तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे.
मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा.
तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा.
मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले.
तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल.
मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत?
तो-- जास्त नाही. ५० लाख.
प्रतिक्रिया
23 Jan 2023 - 8:48 am | कर्नलतपस्वी
खरेच आहे.
23 Jan 2023 - 10:48 am | सौंदाळा
खरयं
पण अजून थोडा वेळ आहे. महानगपालिका निवडणुका तारखा जाहीर होऊ द्या. नाहीतर २०२४ मधे तर नक्कीच. पण तेव्हा रक्कम जास्त असेल.
23 Jan 2023 - 11:41 am | श्वेता व्यास
कटू सत्य !
23 Jan 2023 - 12:00 pm | टर्मीनेटर
छान 👍
23 Jan 2023 - 5:45 pm | चौथा कोनाडा
निवडणुकीची समर्पक नांदी !
स्मार्ट राजकिय लोक !
शशक आवडली.
|| पुशप्र ||
25 Jan 2023 - 6:05 pm | प्राची अश्विनी
शशक आवडली.