मी पकडलेला चोर

भिडू's picture
भिडू in जनातलं, मनातलं
12 Dec 2008 - 9:22 pm

ही एक सत्य घटना आहे.

त्याचे काय झाले.गेल्या वर्षी मी एका ब्रिटिश कंपनी च्या प्रोजेक्ट वर काम करत होतो(म्हणजे आमचा क्लायंट ब्रिटिश होता).त्या मुळे कामाची वेळ दुपारी २ ते रात्रि ११ अशी होती.नेहमी प्रमाणे कॅब ड्रायवर ने पुणे दर्शन घडवत रात्रि १२ च्या सुमारास मला घरी सोडले. पण त्या दिवशी नेमके त्याने घराच्या जरा आधी सोडले.नाहीतरी घरचे बाहेरगावी गेले होते त्या मुळे घरी काहीच काम नव्हते आणी अंतर ५ मिनीटाचेच होते म्हणून चालत निघालो.बरेचसे पुणेकर १० वाजताच झोपतात त्या मुळे सगळ्यांचे लाईट्स बंदच होते. मी बिल्डिगं मधे प्रवेश केला आणी पाहतो तर काय एक माणूस आमच्या बिल्डिगं मधल्या एका बाइक मधुन पेट्रोल काढत होता. त्याचे वागणे संशयास्पद वाटले म्हणून त्याला हटकले,त्या वर तो म्हणाला कि "मी या बिल्डिगं चा वॉचमन आहे".त्याचे उत्तर ऐकुन मला हसायलाच आले.त्याला म्हटले "गाढवा,मी या बिल्डिगं मधे गेले २२ वर्ष रहात आहे. आणी तू मला सांगतोस मी वॉचमन आहे म्हणून" या वर तो थोडा गडबडला. आणी नंतर म्हणाला "या नाही,मी बाजुच्या बिल्डिगं चा वॉचमन आहे" मला कळुन चुकले होते कि तो खोटे बोलत आहे.तरी त्याला म्हंटले "ठिक आहे दाखव कुठली बिल्डिगं ते"त्याचा हाथ पकडुन च ठेवला होता.त्याच्या तोंडाला एक तर दारुचा जबरद्स्त वास येत होता. त्याच्या मागोमाग निघालो.४-५ पावंल चालत गेल्यावर त्याने एकदम माझ्या हाथाला हीसका दिला आणी पळून जायचा प्रयत्न केला.पण मी सावध असल्यामुळे झेप घेउन मागनं त्याचा गळाच पकडला.त्या बरोबर त्याचा सर्व जोर गळुन पडला.मग मला जोर चढला. आणी मी जोर जोरात ओरडलो "चोर्,चोर,चोर" म्हणून्.आमच्या बिल्डिगं मधे पहिल्या मजल्यावर काहि बॅचलर भाडेकरू राहतात्.ते लगेच खाली आले.मग त्याला थोडासा चोप दिला.त्यातल्या एका उत्साहि मुलाने पायातल्या चपलेने बडवले.उत्साहाचा जोर उतरल्यावर आमच्या पुढे प्रश्न पडला कि आता पुढे याचे काय करायचे.त्या भाडेकरुनी हाथ साफ करुन घेतल्यावर माघार घेतली आणी निघुन गेले.आणी परत मी आणी तोच उरलो.तो दारुडा आता रडायला लागला होता.पाया पडत होता.छाती वर हाथ ठेउन आरडा ओरडा करायला लागला.तो सांगत होता कि त्याला कोणीतरि दारुच्या अडयावर एक वडापाव खायला घातला आणी पेट्रोल चोरुन आणायला सांगितले होते.खरे खोटे देव जाणे. शेवटी मलाच दया आलि त्याची.विचार केला.तो आधीच मरतुकडा होता. त्यातुन दारुडा,अजुन याला मारले आणी चुकुन एखादा घाव वर्मी बसला तर भलतंच काहितरी व्हायचे.पोलिसांकडे जायचे म्हटले तर पोलिस तरि काय शि़क्षा करणार होते त्याला १ लीटर पेट्रोल चोरल्या बद्द्ल. फार तर एक् कानाखाली वाजवुन सोडुन दिले असते.म्हणुन परत त्याला एकदा दम दिला आणी सोडुन दिले.कदाचित माझे वागणे चुकिचे असेल त्या वेळी, पण त्या वेळी रात्रिचे १२.३० वाजले होते.आणी मी ऑफीस मधुन दमुन आलो होतो.
खरे सांगायचे तर झेप बिप घेउन कोणाला पकडायचे एवढा शूर नाही आहे मी.पण त्या दिवशी अगांत काय संचारले होते कोणास ठाउक्?(कदाचित त्याच्या आधीच्या आठवड्यात ऐन रस्त्यात पेट्रोल संपल्यामुळे बाइक् ढकलत न्यावि लागली होति तो राग मनात असावा.पेट्रोल ची खरी किंमत जेव्हा ते संपल्यामुळे गाडी ढकलत न्यावि लागते पेट्रोल पंपापर्यंत तेव्हाच कळते.)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 9:28 pm | लिखाळ

:) छान कथा..

पेट्रोल ची खरी किंमत जेव्हा ते संपल्यामुळे गाडी ढकलत न्यावि लागते पेट्रोल पंपापर्यंत तेव्हाच कळते.
खरे आहे :)

-- लिखाळ.

सोनम's picture

12 Dec 2008 - 9:34 pm | सोनम

घटना सत्य आहे .असे तर सर्वीकडे होत असते. पण माणूस पहिल्यादा चोर दिसला की आपले काय जाते याविचाराने त्या चोराच्या नादी लागत नाही.त्यामुळे चोराचे फावते. पण आपण एक जागरुक नागरिक सारखे त्या चोराचा मुकाबला केला. चा॑गले केले. =D> =D> =D> =D> =D>

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

भडकमकर मास्तर's picture

13 Dec 2008 - 12:21 am | भडकमकर मास्तर

त्यातुन दारुडा,अजुन याला मारले आणी चुकुन एखादा घाव वर्मी बसला तर भलतंच काहितरी व्हायचे.पोलिसांकडे जायचे म्हटले तर पोलिस तरि काय शि़क्षा करणार होते
अशीच घटना तीन की चार वर्षांपूर्वी पुण्यात घडली होती... दुसर्‍या एका धाग्यात त्याचा उल्लेख केला आणि परत ही गोष्ट वाचली...
आपली गोष्ट चांगली आहे... मला तुमचे फार चुकले असे वाटत नाही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मिंटी's picture

13 Dec 2008 - 1:14 pm | मिंटी

पेट्रोल ची खरी किंमत जेव्हा ते संपल्यामुळे गाडी ढकलत न्यावि लागते पेट्रोल पंपापर्यंत तेव्हाच कळते.

हे मात्र अगदी खरं आहे. अगदी मनापासुन पटलं :)