ते ९६ भाग

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
4 Dec 2008 - 10:04 am

बाबा, गांधीवाद म्हणजे काय? रात्री ९.३० वाजता चिरंजिवांनी घरात गेल्या गेल्या प्रश्न विचारला.
अरे, आपण उपवनात गेलो होतो तेंव्हा तळ्यात दोन बदके क्वॅक्,क्वॅक असा आवाज करत विहार करत होती, त्यांतले अत्यंत पांढरे शूभ्र बदक म्हणजे गांधीवाद. आणि त्याच्याबरोबर अंगावर काळे पट्टे असलेले आणखी एक बदक म्हणजे संधीवाद.
गांधीवाद म्हणजे "अहिंसा परमो धर्म "ह्या मुख्य सुत्रावर आधारित आपण भारतियांनी दैनंदिन जिवनात कसे आचरण करावे ह्या बाबतीत महात्मा, राष्ट्रपिता मोहनदास गांधींनी केलेले विस्तृत विवेचन म्हणजे गांधीवाद.
आता काही दिवसांनी "आपण अतिरेकीग्रस्तांच्या पाठीमागे कसे उभे राहिलो ह्याच्या विविध लोकांच्या वाहिनी वरच्या चित्रफिती कम जाहिराती म्हणजे संधीवाद.
पण इस्रायल ह्या देशातील आपल्या बांधवाना अशी मदत करणारे अमेरिकन ज्यू अशी जाहिराती ची संधी का साधत नाहीत हा प्रष्न चिरंजीवांनी विचारल्यावर मात्र मास्तर निरुत्तर झाले. असो.
सध्या मिपावर के कारान्त भाग मालिका सुमारे १०० हुन अधिक भाग चालणार आहे असे खात्रिलायक सुत्राकडुन स॑मजते. मास्तरांनी आधीचे ३ भाग आणि त्यावरिल प्रतिक्रिया वाचल्या होत्या. हुशार सदस्याने सुमारे ९०% लोकांचा ह्या मालिकेतील विचारांना विरोध आहे हा विदा लगेच सादर केला होता. ३ भागातच मनाने सिक झालेली सद्स्यांची मानसिकता बघुन मास्तरांनी स्ट्रेस बस्टर ही मालिका सादर करायचा निर्णय जाहीर केला.
एकंदरीत परिस्थीती बघता ह्या १०० किंवा अधीक भागानंतर मिपा वरच्या सदस्यांची अवस्था काय होईल हे विचार मास्तरांच्या अमंळ मंद झालेल्या डोक्यात चमकायला लागले.
सर्वात पहिल्यांदा मास्तरांना विचार आला तो अफ्रिका खंडातील त्यांच्या जिवलग विद्यार्थ्याचा.
ह्या विद्यार्थ्याचे १०० भागानंतर संपूर्ण मतपरिवर्तन झालेले असेल. अंगावर संपुर्ण खादी वस्त्र चढवून हा विद्यार्थी गेटवे ऑफ इंडीयाच्या कट्ट्यावर उत्तर दिशेला तोंड करुन बोटीची वाट बघत बसलेला असेल. एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल व दुस-या हातात गुलाबाचे हार असतील. हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल.
ह्या १०० भागानंतर इतर सर्व सदस्यांवर काय परिणाम होतील ह्या बाबतीत आपल्या कल्पना काय आहेत ह्यावर चर्चा अपेक्षित.
जाता जाता: रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे. त्यांनी राहिलेले ७ फोटो फक्त मास्तरांना दाखवले. ते बघाल तर ????????????????????????????????????

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

4 Dec 2008 - 10:26 am | विजुभाऊ

रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे =))
फक्त त्याला दाढी किंवा जटा काहीच नाहीय्ये
अवांतरः पुरस्क्रुत हारातील फुलांवर कोणाची जहिरात छापलेली असेल ?

span style="color: #9900FF;"> आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 10:32 am | भास्कर केन्डे

हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल.
=)) =)) =))

प्रभूदेवा, जरा क्रिप्टिक कमी करा ना अशा साध्या सरळ विषायात तरी. आपले साधे लेखन सुद्धा कधी कधी जड जाते बॉ. :)

आपला,
(मूढ वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

4 Dec 2008 - 10:57 am | टारझन

=)) =)) =))

आज सकाळी सकाळीच का ?

- टारझन

अवलिया's picture

4 Dec 2008 - 10:58 am | अवलिया

विप्र
गांधीवादा मुळे तुमच्या धी चा डु झाला का?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

4 Dec 2008 - 11:03 am | विनायक प्रभू

डु शोधायचा उत्तम उपाय.

अवलिया's picture

4 Dec 2008 - 11:06 am | अवलिया

त्याकरता डु गिरी करायची गरज काय‍?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

4 Dec 2008 - 11:08 am | विनायक प्रभू

आमचे आपले वेषांतर. पुर्वीचे सम्राट करत असत.

अवलिया's picture

4 Dec 2008 - 11:13 am | अवलिया

सगळे समान आहेत आता. तुमची पुर्वीची पद्धत आणु नका.
हे प्रभो (वरचा) हे प्रभु (खालचे) काय करत आहेत त्यांना कळत नाही. त्यांना क्षमा कर.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

4 Dec 2008 - 11:18 am | विनायक प्रभू

त्याने क्षमा केली नाही तर चालेल. हे केले नसते तर मी मला क्षमा केली नसती.
अंमळ मंद झालेला
वि.प्र.
त्ताक.: प्रकटनात मंद झालेल्याचा उल्लेख आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2008 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार

एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल
=))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मदनबाण's picture

4 Dec 2008 - 11:06 am | मदनबाण

ते बघाल तर ????????????????????????????????????...
या वर मौन धारण करणे उत्तम !! [( ,जमल्यास काही दिवसाचे उपोषण करीन म्हणतो !!
छे छे..काहितरीच काय,, अहिंसा..अहिंसा.. अहिंसा नक्कीच फरक पडेल बघा..
दिसला अतिरेकी दे गुलाब्,,,दिसला अतिरेकी दे गुलाब.... (बघा नक्कीच गुलकंद बनवुन खातील ते,,आरोग्याला फार उत्तम्,,अंगातला दाह कमी होईल्...मग मनातला दाह पण कमी होईल यावर माझा ठाम विश्वास आहे.)बोलो राम बोलो भाई राम..
चला माझी सुत कातायची वेळ झाली,,कुठे गेला बरं माझा चरखा?...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

घाटावरचे भट's picture

4 Dec 2008 - 12:07 pm | घाटावरचे भट

बाबा, गांधीवाद म्हणजे काय?

ज्याचा नुसता उल्लेख केला असता सामान्य माणसे मेगाबाईट्सच्या मेगाबाईट्स भरून वाद घालतात व त्यांच्या वादाचा फायदा घेऊन नेतेमंडळी बंडलंच्या बंडलं भरून गांधी खिशात घालतात त्यास गांधीवाद असे म्हणतात.

स्वप्निल..'s picture

4 Dec 2008 - 12:55 pm | स्वप्निल..

=))

स्ट्रेस बस्टर.....वि.प्र. सर मस्त...

स्वप्निल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2008 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकटन अंमळ क्रिप्टीक वाटल्यामुळे समजायला अंमळ वेळ लागला. पण मग पोटभर हादडून, लोकांना उपासाचं आणि मौनाचं महत्त्व यावर एक तास लेक्चर दिल्यावर लगेचच समजलं.

अवांतरः हल्ली सगळंच लिखाण एकसारखं का वाटतंय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2008 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2008 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.

टारझन's picture

4 Dec 2008 - 2:12 pm | टारझन

आत्तापर्यंत जुळे प्रतिसाद होत होते ... आजींनी तिळे प्रतिसाद दिल्याबद्दल हाबिणंदण आणि त्यांना त्यांच्या तीन प्रतिसादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

प्रतिसाद संख्या वाढवण्यासाठी उत्तम उपाय :)

- टारझन