स्त्री-लैंगिकतेचे गूढ

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
28 Mar 2022 - 9:47 am

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत).

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे उत्तर सोपे आहे. पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी 30 सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे.

ok
(चित्र सौजन्य : Getty images)

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.

2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो.

3. तर काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.

* शिस्निका 👈

हे उभे अंतर ३.५ सेमी / त्याहून कमी

* मूत्रछिद्र 👈

* योनीमुख 👈

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते.

या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये विल्यम मास्टर्स व व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही. मास्टर्स व जॉन्सन यांच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे परंपरागत प्रारूप असे तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त आणि भरपूर चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.

..................................................................................

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे उत्कृष्ट मांडणी. महत्वाचा विषय.

नचिकेत जवखेडकर's picture

28 Mar 2022 - 10:29 am | नचिकेत जवखेडकर

सहमत. एका संवेदनशील विषयाची अतिशय संयत मांडणी. निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं तरी बरेच गैरसमज दूर होतील :).

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2022 - 12:48 pm | चौथा कोनाडा

महत्वाचा विषय. लेखातील तपशिल चपखल आहेत.

या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही.

या बद्दल लेख वाचण्यात आले होते, पण "हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे" हे प्रथमच वाचण्यात आले.
या अनुषंगाने स्त्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त झाल्यातर आणखी जागरूकता येऊ शकेल.

नगरी's picture

27 Apr 2022 - 6:52 pm | नगरी

+1

nanaba's picture

28 Mar 2022 - 1:28 pm | nanaba

फक्त intercourse विचारा त घेतला आहे .
Foreplay plays a major role, जे ह्या लेखात आलेलेच नाही..

कुमार१'s picture

28 Mar 2022 - 1:34 pm | कुमार१

सहमत.
कळसबिंदू हीच लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे.
अन्य तपशील घेतलेले नाहीत.
संभोगपूर्व प्रक्रियांमधून कळसबिंदूची प्राप्ती होतेच असे नाही.
या संदर्भात बरीच उलट-सुलट चर्चा वाचण्यात आली. म्हणून तो मुद्दा टाळला आहे

कुमार१'s picture

28 Mar 2022 - 1:30 pm | कुमार१

स्वागत केल्याबद्दल वरील तिघांचे आभार !
...
१.

निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं

>> अ-ग-दी ! +१११
..
२.

G बद्दल लेख वाचण्यात आले होते,

>>>

बऱ्याच वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक नियतकालिकांमध्ये या बिंदूवर भरमसाठ चर्चा होत असते. ज्यांच्यामते तो आहे, ते हिरीरीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण त्याचे नक्की स्थान दाखवता येत नाही.
त्यावर एक वैज्ञानिक म्हणाल्या, “ते कसे आहे ना, ‘हवा किंवा वारा दाखवा’ असं म्हणण्यासारखं आहे ! ‘तो’ आहे पण बिंदू म्हणून दाखवता येत नाही ...
😀

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2022 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आहे. चर्चा सुरु ठेवा. पण, इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले,
म्हणजे 'बिंदूवर' पोचता येत असेल, जाता येत असावे. वगैरे. बिंदुगामी चर्चेच्या प्रतिक्षेत.

लेखातला फोटो उच्च आहे. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2022 - 5:01 pm | चौथा कोनाडा

लेखातला फोटो उच्च आहे

असहमत ! या पेक्षा उत्तम फोटो वापरता आला असता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2022 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>असहमत ! या पेक्षा उत्तम फोटो वापरता आला असता.
क्षणभर असहमतीशी सहमती दाखवली आणि तुम्हाला समजा लेखकाने सांगितलं असतं की दुसरा फोटो टाका तर, तुम्ही कोणता फोटो टाकला असता ?

मला तर वरील फोटो वरुन काल्पनिक चलचित्र डोळ्यासमोर आले की ती महिला आता उत्कलन बिंदूच्या सॉरी, कळसबिंदूच्या यात्रेला निघाली आहे, बस आता कोणत्याही तो क्षण आणि त्या क्षणी पापण्या हळूहळू कमळ पाकळ्याप्रमाणे अलगद मिटतील आणि मान डाव्या आणि उजव्या बाजुच्या घाटवळणांनी वळणे घेणा-या मोटारीप्रमाणे वळत राहील आणि आनंदलोकाच्या बागेत फुलपाखरी झालेलं मन या फुलावरुन त्या फुलावर काही वेळ विहरत राहील. आनंदावेग ओसरु लागला की मोग-याच्या गंधाने हळुहळु मलुल झालेले डोळे उघडू लागतील असा तो 'लै. गुढतेचा' प्रवास फोटो वरुन वाटला होता.

च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या.

-दिलीप बिरुटे
(प्रवासी ) :)

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2022 - 5:50 pm | चौथा कोनाडा

च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या.

👍

नगरी's picture

25 Apr 2022 - 6:48 pm | नगरी
नगरी's picture

25 Apr 2022 - 6:50 pm | नगरी
अनिंद्य's picture

28 Mar 2022 - 3:50 pm | अनिंद्य

क्लायमॅक्स साठी 'कळसबिंदू' छान शब्द आहे. आधी कधी वाचला नाही.
लेख आवडला.

ह्या एका बाबतीत 'सफर है मंजिल से ज्यादा हसीन' हेच खरे :-)

कुमार१'s picture

28 Mar 2022 - 4:24 pm | कुमार१

१.

इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले,

>>>
संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व यावर एक नवा परिच्छेद मूळ लेखात संपादित करून घेतला आहे. त्यात या क्रीडांचे महत्व आणि मर्यादा दिल्यात.
...
२.

'सफर है मंजिल से ज्यादा हसीन'

>>> छान . सहमत.

तुषार काळभोर's picture

28 Mar 2022 - 5:26 pm | तुषार काळभोर

आणि नेटकी मांडणी.

विंजिनेर's picture

28 Mar 2022 - 11:48 pm | विंजिनेर

निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का?

उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध oversimplified/cherry picking क्याटॅगरीतला वाटला.

कानडाऊ योगेशु's picture

29 Mar 2022 - 10:58 pm | कानडाऊ योगेशु

>>मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का?
डिस्कवरी का नॅशनल जिओग्राफीवर लायन्स प्राईड वरचे काही भाग पाहिले होते. त्यात काही सिंह (३-४ किंवा अगदी ५ ही असु शकतात) हे एका कळपाचे प्रमुख असतात ज्यात जवळपास १०-१२ सिहिंणी असतात.त्यात असे पाहिले होते कि एखादी सिहिंण माजावर आली कि हे सिंह आळीपाळीने तिच्याशी संभोग करत होते. त्या भागात तरी तो सिंह सिहिंणीमधला राजीखुशीचा मामला वाटला. पण दरवेळेला तसे नसावे. त्यामूळे इच्छा नसतानाही मादीला अश्या प्रकाराला सामोरे जावे लागत असावे. त्यामूळे निसर्गतः मादीची जडणघडणच अशी झाली असावी. म्हणजे उलट बाजुने विचार केला तर स्खलीत झालेल्या नराला पुन्हा दुसर्या माद्यांशी संकर करायची जबरदस्ती केली तर त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 7:27 am | कुमार१

त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.

>>>
विचार करण्याजोगा मुद्दा. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अधिक वाचावे लागेल

पुष्कर's picture

29 Mar 2022 - 4:43 am | पुष्कर

महत्त्वाचा विषय, उत्तम मांडणी, वाचनीय. इतका चांगला लेख लिहिल्याबद्दल तुमचे एक वाचक म्हणून आभार मानतो.

कुमार१'s picture

29 Mar 2022 - 7:29 am | कुमार१

उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध

>>>
इथे शास्त्रीय विवेचन आहे.

In men, orgasms are under strong selective pressure as orgasms are coupled with ejaculation and thus contribute to male reproductive success. By contrast, women's orgasms in intercourse are highly variable and are under little selective pressure as they are not a reproductive necessity.

कॉमी's picture

29 Mar 2022 - 8:28 am | कॉमी

छान लेख!
या विषयावर एक मजेशीर व्हिडीओ.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2022 - 5:13 pm | चौथा कोनाडा

कॉमी, मजेशीर व्हिडिओ आहे !
🤩

Bhakti's picture

29 Mar 2022 - 8:44 am | Bhakti

नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने लेख लिहून मांडल्याबद्दल अभिनंदन!

अभिनंदन.

अवांतरः
शरीरशास्त्र जर स्त्रीदेहाविषयी अशी सगळी मांडणी करतेय तर मग लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय असावा? इतर प्राणीमात्रांमधे गंधस्त्राव, विशिष्ट प्रकारचे आवाज करणे वगैरे प्रकार होतात पार्टनरला आकर्षीत करायला. मनुष्यप्राण्यात तर असं काहि होत नाहि. तेंव्हा चुकुन एखादा गंध समलिंगी व्यक्तींना शरीरसंबंधाकडे आकृष्ट करतो म्हणावं तर तसंही दिसत नाहि.

कुमार१'s picture

29 Mar 2022 - 9:09 pm | कुमार१

१.

मजेशीर व्हिडीओ.

>>> हा हा ! विविध मैथुने आवडली !!
...
२.

नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने

>>> होय, तसा प्रयत्न केलाय.
...
३.

लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय

>>>
मुद्दा रोचक आहे. सवडीने वाचन करून शोधावे लागेल

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 10:53 am | कुमार१

लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या) आधार

>>
या मुद्द्यावर काही वाचन केले असता काही गोष्टी अंधुकश्या समजल्या. मुळात (स्त्री अथवा पुरुष) समलैंगिकता का निर्माण होते हा गहन प्रश्न आहे. त्याचे ठाम असे उत्तर सापडलेले नसल्याने विविध जैविक थिअरीज मांडल्या गेल्या आहेत :

१. व्यक्तीच्या X गुणसूत्रावरील डीएनए संबंधित विशिष्ट रचनेतील भेद.
२. गर्भावस्थेत असताना आईच्या हार्मोन्सचा झालेला कमी-अधिक प्रभाव.

तूर्त एवढेच म्हणता येईल.

डॉक्टर, एक शंका आहे. फक्त नरालाच refractory period का असतो? वर काहीसा संदर्भ दिसतोय. पण यामागे निसर्गाची शरीर / मेंदू यांच्या दृष्टीने काही प्रोटेक्टिव्ह व्यवस्था आहे का?

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 10:12 am | कुमार१


फक्त नरालाच refractory period का असतो?


>>>>
चांगला प्रश्न.
पुरुषांमध्ये लागोपाठ संभोग करण्यासंबंधी जो अकार्यक्षमता कालावधी ( RP) असतो तो सर्वपरिचित आहे. मात्र या संदर्भात स्त्रियांमध्ये तुलनेने कमी अभ्यास झालेले आहेत. त्यामुळे फार मोजका विदा उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही एका संभोगक्रियेनंतर प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवते. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या क्रियेत अडथळा येतो. पहिली क्रिया संपल्यानंतर स्त्रियांची शिस्निका अतिसंवेदनक्षम झालेली असते. ती पुन्हा चेतविण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होतात. त्यामुळे लागोपाठ दुसरी क्रिया नकोशी वाटते.

स्त्रियांत RP चा कालावधी पुरुषांच्या तुलनेत बराच कमी राहतो असे काही संदर्भ सांगतात.

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 10:12 am | कुमार१


फक्त नरालाच refractory period का असतो?


>>>>
चांगला प्रश्न.
पुरुषांमध्ये लागोपाठ संभोग करण्यासंबंधी जो अकार्यक्षमता कालावधी ( RP) असतो तो सर्वपरिचित आहे. मात्र या संदर्भात स्त्रियांमध्ये तुलनेने कमी अभ्यास झालेले आहेत. त्यामुळे फार मोजका विदा उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही एका संभोगक्रियेनंतर प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवते. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या क्रियेत अडथळा येतो. पहिली क्रिया संपल्यानंतर स्त्रियांची शिस्निका अतिसंवेदनक्षम झालेली असते. ती पुन्हा चेतविण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होतात. त्यामुळे लागोपाठ दुसरी क्रिया नकोशी वाटते.

स्त्रियांत RP चा कालावधी पुरुषांच्या तुलनेत बराच कमी राहतो असे काही संदर्भ सांगतात.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

30 Mar 2022 - 12:26 pm | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2022 - 1:17 pm | कर्नलतपस्वी

अकार्यक्षमता कालावधी ( RP)

एक्न्दरीत निसर्गाची रचना बघता सर्वच गोश्टी विचार पुर्वक केलेल्या वाटतात. वात्सायन ते मस्तराम पर्यन्त साहित्य सम्पदा आसताना एकेकाळचा समजाभिमुख विशय निशीध कसा काय झाला. आज यावर सकारात्मक विचार होतोय . खजुराहो मन्दिरे याचे एक उदाहरण आहे. पस्तीस वर्शापुर्वीचे फोटो शेअर करत आहे,
कुमार सर अभिनन्दन .

mipa mipa

mipa mipa

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2022 - 12:07 pm | चौथा कोनाडा

कर्नलसाहेब, फोटो दिसत नाहीयत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2022 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलसाहेब, फोटो दिसत नाहीयत !

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

31 Mar 2022 - 7:01 pm | प्रचेतस

किती ती उत्सुकता :)

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 12:40 pm | चौथा कोनाडा

😃

या धाग्याचा "विषय"च असा आहे की उत्सुकता नाय दाखवली तर काय मजा ?
😜😜😜

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 12:25 pm | कुमार१

दिवसभर ते फोटो दिसत होते.

एकदा दिसणारे फोटो 24 तासात का गायब होतात यासंबंधी टर्मिनेटर यांनी मार्गदर्शन करावे :)

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2022 - 12:34 pm | चौथा कोनाडा

सेन्सॉरड् ....... ?
संमं ने गायब केले असावेत की काय अशी शंका येतेय !

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 1:45 pm | कुमार१

पस्तीस वर्षांपूर्वीचे फोटो शेअर करत आहे,

>>>
ते छान व अनुरूप आहेत,
हे वे सां न ल !

टर्मीनेटर's picture

30 Mar 2022 - 3:06 pm | टर्मीनेटर

चांगला विषय आणि उत्तम मांडणी!

"स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही."

स्त्रियांना प्रणयक्रिडेत कळसबिंदू गाठण्यात शिस्निकेला (clitoris) अनन्यसाधारण महत्व आहे हे कित्येक पुरुषांना माहितच नसते. लज्जा किंवा संकोच वाटत असल्याने बहुतांश स्त्रिया त्यांना नक्की कुठल्या क्रियेतून परमोच्च (लैंगिक) सुख प्राप्त होते ह्याची वाच्यता आपल्या जोडीदाराकडे करत नाहीत ही एक मोठी समस्या आहे!

"पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता" आहे."

+१०००

स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात. जोडीदार अतृप्त राहिलाय हे त्यांच्या गावीही नसते.

मित्रांच्या बरोबरीने कुठल्याही विषयावर बिनधास्त मोकळेपणाने चर्चा / अनुभव शेअर करणाऱ्या भरपूर मैत्रिणीही लाभल्या असल्याने "स्त्रीच्या बिंदूबाबतची अनुभवभिन्नतेशी" बऱ्यापैकी परिचित आहे.
त्यांच्याकडून मिळालेली काही माहिती शेअर करतो.

"काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे" हे तुम्ही लेखात लिहिलेलंच आहे आणि "काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते" हे देखील अगदी बरोबर आहे.
ह्या क्रियेत पुरुषाच्या हाताचे मधले बोट आणि जीभ ह्यांचा वापर केलेला स्त्रियांना विशेष आवडतो.
काही जणींना संभोगाच्या जोडीने/नंतर शिस्निकेप्रमाणेच स्तानाग्रे, कानाच्या पाळ्या चेतवल्यावर Orgasm येते.
शिस्निका, स्तानाग्रे आणि कानाच्या पाळ्या हे स्त्रीदेहाचे संवेदनशील भाग असतात त्यामुळे त्यांना चेतवून Orgasm येणे तसे स्वाभाविक वाटते पण एका मित्राचा अनुभव थोडा वेगळा वाटतो.
Foreplay ते संभोग सर्व क्रिया झाल्यावर त्याने बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय तिला Orgasm येत नाही!

असो, एका महत्वाच्या विषयावरील छान लेखासाठी आभार आणि बिरूटे सरांनी प्रतिसादात चित्राबद्दल लिहिलंय त्याच्याशी प्रचंड सहमत! अतिशय समर्पक चित्राची निवड केली आहेत तुम्ही 👍

तर्कवादी's picture

30 Mar 2022 - 10:56 pm | तर्कवादी

स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात

पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ? त्यापेक्षा स्खलन लांबवण्याचे प्रयत्न करुन स्वतःला आणि जोडीदार स्त्रीला अधिक वेळ आनंद देण्याचा प्रयत्न करणे अधिक वास्तववादी उपाय असू शकेल काय ? आणि स्खलन झाल्यावर थोडा वेळ (निदान लगेचचा काही काळ तरी) स्त्री देहाबद्दल खरंच आकर्षण जागृत असते ?
संभोग ही पुनरुत्पादनाकरिता आवश्यक कृती - पण मानवात पुनरुत्पादनाशिवायही संभोग ही आनंदाकरिता करण्याची कृती आहे - हे सत्य आहे आणि ते मान्य केले तरी ते सगळ्याच व्यक्तींच्या बाबत सदासर्वकाळ लागू होत असेल का नक्की ?
ह्या 'सत्याचा' विविध माध्यमांनी , जाहिरातींनी इतका मारा केलाय की संभोग न करणे म्हणजे काहीतरी अपराधच जणू असे झाले आहे. या दबावातून संभोग हा जबाबदारी म्हणून उरकला जातो मग जोडीदाराची तृप्ती दुर्लक्षिली जाते. यात फक्त पुरुषालाच दोष देणे योग्य कसे ? कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो..
अगदी प्रत्येकाला नेहमीच ते ही वर्षानुवर्षे एकाच जोडिदारासोबत संभोगातुन आनंद मिळू शकेल हे कशावरुन ? मग अशा वेळी ते न करण्याचेही स्वातंत्र्य हवेच ना. स्त्री-पुरुष दोघांनाही - पण लग्नाच्या जोडीदारापैकी एकाला ते नको आहे आणि दुसर्‍याला ते हवेच आहे अशी परिस्थिती असेल तर ओपन मॅरेज , विवाहबाह्य संबंध वा घटस्फोट घेवून पुनर्विवाह यापैकी एखादा मार्ग चोखाळावा लागेल. विवाहसंस्थाही टिकवायची (ते ही अगदी आदर्श स्थितीत - जोडीदाराखेरीज इतर कुणाचा विचारही मनात आणायचा नाही वगैरे नियम पाळत) आणि संभोगातुन पुर्ण समाधानही मिळवायचे व द्यायचे ही दोन्ही धेय्ये साध्य करणे ही आदर्श वाटणारी कल्पना नेहमीच प्रत्यक्षात उतरेल ही अपेक्षा अगदीच भाबडी आहे. बहुतेक वेळेस कोणत्यातरी एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे लागेल. असो.

जाता जाता : यानिमित्ताने नेटफ्लिक्स वरील Sex/Life ही वेबसिरीज सुचवू इच्छितो.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 9:31 am | कुमार१

पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ?

>>>
चांगला मुद्दा.
बहुसंख्य जोडप्यांमध्ये निव्वळ संभोगातून दोघांनाही एकाच वेळेस कळस बिंदूस पोहोचणे हे खूप दुर्मिळ असते.
बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात.
स्त्रीला कळसबिंदूचे सुख मिळणे तसेही तुलनेने अवघड आहे. त्यामुळे एकतर तिचा बिंदू आधी आणून देणे हा पर्याय राहतो, किंवा
पुरुषाचा कार्यभार उरकल्यावर त्याने अन्य मार्गाने स्त्रीला चेतवून तिला बिंदूपर्यंत नेले पाहिजे.

दोघांनाही अंतिम सुख नियमित मिळत राहिले तरच स्त्रीच्या बाजूने याची गोडी दीर्घकाळ टिकून राहील.

तर्कवादी's picture

31 Mar 2022 - 1:30 pm | तर्कवादी

बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात.

काहीसा असहमत - माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल
बाकी पुरुषाकरिता कळसबिंदू ही समागमाची संपुर्णता असली तरी कळसबिंदू गाठला म्हणजे त्याला पुर्ण समाधान वा तृप्ती लाभलीच असे नाही..
त्यामुळे "खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात". पण केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ? नसल्यास इथे पुरुष हा अन्याय करणारा आणि स्त्री ही अन्यायग्रस्त अशीच मांडणी इथे अनावश्यक वाटते... तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 2:02 pm | कुमार१

केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ?

>>
माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ?
पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :

Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation.

माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ?
पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :

माफ करा डॉक्टर, माझा वैद्यकीय क्षेत्राशी फारसा संबंध नाही. आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाला आव्हान देण्याचा माझा वकुब नाही. पण तरीही नमूद करावेसे वाटते की ही व्याख्याच म्हणते की Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation.
यातील subjective , perceptual व in normal conditions या शब्दांचा अधिक खोल अर्थ लावण्याची गरज वाटते का ?
तसेच शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते.

स्खलन = समाधान इतके सुलभ समीकरण असते तर एखादा पुरुष कधी एखाद्या विशिष्ट स्त्री करिता वेडा झाला नसता, किंवा एक लैंगिक जोडीदार असताना दुसर्‍या स्त्रीकडे बघण्याची कधी इच्छाही झाली नसती .. फार काय एकूणातच त्याला स्त्रीची फारशी गरज वाटली नसती... स्खलन तर काय स्वहस्तेही होतेच की !!

अवांतर : या निमित्ताने "Don Jon" या प्राईमवरील चित्रपटाचा अल्पपरिचय द्यावासा वाटतो. (स्पॉइलर अ‍ॅलर्ट : मी संपुर्ण कथाच संक्षिप्तपणे लिहित आहे.)

adult comedy प्रकारातील या चित्रपटाच्या नायकाला पॉर्न बघण्याचे ( आणि अर्थातच ते बघत हस्तमैथुन करण्याचे) व्यसन आहे. जरी त्याला नियमितपणे वेगवेगळ्या मुलींशी लैंगिक संबंध ठेवायला मिळत असले तरी त्याला जास्त मजा पॉर्न मध्येच येते.. पुढे एक सुंदर मुलगी त्याची प्रेयसी बनते. तरी त्याचे पॉर्नचे व्यसन सुटत नाही. प्रेयसीला एकदा संशय येतो तेव्हा तो आपण कधीच पॉर्न बघत नाही - जे आता चालू होते ते केवळ अपघातानेच असे खोटे सांगून वेळ मारुन नेतो. तरी "पॉर्न बघणे हे कसे वाईट, व्यर्थ व मुर्खपणाचे ई ई वर" सुनावत त्याची प्रेयसी त्याला पुन्हा एकदा बजावते.. मग पुढे सार काही सुरळीत चालू असतं पण नायकाचे व्यसन काही सुटत नाही. पुढे या प्रेयसीला नायकाच्या या व्यसनाबद्दल पुरावाच हाती लागतो. त्याच्याशी भांडून ती त्याला सोडून देते. नायक कसलासा अर्धवेळ कोर्स करत असतो. तिथे एक विधवा- वयाने काहीशी मोठी स्त्री त्याच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करत असते. आधी तो तिला अक्षरशः हुसकून लावतो पण प्रेयसीशी झालेल्या ब्रेकअप नंतर तिच्याशी संवाद साधतो.. पुढे त्यांच्यात प्रेम वगैरे होत नाही पण मैत्री व जवळीक होते. तो तिला आपल्या व्यसनाबद्दल सांगतो, त्याला खर्‍या आयुष्यातील स्त्रियांसोबतच्या संबंधापेक्षाही पॉर्न जास्त आवडते हे सांगतो तेव्हा ती अजिबात न चिडता त्याला नेमकेपणाने विश्लेषण करुन समजावते की त्याच्याबाबतीत असे का घडत आहे, तो कुठे चुकत आहे. त्यालाही तिचे म्हणणे पटते व तो पॉर्न पाहणे सोडतो आणि तिच्यासोबत संबंधात त्याला मजा वाटू लागते.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 5:20 pm | कुमार१

शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते.

>>>
कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते.
माझ्या मते हेच त्या क्षणीचे समाधान देखील आहे.
अर्थात समाधान, मानसिक समाधान या शब्दांच्या आपण जेवढे खोलात जाऊ तेवढे ते अधिक गहन होत जातील.

तुम्ही वेगळा विचार मांडल्याचा आनंद आहे.
थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते.
छान चर्चा होते आहे !

कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते.

सहमत
कळसबिंदू = वीर्यस्खलन याबद्दल दुमत नाहीच.
मतभिन्नता आहे ती वीर्यस्खलन (किंवा कळसबिंदू ) = समाधान याबद्दल.
असो.

थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते.
छान चर्चा होते आहे !

सहमत.. मलाही माझा काहीसा वेगळा मुद्दा मांडायला व्यासपीठ मिळाले,.
धन्यवाद.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 5:39 pm | कुमार१

कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे. सहज म्हणून मी या तीन इंग्लिश शब्दांचे अर्थ कोशात एकत्र बघितले. ते खाली डकवत आहे. तिन्ही शब्द एकमेकात कसे गुंतलेले आहेत हे लक्षात येईल :

1. ecstasy
=a feeling or state of great happiness.
खूप आनंद झाल्याची भावना किंवा स्थिती; हर्षोत्फुल्लता, परमानंद.

2. pleasure
= the feeling of being happy or satisfied.
आनंद किंवा समाधानाची भावना; सुख, संतोष.

3. satisfaction
= the feeling of pleasure that you have when you have done, got or achieved what you wanted; something that gives you this feeling.
तुम्हाला हवे ते मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर किंवा करता आल्यानंतर येणारी सुखाची भावना. सुखसमाधान, संतोष, संतुष्टता; समाधान देणारे काही.

कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे

तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न.. लैगिंक साहित्यात तर बहुधा स्त्री-पुरुष दोघांनाही त्यावेळी परमानंद होतच असावा.

आधीचाच प्रश्न पुन्हा विचारतो.
कळसबिंदू = परमानंद असे सहजसोपे समीकरण असेल तर पुरुषाला नेहमीच परमानंद मिळायला हवा (अगदीच काही शारिरिक समस्या नाही असे गृहीत धरल्यास). आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही.. पुरुषाला कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री चालू शकेल - हस्तमैथुनामुळे तर स्त्रीची ही गरज नाही.

माझ्या मते स्त्री व पुरुषातील शारिरिक, मानसिक , भावनिक असे सर्व पातळीवरचे आकर्षण , जवळीक हे जितके तीव्र तितकी या समीकरणाची शक्यता जास्त .. मग त्यावेळची मनस्थिती, शारिरिक स्थिती, आजूबाजूच्या वातावरणातील प्रसन्नता, निवांतपणा ई तात्कालिक गोष्टी अनुकूल असल्यास दोघांनाही परमानंद मिळणे कठीण असू नये.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 6:58 pm | कुमार१

**तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न..

>>>
माझ्यापुरते तसे दर वेळेला नक्की होते इतके सांगून मी थांबतो. :))
अन्य लोकांचे अनुभव मी नाही सांगू शकणार.:)

>>आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही..

हे तर्काला धरून नाही. कळसबिंदू आल्यानंतर ते तसेच राहते का हा प्रश्न संयुक्तिक आहे..
बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?

तर्कवादी's picture

6 Apr 2022 - 11:48 am | तर्कवादी

माझे म्हणणे आहे की कळसबिंदू = पुर्ण समाधान हे जर पुरुषाच्या बाबत खरे असेल तर त्याला एखाद्या विशिष्ट स्त्रीबद्दल अतीव ओढ वाटायचे कारण नाही किंवा एक लैंगिक जोडीदार असतानाही दुसर्‍या स्त्रीबद्दल आकर्षण वाटते (मग आणखी अफेअर वगैरे होणे) हे घडण्याचे कारणच नाही. कारण कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री पुरेशी आहे .. फार काय हातानेही कळसबिंदू गाठता येतो.

बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?

माहित आहे. पण तुमचा मुद्दा काय आहे ? तुम्हीच विस्ताराने सांगा.

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 12:49 pm | सुबोध खरे

मूलभूत फरक समजून घ्या.

प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक पेशीत एक्स X आणि एक Y गुणसूत्र असते आणि हे प्रत्येक मेंदूच्या पेशीतही असते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला सुंदर स्त्री बद्दल आकर्षण वाटत असते मग वय ९० वर्षे असले तरी. यात सेक्स चा भाग नाही. याशिवाय पुरुषाचे स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण हे शारीरिक स्वरूपात असते यामुळे पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो.

परंतु प्रेमस्वरूप आकर्षण असते त्यात लैंगिकता असेलच असे नाही त्यामुळे पुरुषाला एखाद्या स्त्रीबद्दल अतीव आकर्षण आणि प्रेम असले तरीही तो दुसऱ्या स्त्रीशी कोणतीही भावनिक गुंतवणूक न करता सहज संबंध ठेवू शकतो. याउलट ज्या स्त्रीवर तो अतिशय प्रेम करतो त्या स्त्रीशी संबंध ठेवताना त्याला मिळणारे सुख हे केवळ लैंगिक निचऱ्यापेक्षा किती तरी उच्च कोटीचे असते.

स्त्री च्या प्रत्य्रेक पेशीत आणि प्रत्येक मेंदूच्या पेशीत दोन X गुणसूत्रे असतात त्यामुळे रजोनिवृत्ती झाली आणि स्त्रीच्या संप्रेरकांची पातळी अगदी कमी झाली तरी तिचे स्त्रीत्व नाहीसे होत नाही ते प्रत्येक पेशीत कायमच असते. यामुळेच प्रेमळ स्वभाव वात्सल्य हे गुण स्त्री जिवंत असेपर्यंत तिच्या स्वभावात कायम राहतात.

पुरुषाशी रत होण्यात स्त्रीची केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक गुंतवणूक असते त्यामुळे पुरुष जसे समोर येणाऱ्या कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू शकतात तसे स्त्रीच्या बाबतीत होत नाही. संबंध ठेवल्यानंतर होणारी संतती हि स्त्रीला आयुष्यभर जखडून ठेवणारी असते यामुळे अवांछित संतती होऊ नये हि निसर्गाची उर्मी स्त्रीला कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यापासून प्रतिबंध करते.

याचे कारण पुरुषाचे शुक्राणू एका वीर्यस्खलनात १० कोटी इतके असतात आणि तरुणपणात दररोज असे कोट्यवधी शुक्राणू तयार होत असतात. या उलट साधारणपणे स्त्रीबीज हे एक महिन्यात एकच तयार होत असते.

३०० कोटी शुक्राणूंपैकी एकाच शुक्राणूचा स्त्रीबीजाशी संपर्क आला तर गर्भ धारणा होते. म्हणजे २९९ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९९ शुक्राणू दार महिन्याला फुकट जात असतात.

प्रत्येक प्राण्यात पुनरुत्पादन करण्याची नैसर्गिक उर्मी अत्यंत प्रबळ असते त्यामुळे माणसात नराला स्त्रीचे शारीरिक आकर्षण अत्यंत प्रबळ असते जेणेकरून तो जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवून आपली पुढची पिढी निर्माण व्हावी असा प्रयत्न करत असतो.

याउलट स्त्रीचे एकच स्त्रीबीज महिन्याला तयार होत असत त्याशिवाय त्यातून तयार होणाऱ्या गर्भाला स्त्रीला आपल्या पोटात ९ महिने आणि पुढे सहा महिने दूध पाजून वाढवावे लागते. यामुळे स्त्रीची गुंतवणुकी फार जास्त असल्यामुळे स्त्रिया सहज सहजी कोणत्याही पुरुषाशी रत होत नाहीत.

याकारणामुळे पुरुषाची नैसर्गिक उर्मी अशी असते कि उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे आणि आपले पुरुष बीज स्त्री मध्ये पोचवून पुढच्या संबंधाला तयार होणे.

याउलट स्त्रीची भावनिक गुंतवणूक नसेल तर स्त्री या उत्कर्षबिंदू पर्यंत पोचतच नाही. केवळ उपचार म्हणून संबंध ठेवला जातो. यामुळेच स्त्रीला फुलवून मानसिक दृष्ट्या तयार करून उत्तेजित केल्यास स्त्री या परमोच्च बिंदू पर्यंत पोहोचू शकते.

यावर बरेच काही लिहण्यासारखे आहे पण टँकाळा आहे

विस्तृत विवेचनाबद्दल धन्यवाद,
पण माझा प्रश्न काहीसा वेगळा होता...

पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो

टेक्निकली (म्हणजे बायोलॉजिकली) - होय ... पण त्याला असे रत व्हायला आवडेलच असे नाही. एखादी स्त्री लैंगिक संबंधाकरिता सहज उपलब्ध असूनही तिच्याबद्दल आकर्षण न वाटल्याने पुरुष तिला टाळतो - असे प्रत्यक्षात होते ना ? मग त्याचे कारण काय (इतर काही फॅक्टर्स असतील उदा: नको असलेली स्त्रीशी नाते जोडावे लागेल की काय ही भिती ई - ते बाजूला ठेवू) ? फार काय पैसे देवून सुख विकत घ्यायचे तेव्हाही पुरुष आपल्या पसंतीच्या स्त्रीकरिता प्रसंगी बरेच जास्त पैसे खर्च करतो. मग जर वीर्यस्खलन = कळसबिंदू = समाधान इतके साधे गणित असेल तर पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ?

मला वाटते की जेव्हा पुरुषाला एखादी स्त्री अतिशय आवडते, हवीहवीशी वाटते तेव्हा त्याला अंतःप्रेरणेने असे वाटत असावे की ह्या स्त्रीशी संबंध ठेवताना/समागम करताना विलक्षण अद्वितीय असा आनंद मिळणार आहे - याचे नेमके जीवशास्त्रीय शब्दात स्पष्टीकरण मला देता येणार नाही. पण कुठेतरी त्याच्या मेंंदूतून वा शरीतातुन हे संकेत त्याला मिळालेले असतात आणि भविष्यात त्या स्त्रीशी होणार्‍या संभोगातून मिळू शकणारा विलक्षण अद्वितीय असा आनंद /लैंगिक समाधान हे त्याच्या त्या स्त्रीला मिळवण्याकरिता केलेल्या धडपडीमागील प्रेरणा होय. -
याचीच दुसरी बाजू अशी की ज्या स्त्रीबद्दल अशी ओढ त्याला वाटत नाही पण संबंध ठेवायचे आहे तिच्याबाबत त्याची वृत्ती कदाचित तुम्ही म्हंटल्याप्रमाणे "उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे" अशी असू शकेल. मग त्या संभोगाचे वर्णन फक्त "लवकरात लवकत उत्कर्ष बिंदू वा कळस बिंदू गाठणे" असे असल्याने त्यातून स्त्री वा पुरुष कुणालाही त्यातून समाधान मिळण्याची शक्यता कमीच.

प्रेम आणि वासना या संपूर्णपणे वेगळ्या भावना आहेत.

वासनेने अंध झालेले नराधम दोन तीन वर्षाच्या कोवळ्या बालिकांवर सुद्धा बलात्कार करू शकतात.

याच उलट जिच्यावर माणूस प्रेम करतो तिला थोडीसुद्धा इजा होणार नाही याची अतीव काळजी घेतो.

आकर्षण हि या दोन भावनांच्या मधली एक भावना आहे.

यामुळेच स्त्री एखाद्या वेळेस आकर्षणाला बळी पडून एखाद्या माणसाबरोबर वाहत जाते.

परंतु केवळ आकर्षणापायी सहजासहजी त्याच्या बरोबर संबंध करेलच असे नाही.

याउलट आकर्षणापायी पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर संबंध ठेवू शकतो.

कारण संबंधात पुरुषाची गुंतवणूक हि काही क्षणापुरता असते तर स्त्रीची गुंतवणूक आयुष्यभराची असू शकते

संतती नियमनाची साधने उपलब्ध झाल्याने स्त्रीला भावनिक गुंतवणूक न करता सुद्धा आकर्षक वाटणाऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे शक्य झाले आहे परंतु हे त्या अगोदर शक्य नव्हते.

पुरुषाला एखाद्या स्त्री बद्दल( किंवा स्त्रीला पुरुषाबद्दल) आकर्षण का वाटते हा एक फार गहन विषय आहे.

पण अशा आकर्षक वाटणाऱ्या स्त्री शी संबंध ठेवण्यास पुरुष सहज तयार होतो आणि ज्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नाही तिच्याशी संबंध टाळतो.

या कारणासाठी लग्न झालेल्या स्त्रीपुरुषांनी आपण आपल्या जोडीदारास आकर्षक वाटतो का हा विचार ठेवणे आवश्यक आहे.

आधुनिक काळात पुरुषांच्या उच्शृंखलपणावर बंधने आली आहेत परंतु पूर्वी बायको आकर्षक वाटत नाही या कारणासाठी माणसे सहज दुसरे लग्न करत किंवा अंगवस्त्र ठेवत असत किंवा देवदासी या प्रथेला पुरुषप्रधान संस्कृतीने मान्यता दिलेली होती.

यात केवळ आकर्षण वाटते म्हणून आणि वासना शमन यासाठी दुसरी स्त्री राजरोसपणे "उपलब्ध" असे आणि त्याला समाजमान्यताही होती.

असो

मुद्दा विश्लेषण करण्यासाठी फार पाल्हाळ लावून लिहिले आहे

क्षमस्व

पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ?

याचे उत्तर अतिशय त्रोटक शब्दात असे देता येईल.

अल्कोहोल ३५ रुपये लिटर असताना माणसे सिंगल माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली च्या बाटली साठी ६-७००० रुपये ( लिटर मागे दहा हजार रुपये) का खर्च करतात?
नशा त्यातील अल्कोहोल मुळेच येते ना?

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2022 - 7:27 am | कर्नलतपस्वी

खुपच छान उलगडा केलात.

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2022 - 7:27 am | कर्नलतपस्वी

खुपच छान उलगडा केलात.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2022 - 5:40 pm | चौथा कोनाडा

या वरून आठवले, मी काही वर्षांपुर्वी एका इंग्लिश मासिकात वाचले होते की काही स्त्रिया क्वचित प्रसंगी नुसत्या नटण्या-मुरडण्याने कळसबिंदू (ऑर्गॅजम) अनुभवू शकतात . यावर कुणी प्रकाश टा़कू शकेल ?

कुमार१'s picture

8 Apr 2022 - 6:31 pm | कुमार१

स्त्रीचा कळस बिंदू दोन प्रकारे येऊ शकतो:

१. जननेंद्रिय, स्तनाग्रे किंवा शरीराचे अन्य अवयव चेतवल्यामुळे
२. लैंगिक स्पर्शाविना चेतावणी. मात्र या प्रकारात स्त्रीला स्वतः कल्पनाविलास करून लैंगिक भावनांनी युक्त अशी प्रतिमासृष्टी मनात उभी करावी लागते. काही स्त्रियांना स्वप्नात बिंदूचे सुख मिळालेले आहे.
इथे एका स्त्री ची केस दिली आहे. ज्यात तिने योग आणि अन्य काही तंत्राच्या साह्याने अशाप्रकारे बिंदूचे सुख अनुभवले होते

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 2:11 pm | कुमार१

तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.

>>
ही अनभिज्ञता प्रौढपणी राहू नये हेच तर यासारख्या लेखनाचे प्रयोजन आहे !
त्यादृष्टीने हा विषय विविध दृक-श्राव्य माध्यमातूनही हाताळला जात आहे आणि तो पुरेसा हाताला जावाच.
लेखात मी लस्ट स्टोरीज चे उदाहरण दिलेले आहे त्यातील काही संवाद आणि एकंदरच मांडणी सुरेख आहे.

कानडाऊ योगेशु's picture

31 Mar 2022 - 10:23 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल

खरेतर उलट प्रकार असावा. म्हणजे आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे. नील फिती पाहताना हे विशेष्तः जाणवते.सगळ्याच हालचाली यांत्रिकपणे उरकत असल्यामूळे व भावनिक दृष्ट्या अजिबात न गुंतल्यामुळे कळसबिंदु बराच वेळ लांबवला जात असावा.

सुबोध खरे's picture

8 Apr 2022 - 7:24 pm | सुबोध खरे

आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे.

नाही. प्रत्यक्ष आणि प्रतिमा यातील फरक आहे.

शिवाय निल फिती मध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया उत्तान आणि तारुण्याने मुसमुसलेल्या असतात आणि पुरुष मदनाचे पुतळे असतात. पुरुषांची लिंगे असाधारण अशी मोठी असतात. ( एकतर असेच पुरुष/ स्त्रिया निवडले जातात आणि पुरुषांना कृत्रिम लिंगे लावलेली असतात. यामुळे त्यातील पुरुष लिंग शैथिल्य न येता तासनतास रतिक्रीडा करू शकतात

यामुळे या फिती पाहणाऱ्या पुरुषाला स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड येऊ शकतो/ येतो.

त्याशिवाय performance anxiety ( कार्यसाफल्याची चिंता) म्हणजेच आपण स्त्रीला आनंद देऊ शकू का आणि स्त्रीला कळसबिंदु पर्यंत पोहोचे पर्यंत रतिक्रीडा करू शकू का याची चिंता/ तणाव आल्यामुळे लवकर वीर्यस्खलन होते. यातून आपल्या पौरुषाबद्दल आपली सखी शंका घेईल का हि पण चिंता मनात खात असते.

याचाच बाबा कमाल खान बंगाली, वैद्यराज कृष्णभूषण उपाध्याय, आयुर्वेद भुवन, कतरी सराय सारखे लोक फायदा घेताना गल्लोगल्ली दिसतात.

नवरा तरुण आणि सुंदर स्त्रीला समाधानी ठेवू शकत नाही म्हणूनती त्याच्या पश्चात ड्रायव्हर, धोबी, सुरक्षा रक्षक, विक्रेता यांच्याशी शरीर संबंध ठेवते अशा तर्हेच्या असंख्य नीलफिती पाहायला मिळतात.

आपण सखीला अत्युच्च आनंद देऊ शकलो नाही तर ती आपल्याला सोडून जाईल हि भीती असलेलय पुरुषाच्या मनातील हि भीती अशा तर्हेच्या निल फिती पाहून अधिकच बळावते.

Nitin Palkar's picture

30 Mar 2022 - 8:04 pm | Nitin Palkar

अतिशय संवेदनशील विषयावरील शास्त्रीय माहितीने परिपूर्ण अस लेख. अनेक जाणकारांचे प्रतिसादही रोचक.

'निरामय कामजीवन' या डॉ. विठ्ठल प्रभूंच्या खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातील एक वाक्य आठवले, ते असे आहे, 'पुरुष हा संभोगासाठी प्रेम करतो तर स्त्री प्रेमासाठी संभोग देते'.पौगंडावस्थेत हे पुस्तक वाचले होते, तेव्हा हे वाक्य मनात ठसले होते. पुढे अनुभवांती हे चुकीचे असल्याचे जाणवले.

स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते. विशेष म्हणजे या दोन्हींचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि सुरेश भट हे पुरुष आहेत.
https://www.youtube.com/watch?v=NUZ8EmudfLQ
https://www.youtube.com/watch?v=8BvLj2KYvCg

उत्तम लेखाबद्दल अभिनंदन.

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 8:11 pm | कुमार१

१.

स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात.

>>> चपखल वर्णन ! आवडलेच.

बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय

>> हीच ती विविधता. रोचक !
......
२.

स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते

>>>
सवडीने नक्की ऐकणार.
आभार !

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2022 - 10:04 pm | कर्नलतपस्वी

लग्नाच्या आगोदर

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते!

लग्नानंतर

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

आशीच काही आनाडी जोडप्यांची आवस्था आसते.

मदनबाण's picture

30 Mar 2022 - 10:14 pm | मदनबाण

अतिशय उत्तम लेख !

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे.
हा.हा.हा... का कोणास ठावूक, पण मला मीच एक लिहलेला प्रतिसाद आठवला ! :))) [ तो खाली देतो ]

साहित्यः- गुबगुबीत,लुसलुशीत टच्च पाखरु, स्वतः मधील प्रयोगशिलता. ;)
कॄती:- पाखराला "मंद आचेवर" ठेवावे,त्याच्या फडफडी प्रमाणे आच कमी-जास्त करावी.पाखराचा राग-रंग पाहुन त्याला इथुन-तिथुन "व्यवस्थितपणे" परतवुन घ्यावे.चुंबनाची खमंग फोडणी द्यावी.साहित्य अत्यंत नाजुक असल्याने त्याची हाताळणी "हळुवारपणे" करावी.पाखरु व्यवस्थित "तयार" झाले आहे याचा अंदाज येताच,नजाकतीने त्याचा आस्वाद घ्यावा ! ;)
(प्रेमळ ससाणा)

जाता जाता :- मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kelewali... :- Pandu

नगरी's picture

25 Apr 2022 - 7:13 pm | नगरी

ह्या विषयावर लेखात उल्लेख केलेल्या डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे, amazon Prime वर. त्यांचं कार्य, आलेल्या अडचणी आणि संशोधन हे खूप छान पद्धतीने दाखवले आहे.

कुमार१'s picture

2 Apr 2022 - 10:25 am | कुमार१


Masters of Sex ही वेबसिरीज


>>>
काल या मालिकेचा पहिला भाग बघितला. विषय सुंदर हाताळला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिमी देशांमध्ये सुद्धा ‘लैंगिकतेवर संशोधन’ या विषयाची टिंगल-टवाळी होत होती. प्रसूतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. मास्टर्स यांना, लैंगिकता हेदेखील एक विज्ञान आहे हे रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या गळी उतरवायला किती कष्ट पडले, हे त्यात दाखवले आहे. विविध लैंगिक प्रयोग, त्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणे हा भाग कौतुकास्पद आहे.

एकंदरीत मालिकेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नग्न आणि संभोग दृश्यांची रेलचेल असणार आहे याची झलक मिळाली. मालिका खूप मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण बघण्यासाठी वेळ देता येणे अवघड वाटते.
धन्यवाद !

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 7:29 am | कुमार१

चांगल्या मनमोकळ्या चर्चेबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
१.

कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो..

>>>
विचार करण्याजोगा मुद्दा
या लेखात मी लैंगिक जोडीदार हाच शब्दप्रयोग ठरवून वापरलेला आहे. विवाहित जोडपे हा या विषयाचा एक महत्त्वाचा आणि अन्य पैलू आहे.
त्यावर स्वतंत्र लेखन व चर्चा देखील होऊ शकते. जाणकारांनी मनावर घ्यायला हरकत नाही
.....
२.

उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

>>> छान काव्यात्मिक !

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 7:36 am | कुमार१

३.

मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे.

>>> +११११
यासंदर्भात थोडी भर. लेखामध्ये योनीमार्गातील G बिंदूचा लेख आहे. अलीकडे वैज्ञानिकांनी या संदर्भात अधिक संशोधन केलेले आहे. G बिंदूतून निघणारे संदेश हे मेंदूतील एका विशिष्ट ठिकाणी पोहोचतात. त्याला तूर्त C बिंदू असे नाव दिलेले आहे. जसा स्त्रीचा संभोग अनुभव वाढत जातो तसा C अधिक विकसित होत जातो असे एक गृहितक आहे.
मात्र सध्या हे संशोधन बाल्यावस्थेत आहे.
....
४.

डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे

>>>
उपयुक्त पूरक माहिती. छान.
पाहीन.

धर्मराजमुटके's picture

31 Mar 2022 - 12:59 pm | धर्मराजमुटके

कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून कार्यभाग साधावा हाच कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त कर्मफळ मिळवून देणारा आणि काम सिद्धिस नेणारा उपाय दिसतो.

अवांतर : स्त्रीयांचे शरीर आणि मन इतके गुंतागुंतीचे असते तर प्रयोग म्हणून एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. कदाचित त्यातून काही चांगल्या गोष्टींचा शोध लागू शकेल.

सुबोध खरे's picture

4 Apr 2022 - 7:09 pm | सुबोध खरे

स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात

हे पण तितकंच गुंतागुंतीचं आहे

एकीकडं श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन आहेत आणि दुसरीकडे श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी आहेत

प्रसाद गोडबोले's picture

7 Apr 2022 - 2:43 am | प्रसाद गोडबोले

माफ करा , पण ...

श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन ,श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी

ह्या धाग्यात ही नावे अपेक्षित नाहीत , अ‍ॅक्चुअली ही नावे वाचुन ठसकाच लागला =)))) सगळीकडे राजकारण आणायलाच हवे का ? थोडं थंड घ्या . २०२४ मध्ये मोदीच जिंकणार आहे हो , तुम्ही नका लोड घेऊ सर्वत्र !

आपण स्त्री लैंगिकतेचे गुढ ह्यावर बोलत होतो ना ?

जरा चांगली नावे घ्या : सनी ताई लीऑनी , मियां खलिफां , डॅनी डॅनियल्स , एल्सा जीन्स वगैरे ... ;)
हे सगळे आमच्या जनरेशन चे कदाचित तुम्हाला माहीती नसेल तर किमान तुमच्या जनरेशन्ची नावे सांगा हो , लेन्ना फोर्सेन आज्जी वगैरे ;)

a

कुमार१'s picture

7 Apr 2022 - 6:41 am | कुमार१

सनी ताई लीऑनी , मियां खलिफां , डॅनी डॅनियल्स , एल्सा जीन्स वगैरे ... ;)

>>> :)))))+११

सुबोध खरे's picture

7 Apr 2022 - 10:17 am | सुबोध खरे

राजकारण मी आणलं नाही.

एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही.

या वाक्याला दिलेला तो प्रतिसाद होता

प्रचेतस's picture

31 Mar 2022 - 7:00 pm | प्रचेतस

लेख आणि प्रतिसाद अगदी बिंदूगामी आहेत.

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 8:18 pm | कुमार१

* कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून

* अगदी बिंदूगामी

>> वरील वाक्यरचना आणि शब्दप्रयोग दोन्ही भलतेच आवडलेले आहेत !
बाकी,
कामिनीस कामास लावून कमी श्रमात जास्त सुख कमवायची कल्पना भन्नाट आहे खरी...
😀

कंजूस's picture

7 Apr 2022 - 7:33 am | कंजूस

मानसिक असतं.

कुमार१'s picture

9 Apr 2022 - 7:44 am | कुमार१

लेख व चर्चेत न आलेला एक रंजक मुद्दा आता घेतो. उत्कटबिंदूच्या क्षणी पुरुषाप्रमाणे स्त्रीमध्ये सुद्धा द्रवस्खलन असते का, हा कुतूहल चाळवणारा प्रश्न आहे. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा. पुरुषांमध्ये सर्वांनाच वीर्यस्खलन होते. पण स्त्रियांमध्ये मात्र अनुभवभिन्नता भरपूर आहे.

संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो आणि अर्थातच लघवीपेक्षा भिन्न असतो.
तीन प्रकारचे अनुभव वैद्यकात नोंदले गेले आहेत :

१. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद चांगल्यापैकी असते त्या स्त्रियांमध्ये संभोगादरम्यान हा द्राव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. मुळात तो त्या छित्राच्या भोवती असलेल्या विशिष्ट छोट्या ग्रंथींमधून आलेला असतो.
२. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद कमी असते त्यांना वरील प्रमाणे अनुभव येत नाही.
३. अन्य काही स्त्रियांमध्ये या क्रियेदरम्यान प्रत्यक्ष लघवीचे थेंबही मूत्रछिद्रातून बाहेर येतात.

कानडाऊ योगेशु's picture

10 Apr 2022 - 12:14 pm | कानडाऊ योगेशु

संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो

"मेरे प्यार का रस जरा चखना..ओय मखना" हे गीत वरील माहीतीनंतर एकदम अर्थपूर्ण वाटु लागले आहे. ;)

कुमार१'s picture

10 Apr 2022 - 12:24 pm | कुमार१

हे गीत बडे मिया छोटे मिया या प्रसिद्ध चित्रपटातील आहे तर !
मुद्दाम ऐकले :)
धन्यवाद

जेम्स वांड's picture

9 Apr 2022 - 8:20 am | जेम्स वांड

बरेच दिवसांनी मिपावर फिरकल्याचे सार्थक झाले असे वाटले एकदम.

विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे, जननस्वास्थ्य, स्त्री रोग परामर्ष, संभोग विज्ञान ह्यांची चर्चा करणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर स्त्री/ पुरुष लैंगिकतेवषयी अगम्य मते असणारे सुशिक्षित लोकही दिसतात भरपूर समाजात आपल्या.

कुमार१'s picture

9 Apr 2022 - 3:41 pm | कुमार१

विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे,

>>>
या व्यापक विषयाकडे बघता मला त्याचे तीन विभाग स्पष्ट दिसतात :
१. बिंदूसुखाशी शरीर रचनेतील विविधतेचा संबंध
२. मानसिक स्थितीचा संबंध
३. विवाहितांचे कामजीवन : या लेखात मी ठरवून लैंगिक जोडीदार हा शब्दप्रयोग वापरला आहे. एकदा का नवरा बायको या नात्याने या विषयाकडे पाहिले, की त्याला अनेक कंगोरे आहेत.

वरील पहिल्या विभागातील संशोधन मला रोचक वाटले आणि सहसा ते इतर माध्यमांत या संदर्भातील लेखनात येत नाही. म्हणून एक प्रास्ताविक टीप देऊन हा मर्यादित विभाग लिहिला आहे. तिन्ही विभाग एकत्र करून भला मोठा लेख लिहिणे माझ्या आवाक्याबाहेर होते. अन्य विभागांवर सवडीने वाचन करून काही उपयुक्त माहिती मिळाल्यास इथे लिहीन.
.......
बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याचा आनंद आहे.

वामन देशमुख's picture

10 Apr 2022 - 3:48 pm | वामन देशमुख

लेख आणि त्यावरचे प्रतिसाद, प्रति-प्रतिसाद सुरुवातीपासून वाचत आहे.

माहितीपूर्ण आणि संयत मांडणी, कुमारेक. मूळ लेख आणि अनेक प्रतिसाद्स् आवडले.

या धाग्यावर मिपावरच्या बहुतांश दिग्गजांनी हजेरी लावलीय आणि संयत ते उत्तेजक या दरम्यानचे सर्वच रंग उधळलेत (त्यातले काही रंग इतर काही धाग्यांवरही गेलेत!); मी पामर त्यात कसल्या करड्या छटा दाखवणार!

बाकी, स्वतःसोबतच स्व-स्त्रीलाही कामतृप्ती मिळावी या प्रकारे प्रणय करणारा पुरुष, आणि त्याला तेवढीच भरभरून साथ देणारी स्त्री अशी जोडी असलेल्या मानवांसाठी, पृथ्वीवरचा स्वर्ग त्यांच्या बेडरूममध्येच (किंवा जिथे जमेल तिथे 😉) असतो असे म्हणता येईल!

---

अवांतर:

अ. प्रणय:
१. फोरप्ले
२. इंटरकोर्स
३. कुरवाळणे

यांची तुलना -

आ. जेवण:
१. स्टार्टर्स
२. मेन कोर्स
३. डेझर्ट

यांच्याशी करता येईल का?

---

अवांतरचे सवांतर:
वरील अ १, अ २ साठी योग्य मराठी शब्द आणि अ ३ साठी मराठी व इंग्लिश शब्द सुचवता येईल का?

कुमार१'s picture

10 Apr 2022 - 4:02 pm | कुमार१

धन्यवाद.
अ /आ तुलना रोचक ! छान.

१. फोरप्ले : संभोगपूर्व कामक्रीडा (लेखात दिलाय) / रतिक्रीडा

२. इंटरकोर्स : संभोग, समागम, विषयोपभोग; रतिसुख; मैथुन. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%...)

३. कुरवाळणे : fondle, caress
(https://www.google.com/search?q=fondle+meaning&sxsrf=APq-WBvv3h8pmdAUYqR...)
ˈ

वामन देशमुख's picture

10 Apr 2022 - 4:13 pm | वामन देशमुख

अरेच्चा, हे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थही खरंतर मला माहीतच आहेत की! चव्वेचाळीशी उलटली, Educational Dysfunction (ED) होतंय की काय? 😉

कुमार१'s picture

10 Apr 2022 - 4:17 pm | कुमार१

यावरूनच मराठी संस्थळावर मराठीत लेखन व चर्चा करण्याचे महत्त्व दिसून येते !!
😉

वामन देशमुख's picture

10 Apr 2022 - 4:22 pm | वामन देशमुख

बाकी, तुम्ही मिपावर रुळवलेल्या अनेक शब्दांचा कळसबिंदू हा कळसबिंदु शब्द आहे असे म्हणावे लागेल! 👏

कुमार१'s picture

10 Apr 2022 - 4:23 pm | कुमार१

असे "इडी" का होते यावर पुलं उवाच :

सामाजिक संभाषणात इंग्लिशचा आधार घेण्यावरून पुलंनी त्यांच्या १९७४मधील लेखात मार्मिक टिपणी केलेली आहे ती अशी :

“.....त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटर्कोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो”.

( एक शून्य मी मधून )