आई कसे म्हणु मी
Mummy येई मुखी
English याच्या जगात
मराठी मन माञ दु:खी
बाबांचे झाले Daddy
ताईची झाली Sister
English च्या जगात
नवरे झालेत Mister
जग झाले सारे Fast-food
जे चांगले ते झाले Good
मिञ सर्व झालेत Friend
शनिवार झाला Weekend
राञ झाली आता Night
मारामारी म्हणजे Fight
जे बरोबर असेल ते Right
आज पैशाचे झाले दोन प्रकार
एक Black तर दुसरा White
English च्या या जगाचे
काहीच खरे नाही
कालपर्यंत होते जे
उद्या काहीच दिसणार नाही
जुन्या सर्व गोष्टींचा
नव्यापीढीसाठी झाला इतिहास
इंग्रजी शिकावी प्रत्येकानं
हाच आधुनिकीकरणाच्या ध्यास
-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com