दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे.
कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा.
१. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे.
२. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी.
३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी.
४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे.
५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.
६. शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक असल्यास प्राधान्य
जरी सगळ्या अटीत बसणारी ठिकाणे नसतील तरी सुचवा.
मदतीसाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Jun 2023 - 1:22 am | कानडाऊ योगेशु
वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते.
माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम.
मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही.
आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा.
दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
25 Jun 2023 - 7:46 am | इपित्तर इतिहासकार
महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)
25 Jun 2023 - 10:29 am | कंजूस
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.
25 Jun 2023 - 10:57 am | इपित्तर इतिहासकार
पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.
####
का? जयपूर ठीकच आहे पण आग्र्याने काय घोडे मारले ??
26 Jun 2023 - 11:32 am | Trump
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.
26 Jun 2023 - 12:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात.
दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.
27 Jun 2023 - 4:13 pm | मनो
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.
1 Jul 2023 - 10:00 am | सुबोध खरे
यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल.
म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल.
आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते.
शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.
1 Jul 2023 - 11:00 am | मनो
माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D
1 Jul 2023 - 1:41 pm | कंजूस
तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल.
ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.
26 Jun 2023 - 11:28 am | Trump
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
टाकतो यादीमध्ये
27 Jun 2023 - 7:03 pm | कंजूस
वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे.
बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला?
आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.
25 Jun 2023 - 5:19 am | कंजूस
पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा.
बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते.
तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते.
तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.
25 Jun 2023 - 7:55 am | इपित्तर इतिहासकार
ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील.
Itenary खालील प्रमाणे :-
दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम.
दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली
असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे.
बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
26 Jun 2023 - 11:37 am | Trump
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.
25 Jun 2023 - 1:08 pm | कंजूस
याने या ट्रिपमध्ये फरक पडतो.
----
जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.
26 Jun 2023 - 11:40 am | Trump
८ ते १० तरुण लोक.
फक्त दिल्ली. जास्त इतर ठिकाणी नाही.
26 Jun 2023 - 1:58 pm | कर्नलतपस्वी
महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली
गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल.
म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.
27 Jun 2023 - 11:23 am | Trump
धन्यवाद.
26 Jun 2023 - 2:54 pm | कंजूस
1)
2)
3)sightseeing by hoho
4) sightseeing by metro
27 Jun 2023 - 11:24 am | Trump
धन्यवाद. २०१४ ची माहिती पाहुन आदर दुणावला.
27 Jun 2023 - 2:56 am | रंगीला रतन
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही.
बरोबर कोण आणि किती जण आहेत?
८ ते १० तरुण लोक.
अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे.
नुस्ती फालतुगीरी
27 Jun 2023 - 5:01 am | कंजूस
मला वाटतं गप्पाटप्पा मराठीतच व्हाव्यात हा उद्देश असेल.
27 Jun 2023 - 6:06 am | कर्नलतपस्वी
अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे.
नुस्ती फालतुगीरी
का लाज वाटायला पाहीजे?
नाही येत दुसर्या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले,
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली.
उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है.
तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा.
प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा
शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा.
शांताबाई शेळके.
27 Jun 2023 - 11:13 am | Trump
+१
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल.
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.
27 Jun 2023 - 11:56 am | कर्नलतपस्वी
आमच्या सासूबाई लखनऊ आल्या होत्या, कामवाली बाईला म्हणाल्या, तुमरे या धुपकाला अधीक है. धुपकाला म्हणजे उन्हाळा.
27 Jun 2023 - 12:19 pm | चौकस२१२
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.
उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले
सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला
असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )
27 Jun 2023 - 11:09 am | Trump
मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे.
आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.
27 Jun 2023 - 12:22 pm | चौकस२१२
अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे.
ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ?
दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि
27 Jun 2023 - 6:40 am | कर्नलतपस्वी
शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ
आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही.
तसेच दुसर्या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे.
दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
27 Jun 2023 - 11:00 am | Trump
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.
27 Jun 2023 - 9:57 am | चौकस२१२
काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा
अगदी बरोबर
दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल
आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली
एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे
तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त?
- शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे"
तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ
-भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि
मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य
बाळगावे हि माफक अपेक्षा
असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल
बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा
जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते
27 Jun 2023 - 10:31 am | इपित्तर इतिहासकार
सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला.
मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम)
अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.
27 Jun 2023 - 11:23 am | Trump
जरा सविस्तर सांगा. जंजिर्यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.
27 Jun 2023 - 12:05 pm | चौकस२१२
जंजिर्यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे?
आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का?
बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,,
सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे.
परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी
मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही !
सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी
https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-trave...
27 Jun 2023 - 12:50 pm | Trump
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही.
त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे.
स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
28 Jun 2023 - 12:10 am | कानडाऊ योगेशु
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.
27 Jun 2023 - 11:35 am | कंजूस
मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी.
गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके).
आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही.
कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
(फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)
27 Jun 2023 - 11:39 am | Trump
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?
27 Jun 2023 - 1:41 pm | इपित्तर इतिहासकार
गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
27 Jun 2023 - 2:02 pm | Trump
पुर्ण सहल नको आहे.
प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.
27 Jun 2023 - 1:46 pm | महिरावण
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.
27 Jun 2023 - 2:34 pm | इपित्तर इतिहासकार
:D :D
27 Jun 2023 - 7:20 pm | चौकस२१२
सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे
म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८?
स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे
एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०
27 Jun 2023 - 2:50 pm | कंजूस
फक्त दोन ठिकाणी हॉटेल किंवा जागा शोधावी लागेल. दिल्ली आणि आग्रा. त्यासाठी चार चार जणांचे दोन गट करून काम होईल.
27 Jun 2023 - 2:57 pm | कंजूस
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.
27 Jun 2023 - 3:12 pm | Trump
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.
27 Jun 2023 - 7:10 pm | कंजूस
हं. मला तशी शंका आली.
आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.
27 Jun 2023 - 7:37 pm | Trump
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे.
इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.
27 Jun 2023 - 7:33 pm | चौकस२१२
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे
मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू
पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे
एकदा अंगाशी आले होते
कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली
27 Jun 2023 - 7:40 pm | Trump
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.
27 Jun 2023 - 8:05 pm | चौकस२१२
कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.
त्यात गैर काही नाही पण मुळात तुमच्या काही अटी विसंगत वाटतात ..
28 Jun 2023 - 2:55 pm | विअर्ड विक्स
दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा,
मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे .
लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली.
मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .
28 Jun 2023 - 5:44 pm | कंजूस
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो.
आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग.
(वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)
29 Jun 2023 - 11:45 am | Trump
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.
29 Jun 2023 - 11:46 am | Trump
धन्यवाद श्री विअर्ड विक्स
28 Jun 2023 - 2:56 pm | विअर्ड विक्स
सकाळी ८. ० च्या आधी
6 Jul 2023 - 12:28 pm | Trump
मदत करणार्या सर्वांचे धन्यवाद.
श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती.
श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.
6 Jul 2023 - 12:29 pm | Trump
मदत करणार्या सर्वांचे धन्यवाद.
श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती.
श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.
6 Jul 2023 - 4:16 pm | कंजूस
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो -
१)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते.
२) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात.
साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे.
३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात.
तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही.
४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे.
५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात.
६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे.
चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा.
७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते.
८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये.
९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो.
-------
जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे.
आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.
7 Jul 2023 - 7:33 pm | सुबोध खरे
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो.
आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते.
याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते.
याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही.
रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो.
ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.
8 Jul 2023 - 1:13 pm | चौथा कोनाडा
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली.
... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली !
सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट !
सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !
8 Jul 2023 - 2:17 pm | कंजूस
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं.
लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे.
. एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.
8 Jul 2023 - 2:52 pm | चौथा कोनाडा
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव !
सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !