परवा भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे.
भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. भक्तीमार्ग विश्वास देतो, तर ज्ञानमार्ग आत्मविश्वास!
केदार
प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 12:50 pm | अवलिया
विप्र सर योगमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या.
सर्व प्रकारचे आसने तसेच विविध मुद्रा यांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री आम्ही देतो.
बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो
(योगी) अवलिया
अवलियाची अनुदिनी
12 Dec 2008 - 12:56 pm | अभिरत भिरभि-या
अहो ते ज्ञानमार्गी आहेत; योगमार्गी नाहीत !!
बाकी गेल्या किमान ५००० वर्षे चाललेली चर्चा २१ व्या शतकात ही चाललेली पाहून म्या धन्य झालो. भारतीय संस्कृतीची चिंता मिटली.
चला आता सुखाने डोळे मिटतो !!
12 Dec 2008 - 7:04 pm | विनायक प्रभू
मला भक्ती मार्ग आवडतो.
तीने मार्ग दाखवला की तेवढाच शोधायचा त्रास वाचेल.
12 Dec 2008 - 12:55 pm | केदार केसकर
धन्यवाद! राग मानू नये पण प्रतिक्रिया थोडीशी असंबद्ध वाटली.
लो.अ.
केदार
12 Dec 2008 - 5:06 pm | अवलिया
अहो केसकरबुवा
तुम्ही आपले एका ओळीत लिहिले मला असे वाटते. बास.
तुम्हाला असे का वाटले? तुमच्या ज्या काही चर्चा झाल्या किंवा तुम्ही ऐकल्या त्यात कोणाचे काय मत होते? शेवटी निष्कर्ष काय आला? तुम्ही कसे ठरवलेत ? हे नको का द्यायला.
धपदिशी काहीतरी वाक्य टाकायचे अन करा काथ्याकुट म्हणायचे... अहो निदान काही तरी काथ्या तरी द्यायचा ना
त्या शिवाय कसे बोलणार ? सांगा बरे.
आता असे करा .. एक नवीन फक्कडसा लेख लिहा. त्यात तुमच्या मनातले विचार लिहा. वाचतो तुमचे विचार अन मग देतो एकदम संबंद्ध प्रतिक्रिया.. चालेल?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
12 Dec 2008 - 5:37 pm | केदार केसकर
मी काथ्याकुट या सदरात हा विचार टाकला नव्हता हो! टाकला असता तर काथ्या तुम्हाला न मागता मिळाला असता. पण मी विषय सुरु केल्यावर विषयाला धरुनच तुम्ही लिहीले असते तर आनंद झाला असता. म्हणजे विषय चाल्लाय समजा "देवाचे अस्तीत्व" आणि कोणी एकदम "उन्हाळी भुइमुगाची लागवड" हा विषय काढला की जसे विसंगत वाटते ना तसे वाटले. असो, प्रत्येकाची मत असतात. पण काथ्याचं मात्र मस्त. पुढच्या वेळेला नक्की बरं का!
लो.अ.
केदार
12 Dec 2008 - 5:49 pm | अवलिया
अहो शेठ
मी विषयाला धरुनच लिहिले आहे. नीट वाचा.
समजा तुम्ही म्हणता ज्ञानमार्ग खरा. चला धरु खरा. सिद्ध करा तर कसा सिद्ध करणार तुम्ही?
ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. तुम्हाला पातंजल योगाच्याच सहाय्याने अनुभुती शक्य होते. जर तुम्हाला अनुभुती नको असेल तर योगमार्गाची गरज नाही, पण मला सांगा आपण येवढ्या गप्पा मारायच्या पण जर परमेश्वर खरोखर कसा दिसतो हे पहायचेच नाही तर काय उपयोग त्या ज्ञानाचा? सांगा बरे.
बर देवाचे अस्तित्व आहे की नाही असे आपण विचारलेच नाही? असते तर भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. त्याबाबतीत माझी नका काळजी करु.
बाकी तुम्ही लेख लिहाच... चर्चा करु.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Dec 2008 - 11:51 am | केदार केसकर
अहो अवलिया,
बरेच दिवस इथे नव्हतो म्हणून प्रतिक्रिया नोंदवू शकलो नाही. असं काय करता हो! स्वत:लाच खोडून काढता. एक्दा म्हणता सिध्द करा सिध्द करा. आणि तुम्ही स्वतः इतक्या आत्मविश्वासाने चुकीचे कसे लिहिता जे तुम्ही सिध्द करु शकणार नाही. "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. ". तुम्ही लाख म्हटले हो, अगदी आज statement केलेत. पण हे पटवून घेण्यासाठी, माणसं आजुबाजुला हवीत की नकोत. उगीच शब्दबंबाळ वाक्यरचना करून धूळ्फेक करण्यात काही अर्थ नाही साहेब. अद्वैतवादी की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी या दुष्टचक्रात अडकून confuse होउ नका. जी कोणी धन्य माणसं होउन गेली की नाही, ती conceptually अद्वैतवादीच नाहीत का? आता physically तुम्ही करा ग्रुप आणि टाका त्यांना तुम्हाला हव्या त्या ग्रुप मधे. असा साधं सोपा विचार केला तर आपल्यासाठी आणि लोकांसाठी सुसह्य होतं. नाही तर कशात काय आणि फाटक्यात पाय अशी स्थिती होते. आम्हाला आणि मला खात्री आहे माझ्या मि.पा. वरच्या मित्रांना परमेश्वर या ना त्या रुपात दर दिवशी दिसत असेल. अहो, साधा भैरव रागातला शुध्द गंधार लागला ना की सुध्दा परमेश्वर दिसतो. भीमसेनजींनी मिया की तोडी मधे एक्दा पंचम असा लावला होता की पं. सी. आर. व्यासांना अनुभूती आली. तुम्हाला परमेश्वर दिसला की आम्हालाही सांगा. अजुन दिसला नाही वाटतं. पुन्हा तुमची काळजी आम्ही करण्याचे काय प्रयोजन. काही संबंध नाही साहेब. देवाचे अस्तित्व आहे की नाही असे मी विचारलेच नाही. त्यामूळे भुईमुग लागवडी पासून देव ह्या विषयात मला तरी काही स्वारस्य नाही. एकदा म्हणता "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते". एकदा म्हणता "भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी". त्यामुळे मी तुम्ही आत्ता confused आहात या निष्कर्षाप्रत माझ्यासाठी येत आहे. शेवटी माझ्या हीताचा विचार मलाच केला पाहीजे म्हणून. आता यावर सुध्दा विसंगत प्रतिक्रिया लिहीली जाण्याची शक्यता आहे. म्हणून माझ्यासाठी हा विषय आता बंद. यापुढे संवाद होण्याचे चिन्ह नाही. वाद नको म्हणून हा प्रपंच.
केदार
19 Dec 2008 - 2:58 pm | अवलिया
मी confused आहे? :?
बर बर. हरकत नाही. :)
खरे तर तुम्ही इतके मस्त फुलटॉस दिले आहेत की मी अक्षरशः माझे मन मारले आहे कारण तुम्ही तुमच्या बाजुने थांबले आहात. ;;)
बाकी तुम्ही खरेच लेख लिहा ...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
12 Dec 2008 - 7:13 pm | शंकरराव
थोड्क्यात ...
अस्तित्व...पिंडी ते ब्रम्हांडी. ...
12 Dec 2008 - 1:14 pm | राघव
मूळ उद्दीष्टाबद्दल म्हणत असाल तर ते दोन्ही मार्गातून मिळतं असं ऐकून आहोत बॉ. बाकी विश्वास-आत्मविश्वास याबद्दल बोलायचे तर तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं!
मुमुक्षु
12 Dec 2008 - 2:09 pm | केदार केसकर
प्रतिक्रिया १००% आवडली.
तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं! मस्त.
केदार
12 Dec 2008 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार
इस रास्ते से जाओ या उस रास्तेसे , सारे रास्ते गॉड कि तरफ जाते है !
परिकथेतील अमीताभकुमार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
12 Dec 2008 - 1:55 pm | JAGOMOHANPYARE
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ
ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव
देवा मला मिसळपाव !
12 Dec 2008 - 2:20 pm | सुनील
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ
ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव
!!!!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Dec 2008 - 4:03 pm | पुष्कर
माझ्या मते कोणता मार्ग श्रेष्ठ हे ठरवता येणार नाही. जर दोन्हींचं ध्येय एकच आहे, तर तुम्हाला कोणता मार्ग कोणता आवडतो, तो तुम्ही अवलंबावा.
दहावीनंतर डिप्लोमा करून मग इंजिनियरिंगची डिग्री मिळवणं चांगलं, कि बारावी नंतर इंजिनियरिंग करणं चांगलं? दोन्हीचे काही ना काही तरी फायदे तोटे आहेतच...
12 Dec 2008 - 4:58 pm | लिखाळ
भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग म्हणजे काय? या मार्गावरुन प्रवास करुन कृतार्थ झालेले लोक कोण?
असे दोन भाग पाडण्याअतके ते दोन मार्ग भिन्न आहेत ते कसे?
त्याबद्द्ल आपले विचार काय आहेत? असे वाचायला मिळाले तर जास्त आवडेल.
ज्ञान अथवा भक्ती यापैकी काहीच मी स्वतः अनुभवलेले नाही की मी मत देऊ शकेन.
-- लिखाळ.
12 Dec 2008 - 5:25 pm | ऋषिकेश
चर्चाविषय वाचून ह्या चर्चेतील ह्या प्रतिक्रीयेत मला पडलेले पश्न आठवले. चर्चेच्या सोयीसाठी इथे जसेच्या तसे देत आहे:
१. माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी?
म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तर तो कशाला प्रमाण मानेल? कारण माणसाने जसजशी वैज्ञानिक प्रगती केली आहे त्याच वेगाने त्याने नवेनवे देव शोधले आहेत. कधी अग्नीला देव मानले तर कधी पुस्तकाला, कधी व्यजक्तीला तर कधी दगडाला... तेव्हा तो विज्ञानवादी होत गेला का दैववादी?
२. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतवर?
उदा. अनेक गोष्टींमधे तो सश्रद्ध भक्ताला आधार देताना रंगवला जातो .. मात्र अश्या गोष्टींद्वारे ती गोष्ट सांगणारा ती गोष्ट ऐकणार्याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा निर्माण करत असतो का (त्याच्या असामान्य शक्तीबद्दल) भीती?
-(गोंधळलेला) ऋषिकेश
12 Dec 2008 - 6:43 pm | शिशिर
माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी?
एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तरि विश्वातील अनेक गोष्टी अनाकलनीय , मानवी बुध्दी च्या परे असल्याची जाणीव झाल्यावर तो सहजच परमेश्वरी शक्ति वर विश्वास ठेवतो. प्रत्येक वैज्ञानिक जस जसे नवीन शोध लावतो तसाच तो देवा च्या अधिकच जवळ जातो.
देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतीवर?
देवा वर विश्वास ठेवणारा देवा वर प्रेम ,भीती, श्रध्दा,प्राप्त विपरित परिस्थिती मुळे देवा ची ओढ लागणे व इतर ही कारणे असू शकतात.
12 Dec 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर
माझं मत -
ज्ञानमार्गाची वाट भक्तिमार्गातूनच दिसते, सापडते!
ज्ञान गुरुकडून प्राप्त होते आणि गुरुची भक्ति केल्याशिवाय, त्याच्यावर श्रद्धा असल्याशिवाय त्याचाकडून ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान ही दुधारी तलवार आहे जिच्या एका धारेमुळे अहंकार प्राप्त होऊ शकतो आणि ती तलवार आपल्यालाच त्रासदायी ठरू शकते. परंतु भक्तिमार्गाची कास धरली असेल, भक्तिमार्गाच्या रस्त्यावरून ज्ञानमार्गाकडे प्रवास केला असता ज्ञानाच्या दुधारी तलवारीची अहंकाराची धार आपोआपच बोथट होते, कुचकामी होते!
भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो.
या दोन्ही मार्गात अशी तुलना असता कामा नये. आपण ज्ञानमार्ग जरूर अधिक माना, परंतु भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्गाची वाट सापडणे माझ्या मते दुरापास्त आहे!
आपला,
(भक्तिमार्गी) ह भ प श्री संत तात्याबा महाराज.
12 Dec 2008 - 7:33 pm | टारझन
भक्तिमार्ग विश्वास कसा देतो ?
ज्ञानमार्ग आत्मविश्वास कसा देतो ?
काय तरी मागं पुढं ल्या ना राव ... एक तर टाकलाय जनातलं मनातलं मधी ... आता जनामनात २ लायनी असल्याव काय बोलावं ..
हा काथ्याकुटात टाकला नसला तरी एक ज्ञानवर्धक आणि भक्तिवर्धक लेख मात्र नक्कीच नाही.
माझा एक घागा (जागा वाचावी म्हणून इथेच टाकत आहे)
लोहमार्ग का जलमार्ग !
परवा लोहमार्ग का जलमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे.
.
जलमार्गापेक्षा मी लोहमार्ग अधिक मानतो. जलमार्ग रस्त्यांचा खर्च वाचवतो, तर लोहमार्ग इंधन वाचवतो!
.
टार्दार
12 Dec 2008 - 7:41 pm | अवलिया
विप्र सर विमानमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या.
सर्व प्रकारचे आसने तसेच विविध हवाईसुंद-यांचे भावमुद्रा यांचे लाभ मिळतील याची खात्री आम्ही देतो.
बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो
(विमानमार्गी) अवलिया
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
12 Dec 2008 - 7:38 pm | शिशिर
आअता बास करा की टिंगल राव. येवढा गंभीर विषय अन काय बॉलताय काय लिवताय.......?
12 Dec 2008 - 8:57 pm | कलंत्री
भक्ति, कर्म, योग आणि ज्ञान अशा चार पायर्यानंतरच मोक्षमार्ग हा मानलेला आहे.
12 Dec 2008 - 9:32 pm | JAGOMOHANPYARE
जलमार्ग आणि लोहमार्ग दोन्ही हवेतच ( हवेत म्हणजे पाहिजेत, वर वायूमध्ये असा अर्थ नाही !) जलमार्गाने अतिरेकी आले तर लोहमार्गाने आपल्याला पळता येते म्हणून....
12 Dec 2008 - 9:38 pm | अभिजीत
वर सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे थोडा अधिक विषय विस्तार हवा होता.
असो.
भक्तीमार्ग -
आपल्याकडे भक्तीमार्गाचा प्रसार संत परंपरेतून झाला.'नामस्मरण' यात सांगितलं आहे. भागवत धर्माचा प्रसार पाहता भक्तीमार्ग समाजातल्या सर्व घटकांना जवळचा वाटला आहे. असे का झाले असावे याचा अभ्यास संकल्पना समजण्यासाठी होउ शकतो.
- अभिजीत
13 Dec 2008 - 12:01 am | आजानुकर्ण
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा, नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। असा ज्ञानमार्ग कधीही उत्तम
आपला
(अज्ञानी) आजानुकर्ण
13 Dec 2008 - 12:07 am | विसोबा खेचर
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा,
आमच्या मते मुळात हा भक्तिमार्गच नव्हे! कारण असेल माझा हरि तर देईल.. या वाक्यात हरिकडून काहीएक मिळण्याची अपेक्षा व्यक्त झाली आहे. आणि भक्ति ही नेहमीच निर्व्याज, निर्भेळ असावी. किंबहुना तीच खरी भक्ति!
असेल माझा हरि तर देईल.. अशी अपेक्षा जिथे आली तिथे भक्तिमर्ग संपला, असं आमचं मत आहे..
असो,
आपला,
(भक्ति ही नेहमी निर्व्याज, विनाअपेक्षा असावी, संपूर्णत: समर्पणाची असावी अशी भक्तिची व्याख्या गृहीत धरलेला) तात्या.
13 Dec 2008 - 12:14 am | विसोबा खेचर
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।
जगी ज्ञानदीप नक्कीच लावता येतील, परंतु त्या आधी भक्तिने कीर्तनाच्या रंगी नाचणे, तल्लीन होणे अधिक महत्वाचे!
असो,
आपला,
(भक्तिमार्गी) तात्या.
--
मला उत्तम यमन समजण्याकरता, उलगडण्याकरता, त्यातले ज्ञानकण वेचण्याकरता आधी यमनची भक्ति केली पाहिजे, निरनिराळ्या दिग्गजांचा यमन माझ्या सिस्टिममध्ये जाईपर्यंत श्रद्धेने, भक्तिने तो मी ऐकला पाहिजे तरच मला त्यातल्या एखाद्या सुराचे ज्ञान होऊ शकेल! विनाभक्ति, नुसतं ज्ञान मिळवण्याच्या लालसेने यमनचा कोरडा अभ्यास केल्यास माझा यमनही तितकाच कोरडा असेल!
13 Dec 2008 - 12:27 am | शशिधर केळकर
चर्चा वाचायला मजा आली.
कोणाही साधकाला कोणा एका मार्गानेच फक्त प्रवास करणे शक्य नाही. ज्ञानमार्गी असला तरी कर्म करणे प्राप्त आहे. तो काही रेल्वे ट्रैक नाही. आपले बालपणापासून होणारे संस्कार, घरचे वळण वगैरे यांच्या अनुषंगाने माणसाला कमी अधिक भक्ती, कर्माबद्दल आसक्ती, ज्ञानाबद्दल ओढ वगैरे असायचेच. कोणी मोठे योगी, संत महात्मे असतील, अध्यात्ममार्गावर ज्यांची बरीच प्रगती झाली असेल त्यानी या विषयावर काही ठाम मत बनवून तो तो मार्ग अधिकत्वाने स्वीकारला असे होऊ शकते. तसे पाहिले तर हा अगदी व्यक्तिगत विषय ही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रगती माहीत असते. कोणा व्यक्तीची अध्यात्मिक गती काय आहे, हे तो कसा वागतो बोलतो या वरून इतर कोणी करू शकतही नाही (संत वगळता). कोणी म्हणाले ज्ञान मार्ग श्रेयस्कर म्हणून भक्तिमार्ग कमी वगैरे होण्याचा ही भाग नाही. मजेची तर ही ही बाब आहेच, की कोणाला आवडो वा न आवडो, प्रत्येकाला अध्यात्मिक मार्गावर नियती पुढे ढकलण्याचे काम करीत आहेच. हे आहे हे असे आहे. हवे असले तर घ्या, नको असले तरी घ्याच! पर्याय नाहीच इथे! ज्याला जे जसे वाटेल तसे वागण्याची पूर्ण मुभा आहे. मार्ग कोणताही घ्या, प्रवास हा करायचाच आहे.
13 Dec 2008 - 1:48 am | केदार
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का?
देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं.
ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्या केदार केसकरां पर्यत चालतच आहे.
हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप.
अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही.
उदा द्यायचे झाले तर आपल्या तात्यांचेच बघाना. त्यांचा जो आयडी आहे तो काही उगाच घेतला नाही, त्या पाठीमागे विचार आहे हे ज्ञान मार्गीयांना लगेच कळते. :) काय तात्या बरोबर की नाय? पण भक्ती मार्गीयांना विसोबा माहीत असेलच असे नाही. आणि माहीत असला तरी त्या कूळकर्न्याने 'खेचरच' नाव धारण का केले हे कसे कळनार?
त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं.
अवांतर किती जणांना येथे खरे 'विसोबा खेचर' माहीती असतील?
15 Dec 2008 - 2:08 pm | राघव
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का?
कोण म्हणतात/कोण नाही म्हणत? तुम्हांस कुणी माहित असतील तर सांगावे.
देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं.
ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्या केदार केसकरां पर्यत चालतच आहे.
हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप.
अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही.
मला वाटते कि तुम्हाला शंका आहे अशातला काहीही भाग नाही. फक्त मत मांडायचे आहे. मग मांडा की जोरात! कुणी अडवलंय!!
त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं.
लाखाचं बोललांत. आणखी चर्चा करायची गरज आहे क यानंतर?? :)
(ज्ञान तर दूरच राहिले, भक्ती काय चीज असते ते तरी अनुभवून बघावे अशा प्रयत्नात असलेला) मुमुक्षु
21 Dec 2008 - 12:51 am | अविनाशकुलकर्णी
भक्ति मार्ग कि ज्ञान मार्ग या वर एक कथा सांगतो...ज्याने त्याने आपापला निष्कर्श काढावा...
पंढरीची वारी संपवुन एकदा ज्ञानोबा व नामदेव परत चालले होते..पायीच प्रवास होता..उन होते..व दुश्काळा मुळे पाण्याचा ठणठणाट होता..दोघानाहि खुप तहान लागली होति.."ज्ञानोब खुप तहान लागली आहे" नामदेव म्हणाला.त्यांनि आजु बाजुला पाहिले सारे रखरखित वातावरण होते..आता ज्ञानोबा म्हणजे ज्ञान मार्गातले शिरोमणी...आणि नामदेव म्हणजे साधा भक्तिमार्गातला साधक..ज्ञानोबाला जरा नामदेवाची मजा करायची हुक्कि आलि..तो म्हणाला...अरे मी तर योगी आहे मला काहि काळजी नाहि तहानेची..असे म्हणुन त्याने योग सामर्थ्याने सुक्ष्म देह घेतला व बाजुल एका झाडाच्या पानावर दव बिंदु पडला होता तो शोषुन घेवुन ते परत पहिल्या रुपात आले व नामदेवाला म्हणाले.."माझी तहान भागली"..नामदेव तर हा सारा प्रकार पाहुन चकित झाला.त्याला थोड्याच ह्या सा~या विद्या माहित होत्या?..त्याने एकदम विठ्ठला असा व्याकुळ होऊन टाहो फोडला आणि काय चमत्कार महाराजा..जमीनितुन एक कारंजे बाहेर आले आणि त्यानि नामदेवाची तहान भागवली....असा आहे ज्ञान व भक्ति मार्ग....कसाहि जा भगवंत प्राप्ति होणार..
21 Dec 2008 - 1:09 pm | प्रकाश घाटपांडे
योगमार्गाचे काय माहित नाय पन काही ठिकानी सगळे मार्ग चोखाळावे लागत्यात. नाय त मंग लागवड कशी व्हनार?
काय टाकलाय ?
अवधुत दादा 'नी 'दे.
प्रकाश घाटपांडे
21 Dec 2008 - 3:00 pm | साखरांबा
आपण तर उगाच इतके दिवस 'काम' मार्गाची कास धरली म्हणायची =((
ही गंभीर आणि एरंडेलप्राश चर्चा पाहून 'काम' ही गोष्ट सगळ्यात हलक्या दर्जाची असे वाटायला लागले आहे. #o
'काम' देवा धाव रे धाव आता ! :T
साखरांबा