आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

येडा खवीस's picture
येडा खवीस in जनातलं, मनातलं
6 Dec 2008 - 7:39 pm

श्री आझम कसाब,
नमस्कार,

खरा म्हणजे तुला नमस्कार करायला नकोय...तुम्ही एवढा मोठ्ठा चमत्कार दाखवल्यावर आमच्या हिंदु प्रथेनुसार मी तो केलाय. तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ले करुन आम्हाला पार जेरीला आणलेस, जवळपास २०० नागरिक, कार्यक्षम दक्ष पोलिस अधिकारी यांचे बळी घेऊन मगच तुमच्या बंदुका थंडावल्या. परवा गेटवे ऑफ इंडीयावर झालेल्या रॅलीतुन यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आता नागरिकच जागे होतायत. राजकारणी आणि एकंदर ब्युरोक्रसी किती होपलेस आहे ते आता सगळ्यांना समजलय( निदान त्यामुळे २०० जणांच्या आत्म्यांना गती मिळेलंस दिसतय)...तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही. तुम्ही फिदाईन अतिरेकी भ्याड कुठे असता? जीव पणाला लावुन हल्ला करुन त्यात स्वत:ला संपवुन घेणारे भ्याड नसतात...पण तुमचं नेमकं ध्येय्य काय आहे रे? आता बघतोयस ना....पाकिस्तानातल्या तुमच्या "आकां"नी कसे हात वर केलेत ते? तुमचे इथले भाउबंदही तुमच्या प्रेतांना हातभर जमीन कब्रस्तानात देत नाहीयेत...कसली जन्नत मिळणार रे तुम्हाला ( जेहाद करुन जन्नत मिळते असं तुमचं ब्रेनवॉशिंग करतात म्हणुन म्हणतोय)...इतक्या हत्या करणे म्हणजे नुसतं दोजख(नरक) नसीब होणार तुम्हाला...

हा हल्ला म्हणजे मुंबईवरचा एक प्रचंड झंझावात होता...सगळं पितळ उघडं पडलं...मागचे प्रत्येक हल्ले तुम्ही उपनगरात,रेल्वेत बॉम्बस्फोट करुन केलेत आता डायरेक्ट "ताज-ऑबेरॉय" म्हणजे अतिच नाही का?...साऊथ मुंबईवाले इतर मुंबईकरांना जरा "लो प्रोफाईल"समजायचे आणी इथे किंवा इतरत्र काही घडलं की, नुसतं फाईव्हस्टार हॉटेलातल्या पेजथ्री पार्ट्यांमध्ये वाईनचे सीप घेत..."सो शॉकिंग ना...इट्स टेरिबल" इतकं म्हणायचे. आता त्यांच्याच XXशी बॉम्ब फोडुन तुम्ही साऊथ मुंबई देखील असुरक्षित आहे हे सिध्द केल्यामुळे सगळे पेजथ्रीवाले पेटलेत. नाहीतर मागच्या लोकल मधल्या बॉम्बस्फोटाच्यावेळी कोणी कुठे रॅली काढल्याचं मला स्मरत नाहीये...पण ठिक आहे. उशीरा का होईना जाग आली सगळ्यांना....

आता तुझं काय होणार रे?....घाबरु नकोस, तिकडे लोकसभेवर हल्ला केलेल्या अफझल गुरुला सुध्दा आता फाशी द्यायची की नाही हे ठरत नाहीये त्यामुळे तुझा नंबर इतक्यात येणार नाही. डॉन्ट वरी!! तुला दिलेल्या ट्रेनिंगनुसार पोलिसांना रोज वेगवेगळ्या प्रकारे असंबध्द माहीती देऊन चक्राऊन टाकतोय्स तु, ते थांबव...निदान आता तरी तुला सुबुध्दी मिळुन खरं काय ते ...सांगुन टाक म्हणजे तरी निदान तुला जन्नत नसीब होऊ शकते....

अरे हो आणि एक महत्वाचे....आमची ही हिंदुस्तानची सरजमीन आहे ना तिने दिडशे वर्षे इंग्रजांना झेललय़ं...त्यापुढे तुमच्यासारखे अतिरेकी काय रे...म्हणजे मुळात आम्ही सहनशील आहोत. पण जेव्हा पाणी डोक्यावरुन जायला लागलं ना की मग तुम्हालाही समजेल...बहुतेक तुमच्या या युध्दाआधीच्या शेवटच्या हल्ल्याने सगळेच जागे झालेत. अमेरीका, रशीया आणि इतर मोठे देशही आमच्या बाजुने बोलतायत...विचार कर जर आम्ही सगळे एकत्र झालो तर...जगाच्या मध्यभागी तुमचा तो चिमुटभर अफगाणिस्तान-पाकिस्तान कधितरी होता हे नव्या पिढिला जुने नकाशे काढुन दाखवावे लागेल....

आता हे बंद करा...कुठेतरी उद्योगधंद्याला लागा...आणि शांत बसा...

जयहिंद!!!

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2008 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. असे मिसळपाव या संकेतस्थळाचे ब्रीद वाक्य असल्यामुळे लेखनाबरोबर प्रतिसादही मराठी भाषेतूनच अपेक्षीत आहेत :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

9 Dec 2008 - 4:08 pm | विसोबा खेचर

लेखनाबरोबर प्रतिसादही मराठी भाषेतूनच अपेक्षीत आहेत

बिरुटेसरांशी सहमत आहे.. बिगरमराठी लेखन येथून काढून टाकण्यात आलेले आहे..

तात्या.

ऋषिकेश's picture

9 Dec 2008 - 3:29 pm | ऋषिकेश

तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही. तुम्ही फिदाईन अतिरेकी भ्याड कुठे असता? जीव पणाला लावुन हल्ला करुन त्यात स्वत:ला संपवुन घेणारे भ्याड नसतात

तीव्र निषेध!!!!!!!
आलेले आतिरेकी हे भ्याडच होते... नि:शस्त्र नागरीकांवर एके-४७ ने गोळ्या चालवणे याला भ्याड / भेकड यापेक्षा दुसरा सभ्य शब्द वापरता येणार नाहि

त्यांना पाठिंबा देणारे सीमेपलिकडचे तर त्याहून भ्याड.. हिंमत असेल तर समोर येऊन युद्ध करा म्हणावं

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विजय राणे's picture

9 Dec 2008 - 7:21 pm | विजय राणे

मी दिलेली प्रतिक्रिया हिंदी (शुद्ध) भाषेचा अट्टहास धरून दिलेली नव्हती. ती विनोदी अंगाने लिहिलेली होती. तरीही ती काढून टाकण्यात आली, याचा खेद वाटतो.