इलाज नाही

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
29 Jul 2023 - 7:21 pm

कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून......

गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही
उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही.

उसने घेवून बीज पेरु नकोस काही
मातीत खोट आहे त्याला इलाज नाही.

सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची
विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही.

बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे
नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.

------- अभय बापट
२९/०७/२०२३

gajhalgazalकविता

प्रतिक्रिया

बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे
नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.

मस्त. पुलेशू.

राघव's picture

26 Oct 2023 - 6:26 pm | राघव

थोडे मीटर आणिक सांभाळायला हवे. कल्पना उत्तम! पुलेशु. :-)