वार :- रविवार
वेळ :- संध्याकाळचे ७.०० - ७.१५ वाजलेले
ठिकाण :- सोसायटिचे पार्किंग
पात्रे :- अ, ब , क , ड (ड च्या हातात एक बाहुली), इ (सर्व वय वर्षे ४ ते ६ १/२ ) आणी तो (दूरवरुन आपल्या दुकानात बसुन खेळाचा आनंद लुटणारा)
वेळ संध्याकाळची आणी अगदिच आळस दाटलेला, सोसायटित सुद्धा अगदि शांत शांत .... अशा वेळिच ति ४/५ लहानगी वेगवेगळे खेळ खेळुन मन रमवत होती. आधी ते "आयडॉल आयडॉल" खेळले, २ जण "जज" झाले २ जण "स्पर्धक" आणी एकजण झाली "महागुरु" खेळ अगदी छान रंगला होता. थोड्यावेळानी मग नवीन खेळ खेळावा असे ठरले, त्यानंतर पुढिल संवाद घडला ...
अ :- आपण युद्ध युद्ध खेळुयात, मी आणी ब अतिरेकी आणी तुम्ही कमांडो !
ब :- शी बाबा ते नको .. रक्त येते त्यात
अ :- ह्या खोटे असते ते सगळे ...
ड :- आपण WWF खेळु या , मस्त्त !
ब :- आपण XXXX XXXX (मालिकेचे नाव मुद्दाम टाळले आहे) खेळुया
इ :- वाह चालेल
अ :- मी आणी इ म्हणजे राजु आणी संध्या
इ : - ए पळ .. मी ती जादुगारिण होणार .. कसली सॉलिड टेरर आहे ती ! एक मंत्र मारला कि सगळे मरणार.
ड :- मी कोण होणार ?
ब :- तु राधा हो, अ आणी मी तुझ्या बाळाला पळवणार
इ : आणी मी मंत्र म्हणुन मदत करणार. तु खिडकीत बसलेली असताना ब येणार आणी तुझा आणी बाळाचा गळा दाबणार ...
बस येव्हडे ऐकले आणी मग मात्र 'तो' सुन्न झाला, सरळ बाहेर येउन वस्सकन त्या पोरांच्या अंगावर ओरडला "कसले मुर्खासारखे खेळ खेळता रे ? अक्कल आहे का काहि?"
१/२ बाळ गोपाळ वरती पळत सुटले, शेजारच्या सोसायटी मधिल कन्या आपल्या लहान बहिणीचा हात धरुन पळत सुटली, एका कन्येनी मात्र तिथेच फतकल मारुन जोरात भोकाड पसरले. 'कोणाचे कार्टे रडतय काय माहित ?' हि नेहमी मुलांना रडताना ऐकुन होणारी त्याची भावना, पण आज मात्र तिला रडताना बघुन त्याला आत कुठेतरी आनंद वाटला , जणु एखाद्या दुष्ट जगातुन ती परत आपल्या निरागस बालपणात परत आली ह्याचे त्याला हायसे वाटत होते. तो वस्सकन ओरडणारा आणी सुन्न झालेला दुसरा तिसरा कोणी नसुन मी स्वत: होतो !
खरच कोणाला दोष द्यावा ह्या सगळ्यासाठी ? आम्हि येथे धंदा कारायला आलोय समाजसेवा नाही म्हणणार्या ह्या कलाकार, दिग्दर्शकांना का आपल्या पाल्याकडे त्याच्या योग्य विकासाकडे लक्ष पुरवु न शकणार्या पालकांना ?
दोन्ही बाजुकडिल मंडळी आपण किती योग्य आहोत आणी निर्दोष आहोत हे अगदी जिवाचा आटापिटा करुन पटवुन देतील पण जे घडतय त्याचे काय ? कुठले आदर्श आपण देतोय ह्या लहानग्यांना ?
मी स्वत: टिव्हि बघत नाही आणी अजुन लग्न हि झालेले नहिये, त्यामुळे मी स्वत: ह्यावर काहीही भाष्य करणे टाळले आहे. आता जास्ती लिहित बसत नाही. जो प्रसंग घडला तो अस्वस्थ करुन गेला म्हणुन तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवतोय. ह्यातुन एका कुटुंबानी जरी योग्य ते लक्ष आपल्या पालकास पुरवण्यास सुरुवात केली तरी सार्थक वाटेल.
प्रतिक्रिया
8 Dec 2008 - 6:24 pm | सोनम
अरे तु केले ते सहसा कोण करत नाही. कारण आजकाल जीवन जगताना कोणी कोणाचा विचार करत नाही. सध्या लहानवर स॑स्कार कोणी लावावे हाच एक गहन प्रश्न आहे. कारण घरातील व्यक्तीना कामातून वेळ मिळत नाही. आणि त्यात मीडियाचा परिणाम तर काय बघायला नको. <:P <:P <:P <:P <:P <:P
(पुण्याची सोनम) राम राम मिपा