अरूण शौरी इंडियन एक्स्प्रेस मध्ये आपल्या पश्चिम समुद्रकिनार्याविषयी लिहितातः Surprised?. आणि टाइम्स मधली ही बातमी आपल्या पूर्व किनार्याविषयी. तर आपलेच दात आपल्या ओठांना कसे चावतात ते टाइम्स मधल्या या बातमीवरून दिसतं.
सच्छिद्र सीमा जाहल्या
आकाशही आपुले किती
संकटे दोन्ही दिशांना
आपल्याही अंतरी ती
विश्वास कैसा मी धरावा
थोपवावी शल्ये किती
मीच व्हावे प्रहरी आता
सांभाळण्या माझी माता
मीच सेना मीच नेता
जर हवी स्वतंत्रता
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 12:03 am | प्राजु
मीच व्हावे प्रहरी आता
सांभाळण्या माझी माता
मीच सेना मीच नेता
जर हवी स्वतंत्रता
हीच गरज आहे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/