एका नोटेची छोटी गोष्ट…..
एक पाचशेची नोट बरेच दिवस पाकिटातहोती. कुठून आली माहित नाही. अजिबात फाटली नव्हती पण बहुतेक धुतली गेल्यामुळे पुसट झाली होती बऱ्याच ठिकाणी चालवायचा प्रयत्न केला पण कोणी घेतच नव्हता बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये देखील भरायचा प्रयत्न केला पण तीथेही रिजेक्ट झाली..
मग शेवटी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत माझे खाते आहे तीथे गेलो. आधी शीस्तीत रांगेतून जाऊन कशिअर कडे नोट बदलून मागीतली…त्याने नकार दिला. मग त्याला म्हंटले माझ्या खात्यात जमा कर…तर ही नोट चालणार नाही….घाटकोपर ला जाऊन बदला असा सल्ला मीळाला. मी शांतपणे परत आलो..
आठवड्याभरा नंतर सवडीने एक तक्रार( सदर नोट क्रमांक स्विकारण्यास रोखपालाने नकार दिला ) + त्याला पेपरमध्ये आलेली RBI ची जाहिरात लाऊन परत शाखेत गेलो. परत सगळी तीच ऊत्तर….मी म्हंटल ठीक आहे…माझ्या तक्रार अर्जावर पोच द्या .
मग फिरली जादूची काडी…..आधी म्हणतात मशीन मध्ये चेक करतो….आत जाऊन कारतरी केँले….आणी मग म्हणतात हो ठीक आहे नोट..चालेल, आता स्लिप भरा आणि खात्यात जमा करा….मी पण हट्टी पणा केला कि नोट बदलूनच द्या आता.
कारण नियमा प्रमाणे कोणत्याही शाखेत नोट बदलून मिळते…तुमचे खाते तीथे असो वा नसो.
शेवटी मिळाली बदलून
प्रतिक्रिया
3 Jun 2023 - 6:14 pm | कंजूस
काही पन्नासच्या जुन्या मोठ्या आकाराच्या नोटा ज्यावर नोट छापलेल्या वर्षाचा आकडा नाही त्या बाद आहेत.
एका दुकानदाराने ती नोट घेतल्याबरोबर लगेच सांगितले की ही बाद आहे. आणि का ते दाखवले.
"बँकेतूनच या नोटा आणल्याचं आणतो बदलून."
"दुसरी देतो." "नको घेतो आम्ही."
4 Jun 2023 - 12:50 pm | शशिकांत ओक
२००० च्या गुलाबी नोटांची फारकत होणार आहे. काहींना उसासे टाकत अलविदा म्हणायला लागेल...
गुलाबी नोटांची तक्रार आहे की आम्हाला दाबून ठेवतात. बाहेरची हवा लागू देत नाहीत!
रिझर्व बँकेच्या मार्फत छापलेल्या नोटा चलनात आणायला चार्टर्ड प्लेन मधून वेगवेगळ्या शाखांत पाठवल्या जातात... म्हणजे ज्यांचे खाते आहे त्यांनाच आपल्या जमा रकमेतून उचल करताना या नोटा लोकांच्या हातात जातात... असे असले तर मग तळघरात किंवा कॉटखाली, बाथरूममध्ये नोटांची थप्पी लागते ते चलन त्यांना कुठून उपलब्ध होते?
5 Jun 2023 - 2:45 pm | अहिरावण
बँकेत आपण कायदा दाखवला, तक्रार करतो पोच द्या असे म्हटले की काम होते असे अनेकदा स्वानुभावाने आढळले आहे.
ग्राहकांना छळण्यात कर्मचार्यांना काय आसुरी आनंद वाटतो ते समजत नाही, पण फार मोठा तीर मारला असे त्यांना वाटते.