एक चावट लेख!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
15 May 2023 - 1:28 pm

नमस्कार मंडळी
पुण्यात गाडी म्हणजे "स्कुटर". पण ह्या लेखात गाडी म्हणजे "मोटारगाडी" असे वाचावे. तर सहसा प्रत्येक माणसाला गाडी घ्यायची आणि चालवायची हौस असतेच. ठराविक वय झाले की गाडीची गरज प्रकर्षाने भासू लागते. काही जण इतरांची गाडी चालवून आपली हौस भागवून घेतात. पण सगळ्यांचेच नशीब एव्हढे चांगले नसते. त्यांना वाट बघायला लागते. काहीजणांना तर फारच उशीर होतो तर काहीजण त्या फंदातच पडत नाहीत. काहीजणांना गाडीचा इतका वाईट अनुभव येतो की ते प्रतिज्ञा करतात की वेळ पडल्यास टॅक्सीवर काम भागवेन पण पुन्हा आयुष्यात गाडी घेणार नाही.

तर मुद्द्यावर येउयात.
गाडी घेण्याआधी पैशाची सोय करावी लागते. जागेची सोय करावी लागते एक ना दोन. मग गाडी घ्यायला उत्सुक लोक टी.व्ही./ इंटरनेट, अनुभवी लोकांचा सल्ला, शो रूमच्या फेऱ्या अशा चक्रात अडकतात. सगळ्यांना वाटते की आपली गाडी युनिक असावी. रस्त्याने जाताना लोकांनी वळून वळून बघावे आणि हेवा करावा. आपली कॉलर ताठ व्हावी. पण नंतर आपली कुवत लक्षात आली की आपसूक पाय टाटा, मारुती , ह्युंदाई कडे वळतात. फक्त एक काळजी घ्यावी , बजेट कमी असेल तरी शक्यतो सेकण्ड हॅन्ड गाडी घेऊ नये. नक्की काय प्रॉब्लेम असेल काय माहित?

पुढे एक मॉडेल पसंत पडले तरी अजून चांगले दुसरे मॉडेल बाजारात येईल किंवा असेल या विचाराने चालढकल केली जाते. एखादे मॉडेल पसंत पडले तर ते महाग असते, दुसरे जरा बजेटमध्ये पण थोडे कमअस्सल वाटते. शेवटी एकदा सगळे जुळले की गाडी बुक होते.मग ती घरी येण्यासाठी वाट बघणे सुरु होते. या काळात ती गाडी आपल्याला अधिकाधिक सुंदर वाटू लागते. रोज स्वप्नात येऊ लागते.कधी एकदा ती आपल्या हातात येईल याची स्वप्ने रंगवणे चालू होते. त्या स्वप्न रंजनात कधी हातातून चहा सांडतो तर कधी जेवणाकडे लक्ष राहत नाही.ऑफिसच्या कामाचे तर विचारूच नका.

शेवटी एकदाचा तो दिवस उगवतो. आप्त स्वकीयांबरोबर गाडी घरी आणली जाते. घरादाराला तिच्या स्वागताची उत्सुकता असते. पहिल्या वहिल्या गाडीचे जंगी स्वागत केले जाते. तिला कुंकू वगैरे लावून ओवाळले जाते. शेजारपाजारची मंडळी दारा खिडक्यांतून डोकावून आनंद, आश्चर्य ,जळजळ इत्यादी भाव दाखवत असतात. आपण त्या सगळ्याची मजा घेत असतो. या सगळ्यात पहिला दिवस कसा भर्रकन निघून जातो.

आता खरी लढाई सुरु होते. ड्रायव्हिंग स्कुलची सुरक्षित गाडी आणि आपली ही गाडी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ती गाडी शंभर जणांनी हाताळलेली असते आणि ठोकाठोकी करून झालेली असते. शिवाय बाजूला शिक्षकाच्या हाती कंट्रोल असतो. आपली गाडी नवीकोरी, शिवाय चुका सांगायला कोणीच नाही. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरणे कधीही चुकवू नये. रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे(एअर बॅग्स) नक्की वापरावे. काहीजण तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात , त्यांनी तर हे नियम नक्कीच पाळावेत.

पहिले पहिले गाडी चालवताना फार टेन्शन येऊ शकते. पण हळूहळू गाडीला तुमची आणि तुम्हाला गाडीची सवय झाली की एक प्रकारचा सहजपणा येतो, नव्हे हळूहळू मजा येऊ लागते. पट्टीचा पोहणारा कसा नंतर वेडावाकडा , उलटा सुलटा, एका हाताने किंवा पायाने , बसून किंवा झोपून पोहतो तशा वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवावी असे वाटू लागते. फक्त या सगळ्या प्रकारात गाडीला त्रास होणार नाही ना , हे मात्र बघावे. गाडी चालवण्या आधी थोडा वेळ चालू करून तिचे इंजिन गरम होईल असे बघावे. जर हे गणित जुळले, तर मात्र तुमच्यासारखे सुखी तुम्हीच. हळूहळू जशी तुमची तार जुळत जाते, तसे गाडी जास्त ऍव्हरेज देऊ लागते. मात्र तरीही सिग्नल वगैरे सारखे `नियम नेहमीच पाळावेत.

गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करावीच पण कधी कधी मात्र गाडीला काही खरचटले किंवा दुखले खुपले तर् इमर्जन्सी सर्व्हिसिंग करावी लागू शकते. यासाठी एक नेहमीचा ओळखीचा मेकॅनिक असावा. किंवा सरळ शोरूम मध्ये गाडी न्यावी. मात्र काही केल्या या छोट्या काट्याचा नायटा होऊ देऊ नये, नाहीतर गाडी रुसायला वेळ लागत नाही. आणि गाडी एकदा का रुसली की तिची समजूत काढून तिला रुळावर आणायला फार म्हणजे फारच प्रयत्न करावे लागतात. ते फार वेळखाऊ (आणि कधी कधी पैसेखाऊ पण ) काम असते. तर् या छोट्या मोठ्या कुरबुरी वाढू देऊ नयेत. म्हणजे आपल्याला आणि गाडीला दोघांना त्रास नाही. अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे गाडी नेहमी वापरात असावी. न वापरल्याने वस्तू गंजतात. वापरातील वस्तू कधीही हुकमी कामाला येते. आणि हो!! आपली गाडी आपणच चालवावी, कधीही दुसऱ्याच्या हाती देऊ नये. कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच , आणि आपल्याही नात्यावर त्याचा परिणाम होतो. तर् मंडळी लिहिण्या सारखे बरेच काही आहे. पण सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. त्यामुळे थांबतो.

आणि काय म्हणताय ? या सगळ्यात चावटपणा काय आहे? तर् मग आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

गवि's picture

15 May 2023 - 2:00 pm | गवि

हा हा हा.

इतके ठळक न करताही लोकांना समजले असतेच. ;-)

बाकी..

यासाठी एक नेहमीचा ओळखीचा मेकॅनिक असावा. किंवा सरळ शोरूम मध्ये गाडी न्यावी.

बाब्बो.. काय हो हे??

आग्या१९९०'s picture

15 May 2023 - 3:57 pm | आग्या१९९०

कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच

कशावरून गाडीला मजा येत नसेल?

कर्नलतपस्वी's picture

15 May 2023 - 6:28 pm | कर्नलतपस्वी

गाडी किंवा साडी घेताना बहुतांशी सारखाच अनुभव असतो. जसे बजेट, मेक आणी माॅडल कुठले, आवडलेली नेमकी बजेटबाहेर इत्यादी. बाकी फक्त एकच सुर वेगळा, गा म्हणले की गाडी व सा म्हणले की....

रस्त्याने जाताना लोकांनी वळून वळून बघावे आणि हेवा करावा. आपली कॉलर ताठ व्हावी.

साडी घेतल्यावर असे झाले तर वैवाहिक जीवन चारपट (काही क्षणा पुरते) सुखी होते.

एक वेगळाच लेख टाकावा असे आतातरी वाटत आहे.

लेख आवडला.

यश राज's picture

15 May 2023 - 7:55 pm | यश राज
यश राज's picture

15 May 2023 - 7:56 pm | यश राज

भलताच चावट लेख ,धमाल एकदम

चौथा कोनाडा's picture

15 May 2023 - 9:36 pm | चौथा कोनाडा

बायको आणि गाडी हा खुप मोठा अध्याय आहे, दोन्हीही चावटच !

आणि म्हणताय काय ? या प्रतिसादत चावटपणा आहे ? तर् मग आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

कपिलमुनी's picture

15 May 2023 - 11:19 pm | कपिलमुनी

मिपावर खूप दिवसांनी वेगळा लेख वाचायला मिळाला..
पुलेशु

विजुभाऊ's picture

16 May 2023 - 6:52 am | विजुभाऊ

ड्रयव्हिंग स्कूलची गाडी ............... आणि तिथला इन्स्ट्रक्टर ता बद्दल अधीक वाचायला आवडेल

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 10:23 am | राजेंद्र मेहेंदळे

फॉलो अप भाग २ येउंद्या की--नाहीतरी बरेच दिवसात तुमच्याकडुन काही आलेले नाही.

एकदम भारी. जाम मजा आली वाचून.

आनन्दा's picture

16 May 2023 - 8:54 am | आनन्दा

लेखात चावट काय आहे अजूनही कळलेले नाही.
सगळंच तर नॉर्मल वाटतंय.

खेडूत's picture

16 May 2023 - 9:19 am | खेडूत

मला वाटलं फक्त आपण म्हणलं तर अगदीच मोरू ठरतो की काय! मलाही सगळं नॉर्मल वाटलं.

- (दादा कोंडकेचे सगळे पिकचर बघितलेला) खेडूत

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 10:20 am | राजेंद्र मेहेंदळे

वरच्या दोन प्रतिसादांइतके चावट प्रतिसाद कोणीच दिले नाहीयेत अजुन.

बाकी जुना फोन आणि जुनी गाडी घेऊ नये हे बरोबर.

साडी आणि फोन बद्दल बोलायचं तर महागडे घेऊच नये.

आणखी असे विचारप्रवर्तक लेख लिहा. राजकारण आणि संस्कृती यातून सुटका होईल.

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 11:15 am | टर्मीनेटर

चा व ट लेख आवडला 😂

"ड्रायव्हिंग स्कुलची सुरक्षित गाडी आणि आपली ही गाडी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ती गाडी शंभर जणांनी हाताळलेली असते आणि ठोकाठोकी करून झालेली असते. शिवाय बाजूला शिक्षकाच्या हाती कंट्रोल असतो. आपली गाडी नवीकोरी, शिवाय चुका सांगायला कोणीच नाही. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरणे कधीही चुकवू नये. रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे(एअर बॅग्स) नक्की वापरावे. काहीजण तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात , त्यांनी तर हे नियम नक्कीच पाळावेत."

शंभर जणांनी हाताळलेली आणि ठोकाठोकी करून झालेली गाडी चालवताना रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे वापरावेत ह्याच्याशी १०००% सहमत!
पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार अशा मताचा असल्याने जे ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात त्यांनी हे नियम पाळावेत ह्याच्याशी मात्र असहमत! त्यांनी सुरक्षेसाठीच्या अन्य अत्याधुनिक पर्यायांवर भिस्त ठेवावी 😀

"पट्टीचा पोहणारा कसा नंतर वेडावाकडा , उलटा सुलटा, एका हाताने किंवा पायाने , बसून किंवा झोपून पोहतो तशा वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवावी असे वाटू लागते. फक्त या सगळ्या प्रकारात गाडीला त्रास होणार नाही ना , हे मात्र बघावे."

सहमत!
तसेच वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवण्या बरोबरच 'फ्रंट व्हील ड्राईव्ह', 'रिअर व्हील ड्राईव्ह', आणि 'फोर व्हील ड्राईव्ह' अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या (दुसऱ्यांच्या आणि अर्थातच मालकांच्या नकळत, त्यातला रिस्क फॅक्टर विचारात घेउन) चालवायला मिळाल्यास ती संधी सोडू नये! ट्रस्ट मी, प्रत्येक गाडीची आपापली खास वैशिष्ट्ये असतात आणि त्या चालवण्याचा अनुभवही आनंददायी असतो. शेवटी म्हणतात ना "Variety is the spice of life" 😀

गाडीच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्वी दिलीप वेंगसरकर ह्यांची "V फॉर व्हिक्टरी... V फॉर व्हीडॉल" अशी टॅगलाईन असलेली जाहिरात आपल्यापैकी अनेकांना लहानपणी बघितल्याचे आठवत असेल, पण आता "V फॉर _ _ _" ह्यातल्या गाळलेल्या जागी भरण्यासाठी गाडी चालवणाऱ्याची कार्यक्षमता आश्चर्यकारकरित्या वाढवणाऱ्या उत्पादनाचे नाव भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचाही वापर करून बघावा. पण त्यात गाडी चालवणाऱ्याकडून जोशात 'रॅश ड्रायव्हिंग' होण्याचा धोका असल्याने जी गाडी चालवत आहोत तिचे तात्पुरते "wear and tear" होण्याची शक्यता अधिक असल्याने चालवणाऱ्याला जरी बेफाट मजा येत असली तरी जी कुठली गाडी चालवत असाल त्या गाडीला ते झेपतंय कि नाही आणि कितीवेळात ती पुनर्वापरासाठी तयार होते ह्याची पहिल्या वापरात चाचणी घेऊनच पुन्हा 'EXXXXXXट्रा' मायलेज देणारे हे उत्पादन वापरायचे कि नाही ह्याचा निर्णय घ्यावा 😀

तर् मंडळी लिहिण्या सारखे बरेच काही आहे. पण सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. त्यामुळे थांबतो.

आणि मी पण ह्या चावट लेखावरच्या प्रतिसादात अधिक चावटपणा न करता इथेच थांबतो... 😂

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 12:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

लईच चावट प्रतिसाद!!
वाक्यावाक्याशी सहमत. पण जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, हे जास्त आवडले आहे _/\_

सस्नेह's picture

16 May 2023 - 1:54 pm | सस्नेह

नाही, पण चविष्ट आहे बरं लेख !

आपली गाडी आपणच चालवावी, कधीही दुसऱ्याच्या हाती देऊ नये. कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच , आणि आपल्याही नात्यावर त्याचा परिणाम होतो.

हे मात्र एकदम राइट्ट हे :)

गाडीची डिक्की हॅचबॅक बरी की सेदान असावी ?
याचे तज्ञानी मार्गदर्शन करावे

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 3:38 pm | टर्मीनेटर

मी तज्ञ नाही 😀 पण माझ्यामते ते वैयक्तिक आवडी-निवडीवर अवलंबुन असावे. कोणाला हॅचबॅक प्रकारच्या गाड्या आवडतात तर कोणाला सेडान प्रकारच्या गाड्या आवडतात. त्याविषयीची निश्चित आकडेवारी मिळवण्यासाठी एखादा शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व्हे झालाय की नाही ह्याची कल्पना नाही पण भारतिय रस्त्यांवर दृष्टीस पडणाऱ्या गाड्यांवर सहज नजर टाकता 'हॅचबॅक'चे प्रमाण जास्त दिसते, त्यामुळे सेडानपेक्षा त्या जास्त लोकप्रिय असाव्यात असे ढोबळमानाने म्हणता येईल 😂

कारची फीचर्स काही का असेनात, जनरली आपल्याकडे मुख्य प्रश्न विचारतात की "कितना देती है."

कंपनी कितना भी क्लेम करें लेकिन वो तो आखिर चलानेवाले पे डिपेंड करता है 😀
क्लच आणि ब्रेकचा कमितकमी वापर ही जास्त मायलेजची गुरुकिल्ली! अर्थात ऑटोमॅटीक गाड्यांमध्ये ती मजा नाही, त्यासाठी फुल कंट्रोल चालकाच्या हाती असणाऱ्या मॅन्युअल ट्रान्समिशन वाल्या गाड्याच बेस्ट 😂

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2023 - 4:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

कधी कधी फुल कंट्रोल चालकाहाती नसताना ऑटो गाडीवर सुद्धा मजा येते. मात्र हे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यामुळे सरसकट विधान करता येणार नाही.

तुषार काळभोर's picture

19 May 2023 - 12:15 pm | तुषार काळभोर

हा प्रश्न उलट पद्धतीनेही विचारला जाऊ शकतो ना?

कितना लेती है?

ऐसी 'लेने वाली' गाडी चलानेका एक्स्पिरीअन्स नही, पर आपके सवाल मे दम Zaroor है 😀

विजुभाऊ's picture

16 May 2023 - 3:57 pm | विजुभाऊ

सेदान प्रकारच्या गाड्या अफ्रीकेत जास्त असतात

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 4:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

रहदारी आणि पार्किंग ह्या मोठ्याच समस्या असल्याने बरेच लोक "हॅच बॅक" पसंत करतात.

त्यातही प्रत्येक चालकाचा "पार्किंग" करण्याचा अंदाज वेगवेगळा असतो. जसे की काही जण "रिव्हर्स पार्किंग" मध्ये माहीर असतात तर काहीजण "फॉरवर्ड पार्किंग" चांगले करु शकतात. "पॅरलल पार्किंग" सर्वांनाच जमते असे नाही. तद्वत हॅचबॅक कधीही उत्तम.

परंतु कुटुंब वाढत गेले की आपोआप गाडी "सेडान" होते आणि मग ती चालवायची कसरत करावीच लागते. काहीजण मात्र "स्टेपनी" वर काम भागवतात, ते एक असोच. :)

अथांग आकाश's picture

17 May 2023 - 12:10 pm | अथांग आकाश

धमाल लेख! कहर प्रतिसाद!! मजा आली!!!
0

सौंदाळा's picture

17 May 2023 - 8:02 pm | सौंदाळा

सरळ कॉल करुन झूम कार बूक करावी
आपल्या पसंतीच्या शहरात, आपल्या पसंतीचे मॉडेल भरपूर वापरलेले किंवा एकदम नविनच आलेले, मिनि, सेदान, हॅचबॅक, प्रिमियम आपल्या आवडीप्रमाणे चॉईस करावा. पैसे थोडे जास्त जातील पण समाधान मिळेल. वरुन सर्विसिंग वगैरेची कटकट नाही. मात्र झूमकार चालवताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे. आपल्या ड्रायविंगमुळे गाडीला किंवा कंडिशनमधे नसलेल्या गाडीमुळे आपल्याला इजा झाली तर नसते झेंगट मागे लागू शकते.
सर्व व्यवहार शक्यतो गाडीच्या मुख्य मालकंशीच रोखीत करावा. हल्ली फोटो आयडी, मोबाईल नंबर दिला तर कुठून कुठे जाईल सांगता येत नाही. बाकीचे टुकार रेंटल कारवाले पण मागे लागू शकतात. गाडी घेतल्यावर मात्र गाडी घेऊन हॉटेल, मॉल्स, निसर्गसुंदर स्थळांची निवांत सफर करावी. अधेमधे पुढची सीट रिक्लाईन करुन बसावे किंवा सरळ दोन्ही तंगड्या वर करून गाडीत मस्त ताणून द्यावी. क्रुझ मोड, पॉवर मोड, ईकोनॉमी मोड असे सगळे मोड्स आलटून पालटून वापरावे. अचानक तीव्र चढ/उतार आला आणि गाडी बंद किंवा कंट्रोल बाहेर जातेय असे वाटले तर जमत असेल ट्रॅक्षन कंट्रोल गाडी सावरावी आणि धसमुसळेपणाने न चालवता स्मुथ ड्रायविंग करावे. किती सुंदर असली तरी दुसर्‍याच्या गाडीचे फोटो, सेल्फी मोबाईलमधे कधीच ठेवू नयेत.
अशा प्रकारे झूमकार मनसोक्त पिदडावी नंतर घरची गाडी आहेच.

अजून एक म्हणजे सध्या हायब्रीड गाड्या पण आल्या आहेत. ना पूर्ण पेट्रोल ना पूर्ण ईलेक्ट्रीक या गाडीला अजून तितकीशी समाजमान्यता नाही. रस्त्यावर एक तर फक्त पेट्रोल्/डिझेल किंवा ईलेक्ट्रीक गाड्याच दिसतात. झूमकार घेतली तर अश्या हायब्रीड कार ड्रायविंगचा पण आनंद लूटू शकता. पुढे मागे ह्या हायब्रीड गाड्यांचीच जास्त क्रेझ आली तर कशी चालवायची अचानक, आधी कधीच चालवली नाही, हा प्रश्न पडणार नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2023 - 4:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुढची सीट रिक्लाईन करुन किंवा सरळ दोन्ही तंगड्या वर करून

सोत्रि's picture

18 May 2023 - 6:46 am | सोत्रि

गाडी घेऊन झली असेल तर स्टेपनीचे महत्व अधोरेखित करणारा दिवटेसरांचा हा लेख वाचायलाच हवा!

https://www.misalpav.com/node/14400

- (चालक) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2023 - 4:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

भन्नाट लेख!!

आचारी आणि पुजारी लेखाची पण लिंक द्या

कर्नलतपस्वी's picture

18 May 2023 - 4:41 pm | कर्नलतपस्वी

पण नतद्रष्ट वाचक लेखाला हायजॅक करतात ते मात्र आवडले/त नाही.

चलत मुसाफिर's picture

19 May 2023 - 12:42 pm | चलत मुसाफिर

काही हौशी लोक दोन, कधीकधी तीन गाड्याही बाळगून असतात.

एक गाडी कायमस्वरूपी असते, इतर गाड्या बदलत रहातात.

तुषार काळभोर's picture

19 May 2023 - 1:37 pm | तुषार काळभोर

कार - कुप असली तरी दोघे जण बसू शकतात. हॅचबॅक अन सेदान - चार जण. फॉर्चुनर, रेनॉ लॉजी - यांची गोष्टच वेगळी!!
अशी 'बाइक' हवी... एकटाच चालवणार!
single

डुग डुग डुग डुग असा एका लयीत आवाज करत चाळीसच्या स्पीडनी अवजड वाहन घेऊन फिरण्याची आवड असलेल्यांसाठी हि ठीक! पण तिचे बरेच तोटे आहेत. रात्री-अपरात्री चालवल्यास तिच्या आवाजाचा इतरांना फार त्रास होतो, तसेच तिचे वजनही अनेकांना पेलवत नाही. हे सगळे कमी कि काय म्हणून अनेक वर्षे हीलाच चालवणे चालकाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही वाईट, हर्नियाचा त्रास होणे कन्फर्म! हां, पण पदरी चार गाड्या बाळगणाऱ्यांसाठी त्यापैकी एक म्हणून ती ठीक आहे 😀
वरील सर्व बाबींचा विचार करता एकाच व्यक्तीने चालवण्याच्या गाडीची निवड करायची झाल्यास माझी पसंती हि...

.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 May 2023 - 3:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

शक्य तेव्ह्ढी काळजी घ्या :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 May 2023 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

काहीजणांना ईतके व्हायब्रेशन नको वाटते :) त्यांना स्मूथ चालणार्‍या गाड्याच आवडतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 May 2023 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुषार काळभोर यांना

आग्या१९९०'s picture

19 May 2023 - 3:57 pm | आग्या१९९०

हॉर्नचा वापर केल्यास गाडीचे नियंत्रण आपल्या हातात राहते. जुन्या गाडयांना मॅन्युअल भोपू हॉर्न होते,दाबून वाजवायचे. गाडी चालू करायला समोरून इंजिन मध्ये लोखंडी रॉड घालून जोरात फिरवला की गाडी चालू होत असे. बॅटरी मुळे गाडी चालू करणे आणि हॉर्न वाजवणे दोन्हीची मजा गेली.

गाडीला सायलेंसर लावल्याने गाडीची घुसमट होत नाही का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 May 2023 - 7:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण नव्या पिढीने भोपू हॉर्न आणि लोखंडी रॉड दोन्ही बघितले नसतील. त्यामुळे ती मजा त्यांना कशी समजणार?

सायलेन्सरने होणार्‍या घुसमटीबद्दल बद्दल फारशी कल्पना नाही. जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत...

शशिकांत ओक's picture

19 May 2023 - 11:15 pm | शशिकांत ओक

आम्ही जुन्या नर्मदा १५० वरून जात होतो...
नवी डिओ बुक करायला निघालो होतो कँपातील . अचानक पुढे जाणाऱ्या बसच्या मागे एक जाहिरात लागली होता... विमाननगर बियु भंडारीची शोरूम सुरु आहे. तसाच मागे वळून बुकिंग केले. १० दिवसात डिलिव्हरी मिळाली. जुनीला आमच्याकडे काम करणाऱ्याला देऊन टाकली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 May 2023 - 3:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकतर तुमची गल्ली चुकली आहे किवा प्रतिसाद माझ्या डोक्यावरुन गेलाय.