मीर जाफरची आठवण

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
24 Jun 2022 - 10:27 am

आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला. नवाब सिराजुदौलाचा सर्व खजाना ईस्ट इंडिया कंपनीने गिळंकृत केला. अडीच लाख पेक्षा जास्त रुपईया राबर्ट क्लाईवच्याही खिश्यातही गेला. सत्ता मिळाल्यावर नवाब मीर जाफर स्वत:चे आणि बंगालच्या जनतेचे कल्याण करण्याच्या विचारही करू शकला नाही. ईस्ट इंडिया कंपनीची सतत वाढती भूक पूर्ण करण्यासाठी त्याला बंगालच्या जनतेलाच पिळावे लागले. राज्यात अराजकता पसरली. तीन वर्षांत त्याची हकाल पट्टी झाली. शेवटी बंगालच्या सत्तेवर ब्रिटीशांचा पूर्ण अधिकार झाला.

हरियाणा विधान सभेचा निकाल लागला. माननीय दुष्यंत चौटालाच्या पार्टीला 10 जागा मिळाल्या. त्यालाही मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखविल्या गेले होते. पण दुष्यंतने उपमुख्यमंत्री बनण्यात धन्यता मानली. राजनीतीत दुसर्‍यांचे उपकार घेण्यापेक्षा दुसर्‍यांवर उपकार करणे नेहमीच फायद्याचे असते. सत्तेची मलई चाखत तो हरियाणात त्याच्या पक्षाला अधिक सदृढ करू शकतो. शिवाय त्याच्या सोयीने योग्य वेळी सत्तेतून बाहेर ही पडायचा मार्ग मोकळा. आज त्याच्या निर्णय योग्य होता, याची खात्री त्याला निश्चित झाली असेल.

दुर्भाग्य माननीय उद्धव ठाकरे जवळ योग्य सल्लागार नव्हते. आपले अधिकान्श मतदार हे कॉंग्रेस विरोधी हिंदुत्ववादी विचारधारेचे आहे, ह्याचाही मा. उद्धवजींना विसर पडला. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात मोठी किंमत मा. उद्धवजींना द्यावी लागली. सत्तेची सर्व मलाई आजच्या राबर्ट क्लाईवच्या खिश्यात गेली. शिवसेनेच्या आमदारांवर ताकावर गुजराण करण्याची वेळ आली. याशिवाय पालघर ते चितळे पर्यन्त होणारे घटनाक्रम, तरुंगात असलेल्या मंत्र्यांविरुद्ध ही कारवाई करण्याची हिम्मत नसलेला मुख्यमंत्री इत्यादि, राज्यात भाजपला मजबूती प्रदान करत होते. आज सकाळी यू ट्यूब वर बीएमसीचे महिन्यापूर्वीचे ओपिनियन पोल पाहीले. शिवसेनेला फारच कमी जागा मिळत आहे असे चित्र आहे. साहजिकच आहे, याची जाण अधिकान्श शिवसेनेच्या आमदारांना ही असेलच, की असेच चालत राहिले तर, पुढची निवडणू जिंकणे अशक्य आहे. स्वत:चे राजनीतिक अस्तित्व सुरक्षित करणे हा प्रत्येक राजनेत्याचा धर्मच असतो. बंडखोर शिवसैनिक ही तेच करत आहे.

बाकी इतिहासात मीर जाफर सोबत मा. उद्धवजींचे नाव ही घेतले जाणार, हेच दुर्भाग्य त्यांच्या नशिबात येणार.

समाजविचार

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 12:00 am | अमरेंद्र बाहुबली

मीर जाफर म्हणजे शिंदे नी सिराज ऊद्दौल्ला म्हणजे ऊध्दव साहेब. बंगाल म्हणजे महाराष्ट्र. हे गणीत योग्य आहे. तुमचं गणीत चुकलंय.

छान लिहिलंय.... चपखल उपमा