(काल्पनिक कथा)
मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात:
बायकोने छंद जोपासला.
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला
नोटांचा.
तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर. पूर्वीच कथा लिहिली असती तर मलाहि घरी हिरा सापडला असता. पण आता फार उशीर झाला आहे. माझ्या बाबतीत नेहमी हे असेच होते. पण 'अब पछताए होत क्या, जब चिड़ियाँ चुग गई खेत".
तरीही सौ.ला हिम्मत करून विचारले, अग! एखादा छंद जोपासला पाहिजे होता तू. तुझा वेळ मस्त गेला असता. सौ.ने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात विचारले, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सुचले. बायकोलाहि काही छंद वैगरे असतात. काय विचार चालला आहे तुमच्या मनात. मी उतरलो, सहज विचारले. सौ. "सहSSज!, तुम्ही एक नंबरचे मतलबी आणि स्वार्थी आहात, उगीच काही विचारणार नाही. बाकी छंद जोपासायला पैका लागतो, एक दमडीहि कधी ठेवली होती माझ्या हातात, कंजूस-मक्खीजूस. शेवटी वैतागून म्हणालो, अग ए, भवानी, चूक झाली माझी, तुला हा प्रश्न विचारला.
पण आता माझे ऐकावेच लागेल. मला किनई लाॅटरीचे तिकीट घ्यायला लई आवडायचे. पण तुमची पैश्यांवर उल्लू सारखी नजर. तरीहि कधी-कधी मौका मिळाल्यावर तुमच्या खिश्यातून पैशे काढून तिकीट विकत घ्यायची. पण एखाद दुसरे लाॅटरीचे तिकीट घेऊन काही नंबर लागत नाही. त्यासाठी मोठी इन्वेस्टमेंट लागते. तुम्ही जर तुमचा पगार माझ्या हातात दिला असता तर लाॅटरी खेळून मी केंव्हाच कोट्याधीश झाले असते. आपले दु:ख-दारिद्र्य केंव्हाच संपले असते. पण माझे नशिबच फुटके, तुमच्या पदरी पडली.
च्यायला! माझी विकेटच उडाली. डोळ्यांसमोर चित्रपट सुरु झाला बायकोचा छंद जोपासण्यासाठी, महिन्याच्या पहिल्या दिवशी सौ.च्या हातात पगार आणून ठेवला, तिने तो लाॅटरीच्या तिकीटांंवर उडविला. हळू हळू बँकेतील बचत अदृश झाली. मग बनियाने उधार देणे बंद केले. नातेवाईक आणि मित्रांनी दरवाजे बंद केले. फी न भरल्याने मुलांच्या शाळा सुटल्या. घरातील एक-एक करून सर्व वस्तू अदृश्य झाल्या. घर गेले, नौकरी गेली. शेवटी एका पुला खाली संसार थाटवा लागला. जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला, दे दाता के नाम ... भिकेवर गुजराण सुरु झाली.
थंडीचे दिवस होते, रात्रीची वेळ, दानमध्ये मिळालेली कम्बल पांघरून कसाबसा दिल्लीच्या थंडीपासून स्वताला वाचण्याचा प्रयत्न करत होतो. एका लॉटरीवाल्याची आवाज ऐकू आली. 'न्यू यिअर स्पेशल' १० करोड का ईनाम तिकीट केवल १० रुपया. सौ.चा आवाज ऐकू आला, भैया मुझे लगता है, कल मेरी ही लाटरी लगेगी. एक टिकिट मुझे भी चाहिये पर मेरे पास पैसा नहीं है. यह कम्बल चलेगा क्या म्हणत, माझ्या अंगावरचे कम्बल ओढू लागली.
अग! ए, काय करतेस, हेच एक शेवटचे उरले आहे. थंडीत मारणार आहे का मला? सौ. जोरात ओरडली, सकाळचे सात वाजले आहे, ऑफिसला जायचे आहे कि नाही? रात्री उशिरा पर्यंत काही-बाही वाचता, मग झोपेत बडबडतात. मीच आहे, म्हणून सहन करते हे सर्व. चहा तैयार आहे, नरड्यात ओता आणि ऑफिससाठी तैयार व्हा. हुश्श्! वाचलो. बरेच झाले, बायकोला कुठलाही छंद नाही. अन्यथा हिर्याच्या जागी कोळसा सापडला असता.
प्रतिक्रिया
6 Jul 2023 - 11:13 am | इपित्तर इतिहासकार
बायकोने जोपासावा छंद
असे काहीसे करून घ्या title, नाहीतर मेजर confusion होते आहे. आमच्या मते "बायकोचा छंद" राजे महाराजे, वतनदार, चंगेझ खान वगैरे थोर मंडळी राजकीय लग्ने वगैरे करून पाळत, तुमच्या आमच्या आवाक्यात अन् कायद्यात पण बसत नसते ते....
:D :D
6 Jul 2023 - 12:26 pm | विवेकपटाईत
परिणाम दोन्हीचे सारखे असतात.
6 Jul 2023 - 12:25 pm | भीमराव
छंद हा शब्द बायकांचा नाद अशाही अर्थाने बोलीभाषेत वापरतात.
6 Jul 2023 - 1:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
असा अनाहूत सल्ला देतो. :)
बाकी मलाही शीर्षक वाचुन "बाईलवेडा" टाईप काहीतरी वाटले होते. अर्थात तसेही ईतर बायकांपेक्षा "बायकोचा" छंद असणे कधीही चांगलेच
7 Jul 2023 - 9:14 am | उग्रसेन
असं वाचलं.
6 Jul 2023 - 2:32 pm | वामन देशमुख
छंद क्रिकेटचा
छंद सिनेमाचा
छंद वाचनाचा
छंद बायकोचा
6 Jul 2023 - 4:21 pm | कंजूस
मी जेव्हा एकटा होतो तेव्हा शेजारी 'बायको' विषयावर गप्पा मारत. आवडता विषय हो.
प्रमुख सल्ला - तुम्हाला कधी एकदा लग्न करतो असं झालं असेल,पण एक सांगतो रात्री एक वेळ बायको नसली तरी चालते पण पंखा चालू पाहिजे. पंखा ही फार गरजेची वस्तू आहे."
6 Jul 2023 - 4:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
हाताने हलवायचा की वीजेने चालवायचा? :)
6 Jul 2023 - 5:46 pm | आनन्दा
कोणताही असला तरी एकदा हलला की परिमाण दिसणारच
6 Jul 2023 - 8:15 pm | सुरिया
परिमाण बघून परिणाम ठरेल असे वाटते ब्वा
;)
7 Jul 2023 - 10:20 am | राजेंद्र मेहेंदळे
क्वालिटी पण बघितली पाहीजे :)
6 Jul 2023 - 5:05 pm | चौथा कोनाडा
हा हा हा
हा .... हा .... हा .... !
लै खुसखुषीत !
शेवटी "बायकोला कुठलाही छंद नाही" हे वाचून बरे वाटले नाही तर खरंच हि-याच्या जागी कोळसा सापडला असता.
7 Jul 2023 - 7:02 am | विवेकपटाईत
शून्यापासून सहजीवनाची सुरुवात झाली. बाकी सौ चा अधिकांश वेळ माहेर आणि सासरी कर्तव्य पूर्ण करण्यात गेला. त्यामुळे तिला छंद जोपासने संभव नव्हते.
7 Jul 2023 - 6:08 pm | चौथा कोनाडा
दोन्ही कौटूंबिक कर्तव्य पुर्तीसाठी अभिनंदन करायला हवे त्यांचे !
6 Jul 2023 - 9:25 pm | कंजूस
चातुर्मास व्रते.
7 Jul 2023 - 9:13 am | इपित्तर इतिहासकार
किंवा
असे म्हणतात तेव्हा नेमके काय अभिप्रेत असते त्यांना ?? पटाईत काका सरकारी नोकरीतून उच्च पदस्थ पोजिशन वरून निवृत्त आहेत, जॉईन केलं तेव्हा पण सरकारी नोकरीचे स्थैर्य अन् इतर देय त्यांना असतीलच ना ?
मग शून्यापासून सहजीवन सुरू केले म्हणजे काय अर्थ असेल ?? तसे पाहिले तर लग्न करणारा/ लिव्ह इनचा निर्णय घेणार प्रत्येक जोडपे "सहजीवन" शून्य पासूनच सुरु करते की ??
काय confusion झालं तिच्यामारी :D :D
7 Jul 2023 - 11:37 am | कर्नलतपस्वी
रूपास भाळलो मी, लागलो तुझ्या नादाला
तुज वेड लागले जे , मीं सांगू कसे कुणाला
रूपास भाळलो मी
सखी शेजारणीसं बघुनी तू जे मला म्हणाली
ते ऐकून सखे गं झोप माझी उडाली
रूपास भाळले मी
निरखीता हे गोड रूप ऐसे
डोके होते मंद सांग कसा पुरवू गं
तुझा दागिन्याचंl छंद
9 Jul 2023 - 7:55 am | विवेकपटाईत
मस्त.आवडली. माझी सौ.मी लिहलेले कधीच वाचत नाही. त्यामुळे अश्या कथा लिहत येतात. कधी नव्हे यावर्षी गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत रिमझिम पाऊस पडत आहे तूर्त सध्या स्वयंपाक घरात इडली सांबर नाश्ता बनवत आहे. मी झोपल्या झोपल्या मोबाईलवर प्रतिसाद देण्याचे काम करतो आहे.