आता तू पहिले सारखं माझ्याशी बोलत नाहीस
तुझा थोडा वेळ सुध्दा माझ्या समवेत घालत नाहीस
माझ्यावर तुझा राग आहे मी मान्य करतो
त्यसाठी मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो
मला माफ करुन तू पुन्हा माझ्याशी बोलत रहा
पुन्हा एकदा नव्याने माझ्याशी मैत्री करुन पहा
तू बोलली नाहीस की, दिवस माझा कटतं नाही
मित्रांसोबत, घरच्यांसोबत कोणाशीही माझं पटत नाही
तुझी मात्रीच फक्त आता या जीवाला हवी आहे
छोट्या चुकीची फार मोठी सजा तू मला देत आहे
सजा तुझी मागे घे अशी फर्याद मी करतो
वाचलस तर या चुकीचा जुर्माना सुध्दा मी भरतो
जुर्माना काय आहे हे तू मला सांगुन पहा
पण माझ्याशी तू पहिले सारखं बोलत रहा
तुझ ते दोन वाजे पर्यंत थांबण मला सारखं आठवतं
तुझं आता न बोलता निघुन जाणं माझ्या डोळ्यात पाणी साठवतं
त्या लिंबाच्या झाडाखाली आपलं ते थांबणं
दोन वाजेची बस आली की, तुझ मला ते सांगणं
माझ्या समवेत असताना तुझं ते दुस-यांच्या बाबतीत बोलणं
मी तुझ्याकडे पाहिलं की, तुझं ते स्वतःशी खुदकन हासणं
ते लिंबाच झाड अजुन तुझी वाट पाहत आहे
तो त्या झाडाचा पार आपल्या मैत्रीची साक्ष देत आहे
तू रागावल्या पासुन माझी बस अजुन आली नाही
त्या दिवसा पासुन माझ्या घड्याळीत दोन कधी वाजलेच नाही
या सर्व गोष्टी मला वापस कर एवढेच तुला मी मागतो
या सर्व गोष्टींसाठी मी वाट्टेल तो जुर्माना भरतो
-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com
-