करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
16 Jun 2022 - 12:30 pm

दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft. आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात. माझ्या घरा समोरची गल्ली 20 फूटाची आणि मागची दहा फुटाची आहे. गल्लीत काही घरांत खाली घरमालक आणि वर एक-एक खोल्यांमध्ये भाडेकरू राहतात. कमीतकमी पाच ते सात भाडेकरू एका घरात असतातच. सर्व घरमालकांच्या घरात एसी आणि कारही आहे. आमच्या गल्लीत निवृत सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, किरकोळ समान विकणारे दुकानदार, टॅक्सी -रिक्शा चालक, भाजी विक्रेता, फळ विक्रेता, चहाची टपरी लावणारे, भांडी-धुणी करणार्‍या बाया, फॅक्टरी मजदूर इत्यादि राहतात.

आमची कालोनी ही सहा-सात गल्यांची आहे. करोंना काळात आमच्या भागात एक ही मृत्यू झाली नाही. विशेष म्हणजे आमच्या गल्लीत एका ही भाडेकरूच्या परिवारात करोंना हा शिरलाच नाही. बहुतेक त्यांना झाला असेल तरी माहीत पडला नसेल. दुसरीकडे एसीत राहणार्‍या अधिकान्श घरी कुणा न कुणाला तरी करोंना हा झालाच. त्यातही दुसर्‍या लाटेत अर्थात एप्रिल महिन्यात ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये अडमिशन मिळणे कठीण होते. घरात आम्ही तिघे- मी, सौ. आणि मुलगा. मी रोज एक गोळी श्वासारी आणि कोरोंनील घेऊन कार्यालयात जात होतो. पार्लियामेंट सेशन सुरू झाल्यावर आरटीपीसीआर महिन्यातून एकदा होत असे. नेहमीच रिपोर्ट नेगेटिव्ह याची. पण लस घेतल्यानंतर मला, सौ. आणि मुलाला करोंना झाला. सौ आणि मुलाला सौम्य लक्षणे होती. मला आधीच भयंकर केजरीवाल खोकला आणि त्यात नाकही सतत वाहणारे. रोज रात्री झोपण्यापूर्वी Montek LC घ्यावी लगायची. याशिवाय पेंक्रियाचा क्षयरोग आणि हृदयाची सर्जरी ही झालेली होती. हृदय रोगांची औषधी ही रोज घेत होतो. फॅमिली डॉक्टर ने खोकल्यासाठी औषधी दिली आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला. टेस्ट पाजिटीव आल्यावर, सीटी स्कॅन केले. 50 टक्केहून जास्त संक्रमण होते. आता ते आधी पासून होते की करोंना नंतर झाले हे सांगणे कठीण. माझी लेक, तिचा सासरा आणि जाऊ तिन्ही दिल्लीतल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम करतात. ते ही रोज सकाळी गिलोय आणि तुळशी घेत होते. तसे चहात ही ते गिलोय टाकायचे. त्यांच्या हिमाचलच्या गावात भरपूर होते. माझ्या लेकीने मला हॉस्पिटलमध्ये अडमिट होण्यास मना केले. बहुतेक तिथे प्रोटोकॉल औषधे घ्यावी लागली असती. फक्त डॉक्टरचा सल्ला घेऊन एक गोळी steorid (40 रुपयांच्या दहा गोळ्या), विटामीन, कफ काढण्याचे आयुर्वेदिक औषध इत्यादि दिले. steorid गोळ्या एवढ्या स्वस्त असतात तरीही महागडे steorid का दिले जात होते हा ही एक मुद्दा आहे. लेकीच्या हॉस्पिटलमध्येही रुग्णांना रोज काढा दिला जात होता, हे विशेष. दुसर्‍या लाटेत दिल्लीत अधिकान्श हॉस्पिटल्स काढा देऊ लागले होते. पतंजलि वैद्यचा सल्ला ही घेतला, रोज दोन वेळा, दोन-दोन गोळ्या श्वासरी आणि करोंनील घेणे सुरू केले. शिवाय दिवस-रात्र जेवढा वेळ मिळेल दीर्घ श्वास घेत राहिलो. नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार तीन महीने कोरोंनील घेतले. सतत वाहणारे नाक, जुना खोकला ठीक झाला (40 वर्षांपासून नित्य नेमाने रोज रात्री घेणारे Montek LC औषध बंद झाले). बाकी आमच्या गल्लीतील एक ही करोंना रुग्ण हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला नाही आणि मेलाही नाही. दिल्लीत अधिकान्श अधिकृत कालोंनीत मरणार्‍यांचे प्रमाण कमीच होते. गेल्या दोन वर्षांत आमच्या गल्लीत फक्त एक ८५ + म्हातारा दगावला. त्याला करोंना झालेला नव्हता.

समोरच्या घरात सात ते आठ भाडेकरू राहतात. खालच्या फ्लोरवर प. उत्तरप्रदेशचे काही मुस्लिम भाईबंद. ते फळांच्या रेडया लावतात. दर दुसर्‍या दिवशी फळांचा टेम्पो तिथे येतो. सीझनच्या अनुसार टरबूज, खरबूज, आंबा, सफरचंद, डाळिंब, पेरु संतरा इत्यादि विकतात. करोंना काळात ही त्यांना कधी मास्क लावलेले पहिले नाही. कधी-कधी मी त्यांना टोकत ही होतो. नेहमी एकच उत्तर मिळायचे. आम्ही उन्हात फिरतो, आम्हाला करोंना होणार नाही. पण जवळ मास्क ठेवतो, मुख्य रस्त्यांवर जातो, तेंव्हा घालतो. एकदा मी विचारले तुमच्या गावांत करोंना आहे का. तो म्हणाला नाही, गावांतील लोक जास्त वहमी असतात. फक्त अफवा पसरली तरी ते त्या गावांत जाणार नाही. गावांत ही प्रत्येक व्यक्ति दुसर्‍याच्या घरात काय चालले आहे ह्यावर नजर ठेऊन असतोच. ह्याच मानसिकतेमुळे गावांत हा रोग कमी पसरला असावा. माझ्या लेकीचे सासरे ही हिमाचलचे. काही कामानिमित्त त्यांना गावी जावे लागले पण तिथे त्यांना एक आठवडा घरातच बंदिस्त राहावे लागले. बहुतेक आपल्या देशात खेड्या-गावातील अशिक्षित जनतेने प्रोटोकॉलचे पालन शहरी लोकांपेक्षा जास्त उत्तम रीतीने केले. त्या मागाचे कारण काही का असेना. आमच्या घरात भांडी, झाडू पोंछा लावणारी बाईच्या परिवारातही कुणालाही करोंना झाला नाही. तिच्या नातेवाईकांत सर्वच स्त्रिया घरात भांडी-धुणी करतात. भाजी विक्रेता, रिक्षाचालक, मेहनत मजदूरी करणार्‍यांपासून करोंना दूरच राहिला. घरगुती काढा मात्र सर्वच घ्यायचे.

दुसरीकडे माझा मोठा भाऊ नोयडात राहत होता. सामाजिक कार्यांत सदैव सहभाग असल्याने साहजिकच होते नोयडाचे सांसद आणि कैलाश हॉस्पिटलचे संचालक श्री महेश शर्मा ही त्याच्या चांगल्या ओळखीचे होते. दोन्ही मुले इंजीनियर आणि आयटी. एक मुलगा मुंबईत आणि दूसरा यूएसए मध्ये. अर्थातच त्याच्या काढा इत्यादीवर विश्वास नव्हताच. साहजिक होते हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला. मुंबईवाला पुतण्या ही घरी पोहचला. प्रोटोकॉलच्या उत्तम औषधी दिल्या गेल्या. श्री महेश शर्मा यांनी जातीने लक्ष ही दिले.पण तबियत बिघडत गेली. शुगर वाढली, लीवर, किडनी खराब झाल्या, व्हेंटिलेटर, डायलेसिस, शेवटी जीवन रक्षक इंजेक्शन इत्यादि. लाखोंचे बिल झाले. पण तो वाचला नाही. त्याचे शेवटचे दर्शन ही त्याचे घेता आले नाही.

प्रोटोकॉलच्या अनेक औषधी निरर्थक होत्या म्हणून प्रोटोकॉल मधून बाहेरही झाल्या. उत्तम औषधींचे सत्य समजले. तेंव्हापासून एकच विचार मनात येतो. दादा करोंनामुळे गेला की चुकीच्या औषधींमुळे. नातेवाईकांमध्ये अनेक डॉक्टर आहेत एक ही सांगू शकला नाही की त्या औषधी का दिल्या गेल्या होत्या. सगळ्यांचे एकच उत्तर प्रोटोकॉल. अधिकान्श सुशिक्षित डॉक्टरांनी अंधविश्वासी होऊन बिना आक्षेप घेता प्रोटोकॉल औषधी रुग्णांना दिली आणि स्वत: ही घेतली. दिल्लीत तर एक नवीन म्हण तैयार झाली. "जो हॉस्पिटल गया वह गया, जो घर रहा वह बच गया". मेडिकल माफियाने अब्जावधी कमविण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांचे प्राण घेतले हे कटू सत्य आहे.

या सर्व काळात डॉक्टरांची आणि रूग्णांच्या हितैषी आयएमएची भूमिका अत्यंत संदेहस्पद होती. स्वास्थ्य मंत्रालयाने कोरोंनीलला नोव्हेंबर २०२० मध्ये 155 देशांत निर्यातीची अनुमति दिलेली होती. मीडियात बातमी नव्हती म्हणून आयएमए ही शांत होती. फेब्रुवरी २१ मध्ये कोरोंनीलवरचा रिसर्च पुस्तिका प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. आमचे मंत्री तिथे होते आणि मी ही तिथे होतो. पहिल्यांतच स्वामी रामदेव यांना पाहण्याचा योग आला. तसे म्हणाल तर आयुर्वेदिक औषधीवर टिप्पणी करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आयएमएला नव्हता. आयुर्वेदिक वैद्यांच्या हितैषी संस्थाने आक्षेप घेतला असता तर त्यात काही तथ्य आहे, हे समजले असते. आयएमएने बहुतेक आयुर्वेदिक फार्मा कंपनीचे औषध होते म्हणून विरोध करून जनतेला भ्रमित करण्याचा असफल प्रयत्न केला. अधिकान्श टीव्ही डीबेट मध्ये आयएमएच्या प्रतींनिधींनी प्रश्नांचे तार्किक उत्तर देण्याएवजी जोरजोरात ओरडत आणि हातवारे करत समस्त डाक्टरांची इंभ्रत धुळीस मिळविण्यास पुरोजर प्रयत्न केला. आयएमएच्या अश्या कृत्यांमुळे डॉक्टरांच्या विश्वासनीयतेला तडा जात आहे. हे ही ते विसरले. दुर्भाग्य इतकेच की अधिकान्श डॉक्टरांनी, काही अपवाद वगळता, आयएमएच्या कृत्यांचा विरोध केला नाही.

बहुतेक आपल्याला माहीत आहे की नाही, करोंना काळात पतंजलिचे योगपीठमध्ये असलेले दोन्ही शिक्षण संस्थान (सीबीएससी) एक दिवस ही बंद झाले नाही. रोज एक तास, योग आणि व्यायाम, गिलोय आणि तुळशीचा काढा, हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि ब्रम्हचारी सुरक्षित राहिले. प्राकृतिक चिकित्सेचे केंद्र, योगग्रामला ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा उघडण्याची अनुमति मिळाली. तिथली निवासी रोगी क्षमता फक्त ६०० होती. उन्हाळा सोडला तर तिथे फार कमी रुग्ण उपचार घेत होते. पण करोंना काळात असे काय घडले की, पतंजलिला ती क्षमता वाढवून १२०० करावी लागली. त्यासाठी टेंट सिटी तैयार करावी लागली. १२०० लोकांना एकाच वेळी योग करवता येऊ शकेल, एवढा मोठा ३५००० sq. ft. डोम एका भारतीय कंपनीने दोन महिन्यात उभा करण्याचा विक्रम केला. एवढेच नव्हते तर योगपीठ इथेही २००० रुग्णांसाठी आयपीडीची नवीन व्यवस्था उभारवी लागलील. मोठ्या संख्येत वैद्य, फिजिओ, प्राकृतिक चिकित्सकांना प्रशिक्षण द्यावे लागले. भारी भीड असूनही इथे कुणाला करोंना होत नाही. आज ही ३००० हून जास्त निवासी रुग्ण तिथे रोज असतात उपचार घेणार्‍यात अनेक डॉक्टर ही असतात. ज्यांना शंका आहे, सकाळी आस्था आणि वैदिक चॅनल उघडून स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करू शकतात. याचे कारण करोंना काळात पतंजलिच्या हजारो योग शिक्षकांनी ऑन लाइन आणि ऑफ लाइन योग कक्षा घेऊन कोटीहून जास्त करोंना रुग्णांचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्राणांची रक्षा केली. त्यांचे हजारो कोटी वाचविले. परिणाम पतंजलिवर लोकांचा विश्वास वाढला. भारतात एकाच जागी निवासी उपचार देणारी सर्वात मोठी संस्था बनली. अर्थात याचे श्रेय आयएमएला दिले जाऊ शकते.

माझ्या सारख्या सामान्य माणसाला एक गोष्ट चांगली समजली. करोंना सारख्या रोगांपासून मुक्ति पाहिजे असेल तर समावेशी चिकित्सा प्रणालीची गरज आहे. परिस्थितीनुसार योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा, सर्जरी आणि एलोपैथी औषधी सर्वांचा उपयोग रुग्णांना ठीक करण्यासाठी केला पाहिजे. माझे म्हणाल तर आजच्या घटकेला मी एलोपैथीचे औषध घेणे बंद केले आहे. (डिस्पेंसरीतून फ्री मध्ये मिळतात). फक्त पोटाच्या समस्येसाठी सरकारी डिस्पेंसरीतले आयुर्वेदिक औषध घेत आहे. असो.

समाजविचार

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

16 Jun 2022 - 7:12 pm | सुबोध खरे

आजच्या घटकेला मी एलोपैथीचे औषध घेणे बंद केले आहे

बाकी सर्व सोडा

परंतु तुमच्या हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे तेंव्हा त्यासाठी लागणारी औषधे मात्र सोडू नका एवढीच कळकळीची विनंती आहे .

आपण जेथे सेवा करीत होता तेथले वरिष्ठ डॉ मनमोहन सिंह हे स्वतः मधुमेही असून ५८ व्या वर्षी पहिली बायपास आणि ७७ व्य वर्षी दुसरी बायपास शल्यक्रिया करवून घेऊन आधुनिक औषधे व्यायाम आणि पथ्यपाणी घेऊन आज ८९ व्या वर्षी सुद्धा प्रकृती उत्तम ठेवून आहेत.

त्यांचा आदर्श समोर ठेवा

जेम्स वांड's picture

17 Jun 2022 - 10:41 am | जेम्स वांड

येनकेनप्रकारेण ऍलोपॅथी आणि वेस्टर्न मेडिसीनवर तोंडसुख घ्यायचे असते हो खरे सर.

पटाईत, तुमच्या बंधूंना आमच्याकडून नम्र श्रध्दांजली

बाकी तेच नेहमीचे, शैली सोडून सबस्टंस काहीच नाही लेखनात

विवेकपटाईत's picture

18 Jun 2022 - 9:40 am | विवेकपटाईत

औषधी वेस्टर्न आणि देसी नसते. ज्या रोगीला वाचवितात त्याच फक्त औषधी. करोंना काळात माफिया प्रणीत चुकीच्या औषधींनी लोकांचे प्राण घेतले. खर्‍या औषधी विषयी खोटा प्रचार झाला. हजारच्या वर डॉक्टर ही दगावले. हे वास्तव आहे. आता पुन्हा लाट येत आहे. प्रामाणिक औषधी लोकांनी घेतल्या पाहिजे ही अपेक्षा.

गामा पैलवान's picture

18 Jun 2022 - 3:26 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

.... सबस्टंस काहीच नाही लेखनात

असं कसं म्हणता तुम्ही. लेखात बोध आहे.

निरर्थक व प्राणघातक उपचार करणे हे मेकॉलेछाप क्लार्कचं काम आहे. ते फक्त डोळे झाकून वरिष्ठांकडे बोट दाखवतात. असे क्लार्क अधिकारी म्हणून अजिबात नेमले जाऊ नयेत. लेख वाचल्यावर हा बोध मला झाला.

आ.न.,
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

18 Jun 2022 - 9:38 am | विवेकपटाईत

रक्त पातळ आणि कोलोस्ट्रोल औषधी घेऊन ही ब्लोकेज आणि हार्ट अटॅक हा येतोच. 2007 मध्ये अंजीओप्लास्टी झाली. नियमित औषधी घेत होतो तरीही 2010 मध्ये हार्ट अटॅक हा आलाच. पुन्हा अंजीओ आणि अधिक औषधी. तरीही 2014 मध्ये पुन्हा हार्ट अटॅक आणि बायपास सर्जरी. अर्थात या औषधींचा काहीच परिणाम झाला नव्हता. फक्त मनाची फसवणूक. डॉक्टर मनमोहन सिंह यांना औषधी देणारा मेडिकल पर्सनल माझ्या चांगल्या ओळखीचा होता. त्यांना ही पुन्हा सर्जरी करावी लागली. बाकी त्यांच्या प्रकृती बाबत अधिक बोलत नाही. करोंना नंतर मी औषधी घेणे सोडले कारण या औषधी माणसाला वाचवू शकत नाही. आता फक्त रोज अर्धा तास प्राणायाम करतो. बाकी जेंव्हा मृत्यू येईल कुणीच वाचवू शकत नाही.
बाकी आता पुन्हा करोंना येतो आहे. यावेळी जास्त घातक नाही. तरीही योग्य औषधांचे मार्गदर्शन करणे हे डॉक्टरी कर्तव्य.

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2022 - 6:09 pm | चौथा कोनाडा

भारी अनुभव !

काही परिचछेद वाचताना धक्के बसत होते !
निष्णात लोकांनीच यावर भाष्य करणे योग्य.

तुषार काळभोर's picture

24 Jun 2022 - 12:04 pm | तुषार काळभोर

आधुनिक वैद्यक सोडून इतर पदवी घेतलेले डॉक्टर (उदा बीएएमएस, बीईएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, इत्यादी) जेव्हा त्यांच्या घरात कोणी आजारी असेल तर मनापासून आपापल्या क्षेत्रातील उपचार करत असतील का?

म्हणजे दीड वर्षांची मुलगी तापाने फणफणली असेल तर तिला पॅरासिटॅमॉल देतील की आयुर्वेदिक/होमिओपॅथिक/इतर औषधे देतील?

कंबरेत चमक भरली असेल तर डायक्लोफेनॅकचं इंजेक्शन देतील की काही विशिष्ट तेल्/मलम्/लेप याने मसाज करतील?

कोणतेही आयुर्वेदाचार्य हृदयरोग, कर्करोग, न्युमोनिया, अपघात, हाड मोडणे अशा वेळी आधुनिक वैद्यकाकडे का वळतात?

युरोप आणि आशिया दोन्हीकडे एकोणिसाव्या शतकापर्यंत जन्मानंतर पाच वर्षांच्या आत मृत्यू होण्याचं प्रमाण ५०%पेक्षा अधिक होतं. आता ते युरोपात जवळजवळ ०% आणि भारतात ५% पेक्षा कमी आहे. यात आधुनिक वैद्यकाचा काहीच संबंध नाही का? गरोदरपणात घ्यायची काळजी, बाळंतपणात घ्यायची काळजी, गुंतागुंत निर्माण झाल्यावर सी-सेक्शनचा जास्त यशस्वी वापर, जन्मानंतर लगेच आणि पुढील काही वर्षे दिल्या जाणार्‍या लसी, यामुळे बाल आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी होण्यास हातभार लागलेला नाही का?

गामा पैलवान's picture

24 Jun 2022 - 12:19 pm | गामा पैलवान

तुषार काळभोर,

मला वाटतं की लेखकाचं अलोपथीशी वाकडं नाहीये. काही विशिष्ट विचारसरणीमुळे किरकोळ आजार प्राणघातक ठरताहेत. हे सत्याकडे दुर्लक्ष करणे आहे. ती विचारसरणी टाळून उपचार करण्याकडे लेखकाचा कल आहे.

या विशिष्ट विचारसरणीस अलोपथीच्याच काही डॉक्टरांकडून तीव्र विरोध आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 12:25 pm | सुबोध खरे

कोणतेही आयुर्वेदाचार्य हृदयरोग, कर्करोग, न्युमोनिया, अपघात, हाड मोडणे अशा वेळी आधुनिक वैद्यकाकडे का वळतात?

असे प्रश्न विचारायचे नसतात.

मुंबईत कोट्यवधी लोकांना सेपिया आणि अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी च्या गोळ्या करोना होऊ नये म्हणून दिल्या गेल्या.

मुलुंड मध्ये आमच्या आमदाराने स्वखर्चाने घरोघरी हे औषध पाठवले होते

परंतु मुंबईत करोनाचा सर्वात जास्त प्रसार झालाच कि.

हे फेअर अँड लव्हली घेतल्याने मुली गोऱ्या होतात किंवा कॉम्प्लान पिऊन मुलं उंच होतात यात जितके तथ्य आहे तितकेच

बाकी चालू द्या

कॉमी's picture

25 Jun 2022 - 8:33 am | कॉमी

+1