pm | पिलीयन रायडर

मुद्दामच विचारलं कारण माझा (दुसर्‍या एका प्रसिद्ध ज्योतीषाबाबतीत) असा अनुभव आहे की त्यांचे भविष्य चुकले. मला काही पैसे नको होते, पण तुम्ही सांगितले ते चुकले एवढेच सांगायला फोन केला तर त्या माणसाने अभुतपुर्व तमाशा केला. की कसं तुमचच चुकलं आणि माझं काहीही चुकलेलं नाहि..तुम्हीच मी सांगितलं ते सगळं केलं नाही...
प्रसिद्धी मिळाली की माणसं उद्दाम आणि असंवेदनाशील होतात हे पाहायला मिळाले. (कारण भविष्य चुकल्याने अर्थात घरात हिरमोड झाला होता. अगदि ज्योतीषाकडेही गेलो एवढी ती बाब गंभीर होती.. त्याचे ह्यांना काहिच नाही.. "मी चुकलो नाही" हाच घोष)

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 3:19 pm | बॅटमॅन

असे अनुभव जितके ओपनली मांडले जातील तितकेच लोकांचे या बिनबुडाच्या थोतांडावरचे अवलंबणे कमी होऊन त्या लफंग्यांना जरा शिस्त लागेल अशी आशा व्यक्त करतो.

vrushali n's picture

10 Oct 2013 - 3:36 pm | vrushali n

तूमचा अनुभव वाचुन..मला खात्री आहे,ह्या मोठमोठ्या नावांना फसुन बरीच जनता लुबाडल्या जात असणार.....पण ईतक्या लोकांच बरोबर येत आणी आपलच नाही म्हणजे आपलच नशीब खोट म्हणुन लोक गप्प बसत असतील....आणी चमच्यांची ह्यांना कमी नसतेच म्ह्णुन ह्यांचे दुकान चालू रहात्.

यातच त्यांचे फावते. एकतर भाराभर रक्कम घ्यायची आणि असे चुकीचे काहीबाही सांगायचे. त्यांना माहिती असते की ९९% लोक काय का चुकले म्हणून विचारणार नाही. कोणी विचारले तर तोडगा, मंत्र म्हणण्यात तुम्हीच चुकलात असे सांगून त्यांना कटवायचे.

दक्षिणा म्हणून काही कमी रक्कम घेतात का ते? साधा नारळ कुसका निघाला की दुकानदाराला परत करतात, मग ज्योतिषांना तो न्याय का लावू नये?

vrushali n's picture

10 Oct 2013 - 3:05 pm | vrushali n

पण काय करणार...गरजवंताला अक्कल नस्ते म्हणतात ना...

सुहासदवन's picture

9 Oct 2013 - 5:22 pm | सुहासदवन

डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत.

चुकते पण डॉक्टर आणि ज्योतिषी ही तुलना कशी करता येईल.

दोन डॉक्टरांचे एकाच रोगाचे निदान जुळत नाही असे शक्यतो होत नाही. हे मी चांगल्या डॉक्टरांबद्दल बोलतोय.
कारण त्या निदानासाठी लागणारा विदा हा त्यासाठी केलेल्या चाचण्या, रोग्याची लक्षणे ह्यांवर आधारित असतो. केवळ तुम्ही सांगताय म्हणून डॉक्टर तुम्हाला औषध देणार नाही. ह्या चाचण्या कोणत्याही दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत केल्या तरी येणारा रीपोर्ट जवळ जवळ सारखा असतो.
अगदी रोग एक असला आणि दोन वेगवेगळे रोगी असतील तरी दोन वेगवेगळे डॉक्टर तुम्हाला जवळ जवळ एक सारखेच औषध देतील, औषधाच्या कंपन्या वेगळ्या असतील पण औषध नाही. तसेच ह्या चाचण्या का करायच्या आणि हे औषध का घ्यायचे ह्या साठी त्यांच्याकडे ठाम कारण असते.

डॉक्टरांबाबत बोलायचं तर वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा आणि वाव आपण सांगू तरी शकतो. ज्योतिष विद्येच्या मर्यादा सांगा बघू. कोणताही ज्योतिषी आपल्या शास्त्राच्या मर्यादा कधीही सांगत नाही
वैद्यक शास्त्र कुठे कमी पडत असेल तर डॉक्टरला वेळ आणि रोग्याला पैसा द्यायला.

वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना?

होते पण म्हणूनच विज्ञानाच्या सहायाने ह्या चुका व्यवथित शोधून त्या चुका वर्षानुवर्षे अत्यंत कमी केल्या गेल्या आहेत, त्याचा विदा देखील उपलब्ध आहे.
ज्योतिषी किंवा जोतिष जास्तीतजास्त अचूक होत आहे ह्याचा काही विदा कुठे आहे काय?

धोंडोपंत काही उत्तर द्यायला येणार नाहीत हे नक्कीच, किमान युयुत्सूंना तरी बोलवा कोणीतरी इथे. की ते पण पळपुटेपणाच करणार?

सूड's picture

9 Oct 2013 - 6:03 pm | सूड

रोचक चर्चा !!

देशपांडे विनायक's picture

9 Oct 2013 - 7:11 pm | देशपांडे विनायक

श्री ज्ञानेश्वर यांची कीर्ती वाढत जात आहे
हिटलर ,स्टालिन यांची दुष्कीर्ति वाढत आहे
असे योग पत्रिकेत दिसून येतात का ?

कपिलमुनी's picture

10 Oct 2013 - 12:56 pm | कपिलमुनी

यापैकी पंतप्रधान कोण होणार..
याचे भविष्य सांगितले पाहिजे ;)

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2013 - 1:13 pm | श्रीगुरुजी

>>> यापैकी पंतप्रधान कोण होणार..

नजीकच्या काळातील लोकसभा निवडणुकीनंतर मोदी किंवा राहुल या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही असे माझे ज्योतिष सांगते.

माझा ज्योतिष शास्त्रा वर विश्वास आहे . ज्योतिषां वर नहि. आता खरे ज्योतिशि रहिलेत कुथे

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 3:09 pm | बॅटमॅन

काय तो हंबरडा, वा गं म्हशी!

विटेकर's picture

10 Oct 2013 - 3:22 pm | विटेकर

चोक्कस !
अवांतर : तुमची सही मला आवडली !

विटेकर's picture

10 Oct 2013 - 3:23 pm | विटेकर

म्हशी याना आहे.

बाळ सप्रे's picture

10 Oct 2013 - 3:48 pm | बाळ सप्रे

आता खरे ज्योतिशि रहिलेत कुथे

मग जोतिष शास्त्र (??) खरं हे ज्ञान तुम्हाला कुठुन मिळालं??
नामस्मरणातून समजलं का???

अहो नामस्मरणातून मनासारख्या गोष्टी होत नसतात. घडणार्‍या गोष्टी मनासारख्या वाटत असतात.

बाळ सप्रे's picture

10 Oct 2013 - 4:00 pm | बाळ सप्रे

रच्याक

म्हशींना चालते का जोतिष ? ("म्हशींना चालते का होमीपदी?" या चालीवर..) :-)

`अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?' विचारता येत नाही. सांभाळा!

>>म्हशींना चालते का जोतिष ?

आहो न चालायलां कांय झालंय !! शांती, जपजाप वेळच्यावेळी केलेनीत म्हणजे झालं !! ;)

एकदा कोल्हापूरला पुण्यावरून खूप प्रसिद्ध ज्योतिषी आला व त्याने शाहू महाराजांचे भविष्य सांगण्याकरिता राजवाड्यात गेला त्यावेळी महाराजांनी त्यांच्या शिपायाला त्याला घेऊन जायला सांगितले व रात्री शिपायांनी त्याला मारले सकाळी महाराज त्याला भेटायला आले व म्हणाले पुण्यावरून इकडे येताना इथे आल्यावर तुला मार मिळणार आहे याचे भविष्य का कळले नाही तर तू माझे भविष्य काय सांगणार म्हणाले .

प्रसाद१९७१'s picture

10 Oct 2013 - 6:21 pm | प्रसाद१९७१

धोंडोपंत दिवसाला ५-१० पत्रिका तरी बघत असतील, पण त्यांच्या ब्लॉग वर फार च कमी भविष्य बरोबर आल्याची पत्रे आहेत. १०० लोकांना परदेशी जाण्याचा महिना सांगीतला तर ५ लोकांसाठी ते भविष्य बरोबर च येणार.

परिंदा's picture

10 Oct 2013 - 6:28 pm | परिंदा

एकुणच त्यांचा ब्लॉग पाहाता, जाहिरातबाजी जरा जास्तच केली आहे असे मला वाटते. ते सचिन आणि केसरी ट्रॅवेल्स कसे पेपरात अर्धपानी लेख लिहून जाहिरात करतात. तसेच हे पण अश्या मोजक्या भाकितांना जालावर प्रसिद्ध करुन जाहिरात करतात.

लोकही त्यांना भुलतात. असो, लोकांकडे एवढी अक्कल असती तर ते ज्योतिषाकडे का गेले असते? :)

मग जोतिष शास्त्र (??) खरं हे ज्ञान तुम्हाला कुठुन मिळालं??

भौतिकशास्त्र , रासायान्शात्र, जीवशास्त्र हे ज्ञान तुम्हाला कुठून मिळाला? ह्या शास्त्रांवारचा प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचला आहे का?
प्रत्येक प्रयोग करून बघितला आहे का?

बॅटमॅन's picture

21 Oct 2013 - 5:31 pm | बॅटमॅन

बाकी काही म्हणा म्हशीची म्हशीगत विचार विण्याची क्षमता उत्तम आहे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Oct 2013 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले

ह्या म्हशीने नुकताच "तो" धागा वाचला असावा ;)

बॅटमॅन's picture

24 Oct 2013 - 2:34 pm | बॅटमॅन

हा हा हा अगदी अगदी =))

म्हशींना चालते का जोतिष ?

आहो न चालायलां कांय झालंय !! शांती, जपजाप वेळच्यावेळी केलेनीत म्हणजे झालं !!

म्हणजे काय? अर्थहिन प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वताची बुद्धी प्रगल्भपणे वापरायची युक्ती शोधा

राजलक्श्मी रविन्द्र्नाथ's picture

24 Oct 2013 - 2:15 pm | राजलक्श्मी रविन...

श्री धोंडोपंतांशी सम्पर्क करावयाचा आहे.
e mail id किवा mobile नम्बर मिळु शकेल का?

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2013 - 3:43 pm | प्रकाश घाटपांडे

http://dhondopant.blogspot.in/ ला भेट द्या

प्रसाद गोडबोले's picture

24 Oct 2013 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले

काहीही म्हणा पण हा ब्लॉग इतका भारी आहे की बस्स ! मराठी शब्द सुचेना "एईस्थिटीकली प्लीझंट" !

ब्लॉग वाचुन , त्यातले काही अनुभव वाचुन .... स्वतःच ज्योतिष शिकावे अन (किमान स्वतःपुरता तरी ) एकदा ह्या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावावा असे वाटु लागले आहे !!

(अवांतर : मुंबै 'ऑथेंटीक' ज्योतिष कुठे शिकायला मिळेल ? )

मृत्युन्जय's picture

24 Oct 2013 - 4:49 pm | मृत्युन्जय

ज्योतिषाच्या फार नादी मीही लागत नाही. पण ओळखीतल्या एकांना लग्नाचे वर्षच काय तारीख वार देखील २ वर्षे आधी अचुक सांगितल्याचे माहिती आहे. त्याच व्यक्तीने माझ्याही बाबतीत काही ठोकताळे सांगितले होते ते अगदी खरे ठरले.
वडिलोपार्जित घरात मूळपुरुषाच्या पादुका सापडतील हे एकांनी सांगितले होते. साधारण दिशादेखील सांगितली होती. आमचे वडिलोपार्जित घर आम्हालाच ठिकसे माहिती नाही (काकाला माहिती आहे) तर त्या ज्योतिष्याला कुठुन माहिती असणार? पण त्याची माहिती खरी ठरली. या २ -३ गोष्टी निव्वळ योगायोग असु शकत नाहित त्यामुळे भविष्य हे अगदी १००% जुळणारे शास्त्र नसले तरी विद्या आहे असा विश्वास वाटतो. तरीही मी ज्योतिष्याच्या वाटेला जात नाही कारण समजा किती ही खरे जरी असेल तर ज्योतिषी जे होणार तेच सांगणार ना? मग ते असेही होणारच. ते आधीच जाणुन घेण्यासाठी वेळ आणि पैसा कशाला खर्च करावा? आयुष्यात सरप्राइजेस मिळण्यात मजा आहे. आयुष्य आधीच जाणुन घेतले की सगळी मजाच संपेल की.

तिखट's picture

22 Feb 2014 - 2:54 pm | तिखट

हेच धोंडोपंत काही वर्षांपूर्वी ज्योतिष शास्त्राच्या विरोधात लेखन करत होते. तेव्हा त्यांचे टोपण नाव धोंडो जोशी असे होते. आता त्यांच्यात मतपरिवर्तन झालेले दिसत अहे. http://www.scribd.com/doc/100132091/Dhondo-Astrologer

प्रकाश घाटपांडे's picture

22 Feb 2014 - 4:16 pm | प्रकाश घाटपांडे

ऑ! ही काय भानगड आहे. ते त्यांचे २००४-०५ मधील विचार दिसतात. आमच्यासाठी ही बाब नवीनच आहे. असो. आता आम्हालाही भीती वाटू लागली आहे

भीती कसली वाटु लागली आहे?

माझ्यामते ते धोंडोपंत अतिशय हुशार आहेत. मार्केट मध्ये जी गोष्ट चालते तिचा पुरेपुर वापर करुन पैसे मिळवत आहेत. आधी ज्योतिष, मग स्वामी (महाराष्ट्रभरचे जातक) आणि आता साई (भारतभर जातक)!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2014 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

@आधी ज्योतिष, मग स्वामी (महाराष्ट्रभरचे जातक) आणि आता साई (भारतभर जातक)! >>> +++++१११११

आत्मशून्य's picture

22 Feb 2014 - 4:26 pm | आत्मशून्य

प्रकरण आहे...!