पुरूष एक वाल्या कोळी
आयुष्यभर विणतो जाळी
पापाचा घडा मात्र
शेवटी त्याच्याच भाळी
जाळ्यात शिकार फसेल
म्हणून वाट बघत बसतो
कर्तव्य पुर्तीचा भ्रम
उगाच जपत आसतो
पुरूष एक वाल्या कोळी.....
तहान नाही भूक नही.
बसला होता नाक्यावर
डोक आलं जाग्यावर
जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर
नारायण नारायण जाप करी
नारदाची आली स्वारी
ऐकुन विनंती वाल्याची
म्हणती,त्रेता मधे एकच होता
पुरूष एक वाल्या कोळी......
कलीयुगी सारेच वाल्या
एवढे राम कोठून आणू
नाही केवट नाही राम
ज्याचे ओझे त्यालाच घाम
कलियुग आहे बाबा,
खुळ्या भ्रमात नको राहू
दुसऱ्याच ओझं नको वाहू
पुरूष एक वाल्या कोळी......
नारायण नारायण म्हणत गेले
वाल्याचे डोके ठिकाणावर आले
पण आता काय उपयोग
जेव्हां सारे पोपट गेले उडुन
प्रतिक्रिया
13 Dec 2021 - 11:42 pm | सौन्दर्य
कितीही केलं, काहीही केलं तरी त्याचे श्रेय मिळत नाहीच. वर ते तुमचे कर्तव्यच होते हे ऐकवले जाते.
कविता एकदम समर्पक - 'ज्याचे ओझे त्यालाच घाम' हे एकदम चपखल.
14 Dec 2021 - 9:10 am | राजेंद्र मेहेंदळे
युनिव्हर्सल फिलिंग :)