गझनी बघण्याआधी ....

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
6 Dec 2008 - 11:51 am

लोकांच्या आनंदावर विरजण घालणे हा आमचा आवडता छंद नव्हे जणु काहि आम्ही त्यासठिच जन्म घेतला आहे हि आम्हास खात्री आहे.
अमीर खानच्या गझनी ची जे चाहते डोळ्यात प्राण आणुन वाट पहात आहेत त्यांना आत्ता पर्यंत ह चित्रपट कोणा तामिळ का तेलगु मुव्हीचा रिमेक आहे हे कळाले असेलच !
पण खरे तर हा चित्रपट २००० साली आलेल्या "Christopher Nolan" ह्याच्या "Memento" ह्या चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे. जगातल्या श्रेष्ठ २५० चित्रपटांमध्ये ह्याचा २८ वा नंबर लागतो. अत्युच्च अभिनय आणी प्रत्येक प्रसंगात जाणवणारा दिग्दर्शकाचा ठसा हे "Memento" चे वैशिष्ठ्य.
आता गझनी मध्ये भारतीय प्रेक्षकाची गरज म्हणुन त्यात काय भरताड केली आहे आणी त्याचे काय विडंबन केले आहे ते गझनी आला कि समजेलच.

ट्रेलर आणी काही प्रसंग :-
http://in.youtube.com/results?search_query=memento+trailer&search_type=&...

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

6 Dec 2008 - 2:00 pm | भडकमकर मास्तर

माझ्याकडे गझनीच्या तमिळ चित्रपटाची सीडी आहे....
अभिज्ञाने माझ्यासाठी बंगळूराहून आणलेला हा सिनेमा.....
पाहिला.... सबटायटल नव्हते... तरी ९० % समजला... :)...
सुरुवात आणि कथनाची पद्धती छान वाटते पण नंतर नंतर त्यात इतका साउथचा भडकपणा आहे, की शेवटी शेवटी चित्रपट विनोदी सवंग झाला...अगागा, काय त्या खुनाची,अत्याचाराची दृष्ये.... मी कसाबसा तीन-चार सेशनमध्ये पाहत पाहत संपवला....
हिंदीमध्ये इतकं भंपक नसेल अशी आशा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपला अभिजित's picture

7 Dec 2008 - 4:40 pm | आपला अभिजित

दक्षिणेतले अनेक रिमेक भडक, बटबटीत स्वरूपातच आपल्याकडे येतात. तरीही, चाची ४२०, नायक बरे होते. विरासत उत्तम होता.
`गजनी'ची प्रतीक्षा आहे, पण तो आमिर खानच्या योग्यतेचा चित्रपट नाही, असं उगाचच वाटतंय!

स्वाती राजेश's picture

7 Dec 2008 - 8:08 pm | स्वाती राजेश

गजनी त्यावरुन घेतला आहे हे माहीत आहे...
पण गजनी चे डायरेक्शन छान असेल तर तो सुद्धा छान वाटेल, ज्यांनी मेमेंटो पाहिला आहे त्यांना सुद्धा!
कारण कितीतरी पिक्चर हे इंग्रजी वरून घेतात पण सगळेच हीट होत नाहीत कारण सगळ्यांचे डायरेक्शन छान असतेच असे नाही!
मी पण गजनी पाहणार आहे, मग ठरवेन कि तो चांगला आहे कि नाही.
जिस्म हा बॉडीहीट वरून घेतला आहे, काहीना तो आवडला नाही. पण मला आवडला कारण त्यातील गाणी आणि छान डायरेक्शन होते,
तसाच गजनी सुद्धा आवडून जाईल कोण जाणे.
स्पीड(उर्मीला मातोंडकर) हा सेल्युलर यावरून घेतला आहे, पण हा कधी आला आणि कधी गेला कळले सुद्धा नाही.:)