मला आज एक मिपासद्स्य सहकुटुंब भेटले.त्यांच्या परवानगीने हे प्रकटन.
एक तो होता. एक ती होती. पत्रिका बघुन लग्न झालेले. लग्नाआधी एकमेकांच्या आवडीनिवडी पडताळुन बघायला पूर्ण संधी मिळालेली होती. चार वर्षाचा एक मुलगा होता. दोघांची सारखी भांडणे होत होती. भांडणाला कसलाही विषय चालत असे. न आवडणारी भाजी पासुन ते तो ने कधीतरी घेतलेला पेग. भांडण विकोपाला जायचे. सरतेशेवटी मॅरेज काउंसिलरकडे जायचे ठरले. जाउन सुद्धा आले. काउंसिलर कडे जाउन आल्यावर भांडणे आणखीन वाढली. आधी मराठीत भांडत. आता काऊंसिलरने सांगितलेले इंग्रजी शब्द वापरुन भांडत होते.
त्यांच्या बोलण्यात सारखे काउंसिलर हा शब्द परत परत येत होता. तो कानावर कॉन सेलर(बंडलबाज) असा पडत होता.त्या महात्म्याने जी समृद्ध सह़जीवनाची त्यातली काही सुत्रे सांग खालीलप्रमाणे. नंबर घालुन झालेल्या वाक्यानंतर माझे विचार. वाचकांना पटावेत असा काहीही आग्रह नाही.
१.आपल्या जोडीदाराच्या चूका मित्रांकडे/मैत्रिणीकडे बोलु नका.
मी मिपावर बोलु शकतो. मिपाकर माझे मित्र किंवा मैत्रीण नाहीत. (त्याहुन जास्त आहेत) माझे विचार
२.लग्न झाल्यावर एकमेकाना समजायला काही वर्षे लागतात.
माझ्या लग्नाला २२ वर्षे झाली. मला फार काही समजले आहे असे मला वाटत नाही.
३. तुमचे खास हास्य फक्त जोडीदारासाठी.
हा म्हणजे अन्यायच झाला की.
४.सर्व वेळ एकमेकाबरोबर घालवु नका. स्वःत चे सर्कल तयार करा.
मी मला वेळ मिळाला की मिपावर असतो.मित्रांबरोबर बाहेर गेले की बील मला भरावे लागते.ते जास्त असते.
५. कितीही भांडण झाले तरी आदर सोडू नका.
आदराचे मला माहित नाही.पदराबद्दल बोला.तो सोडायचा प्रष्नच नाही. उपाशी मरायचे आहे का?
६. प्रत्येक भांडण तुम्ही जींकलेच पाहिजे असे नाही.
मी भांडण जिंकू शकतो ह्यावर माझा विश्वास नाही.गेले ते दिवस.
७. तोंड बंद करायची कला शिका.
लग्न झाल्यापासुन हे काम एकदम बरोबर शिकलो आहे.
८. प्रत्येक नातेसंबंधात वाद असतोच. तो नीट बोलुन सोडवायचा का कारपेट खाली ढकलायचा हे तुम्ही ठरवा.
माझ्याघरी कारपेट नाही. मी माळ्यावर टाकतो. वेळ मिळाला की कधीतरी साफ करीन.
इतर सर्व चर्चा करुन काऊंसिलरला कानशिलाखाली मारले पाहीजे असे मी त्यांना कळवले. हा सर्व त्रास गृहपाठ नीट न होण्यामुळे होत आहे असे कळवले. आणि २०० पानाची एक वही भेट म्हणुन दिली. आणि तिचे उपयोग सांगितले.
--------------------------------------------------------------------------------------------
मला बसपेक्षा गाडीचा प्रवास आवडतो. त्याचे मुख्य कारण की गाडी ठाण्याला आली की लगेच घोषणा होते, "आपण आपल्या सामानाची नीट तपासणी करा". मी लगेच ती करतो. त्यामुळे काही सामान विसरले असेल तर घरच्या तोफखान्यासाठी तयार राहता येते. गृहपाठ न केलेल्या विद्यार्थ्यासारखे तोंड केले की भांडण लगेच थांबते.
मॉल मधे खरेदी म्हणजे मला एक जीवावरचे संकट वाटते. मलासर्व दुकानदार खाटिक वाटतात आणि मी कत्तलीला आलेला बकरा. सर्व खरेदी होईतो मी नेमक काय करायचे ह्याबद्दल माझा फार गोंधळ होतो म्हणुन मी हे सहसा टाळतो. आता ह्या विषयावरुन भांडण नको म्हणुन एक आयडीया केली. खिशात एक सींगल पेग घेतो. मॉल मधे गेल्यावर एक कोक चा कॅन घेतो. अगदी योग्य जागेवर उभा राहतो. मॉल मधे कोका कोला प्यायला बंदी नाही. हिरवे हिरवे गार गालीचे..... गाणे म्हणत मजेत वेळ जातो. नवरा खरेदीला येतो म्हणुन बायको खुष.
आठ वर्षापुर्वी मी पोल्ट्री मधे रिसर्च करत होतो. घरी आल्यावर बायको दुस-यांदा आंघोळ करायचा आग्रह करु लागली. मी म्हटले चालेल करतो दुसरी आंघोळ. पण आंघोळ केल्यावर "चित्तवृती अंमळ प्रफुल्लीत होतात त्याचे काय" असे म्हटल्यावर परत आग्रह झाला नाही.
सहजीवनात सहन पण करावे लागते आणि जीवन पण व्हावे लागते.
जाता जाता: जीवन ह्या नटाची नारदाची भुमिका करण्यात हातखंडा होता.
माझी बायको मला कमी साईज ची बनियन घेते. कारण त्यावर जास्त डिस्काऊंट असतो. दोनदा घातल्यावर साईज बरोबर होते असे तीचे म्हणणे.
मला एकदा सि.एस.टी वरुन १२ पांढरे शर्ट घेउन आली. लय भारी ब्रँड पण सेकंड क्वालीटी. शर्टाची किंमत प्रत्येकी ७० रुपये. हात थोडे छोटे असले म्हणुन काय झाले. फोल्ड करुन घ्या असे म्हणते. काय बोलायची सोय नाही. मी आपले ७ नंबर सुत्र अंगिकारतो.
प्रतिक्रिया
11 Dec 2008 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर...
एका काउंसिलरने कॉनसेलर ची भादरलेली बघून अंमळ मजा आली.
(आंघोळप्रेमी) बिपिन कार्यकर्ते
11 Dec 2008 - 5:07 pm | टारझन
प्रभूदेवा... हा लेख जरा खालच्या लेव्हल वर व्यनि करा प्लिक ... आम्ही लावलेले तर्क बरोबर आहेत की असंबंध आहेत ते कळेल ..
- महाप्रभू
11 Dec 2008 - 5:24 pm | रेवती
नाही.
रेवती
11 Dec 2008 - 9:03 pm | विनायक प्रभू
नेमक काय कळले नाही.
11 Dec 2008 - 9:37 pm | भडकमकर मास्तर
विप्रंचा हा लेख चांगलाच समजला...
मजा आली....
कौन्सेलर चे काम कठीण...चुकीच्या गृहपाठाच्या निष्कर्षाप्रत मात्र प्रत्येकवेळी पोचता येइल का?
यावर अधिक व्यनि मध्ये बोलूयात विप्र...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Dec 2008 - 9:53 pm | ऋषिकेश
लेख आवडला
-(सुपातला) ऋषिकेश
11 Dec 2008 - 10:34 pm | भास्कर केन्डे
आमच्या एका मित्राला एका कानसेलरने सांगितलेली एक युक्ति....
दिवसभर एकमेकांना आवडलेल्या बाबींवरच चांगल्या टिपण्ण्या द्या. न आवडलेल्या वागण्यावर टिपण्ण्या देऊ नका. त्या विसरने बर्याच जनांना जमत नाही पण भडास मात्र काढावी वाटते. :) त्यासाठी एक वही/दैनंदिनी करा. दिवसाच्या शेवटी तुम्हाला एकमेकांचे न आवडलेले वागणे त्यावर लिहून काढा व तुमच्या बायकोने/नवर्याने त्यावर लिहिलेले तुमच्याबद्दलचे टिपण पहा. त्यावर मात्र टिपण्णी करायची नाही. ;) म्हणजे पुन्हा भडास काढायची झाली तर?... अनुत्तरीत.
असो. बर्याच वर्षांपासून मी सुद्धा एक वही करीन म्हणतोय पण अजून एक काम वाढवायची इच्छा नाही. शिवाय पर्याय क्र ७ हाच उत्तम उपाय हा आमचा विश्वास आहे. ;)
या युक्तीवर प्रभूसरांची टिपण्णी काय असे हे जाणून घ्यायला उत्सुक...
आपला,
( गृहपाठ न केलेल्या विद्यार्थ्याचा मुखवटा कायम स्वरुपी बसवलेला ) भास्कर
आम्ही येथे वसतो.
11 Dec 2008 - 10:46 pm | सर्वसाक्षी
साहेब,
बायको म्हणजे साक्षात विरोधी पक्ष.
नेहेमी 'मुलाची शाळा ही माझीच जबबदारी का?' असा (रास्त) सवाल केला जातो म्हणुन एकदा शनिवारी शिक्षक - पालक सभेला मी जायचे ठरवले. तसे घरात बोलताच हीने मुलाला हाक मारली आणि खड्या आवाजात विचारले 'काय रे क्लास टिचर नवी आली आहे का?'
11 Dec 2008 - 11:05 pm | चतुरंग
'आव(प)ली सरोज खरे' ला भेटायला? ;)
चतुरंग
11 Dec 2008 - 10:46 pm | प्राजु
विशेष पटला नाही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Dec 2008 - 10:54 pm | सर्किट (not verified)
मॉल मधे खरेदी म्हणजे मला एक जीवावरचे संकट वाटते. मलासर्व दुकानदार खाटिक वाटतात आणि मी कत्तलीला आलेला बकरा. सर्व खरेदी होईतो मी नेमक काय करायचे ह्याबद्दल माझा फार गोंधळ होतो म्हणुन मी हे सहसा टाळतो. आता ह्या विषयावरुन भांडण नको म्हणुन एक आयडीया केली. खिशात एक सींगल पेग घेतो. मॉल मधे गेल्यावर एक कोक चा कॅन घेतो. अगदी योग्य जागेवर उभा राहतो. मॉल मधे कोका कोला प्यायला बंदी नाही. हिरवे हिरवे गार गालीचे..... गाणे म्हणत मजेत वेळ जातो. नवरा खरेदीला येतो म्हणुन बायको खुष.
ही आयडिया जबरा आहे.
प्रभूमास्तरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
(ही शुभेच्छांची कल्पना ज्याला/जिला पहिल्यांदा आली, त्याचा/तिचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार व्हावा.)
-- सर्किट
11 Dec 2008 - 11:08 pm | भास्कर केन्डे
ही "वाढदिवसाच्या शुभेच्छां"ची काय भानगड आहे कोणी सांगेल का? मला तर ते जरा क्रिप्टिक वाटतं आहे. एकदा अदितीताईला सगळे म्हणतात तसे आम्ही आ़जी म्हटलो तर तिने उत्तर म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा कळवल्या. तेव्हा लक्षात आलं की काहितरी क्रिप्टिक दिसतय... आता पुन्हा या शुभेच्छा दिसल्या म्हणून विषयांतर... विषयांतराबद्दल क्षमस्व.
आपला,
(सरळ मार्गी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
12 Dec 2008 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काही क्रिप्टीक नाही आहे. तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आला तर तुम्ही त्याच्या अंगावर "हॅपी न्यू इयर" किंवा "मेरी ख्रिसमस" म्हणून ओरडाल का?
मागे कोणीतरी चुकीच्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावरून हा प्रकार सुरु झाला!
(आतातरी हे काय आहे म्हणून पुन्हा कोणी विचारु नका नाहीतर मी तुमच्या नानाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन.)
11 Dec 2008 - 11:10 pm | टारझन
सर्किट महाराजांच्या हस्ते सत्कार व्हाहा ह्याहून आणिक मोठी गोष्ट काय ... ते श्रीफळ तुम्ही तिकडेच खाऊन घ्या ... फक्त ते शाल इकडं पाठवून द्या
(पायोनियर) टार्किट
11 Dec 2008 - 11:18 pm | चतुरंग
कोण म्हणतं संसार असार आहे? अरे मिसळ कशी तर्रीदारच छान लागते!
ते तसलं डायर्या वगैरे लिहिण्यावर आपला विश्वास नाही. नवरा बायकोना एकमेकांचं काय चुकलं, आवडलं नाही हे सांगता आणि ऐकता येऊ नये इतकं परीटघडीचं नातं काय कामाचं! कडू डोस हा शेवटी एकमेकांच्या आणि अंतिमतः नात्याच्या भल्यासाठीच तर असतो.
प्रभुदेवा, ती मॉलमधे 'योग्य जागी' कोक घेऊन उभे रहाण्याची आयडिया मात्र भन्नाट आहे! मी अर्थात पेग घेत नाही आणि कोकसुद्धा क्वचित घेतो पण 'योग्य जागी' उभा मात्र रहातो! ;)
चतुरंग
12 Dec 2008 - 12:29 am | धनंजय
मजेदार धज्जी उडवली आहे.
(पण आठ कलमांत बरेच पटण्यासारखे आहे असे वाटले.)
12 Dec 2008 - 8:34 am | सखाराम_गटणे™
लेख चांगला आहे.
८ कलमे आवडली.
गृहपाठ काही चांगली कल्पना नाही.
प्रत्येक नात्यात एडजेस्ट करावेच लागते,
कोण चुकीचे आहे, हे शोधण्यापेक्षा काय चुकीचे आहे आणि ते कसे सुधारता येयील यावर भर दिला तर बर्याच अडचणी मिटतात.
12 Dec 2008 - 1:48 pm | विनायक प्रभू
गृहपाठ ही कल्पना नाही आहे. ते वास्तव आहे. वेळ आल्यावर नक्की कळेल. ती कधी येणार आहे ते कळव मग बोलु.
12 Dec 2008 - 9:41 am | झकासराव
गृहपाठ न केलेल्या मुलासारखे तोंड हा हा हा हा.
तुम्ही लिहिलेल्या दोन आणि सहा नंबरशी मी ३१५० वेळा सहमत आहे.
सात नं अजुन शिकत आहे. :)
...............
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao