सुपर अँटीस्पायवेअर

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
12 Dec 2008 - 6:19 am

अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती. दोन तीनदा हा प्रकार झाल्यावर लक्षात आले, कुठलातरी ऍडवेअर/मालवेअर सारखा विषाणू घुसला आहे. लगेच आयईची सगळी कॅश मोकळी केली आणि कुक्या/हिस्ट्री वगैरे उडवुन लावले. पुन्हा ब्राउजींग सुरू केले तरी तोच प्रकार सुरू झाल. मग लक्षात आले की आपल्याकडे कुठलेही स्पायवेअरच नाही. लगेच 'विंडोज डिफेंडर' डाउनलोड केले आणि सगळा संगणक पिंजुन घेतला. त्याने किरकोळ एक दोन ट्रॅकिंग कुक्या उडवल्या पण त्यानंतरही बाकीची स्थिती जैसे थेच. आता मात्र लक्षात आले की काहीतरी गंभीर प्रकरण आहे. मग स्टार्टअप मध्ये जाउन कुठल्या कुठल्या प्रोसेसेस लोड होताहेत ते बघीतले तर त्यात एक विचित्र डीएलएल फाईल दिसली. त्या फाईलच्या नावाने गुगलले असता १-२ डिस्कशन बोर्ड्सवरच त्याची नोंद आढळली आणि तिथले पब्लिक हि फाईल विषाणू आहे म्हणून बोंबलताना दिसले. मग मात्र प्रकरणाला चांगलेच गांभिर्य आले. मी लगेचच माझा मकॅफी अँटी व्हायरस अपडेट केला आणि पुन्हा संगणक पिंजून काढला. जवळपास २-३ तास घेतल्यावर त्यातुनही काही फारसे हाताला लागले नाही आणि मूळ समस्या तशीच. आता मात्र काय करावे कळेना.

शेवटी गुगलबाबावर विश्वास ठेवुन आणखी काय उपाय आहेत का ह्याचा शोध एक शेवटचा प्रयत्न म्हणून सुरू केला. त्यातुन एका ठीकाणी मला 'सुपर अँटीस्पायवेअर' ह्या नविनच सॉफ्टवेअर विषयी माहिती मिळाली. त्यांच्या संकेतस्थळावर जाउन ते मोफतच आहे ना, कसल्याही जाहिराती घुसडत नाही ना इ. इ. ची कसुन माहिती काढली. कारण बर्‍याचदा ही नाव न ऐकलेली सॉफ्टवेअर्स भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था करुन ठेवतात. सगळी खात्री झाल्यावर शेवटी एकदाचे ते डाउनलोड केले, आणि नामवंत डॉक्टर्सनी हात टेकल्यावर शेवटचा उपाय म्हणून रुग्णाला जसे कोण काय सांगेल ते देतात तश्या अवस्थेत पुन्हा एकदा संगणक ह्या सॉफ्टवेअर कडून पिंजुन घेतला. "साध्या सुध्या व्याधी तर कुणीही बरे करते आम्ही असाध्य व्याधी देखिल बर्‍या करतो" असे काही तरी स्लोगन आले आणि उपचार सुरू झाले. जवळपास १-२ तास खाल्ल्यावर माझ्या संगणकात ह्याने बरेच काय काय शोधुन काढले. निरनिराळ्या ४१ व्याधी दाखवल्या आणि त्यावर उपायही केले. मी संगणक रिस्टार्ट केला आणि ब्राउजींग सुरू केले तर अहो आश्चर्यम!! मूळ समस्यातर दूरच नेटचा स्पीड पूर्वीपेक्षा किंचीत जास्त वाटत होता. सुपर अँटीस्पायवेअर ने झक्कास काम केले आणि माझी बराच ताण हलका केला. भविष्यात आणखी कुणाला असा त्रास उद्भवल्यास वेळ आणि ताप वाचावा म्हणून माझा अनुभव इथे द्यावासा वाटला.

सुपर अँटीस्पायवेअर इथे मोफत उतरवुन घेता येते. तुमच्या संगणकावर देखिल एक ट्रायल घेउन बघाच.

माझा संगणक : विंडोज एक्सपी आणि इंटरनेट एक्सप्लोरर.
----------------------------------------------------------------------------------------------
डिस्क्लेमर : माझा सदर सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपनीशी कसलाही संबध नाही, ज्याने त्याने आपापल्या जवाबदारीवर उतरवुन घ्यावे.

तंत्रसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

12 Dec 2008 - 7:10 am | छोटा डॉन

ऍन्टीव्हायरसचे मस्त माहिती दिली आहे ...
हा बहुतेक "मालवेअर" प्रकारचा विषाणु असेल, ह्याचा मुख्य परिणाम म्हणाजे स्पीड वाईट बोंबलतो सिस्टीमचा ...
चांगली सुचना दिलीत, बर्‍याच जणांना उपयुक्त आहे ही माहिती ...

अवांतर :
साधारणता २ महिन्यापुर्वी मलाही असाच प्रॉब्लेम आला होता, माझ्या सिस्टीमची वाईट लागली होती.
मी "गाजलेले ऍन्टीव्हायरस" जसे की "मॅक्फी, ए व्ही जी , नॉर्टन " वापरुन पाहिले तर जास्त काही चांगला परिणाम झाला नाही व उलट हालत जास्त खराब झाली , स्पीड एवढा बोंबलला की मला कुठेही क्लीक करताना देवाचा धावा करावा लागला ...
नंतर "विंडोज डिफेंडर" ने बर्‍यापैकी स्पीड बाबत चांगला परिणाम दिला व माझे संगणकावर नियंत्रण आले ...

मग मी " अव्हिरा फ्री ऍन्टीव्हायरस + स्पाय बोट " हे कॉम्बीनेशन वापरुन अख्खी सिस्टीम धुवुन काढली व आज परिस्थीती पुर्ववत आहे.
जरी "ओ एस" रिफ्रेश मारली तरीही काम होते ...

सद्य परिस्थीतीत मी वर दिलेले " अव्हिरा फ्री एव्ही + स्पाय बोट " हे कॉम्बीनेशन वापरायचा सल्ला देईन, एकदम जबरा आहे दोन्हीही.

अतिअवांतर : माझा "" अव्हिरा फ्री एव्ही + स्पाय बोट " ह्या दोन्हीही कंपन्यांशी कसलाही संबंध नाही.

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

आजानुकर्ण's picture

12 Dec 2008 - 7:38 am | आजानुकर्ण

मी लायनक्स वापरतो. त्यामुळे ही कटकट नाही.

आपला,
(उबुंटूप्रेमी) आजानुकर्ण टोरवाल्ड्स

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2008 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी लायनक्स वापरतो. त्यामुळे ही कटकट नाही.
+१
लिनक्सच वापरत असल्यामुळे अशा गोष्टींचा विचारच नाही करायला लागत.

(जेन्टूप्रेमी) आदीमाया दुर्बिटणे

राघव's picture

12 Dec 2008 - 11:16 am | राघव

उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
छोटा डॉन म्हणतो तसे नक्कीच मालवेअर चा प्रॉब्लेम असणार हा. मलाही असा अनुभव आलेला. बहुतेक सगळे ट्रोजन्स असेच असतात. वाट लावणारे!! कसले सुख मिळते यांना बनवणार्‍यांना माहित नाही!! डोक्याचा पार भुगा होतो!
माझ्याकडे तेव्हा फक्त ऍण्टीव्हायरस होते. या ट्रोजन्स नी त्याचीच वाट लावली प्रथम. मग काय त्यांना रान (बोलेतो कॉम्प्युटर) मोकळे. शेवटी मी सरळ शहाण्या मुलासारखे फॉरमॅट मारले. मित्राकडून AVG antivirus, AVG antispyware, Zonealarm Firewall, CCleaner असे सगळे सेटअप्स आणले आणि माझ्या कॉम्प्युटर वर टाकले. नंतरच मग नेट चालू केले. तेव्हा कुठे आता जरा सुखी आहे.
पण आता AVG चा स्यूट विकत घ्यावा लागणार बहुदा. कारण AVG antispyware आता फ्री नाहीये. त्यामुळे नवीन अपडेट्स नाही डाऊनलोड करता येत.
या बाबतीत लायनक्स/युनिक्स खरेच चांगले.
मुमुक्षु

सखाराम_गटणे™'s picture

12 Dec 2008 - 10:18 am | सखाराम_गटणे™

माहीतीबद्द्ल धनन्यवाद

http://lokayat.com/node/130

हे पहा.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2008 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार

मालवेअर बाइटस हा सर्वात अप्रतीम असा क्लिनर आहे आणी तो फ्री सुद्धा आहे. आणी हो कोणालाही कुठलेही सॉफ्टवेअर हवे असल्यास अगदि कॉर्परेट एडिशन्च्या एन्टिवायरस पासुन आयकॉन पॅकेजेस पर्यंत त्यांनी बिनधास्त आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सर्व प्रकारचे क्रॅक्स व सिरियल्स दोस्ती खात्यामंधी फीर्र्री पुरवु. ;)
फुकट ते पौष्टीक !
स्.दा.फुकटे

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सुनील's picture

12 Dec 2008 - 2:15 pm | सुनील

सर्व माहितीबद्दल धन्यवाद. ह्या सर्वांच्या सुधारीत वायरस डेफिनेशन फाईल्स विना-मोबदला उपलब्ध होतात ना?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2008 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

हो सहजपणे मिळतात. प्रोग्रामचे नविन व्हर्जन आल्यास ते सुद्धा आपोआप डाउनलोड होते. चिंता नसावी !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अमेरिकन त्रिशंकू's picture

12 Dec 2008 - 5:12 pm | अमेरिकन त्रिशंकू

माझ्या संगणकावर पण एक व्हन्डू नावाचा व्हायरस शिरला होता. तेव्हा सुपर ऐंटीस्पायवेअर ने वाचवले होते. सुपर ऐंटीस्पायवेअर ची माहिती मला या वेबसाईट वरून मिळाली .

www.techsupportalert.com

This has independent reviews of all sorts of freeware.