मिपावर मनस्वी लिहायचे त्यापैकी एक होता
होता म्हणवायचे धजत नाही
जे वाट्टेल, ते लिहायचा !
भेटणे न भेटणे वेगळे , पण स्पर्श करून गेला
यकु कुठे गेला ?
परिक्रमा असो , हलके फुलके लेख असोत , कन्फेशन असो नाही तर आणी काही
जे वाट्टेल, ते लिहायचा
यकु कुठे गेला
ट्रिब्युट
- उन्मेष
प्रतिक्रिया
27 Aug 2023 - 7:57 am | सुनील
सहमत.
अगदी हेच श्रामोंबद्दलही म्हणता येईल.
27 Aug 2023 - 3:03 pm | राघव
दोघंही हकनाक गेलेत हे मान्य. :-(
27 Aug 2023 - 8:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या आजुबाजुला अनेक लोक असतात. काही वेगळे, गुढ, अतर्क्य, बोलण्यात, लिहिण्यात, त्याचे वेगळे शब्द-अर्थ कशात तरी गुरफटून गेलेले वेगळेच. एक अधिक एक बरोबर दोन असे होत असूनही यांना एक अधिक एक म्हणजे घ्ंटानाद, त्यातून येणारा अद्भुत नाद, लय. अद्भुत तादात्मय असे काही वाटणारे फार थोर असतीलही पण काहींना समुपदेशनाची, योग्य उपचाराची गरज असते, तो केमिकल लोचा असतो, ती मानसिक गड़बड़ असते असे वाटते. अशी माणसं आपल्या लक्षात येतात पण आपलं दुर्लक्ष होतं.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2023 - 2:54 pm | सौंदाळा
यकु, श्रावण मोडक, भोचक, तात्या, अविनाश कुलकर्णी, चौकट राजा सर्वच जण सक्रिय आणि चांगले लेखक होते.
अजुनही अधून मधून त्यांचे लेखन वाचत असतो.
अजून कोण मिपाकर आहेत सध्या हयात नसलेले?
28 Aug 2023 - 3:09 pm | गवि
बोका ए आझम, वरुण मोहिते, निपो.
28 Aug 2023 - 5:17 pm | सौंदाळा
बोका ए आझम, वरुण मोहिते माहिती होते पण विसरलो. मस्तच लिहायचे दोघेही.
निपो माहिती नव्हते.
29 Aug 2023 - 7:58 am | योगी९००
निपो म्हणजे कोण?
28 Aug 2023 - 3:13 pm | सुरिया
जावेत एकदाचे अशी लै जणांची इच्छा असलेले काहीजण आहेत.
.
कधी खपतेत कुणास ठाऊक? :(
28 Aug 2023 - 5:38 pm | आंद्रे वडापाव
हा प्रतिसाद मी समजू शकतो ...
असा प्रतिसाद येणे स्वाभाविक आहे..