विमानतळ

भिडू's picture
भिडू in जनातलं, मनातलं
16 Dec 2008 - 3:17 pm

गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त लंडन ला जायचा योग आला.तिथुन परत येताना हिथ्रो विमानतळावर आलेला हा अनुभव्.
पु.लं. नी म्हटल्याप्रमाणे मन्दिरामधे गेल्यावर देवाच्या मुर्ती पेक्षा भाविकाच्या चेहरयावर असणारे भावच जास्त प्रेक्षणीय असतात.मलाहि माणसं(यात स्त्रि वर्ग हि आला) निरखण्यात जास्त मजा वाटते.कोणकडे तुम्ही निरखुन एकटक पहात असाल ,आणी हे जर त्या माणसाच्या लक्षात आले तर तो एकदम कावरा बावरा होतो आणी त्या मुळे त्याचा चेहरा अधिक प्रेक्षणीय होतो.त्या मुळे त्या विमान तळाचि भव्यता,तिथला दिव्यांचा लखलखाट याने प्रभावित होण्यापेक्षा तिथे असण्यारया विविध माणसांमुळे जास्त प्रभावित झालो.विमान सुटायला दोन तास होते म्हणून मी आपला एक कोपरा पकडला आणी माणसं बघायला लागलो.
जगाच्या प्रत्येक कोनातून आणि प्रत्येक कोनामधे जाण्या साठी तिथे माणसे आलि होति तिथे.गोरे,काळे,जाडे,लूकडे,ऊंच,बुटके सर्व जण.आणी प्रत्येकाच्या चेहरयावर वेगळे वेगळे भाव.
कोणी त्या अनोख्या ठिकाणी आल्या मुळे बावरत होते तर कोणी जणू स्वताचा जन्मच मुळी विमानतळावर झाल्याप्रमणे वावरत होते,कोणाच्या चेहरयावर प्रवास सुखरुप होइल कि नाहि याचे टेंशन तर कोणाच्या चेहरयावर नंतर कस्ट्म कसा चुकवायचा याचे टेंशन.लहान मुले तर समवयस्क मुलांबरोबर साताजन्माची ओळख असल्याप्रमाणे पकडापकडी,लपाछीपी खेळत होतिं. काहि मुले दुसरया मुलांच्या हाथा मधला खाउ पाहुन मत्सरा मुळे रडत होति तर काहि जण या सर्व प्रकारशी काहि घेणं देंण नसल्या सारखी आरामात झोपलि होति. तिथे जात्,पात,धम॑ कसलेहि बधंन नव्हते.माणस एकमे़कांशि बोलायला बघायचि पण भाषे च्या अडचणिं मुळे त्यांचा हिरमोड व्हायचा. ति उणीव ते हाथवारे,डोळे किंवा फक्त हास्य यातुन भरुन काढत होते.शेवटी माणसाला माणूस पाहीजे असतो हे खरे.
कोणी घरी जायच्या आनंदात होते तर सोडायला आलेले कोणि विरहात होते.माझ्या समोरच एक अमेरिकन कुटुंब होतें. नवरा,बायको आणी दोन लहान पोरे.ती बिचारी ३ आणी ५ वयाचि मुले बापच्या पायाला मिठी मारुन "पापा,प्लीज डोंट गो, प्लीज डोंट गो" म्हणून रडत होति. आई बिचारी त्या लहान पोरांची समजुत घालत होती आणी बाप असाह्यतेने त्या छोट्यांजींवा कडे बघत होता.एकाक्षणि वाटले त्या ने तो पासपोर्ट,तिकिट,सामान भिरकावुन द्यावे आणी मुलांना जवळ घ्यावे.मनात विचार आला सैनिंकांचे सीमेवर जाताना काय हाल होत असतील्.फारच ह्रदयद्रावक प्रसंग होता तो.का कोण जाणॅ डोळ्यात चटकन पाणी आले.
माझ्या बाजुला एक जपानी जोडपे बसले होते.दोघेहि बाहुली सारखे दिसत होते.त्यातला पुरुष कोण आणि स्त्री कोण हेच कळत नव्हते.ति दोघे हि "सब दुनिया गयी भाड में" असे समजुन एकमेकांन शी गुजगोश्टि करत होते.तिथेच मला एक खिलाडू व्रुत्तीचा पाकिस्तानि तरुण ही भेटला,मी भारतिय आहे हे कळल्या बरोबर शेकहँड करुन "क्या यार्,इस बार भि आपने हम को हरा दिया मॅच में" असे म्हणाला(५-१० दिवसांपुर्वीच आपण पाकिस्तान ला T 20 मधे फायनल ला हरवले होते).
तिथे कोणी फिरत फिरत खात होते तर कोणि टी वी बघत होते.कोणी ग्रुप मधे काय काय घेतले,काय काय घ्यायचे राहिले,काय काय पाहीले,काय काय पाह्यचे राहिले या बद्द्ल बोलत उभे होते तर कोणी निवांत् पणे बसुन पुस्तक/पेपर वाचत होते.कोणी होटेल मधे बसुन चरत होते तर कोणी (माझ्या सारखें) विमानात मिळेल खायला फुकटामधे म्हणुन स्वताचे पौंड वाचवित होते.काहिजण विमानतळावरच शॉपींग चि शेवटचि राउंड उरकुन घेत होते.
विमानतळावर एक परफ्युम चे दुकान होते.महागातली महाग परफ्युम्स तिथे होती(किंमत ५०००,१०,००० आणी पुढे).आणी लोकं बिनधास्त पणे आत मधे जाउन ती ट्राय करत होती.मालक ही शांत पणाने त्या सर्व प्रकाराकडे पाहत होता.मी पण हिय्या करुन आत मधे गेलो आणी २/३ परफ्युम्स गो-मुत्रा प्रमाणे अंगावर शिंपडुन घेतलिं. न जाणो शेजारच्या सिट वरती 'सहप्रवाशीण' असलि तर (अहो कसले काय्,रस्त्यात साध्या सिग्नल ला उभे रहिल्यावर आजु बाजुच्या गाड्यांवरती(किंवा गाड्यां मधे) मुली नसतात्,नशींबच खराब आणि काय) पण माणसाने आशावादी असावे.
मी ही एका कोपरयात बसुन, कुठल्या कुठल्या गंमति जंमति घरी सांगयच्या,खरेदि केलेल्या वस्तू नातेवाईकांना ,मित्रमडंळीना दिल्यावर त्याना कसा आनंद होइल, त्यांच्या reactions कशा असतील याचा विचार करत बसलो होतो.(त्या वेळी माझ्या हि चेहरयाकडे कोणि एकटक पाहत बसले असेल काय्????.........काहितरीच काय.... माझ्याकडे कोण कशाला बघत बसेल्......आमचे आपले 'एकला चलो रे बाबा'.....'आईना देखकर तसल्ली हो गयी.. हमे भी ईस दुनिया में जानता है कोई........)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

16 Dec 2008 - 4:17 pm | निखिलराव

मजा आली , छान निरी़क्षण...

अभिरत भिरभि-या's picture

16 Dec 2008 - 5:53 pm | अभिरत भिरभि-या

बारिक निरिक्षण !!
वर्णनशैली ही आवडली.
पुढील लेखनास शुभेच्छा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2008 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले निरिक्षण !!!

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 1:17 pm | विसोबा खेचर

हेच बोल्तो!

टारझन's picture

16 Dec 2008 - 6:12 pm | टारझन

अवांतर :
मुद्दा १ : मस्त लिहीलंय !!
मुद्दा २ : मांडणी आवडली !!
मुद्दा ४ : चौथा पॅरा आवडला
मुद्दा १४. जिंकलंस मित्रा ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ...

- विमानतळावरचा लाल बल्ब) टार्क्यूरी