मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
20 Nov 2021 - 3:39 pm

आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले.
गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत.
गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते. मला कायप्पाखेरीज त्यांचेशी संपर्क करणे शक्य नसल्याने शशिकांत ओक आणि वल्ली यांना विचारले, त्यापैकी शशिकांत ओक यांचे त्यांच्या मुलीशी आज बोलणे होऊन बातमी समजली.
चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना मन भरून आलेले आहे. पुढील जीवनात त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील. ओम शांति.
.

चौकटराजा यांचे सर्व लेखन

समाजबातमी

प्रतिक्रिया

भीमराव's picture

20 Nov 2021 - 3:41 pm | भीमराव

भावपूर्ण श्रद्धांजली

वामन देशमुख's picture

20 Nov 2021 - 3:41 pm | वामन देशमुख

चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांना मोक्षप्राप्ती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मिपावरील एक जुने व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. कोविड ला अजूनही गांभिर्याने घ्यावे लागेल हा संदेश मिळाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2021 - 3:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Nov 2021 - 3:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

चौराकाकांशी कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही, ते भेटले ते इथल्या लिखाणातुनच.

एकदम कलंदर माणूस त्यांच्या लिखाण आणि प्रतिसादाची त्यांची स्वतःची अशी एक विशिष्ठ शैली होती.

काकांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांना सद्गती लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना.

ते जिथे असतिल तिथे मजेतच असतील याची खात्री आहे.

पैजारबुवा.

चौराकाकांचे वाचून वाईट वाटले. पिंचि साहित्य संमेलनाच्यावेळी भेट झाली होती आमची. डेंटल ट्रीटमेंटबद्दल ,प्रवासांबद्दल विचारायला आवर्जुन मेसेज येत असे त्यांचा. इतक्यातच दिसले नव्हते.
चित्रगुप्त काकांनी कळवले नसते समजलेही नसते. कुठेतरी मजेत असावेत वाटले असते. असो..

भावपूर्ण श्रध्दांजली.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Nov 2021 - 4:09 pm | चंद्रसूर्यकुमार

भावपूर्ण श्रध्दांजली.

मुक्त विहारि's picture

20 Nov 2021 - 4:17 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण आदरांजली ....

सोत्रि's picture

20 Nov 2021 - 4:22 pm | सोत्रि

भावपूर्ण आदरांजली ....

_/\_

- (मिपाकर) सोकाजी

गवि's picture

20 Nov 2021 - 4:25 pm | गवि

वाईट बातमी. ज्येष्ठ मिपासदस्य आणि दिलदार विचार असत. प्रत्यक्ष भेट, परिचय नसूनही उदास वाटत आहे.

कुमार१'s picture

20 Nov 2021 - 4:28 pm | कुमार१

हा जबरदस्त धक्का आहे.
माझे मन अजूनही मानायला तयार होत नाही. त्यांच्याबरोबर पु ल देशपांडे उद्यानात घालवलेले काही तास मी कधीही विसरू शकणार नाही.
अतिशय दिलखुलास माणूस.
माझे ते उत्तम मार्गदर्शक होते.
आदरांजली !

प्रदीप's picture

20 Nov 2021 - 4:33 pm | प्रदीप

वाईट बातमी.

ओम सद्गती!

प्रचेतस's picture

20 Nov 2021 - 4:36 pm | प्रचेतस

आमचा लाडका हिरवट म्हातारा गेला. वाईट झालं.
काहीही सुचत नाहीये......

मदनबाण's picture

20 Nov 2021 - 4:38 pm | मदनबाण

भावपूर्ण श्रध्दांजली... _/\_

मदनबाण.....

मदनबाण's picture

20 Nov 2021 - 8:43 pm | मदनबाण

चौकटराजा आणि त्यांचे संगीतावरचे प्रेम हे इथे विशेषपणे अनुभवले गेले, त्यांनी मला रॉन गुडविन यांच्या कलाकृती ऐकण्यास सांगितल्या. त्यांच्या सुचवण्यामुळेच रॉन गुडविन यांचे अनेक ट्रॅक मी ऐकले आणि नंतर अधुन मधुन माझ्या सहीत देखील त्या ट्रॅक्सचा वापर केला. यापुढे जेव्हा केव्हा रॉन गुडविन चे संगीत कानावर पडेल तेव्हा तेव्हा चौकटराजा यांची आठवण माझ्या मनात जागृत होइल हे नक्की.

मदनबाण.....

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2021 - 4:41 pm | श्रीगुरुजी

अरेरे, वाईट बातमी. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.

Bhakti's picture

20 Nov 2021 - 4:57 pm | Bhakti

ओह, वाईट वाटलं!
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

रावसाहेब चिंगभूतकर's picture

20 Nov 2021 - 5:04 pm | रावसाहेब चिंगभूतकर

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

भावपूर्ण श्रद्धांजली .
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

अनन्त्_यात्री's picture

20 Nov 2021 - 5:20 pm | अनन्त्_यात्री

___/\___

सरिता बांदेकर's picture

20 Nov 2021 - 5:37 pm | सरिता बांदेकर

भावपूर्ण श्रद्धांजली.

चौथा कोनाडा's picture

20 Nov 2021 - 5:57 pm | चौथा कोनाडा

खुप दु:खद वृत्त. धक्का बसला.
तसे आमच्या पंचक्रोशीतलेच म्हणायचे, ४-५ वर्षांपुर्वी प्राधिकरण कट्ट्यात ओझरती भेट झाली होती. ते कट्ट्यांमधून लवकर निघून गेल्यामुळे फार गप्पा होऊ शकल्या नव्हत्या.
नंतर दुर्दैवाने भेटण्याचा योग आला नाही !

ज्येष्ठ मिपाकर,
चौ. रा. यांना
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !

अत्रुप्त आत्मा's picture

20 Nov 2021 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

:( :( :( :( :( :(
काय को चौरा काका... :( :( :(
कुठे गेलात हो!? :( :( :(

चौरा जिथे कुठे गेलेत तिथे ओपी नय्यर यांना नक्की भेटतील.
सकाळपासून येणारा प्रत्येक प्रतिसाद वाचून डोळे ओलावत आहेत.

अभिजीत अवलिया's picture

20 Nov 2021 - 6:40 pm | अभिजीत अवलिया

चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली.

श्रद्धांजली चौराकाकांना.
एकदाच भेट झाली होती कशेळे वनविहार मिपामहाकट्ट्याला.
एक मनमिळावू, आनंदी आणि कलाकार मनुष्य गेल्याचे दु:ख होत आहे. उत्साही आणि धाडसी. स्वत: आयोजन करून युअरोप ट्रिप करवून आणली कुटुंबाला. आता आताच चित्रदुर्ग, हंपी आणि लखुंडी एकट्यानेच यथेच्छ पाहून आले. फोटोग्राफीची आवड आणि त्यातही निरनिराळ्या दगडांचे,खडकांचे फोटो त्यांनी ठिकठिकाणी जाऊन काढले होते. नवनवीन शिकण्याची आवड. आणि काम करतील तर ते एक नंबर. स्वत:चे घर त्यांनी अप्रतिम रंगवले होते.
माझ्या प्रत्येक गोष्टीचे ते कौतुक करत. फेसबुकवरची माझ्यासाठीची ४ नोव्हेंबरची प्रतिक्रिया शेवटचीच ठरेल असं वाटलं नव्हतं.

भावपूर्ण श्रद्धांजली

__/\__

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2021 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी

चौकटराजा म्हणजे उत्साह, मनमिळाऊपण, सतत नवे शिकणे व ते इतरांशी वाटणे, सहजपणे माणसं जोडणे, समाधानी, कलासक्त अशा अनेक गुणांचा समुच्चय असणारा माणूस होता. माझ्यासारख्या अनेक मिपाकरांचे मिपावर रुळणे सोपे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सात वर्षापूर्वीच्या शनिवारवाडा येथील कट्ट्यात त्यांनी गप्पा रंगवण्याच्या कौशल्याने बहार आणली होती. माझी त्यांच्याशी प्रत्यक्षात एकमेव भेट केवळ तेव्हाच झाली होती.

हा माणूस असा की पहिल्यांदा भेटला तरी आपण अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत असे वाटायला लावणारा..
चौकटराजा आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या उमद्या विचारांनी कायमच आपल्यात राहतील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

गोरगावलेकर's picture

20 Nov 2021 - 7:47 pm | गोरगावलेकर

भावपूर्ण श्रद्धांजली.

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2021 - 7:49 pm | सर्वसाक्षी

विनम्र श्रधांजली. चौरा हे चित्रणप्रेमी होते.
बहुधा २०१९ दिवाळी अंकात त्यांनी गन्स ओफ नॅवेरॉन चे रसग्रहण लिहिले होते
एक जुना जाणता मिपाकर गेल्याचे ऐकून वाईट वाटले

यश राज's picture

20 Nov 2021 - 7:56 pm | यश राज

भावपूर्ण श्रद्धांजली

खेडूत's picture

20 Nov 2021 - 8:04 pm | खेडूत

__/\__
शांति ओम्.
त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो.

एकदाच काकांची प्रत्यक्ष भेट झाली होती पण फोनवर बोलणं होत असे. अतिशय दिलखुलास आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना आपलेसे करत असतं. स्वतःची दुःख मात्र कधीच जाणवू देत नसत, आज त्यांच्या जाण्याने फारच उदास वाटत आहे.

हो ना ....

भावपूर्ण श्रद्धांजली .

जुइ's picture

20 Nov 2021 - 9:09 pm | जुइ

एक दिलदार व्यक्तिमत्त्व हरवले. चौराकाकांशी एका कट्ट्याच्या निमित्याने भेट झाली होती. त्यांनी स्वतः नियोजन करून पार पाडलेली युरोप सफरेचे केलेले वर्णन अजूनही लक्षात आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शानबा५१२'s picture

20 Nov 2021 - 9:28 pm | शानबा५१२

पुर्नजन्मात भेटतात अशा व्यक्ती. आपण शोधुया.

शाम भागवत's picture

20 Nov 2021 - 9:49 pm | शाम भागवत

चौराकाकांना,
🙏

शेखरमोघे's picture

20 Nov 2021 - 10:05 pm | शेखरमोघे

भावपूर्ण श्रद्धांजली.

काकांना भावपूर्ण श्रध्दांजली..
मीपावर त्यांचा खोडकर स्वभाव त्यांचं वय जाणवू देत नसे.
अतिशय दुःखद बातमी.

सौंदाळा's picture

20 Nov 2021 - 11:04 pm | सौंदाळा

धक्कादायक बातमी
आयुष्य भरभरून जगले असे त्यांच्या प्रतिसाद आणि लिखाणातून जाणवे.
घरी स्वतः रंग द्यायचा होता तेव्हा त्याना खरड करून माहिती विचारली होती आणि भरपूर उपयुक्त माहिती मिळाली.
हरहुन्नरी चौकटराजा काकांना श्रध्दांजली.

सुक्या's picture

20 Nov 2021 - 11:19 pm | सुक्या

चौराकाकांना भेट्ण्याचा योग कधी आला नाहे पण त्यांच्या लिखानाचा मी चाहता आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अरेरे, फार वाईट झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मधुरा देशपांडे's picture

20 Nov 2021 - 11:49 pm | मधुरा देशपांडे

वाईट बातमी. काकांशी खरडवही आणि अनेक धाग्यांवर गप्पा झाल्या होत्या. युरोप मधली भटकंती, स्थापत्य याबाबत त्यांना खूप रस होता. अनेक धाग्यांवर त्यांनी आवर्जून कौतुक केले होते. भावपूर्ण श्रद्धांजली !!

मित्रहो's picture

21 Nov 2021 - 12:03 am | मित्रहो

धक्कादायक बातमी
चौराकाका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप विचार करून प्रतिसाद देत असत. फार वाईट वाटले

श्रीगणेशा's picture

21 Nov 2021 - 12:13 am | श्रीगणेशा

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

आदरपूर्वक श्रद्धांजली...

ज्येष्ठ मिपाकर चौकटराजा ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !

वरच्या सर्वच प्रतिसादांशी सहमत.

डॅा. कुमार१ ह्यांनी आज ही बातमी Whatsapp वर दिल्यावर धक्काच बसला.

वैचारीक मतभेद असले तरी भटकंतीच्या सामायीक आवडीने आम्हला जोडुन ठेवले होते.

त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग काही आला नाही, पण त्यांच्याशी मिपावरच झालेली ओळख आणि संपर्क नक्कीच स्पुर्तिदायक होता.

चौकटराजा ह्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

काळाच्या पडत्याआड गेले. मी त्यांना कधी भेटलो नाही. परंतु कोणार्कच्या रथमंदिराच्या चाकाच्या आठ अर्‍यामध्ये नायिकांची दिनचर्या दर्शविलेली आहे हे त्यांनी मला माझ्या मिपावरील लेखावरील त्यांच्या अभिप्रायात सांगितले होते. एवढे कलासक्त आणि सूक्ष्म मिरीक्षण होते त्यांचे. शास्त्रीय संगीतातले तर ते एक दर्दी, जाणकार श्रोते होते हेही त्यांच्यां अभिप्रायांमधून दिसून आलेले आहे.

वाईट वाटतेच, तसे ते वाटलेच. त्यांना माझी भावपूर्ण रद्धांजली.

गणेशा's picture

21 Nov 2021 - 7:48 am | गणेशा

भावपूर्ण श्रद्धांजली...
वाईट वाटले बातमी वाचून..

तुषार काळभोर's picture

21 Nov 2021 - 8:46 am | तुषार काळभोर

चौकतराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जेम्स वांड's picture

21 Nov 2021 - 9:00 am | जेम्स वांड

ओम शांती ओम शांती ओम शांती:

उपयोजक's picture

21 Nov 2021 - 9:05 am | उपयोजक

_/\_

अनिंद्य's picture

21 Nov 2021 - 9:13 am | अनिंद्य

_/\_

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Nov 2021 - 10:06 am | बिपीन सुरेश सांगळे

माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी नाव परिचयाचे.
आपल्या परिवारातील एक सदस्य गेला याचे दुःख आहेच .
भावपूर्ण श्रद्धांजली !

जव्हेरगंज's picture

21 Nov 2021 - 10:46 am | जव्हेरगंज

भावपूर्ण श्रद्धांजली
ओम शांती

कानडाऊ योगेशु's picture

21 Nov 2021 - 10:55 am | कानडाऊ योगेशु

चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली!_/\_

चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली. महादेव त्याना सद्गती द्या...

चांदणे संदीप's picture

21 Nov 2021 - 11:16 am | चांदणे संदीप

चौराकाका नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही ही खंतसुद्धा कायम राहील.
मिपाने एक उत्कृष्ट हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावले.

भावपूर्ण श्रद्धांजली!

सं - दी - प

काकांना भावपूर्ण श्रध्दांजली.._/\_

बबन ताम्बे's picture

21 Nov 2021 - 1:40 pm | बबन ताम्बे

चौ रा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
एका प्रतिसादात ते चिंचवडला भेटू म्हणाले होते, पण भेट राहिलीच.
त्यांचे युरोपचे प्रवासवर्णन खूपच सुंदर होते. एक कलासक्त व्यक्तिमत्व हरपले. मिपावर त्यांची उणीव सतत जाणवत राहील.

गामा पैलवान's picture

21 Nov 2021 - 3:37 pm | गामा पैलवान

चौकटराजांना शांती व सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना व मिपाकरांना हे दु:ख सहन होवो.
-गा.पै.

सन्जोप राव's picture

21 Nov 2021 - 3:49 pm | सन्जोप राव

भावपूर्ण श्रद्धांजली.

नावातकायआहे's picture

21 Nov 2021 - 9:31 pm | नावातकायआहे

चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.! :-(

वाईट बातमी. ईश्वर शांती देवो.

_/\_
शांती लाभो हि प्राथना!

नि३सोलपुरकर's picture

22 Nov 2021 - 11:10 am | नि३सोलपुरकर

चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली
_/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2021 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

चौकट राजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

योगी९००'s picture

23 Nov 2021 - 12:12 am | योगी९००

अरेरे.. वाईट बातमी. तसा प्रत्यक्ष परिचय नाही पण मिपावरचे त्यांचे लिखाण वाचले होते. एक चांगले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वाईट वाटले.

भावपूर्ण श्रध्दांजली.

अनन्त अवधुत's picture

23 Nov 2021 - 7:46 am | अनन्त अवधुत

चौकटराजांना सद्गती लाभो. त्यांच्या परिजनांना हे दु:ख सहन होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

रुपी's picture

24 Nov 2021 - 5:10 am | रुपी

फार दुःखद बातमी.
भावपूर्ण श्रध्दांजली.

तिमा's picture

24 Nov 2021 - 7:05 am | तिमा

_/\_

इरसाल's picture

24 Nov 2021 - 4:51 pm | इरसाल

चौरांना भावपुर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ देवो.

स्वधर्म's picture

24 Nov 2021 - 5:08 pm | स्वधर्म

त्यांचे प्रतिसाद मार्मिक असायचे.

वाईट बातमी. खरंतर २० तारखेलाच धागा वाचलेला. पण काय प्रतिसाद द्यावा हे देखील सुचत नव्हतं. अजूनही सुचत नाहीये.. :-(
_/\_

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_