कुत्र आणि कानमंत्र

rahulkransubhe's picture
rahulkransubhe in जनातलं, मनातलं
8 Dec 2008 - 9:53 pm

मला लहानपणा पासुनच कुत्र्यांची भीती वाटायची. ज्या रस्त्यावर कुत्रे आहेत त्या रस्त्यावरून मी जातच नसे. कुत्र्यांच भूंकण, त्यांचे विषारी दात, कुत्रं चावल्यामुळे होणारा रोग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पोटात घ्यावे लागणारे इंजेक्शन या सर्व गोष्टींची आठवण काढली की अंगाला काटा येतो. या सर्व गोष्टींमुळे मला कुत्र्यांची फार भीती वाटायची.
मी कुत्र्याला घाबरतो म्हणून माझे सर्व मित्र मला हसायचे. ते मला नेहमी सांगायचे की, "कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात". हा त्यांचा मला नेहमीचाच कानमंत्र असायचा. त्यांनी सांगीतलेलं खरं आहे का हे पाहण्यासाठी एकदा- दोनदा कुत्र माझ्यावर भुंकल तरी मी पळालो नाही, आणि खरचं त्या कुत्र्यानी मला काहीच केल नाही. तो नुसता जागेवरच भुंकून निघुन गेला. असं अनेक वेळा झालं. मला पम जरा हिम्मत आल्यासारखं झाल होतं. मग मी सुध्दा कुत्र कितीही भुंकल तरी ही मी घाबरत नव्हतो, पळत नव्हतो. कुत्रे असतील त्या रस्त्यानेसुध्दा न घाबरता जाउ लागलो. माझ्या मित्रांच्या कानमंत्रानी माझी कुत्र्यावरची भितीच नाहीशी करुन टाकली होती. पण माझ्याघरचे, जास्त करुन माझी आई मला नेहमी कुत्र्याच्या बाबतीत सावध करायची. पण मला आलेल्या अनुभवावरुन मी तिच्या बोलण्याकडे जास्त काही लक्ष लेत नव्हतो.
पुढे काही दिवसांनी आमच्या शेजा-यांनी एक कुत्रा पाळला. पण ते त्याला नेहमी बांधुन ठेवत. तो कुत्रा जेव्हा पण सुटायचा तर तो कोणाला तरी चावूनच परत यायचा. दररोज कोणाच ना कोणाचं, कोणत ना कोणतं भांडण त्यांच्या घरी येत होतं. त्या घरच्या लोकांना जणु त्या भांडण झेलायची सवयच झाली असावी. आम्ही सर्व लहान मुलं कॉलनीत एकत्र खेळायचो, पण जेव्हा त्या शेजा-यांच कुत्र सुटलं असं कानावर पडताच आम्ही दिसेल त्या घरात पळून जायायचो. सगळी कॉलनी करफ्यु लागलेया प्रमाणे व्हायची. त्या वेळेस मुलचं काय तर मोठी माणसं सुध्दा घराच्या बाहेर पडायला घाबरत होती. त्या कुत्र्याचा एखाद्या डाकूप्रमाणे प्रमाणे आमच्या कॉलनीत दरारा होता. जसं रामगढ मध्ये गब्बरसिंग आल्यावर सर्व गावातील लोकं घरी पळतात, तसा अनुभव आम्हाला तो कुत्रा सुटल्यावर यायचा. एक दिवस आमच्या कॉलनीतल्या एका मुलीला तो कुत्रा चावला. त्या कुत्र्याच्या घरमालकांनी त्या मुलीचा सर्व दवाखान्याचा खर्च उचलला. कॉलनीतील सर्व लोकं त्या कुत्र्याच्या मालकाला सारखं बजावत होते की, '' या कुत्र्याला तुम्ही महानगर पालिकेत तरी द्या! '' नाही तर दुर कुठे तरी जंगलात सोडून द्या. पण त्या घरच्या लोकांच त्या कुत्र्यावर ऐवढ प्रेम होतं की, ते काही केल्या त्या कुत्र्याला सोडायला तयार नव्हते. पण एकेदिवशी तो कुत्रा त्यांच्या घरातल्या कोणालातरी चावला. या गोष्टीचा त्या लोकांना चांगलाच धक्का बसला. त्या मुळे त्या दिवशी त्या कुत्र्याला कुठे तरी नेउन ठेवलं काय माहीत? पण त्या दिवसापासुन तो कुत्रा आम्हाला कधीच दिसला नाही. पण जे झालं ते चांगलच झालं म्हणाव, नाही तरी आमच्या कॉलनीत कधी '' जय-विरु'' आले नसते. म्हणून जे झालं ते चांगलच झालं. तो कुत्रा नाहीसा झाल्याची बातमी ज्या दिवशी कॉलनीत कळाली तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आम्ही मुलं तर मजेत कॉलनीत फिरायला लागलो. जसं १५ ऑगस्ट १९४७ ला जसा प्रत्येक भारतीय इंग्रजांच्या सत्तेतुन बाहेर पडल्यावर खुष झालतना तेवढी खुशी, तेवढा आनंद आम्हा कॉलनीच्या सर्व लोकांच्या तोंडावर दिसत होता. काही दिवस गेल्यानंतर माझ्या कानावर एक बातमी आली की, तो कुत्रा मेला अथवा त्यावा कोणीतरी मारुन टाकलं. असो पण त्या वेळीपण मला जे झालं ते उत्तमच झालं असं वाटलं.
काही वर्षांनी माझी शाळा संपली. १० वी च्या सुट्ट्या लागल्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यात काय करायचं असा प्रश्न माझ्या समोर उभा राहीला. माझ्या लक्ष्यात आल की, माझा एक मित्र ८ वी पासुन पेपर वाटत होता. त्याच्या जवळ नेहमी पैसे असायचे. मग मला पण पेपर वाटावसं वाटायला लागल. कारण त्यात भरपुर पैसा होता, शिवाय एका तासाच काम. नंतर संपुर्ण दिवस मोकळ. पण या कामात एक मोठ्ठी अडचण होती. ती म्हणजे सकाळी उठण्याची. मी मुलाखाचा आळशी माणुस. रात्री १२ पर्यंत टी.व्ही. पहायची आणि सकाळी १० ला उठायचं अशी माझी सवय. तरी माझे वडिल मला सकाळी ६.३० वाजता मारुन-मारुन उठवायचे म्हणुन बरं. नाही तर माझी ७ वी ते १० वी ची सकाळची शाळा कधीच पुर्ण झाली नसती. शाळा सुरु असताना मी रविवारची वाट चातकपक्षी ज्या प्रमाणे पावसाची वाट पाहतो त्या प्रमाणे पहायचो. कारण रविवार म्हणजे सुट्टी आणि शाळेला सुट्टी म्हणजे मनसोक्त झोपायचं असा माझा कार्यक्रम ठरलेला असायचा. आणि आता तर काय सुट्टयाच सुट्टया. त्यात हे असल काम करायचं म्हणजे सकाळीच काय तर आता पहाटे ४ वाजताच उठायचं. पण तरीही मनाशी पक्क ठरवून मी सकाळी ४ वाजता स्वतः उठून पेपर वाटायला जात होतो. मी माझ्या कामावर खुष होतो, कारण बराच पैसा (माझ्यादृष्टीने) मला मिळत होता. महीना ३०० रु. पगार आणि त्यात एखादा पेपर एखाद्या घरात न टाकता तो रस्त्यावर विकला की त्या पेपरचे २.५० रु. मिळत, आणि असे रोज चार- पाच पेपर तर आम्ही (मी अणि माझा मित्र) मालकाला न विचारता जास्त घेउन ते रस्त्यावर विकून देत. त्याचे रोज १० ते १२ रूपये मला मिळत, शिवाय एखाद्याच्या घराला कुलूप असल तर तो पेपर आपल्या घरी घेउन जाता येत होतं. अश्या प्रकारे माझं काम चांगलच सुरू होतं. सुट्टयातही चांगल्या प्रकारे चालल्या होत्या आणि माझ्या उठण्याने घरचे पण खुष होते. तरी ही आईला भिती होती ती म्हणजे कुत्र्यांची. मला आई नेहमी म्हणत रस्त्याने बघुन जात जा, एक तर तुला चष्मा लागलेला. सायकल नीट चालव. कुत्री असतात रस्त्यात. एखाद कुत्र चावल तर तुझा पुर्ण पगार त्यातच घालावा लागेल. असं नेहमीच मला बजावत. पण आईच्या बोलण्याचं मी काही जास्त मनावर घेत नव्हतो. कारण माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र होताच की माझ्या लक्षात –"कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात". हे सर्व लक्ष्यात ठेऊन मी माझं काम जोरात चालु ठेवल.
आता हळुहळु मी पेपरच एकेक घर विकत घेऊन (म्हणजे तीथे मी स्वतः पेपर टाकेलचं पण त्याचं बील सुध्दा मीच घेईल). माझी स्वतःची एजन्सी तयार केली. मी स्वतः मालक झलो. जास्त नाही तरी वीस-बावीस घरं आता माझ्या मालकीची होती. आता माझे उत्पन्न हे वाढून ६०० रू. म्हणजे दुप्पट झालं होतं. हे सर्व सुरळीत होतं तेच एक दिवस मी पेपर वाटत होतो. साधारण सकाळी ६.३० ची वेळ असेल. त्या दिवसात मला रोज पेपर वाटायला उशीर व्हायचा कारण तो हिवाळ्याचा महीना होता. इतक्या थंडीत सकाळी उटायचं म्हणल तर जिवावर येत होत. शिवाय उजेड पण ६.३० च्या सुमारास पडायचा. म्हणून नेमके किती वाजले ते समजत नव्हतं. माझं पेपर वाटण साडेसात-आठ वाजापर्यंत चालुच असायचं. लोकं माझ्यावर चिडत होती. कारण त्यांची नौकरी ६.३० वाजता असायची, त्यांच म्हणनं अस होतं की, सहा-सव्वा सहापर्यंत पेपर यायला हवा, कसं जरा पेपर वाचुन जाता येईल कामावर. पण आता पेपर वाटायला उशीर होतं असल्यामुळे काही लोकांनी मला पेपर बंद करायची धमकी दिली आणि त्यात माझी स्वतःची एजन्सी असल्याने नुकसान माझच होणार होतं. म्हणुन मी लवकर उठण्याचा प्रयत्नात होतो.
त्या दिवशी मला नेहमी प्रमाणे पेपर वाटायला जायायला उशीर झाला. गडबडीत मी एकेक पेपर वाटू लागलो. एका कॉलनीत गच्चीवर मला पेपर टाकायचा होता. आणि त्यांच्या खालच्या घरच्या कंपाउंडमध्ये एक कुत्र नेहमी असायचं. मी दररोज लांबुनच पेपरची घडी करुन वरती पेपर फेकुन देत होतो, आणि ते कुत्र मला नेहमी भुंकायच. दरवेळेस ते कुत्र तीथे आहे की नाही हे पाहुनच मी तीथे जात होतो. पण आज जरा जास्त उशीर झाल्याने मी गडबडीत त्या कुत्र्याकडे लक्ष्यच दिले नाही व त्या गच्चीवर पेपर फेकुन निघुन आलो. थोड्या वेळाने ते कुत्र भुंकत-भुंकत पळत माझ्याजवळ येत होतं असं मला दिसलं. मी घाबरलो, घामाघुम झालो. मग मला माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र आठवला, मी हिम्मत करुन जागीच उभा राहीलो. वाटलं.. ते कुत्र भुंकुन निघुन जाईल, पण ते कुत्र माझ्याजवळ पळत-पळत, येतचं होतं मी पळलो तर ते मला चावेल अशी भिती पण माझ्या मनात होतीच, म्हणुन मी त्या कुत्र्याला हाड-हाड करत, घाबरत-घाबरत तिथेच उभा राहिलो. पण ते कुत्र न थांबता माझ्या पायाला चावा घेणार..तेच मी त्याचे तोंड धरले व बाजुला केले तरीही त्याचे दात माझ्या हाताला लागले. मी थोडा प्रतिकार केल्यानंतर कुत्र तिथुन निघुन गेलं. माझ्या हातातुन रक्त येत होतं. मी घाबरलो होतो. माझा शर्ट पुर्ण घामाने ओला झाला होता. माझा हात पण फार दुखायला लागला. कसे तरी करुन मी सगळे पेपर वाटून घरी आलो व माझ्या आई समोर जाऊन हात लपवत शांतपणे बसलो. पण मी विसरलो होतो ती माझी होती. माझ्या आईला माझ्यासोबत जे काही घडलं ते सर्व न सांगता समजतं. कुणास ठाऊक कसं काय? तरी आईने विचारलं ‘काय झालं!’ मी म्हणालो ‘काही नाही’, आई तरी म्हणाली ‘काही कुत्र-बीत्र चावलं का?’ मग मात्र मी हो म्हणलो. माझ्या आईचा जीव बेचैन झाला. धावपळ सुरु झाली. शेजार-पाजा-यांना मोठ्या मंडळींना यावर उपाय विचारा, त्याच्यावर काही औषध लावा असे अनेक प्रकार सुरु झाले. मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात इतकी मोठी रांग होती की, काय सांगु ? ही रांग कशाची असेल याच विचारात मी असताना मला कळाले की, या सर्व लोकांना पण कुत्र्यांनी चावले आहे. मला जरा सम दु:खी लोकांना पाहून दिलासा वाटला, म्हटलं ‘मी एकटाच पळालो नाही असं नाही, तर भरपूर लोकं माझ्यासारखे कुत्र्याला पाहून पळाले नाहीत’ असे म्हणुन मी माझ्या मनाला दिलासा देत होतो. मी मनातल्या मनात हसू येत होते की, ‘माझ्या सारखेच मित्र इतरांना पण आहेत कानमंत्र देणारे’....

-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com

साहित्यिकअनुभव

प्रतिक्रिया

रामदास's picture

8 Dec 2008 - 11:55 pm | रामदास

आवडली गोष्ट.

धनंजय's picture

9 Dec 2008 - 12:20 am | धनंजय

गमतीदार

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 1:25 am | भडकमकर मास्तर

होय....
आम्हीही हा अनुभव घेतला आहे... कुत्र्याने चावायचे ठरवले असले की तो चावतो ( तुम्ही जागेवर उभे रहा किंवा पळा)....

... एकदा आठवीत पामेरियन चावलं... फॅमिली डॉक्टरने एक टिटॅनस इंजेक्शन लगावलं आणि महापालिकेच्या दवाखान्यात रेबीज लस घ्यायला पाठवलं... महापालिकेच्या दवाखान्यात जायचा माझा तो पहिलाच अनुभव, तिकडे प्रचंड रांग, डॉक्टरांनी जखम पाहून पोटात इंजेक्शन घ्यायला पाठवलं...चौदा इन्जेक्क्शनांच्या कल्पनेने मला ब्रह्मांड आठवलं... मग तिकडे एका नर्सने हातावर टेस्ट केलं इन्जेक्शन आणि थोड्या वेळाने पोटात .... मी भीतीने जोरात बोंब ठोकल्याचे स्मरते.... नंतर कळाले की दुखण्यापेक्षा जास्त आपण घाबरून रडत आहोत.... पुढची रोजची तीन की चार इन्जेक्शने तुलनेने सोपी गेली..... पोटावर छान नक्षी तयार झाली...चार इन्जेक्शनांमध्ये भागलं प्रकरण...
शाळेला दोन दिवस दांडी मारली , इतकाच फायदा आठवतो आता... सध्या रेबीजच्या लशी दंडावरच्या स्नायूतच घेता येतात म्हणे... आमच्या काळातली मजा आता उरली नाही...
....

त्या काळात काही मित्रांनी गंमत म्हणून त्याला रेबीजची लक्षणे दिसत आहेत, तो पाण्याला घाबरतो आणि भुंकत आहे अशी खबर पसरवली आणि अफवेचा आनंद लुटला...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

9 Dec 2008 - 1:31 am | टारझन

अबब ... आमचा कानमंत्र वेगळा आहे. कुत्रा धोकादायक वाटला की त्याच्या डोक्यात एक दगड टाकावा. हमखास कुत्रा पळून जातो. कामावरून घरी येताना गल्लीतली काहा कुत्री वाघ बनायची... आणि भुंकायची.. एकदा वैतागून दगड हाणला ते कुत्रं पडलं ते उठलंच नाही, म्हटलं मेलं.. नाय पण ते दुसर्‍या दिवशी दिसलं, पण मला पाहून ते लांबच पळायचं ..
- टारझन

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 1:48 am | भडकमकर मास्तर

कुठेतरी खरंच वाचल्याचं आठवतंय की गांधीजींनीसुद्धा मुंबईतली भटकी मोकाट कुत्री पकडून त्यांचा बंदोबस्त करावा असे सुचवले होते...१९२० च्या सुमारास असेल...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

9 Dec 2008 - 2:53 am | टारझन

आहो मास्तर , तुमची काही तरी चुक झाली असेल ..

गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत.
(प्रतिसाद गांधीवाद्यांना समर्पित)

- टारझन

घाटावरचे भट's picture

9 Dec 2008 - 2:55 am | घाटावरचे भट

दुसरा पाय पुढे केल्यावर कुत्र्याने चावण्याऐवजी वेगळंच काही केलं तर??? त्यापेक्षा दगडाचा उपाय बरा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2008 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत.

हा हा हा

गांधीविचार समजून घ्या रे ! तुमच्या अशा विचार करण्यामुळे माझा गांधी विचारांवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला राव !
गांधीजींचा विचार पीव्वर गांधीवाद्यांना कळला नाही म्हणतात, तेव्हा आपलीही गोष्ट निराळीच म्हणा ;)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2008 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

>>गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत.
=)) =))

आणी तरीहि ते पुन्हा चावले तर मग आपण त्याला चावावे आणी त्यास चावले गेल्यावर होणार्‍या वेदनांची जाणिव करुन द्यावी !!
दुरात्मा चावरे

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

वेलदोडा's picture

9 Dec 2008 - 1:56 am | वेलदोडा

ह्म्म्म्...छान आहे गोष्ट.

शंकरराव's picture

9 Dec 2008 - 2:42 am | शंकरराव

कथा आवडली पुढील लेखनास शुभेच्छा

वर्षा's picture

9 Dec 2008 - 3:53 am | वर्षा

चांगलं लिहिलंय. आवडलं.
अवांतरः पुढील वेळेस एक ओळ रिकामी सोडून पॅराग्राफ पाडल्यास वाचायला अजून चांगलं वाटेल.

अनिल हटेला's picture

9 Dec 2008 - 8:03 am | अनिल हटेला

‘माझ्या सारखेच मित्र इतरांना पण आहेत कानमंत्र देणारे’....
:-D

१९९५ साली डीसेंबरात आम्ही काही मित्र व्यायामासाठी लवकर उठत असू..
सकाळी -स़काळी ग्राउंडावर जाय्चो आणी व्यायाम आणी फूटबॉल असा कार्यक्रम असायचा...
एक कुत्र रोज भूंकायच...
वैताग आणलेला.....जीव मोकलून भूंकायच ते बेणं......
आम्ही पण प्राणीमात्राच्या भूतदयेला जागून त्याला लै वैताग द्यायचो..
असं करता -करता एके दिवशी त्या कुत्र्याचा घसा बसला( गंमत वाटतेय का? खरये!!)
तेव्हा पासून त्या कुत्र्याने आम्हाला भूंकायचा नाद सोडला....

आणी आमची चांडाळ चौकडी दिसली की ते शेपूट घालून पळून जायचं....

(भटक्या)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2008 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टोरी भारी आहे, आवडली !

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2008 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

गोष्ट आवडली. लहानपण कुत्र्यांच्याच सोबत गेल. आताही कुत्री जवळ येतात.

कारण माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र होताच की माझ्या लक्षात –"कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात

एकदा झोपडपट्टीतुन मोटरसायकलवर चाललो होतो. एक आडदांड कुत्रे माझी पिंडरी पकडायला वेगान धावत आल. मी वेग कमी करुन मोटर सायकल थांबवली. कुत्र्याला यु यु यु असे प्रेमाने केले. कुत्रे अचंबित झाले आन अक्षरशः मान खाली घालुन निघुन गेले. कारण असे काही होईल हे त्याला अपेक्षितच नव्हते.
गावाकडे आमचेच कुत्रे मला चावले. पण चुकुन. सगळ्यांचेच पांढरा शर्ट खाकी चड्डी व गांधी टोपी असायची. इतर मुलांशी मस्ती करताना आमच्या राजाने हल्ला केला तो माझ्यावरच . नंतर गुपचुप मार खाउन घेतला. खरं तर त्याला वाटल होत कि मलाच कुणी तरी मारतय. म्हणुन तो संरक्षण करायला आला होता. पण नेम चुकला. नंतर पुण्याला येउन तीन इंजेक्षने पोटात घेतली होती. फिरकीची.
सर्व माणसे सारखी नसतात. कुत्र्यांचेही तसेच आहे.
त्यांच्यात एखादा कुत्रा गद्दार निघाला कि ते म्हणतात साला "आदमी" निकला.
कुत्र्यांविषयी प्रेम किंवा भय हे माणसातल्या जीन्स शी निगडीत असावे. काही माणसे कुत्रा या कल्पनेलाच घाबरतात. प्रत्येक कुत्रा हा माणसाला चावण्यासाठीच जन्माला आला आहे अशी त्यांची समजूत असते.त्यामुळे तो प्रेमाने जवळ आला तरी तो चावण्यासाठीच आला आहे असे समजून त्यांची घाबरगुंडी उडते.
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

9 Dec 2008 - 9:51 am | सहज

एकदा झोपडपट्टीतुन मोटरसायकलवर चाललो होतो. एक आडदांड कुत्रे माझी पिंडरी पकडायला वेगान धावत आल. मी वेग कमी करुन मोटर सायकल थांबवली. कुत्र्याला यु यु यु असे प्रेमाने केले. कुत्रे अचंबित झाले आन अक्षरशः मान खाली घालुन निघुन गेले. कारण असे काही होईल हे त्याला अपेक्षितच नव्हते.

चला लोकांवर नाही तर कुत्र्यांवर गांधीगिरी चालते तर :-)

गावाकडे आमचेच कुत्रे मला चावले. पण चुकुन. सगळ्यांचेच पांढरा शर्ट खाकी चड्डी व गांधी टोपी असायची. इतर मुलांशी मस्ती करताना आमच्या राजाने हल्ला केला तो माझ्यावरच . नंतर गुपचुप मार खाउन घेतला. खरं तर त्याला वाटल होत कि मलाच कुणी तरी मारतय. म्हणुन तो संरक्षण करायला आला होता. पण नेम चुकला. नंतर पुण्याला येउन तीन इंजेक्षने पोटात घेतली होती. फिरकीची.

काय राव पोलीसात होता ना तुम्ही विज्ञानवादी. अहो कुत्र्याचे डोळे बांधले तरी ओळखु शकतो वासाने. ते सुद्धा रोजच्या सवयीच्या माणसाला. कुत्र्याने डाव साधला हिशोब चुकता केला त्या घोळक्यात ;-)

मदनबाण's picture

9 Dec 2008 - 9:50 am | मदनबाण

मस्त लिहले आहेस...
आमच्या इथं सुध्दा जाम माजुरडे कुत्तरडे आहेत,,साल्यांना रात्रीच खुमखुमी येते भुंकायची,,रात्रभर भुंकाभुंकी चालु असते,,तो कुत्रे उचलुन नेणारा ट्रक अनेक वर्ष दिसलाच नाही..
चुकुन मला झोप लागलीच की ह्यांची भुभु सभा सुरु होते..झोपचं खोबरच करुन टाकतात!!आणि सकाळी पहाव तर लांब तंगडी करुन मस्त झोपलेले असतात..

(त्रस्त ठाणेकर)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 9:30 pm | भडकमकर मास्तर

तो कुत्रे उचलुन नेणारा ट्रक अनेक वर्ष दिसलाच नाही..

माझ्या माहितीप्रमाणे ही कुत्रे उचलणार्‍या ट्रकची संकल्पना आता बंद केली आहे.... मनेका गांधी यांची कृपा
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

के अजुनही खुप भिती वाटते,ती कुत्र्याची नाही तर रेबीज इंजेक्शनची. बाकी सगळीकडे कुत्रा स्वभाव हा सारखाच असतो. प्रत्येक कुत्र्याला अनोळखी माणुस चोर वाटत असतो.म्हणुनच म्हण आहे ना की कुत्र्याच शेपुट वाकड ते वाकडच.मला एक दोनदा आमची पामेरिअन कुत्री चावली होती. पंरतु मी त्यावर देशी औषध घेतले. सहसा पाळलेला कुत्रा चावला तर रेबीजची भिती नसते. परंतु त्यावर चा उपाय म्हणजे रेबिजची लस घेतलेली बरी.
आजकाल पेटा व मनेका गांधीच्या कृपेने समुच्च श्वानकुलाला चांगले दिवस आले आहेत. कुत्रा मारणेस आता कायद्याने बंदी आहे.त्यामुळे श्वानसंख्या इतकी वाढलेली आहे की विचारु नका. पण सरकार कडुन जी उपाययोजना चालु आहे ती खुपच हास्यास्पद आहे. ते म्हणजे श्वानानचे कुंटुबनियोजन करणे. ह्याचा परिणाम आजकाल आपल्याला सर्वत्र दिसतच आहे.
वेताळ

सोनम's picture

9 Dec 2008 - 1:17 pm | सोनम

:-C :-C :-C :-C :-C :-C आम्हीही हा अनुभव घेतला आहे... कुत्र्याने चावायचे ठरवले असले की तो चावतो ( तुम्ही जागेवर उभे रहा किंवा पळा)....
बरोबर आहे कुत्रा हा काहीही करुन चावतोच. (तुम्ही पळा वा न पळा)
माझ्या वडिलानी कुत्र चावले होते त्यान॑तर ते इजेक्शन घेणे. मला थोडा वेगळा अनुभव आला होता एकदा मी शाळेत जाताना(सकाळी ६.३० वाजता तेव्हा हिवाळा असल्याने अ॑धारच होता) तेव्हा मी सातवीला होते त्यामुळे मला ही भीती वाटत होती एक कुत्रे आमच्या घरापासून माझ्या मागे लागले ते शाळेतपर्यत मागे लागले परत घरी येत होते तेव्हा ते कुत्रे तिथेच फिरत होते. तेव्हापासून मी ही कुत्रा दिसले की त्यापासून ला॑बच राहते

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 8:19 pm | लिखाळ

अरे वा ! मस्त किस्सा ! :) मजा आली.

माझा भाउ नोकरीसाठी दुसर्‍या गावाला जायचा. त्याला भल्या पाहटे चार वगैरे वाजता बरेचदा एसटी पकडायला जायला लागे. तेव्हा पुढल्या चौकातली कुत्र्यांची टोळी फार भुंके आणी ते कुत्रे अंगावर येत. हे पाहता माझ्या आजोबांनी त्याला युक्ती सांगीतली. तो रोज ग्लुकोज बिस्किटांचा पुडा घेऊन जायला लागला आणि कुत्रे अंगावर आले की चार बिस्कीटे टाकायला लागला. चार सहा वेळा असे केल्यावर त्याच्या अंगावर ती कुत्री येईनाशी झाली. (त्यांचे हृदय परिवर्तन झाले ;) )
-- लिखाळ.

संजीव नाईक's picture

9 Dec 2008 - 8:32 pm | संजीव नाईक

गोष्ट आवडली खुपच सुदंर अनुभव आहे.
पण एक गोष्ट खटकली ती .........तुझे नाव इंग्रजीत आहे ते मराठीत कर नाहीतर ?
संजीव

आपला अभिजित's picture

10 Dec 2008 - 9:36 am | आपला अभिजित

(या आठवड्याच्या `मुक्तपीठ'मध्ये आलेला हा लेख अवश्य वाचा.)

नुकताच एका परिचितांकडे जाण्याचा योग आला. (सोयीसाठी आपण त्यांना कुलकर्णी काका म्हणून या.) त्यांचा कोथरूडला बंगला आहे. दुचाकी लावण्याअगोदर डावीकडे-उजवीकडे नजर फिरवली. कुठे "नो पार्किंग', "सम दिनांक पार्किंग', "विषम दिनांक पार्किंग', येथून ५० फूट पुढे पार्किंग करू नये,' "तिथून १०० फूट इथे पार्किंग करण्यास बंदी' इत्यादी पाट्या नसल्याची खात्री करून घेतली. बंगल्याच्या फाटकासमोर पोचलो. फाटकावर तीन पाट्या एका खाली एक अशा लावल्या होत्या. पहिली पाटी कुलकर्णी काकांचे पूर्ण नाव, शैक्षणिक अर्हता, तसेच बंगला क्रमांक. दुसरी पाटी- "सावधान! कुत्रा मोकळा आहे.' तिसरी पाटी- "कृपया जाता-येता फाटक बंद करणे ....आज्ञेवरून'

आता दुसरी पाटी वाचल्यानंतर तिसरी पाटी वाचली काय आणि न वाचली काय- दोन्ही सारखेच होते. फाटकाची कडी लावलेली नव्हती, त्यामुळे फाटक अर्धवट उघडे होते. मी पुढे होऊन सर्वप्रथम अर्धवट उघडे असलेले फाटक आवाज न करता हळूच बंद केले. त्याची कडीसुद्धा लावली. मग फाटकाबाहेर उभा राहून "मोकळा कुत्रा' कुठे दिसतो का, ते पाहू लागलो. दूरवर एक घोटा पिंजरा व त्यात असलेला कुत्रा दिसला. मात्र, पिंजऱ्याचे दार उघडे होते. मी बाहेर उभा राहून कुलकर्णी काकांना हाका मारल्या. चार हाका मारल्यानंतरही कोणी बाहेर आले नाही. कुलकर्णी काका नाही तर नाही, निदान त्यांचा कुत्रातरी आपल्या हाकेला "ओ' (का "भो') देईल असे वाटले होते! पण कुत्रा त्याची पिंजऱ्यातली जागा सोडायला तयार नव्हता.

पाचव्या हाकेला समोरच्या बंगल्यातले गृहस्थ बाहेर आले. मला म्हणाले, ""अहो बाहेरून कशाला हाका मारताय, सरळ आता जा की.'' मी त्यांना पाटी दाखवली. त्यावर ते म्हणाले, ""त्यांचा कुत्रा काही करत नाही. अगदी बिनधास्त राहा!'' एवढे सांगूनसुद्धा माझी हिंमत झाली नाही. सहाव्या हाकेला कुलकर्णी काका बंगल्याबाहेर आले. त्यांनी फाटकाजवळ येऊन मला त्यांच्या घरात नेले. घरात शिरताना मी दार लावायला लागलो. त्यावर त्यांनी त्या दारातून वारा चांगला येतो ही सबब सांगितली व दार उघडे ठेवले. गप्पाटप्पा, खाणेपिणे झाले. पण माझे अर्धे लक्ष त्या उघड्या दाराकडे होते. त्यांचा "मोकळा कुत्रा' त्या दरातून माझी भेट घ्यायला कधी आत येईल याची खात्री नव्हती. सुदैवाने आम्ही निघेपर्यंत तो आत आला नाहीच, शिवाय एकदाही भुंकलादेखील नाही. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.

निघताना कुलकर्णी काका म्हणाले, ""चल, तुझी आमच्या रॉकीशी ओळख करून देतो.'' यावर मी म्हणालो, ""कशाला, कशाला? तुम्हाला पुन्हा उठायचा त्रास! मी पुढच्या वेळेस येईन, तेव्हा ओळख करून घेईन. आज मी जरा गडबडीत आहे.'' पण कुलकर्णी काका उत्साहाने ओतप्रोत भरले होते. त्यांनी मला जवळजवळ ओढतच पिंजऱ्याजवळ नेले, ते म्हणाले, ""एकदा ओळख झाली म्हणजे पुढच्या वेळेस तुला हाका मारत बसायला नको. मला हल्ली जरा कमी ऐकू येतं.'' त्यांचा रॉकी अजूनही त्याच्या पिंजऱ्यात तसाच बसला होता. त्याने जरादेखील चुळबुळ केली नाही. मी मात्र चौदा इंजेक्‍शने घ्यावी लागतील, की नवीन पद्धतीनुसार तीन इंजेक्‍शनांवर भागेल, याचा विचार करत होतो. शिवाय ही इंजेक्‍शने पोटावर घ्यायची का दंडावर, हाही प्रश्‍न होताच. तोच कुलकर्णी काका म्हणाले, ""हा बघ आमचा रॉकी. तू उगाचच याला घाबरत होतास.'' मी त्या कुत्र्याकडे बघितले आणि मला धक्काच बसला. हुबेहूब खऱ्या कुत्र्यासारखा दिसणारा तो एक पुतळा होता. माझ्या जिवात जीव आला. मी सुटकेचा निःश्‍वास टाकला. कुलकर्णी काकांनी स्पष्टीकरण दिले, ""आज-काल बंगल्यात राहायचे म्हणजे कुत्रा हा हवाच. पण कुत्रा पाळणे ही काही सोपी गोष्ट राहिली नाही. त्याचे खाणेपिणे, औषधपाणी, त्याला वेळोवेळी फिरायला नेणे-या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. यावर मी हा उपाय काढला. एकदाच काय तो खर्च केला. निदान थोडंतरी सुरक्षित जीवन जगता येतं.'' आता माझी ट्यूब पेटली. समोरचे बंगलेवाले मला "बिनधास्त राहा' असे का म्हणाले ते कळले.

- अजित भालचंद्र पेंडसे

पाषाणभेद's picture

11 Dec 2008 - 9:40 pm | पाषाणभेद

आम्हि रात्रपाळी करतो. असे अनुभव आपण सर्वांनी एकमेकांना वाटल्यास फार उपयोग होतो.
कुत्रा जवळ आला की शांत ऊभे रहावे. मोटरसायकल थांबवावी. नंतर जोरात "हाड हाड" करावे. कुत्र्यांची टोळी असल्यास दगड मारावा किंवा तशी अऍक्ष्न करावी.
आंतरजाळावर याविषयी बरीच माहिती आहे. ( त्यात भारतीय जाळे-जागा नाहीत.)(म्हणुन सावधान ! कुत्रे पण तिकडीलच आहेत.)

-( सणकी )पाषाणभेद