मुसलमान अतिरेक्यांचा भारतावर झालेला हल्ला (शीर्षक संपादित)

भाष's picture
भाष in जनातलं, मनातलं
4 Dec 2008 - 5:28 am

X(

गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते. मुंबईवर झालेल्या मुसलमानी आक्रमणामुळे या २-३ स्थळांवर काय चालले आहे हे सहज बघावे म्हनुण आलो तेव्हा असे आढळले कि उपक्रम वर या बाबत काहीच नाही, मनोगतावर थोडेफार लिहिले आहे.

मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे.

२६ नोव्हेंबरला इथल्या सकाळी ११ वाजता ( भारतातल्या रात्री ९:३० ) रेडियोवर बातमी ऐकली. लगेच भावाला मुंबईला फोन लावला तो लागला नाही. शेवटी दुपारी २ वाजता लागला. वहिनी म्हणाली कि भाऊ नेमका कामाच्या बैठकीसाठी तेव्हाच ताजमध्ये गेला होता तो नुकताच आला आहे. मग त्याच्याशी सविस्तर बोललो.तो स्वतः पूर्वी सैनिकी अधिकारी होता आणि गेले कित्येक पायदळ, नौदल आणि वायुदल प्रमुख त्याचे जिगरी दोस्त आहेत. त्यामुळे त्याच्याकडून बरीच माहिती मिळाली. परत आज त्याच्याशी सविस्तर बोलणे झाले. सर्व देश पेटून निघाला आहे असे तो म्हणतो. मात्र इथल्या लिखाणात तसे जाणवले नाही याचे वैषम्य वाटले.

सध्या एव्हढेच लिहितो.

कळावे,
भाष

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

4 Dec 2008 - 6:15 am | कपिल काळे

<<सर्व देश पेटून निघाला आहे असे तो म्हणतो. मात्र इथल्या लिखाणात तसे जाणवले नाही याचे वैषम्य वाटले.>>

असे असेल तर..

<<मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे. >>

मित्रा तुला बहुतेक लिखाण दिसले म्हणजे तुला लिखाण बघण्याची सवय आहे तर. बघू नकोस, वाच . गेल्या आठवडयाभरातले लेखन "वाचल्यावर" नक्की समजेल. "बघून" नाही समजणार.

बरं पुढचा मुद्दा आपण पेटलो आहोत हे कसं "दाखवून" दयायचं ते ही स्पष्ट कर. उपक्रम आणी मनोगत "पेटली"आहेत का ते ही सांग. नसतील तर तू दे पेटवून. ;)

http://kalekapil.blogspot.com/

कपिल काळे's picture

4 Dec 2008 - 6:16 am | कपिल काळे

मुसलमानांचा भारतावर झालेला हल्ला

असे शीर्षक दिले म्हणजे पेटलो असे म्हणतात का?

http://kalekapil.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 6:40 am | भास्कर केन्डे

अहो मिपा सुद्धा पेटलेलेच आहे. जरा इथला वावर वाढवा म्हणजे कळेल.

इथे बरेच पेटलेले लेख होते पण कायदेशीर बाबींमुळे सरपंचांनी ते अप्रकाशित केले. सद्याची आणीबाणी हटल्यावर कदाचित ते पुनःप्रकाशित होतील अशी अपेक्षा.

आपला,
(पेटलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मुसलमानांचा भारतावर झालेला हल्ला

भाष राव, नक्की काय म्हनायचे आहे? उगाचच काहीतरी बरळुन धर्मीक तेढ वाढवु नका. मुंबैवर हल्ला झाल्यापासुन इथे कोण किती पेटले आहे ते सर्वांना ठाउक आहे. आम्ही हा भारतावर झालेला हल्ला मानतो. त्याला उगिचच धार्मीक रंग देउ नका.

सुक्या (बोंबील)

भाग्यश्री's picture

4 Dec 2008 - 7:40 am | भाग्यश्री

कोणाचं काय तर कोणाचं काय!! :|

बाकी, कोण किती पेटलंय,कोण जास्त पेटलं आहे, अशा क्षुल्लक तुलनेसाठी नो कमेंट्स!!

http://bhagyashreee.blogspot.com/

_समीर_'s picture

4 Dec 2008 - 8:59 am | _समीर_

मुसलमानांचा भारतावर हल्ला म्हणजे काय? भारत देश हा मुसलमानांचा नाही का? नसेल तर तसे स्पष्टपणे लिहा.

असेल तर मुसलमान लोक आपल्याच देशावर कसे काय हल्ला करतील ते समजावुन सांगा. तोपर्यंत कानातुन धुर येणारी स्मायली टाकुन तुमचे पेटणे तुमच्या घरात ठेवा.

नाखु's picture

4 Dec 2008 - 9:07 am | नाखु

आजच्या सामना मधिल "http://www.saamana.com/2008/Dec/04/Link/Main4.ht""
माय बाप "सरकार" काय ऊपाय करणार यासाठि "चिंतातुर"शुद्र प्राणी
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

क्लिंटन's picture

4 Dec 2008 - 9:25 am | क्लिंटन

भाष साहेब,

मुसलमानांचा भारतावर झालेला हल्ला असे आपल्या लेखाचे शीर्षक आहे. तेव्हा लेखातील मजकूराशी नाही तरी शीर्षकाला अनुसरून असलेले पुढील काही दुवे बघा

एक

दोन

तीन

चार

तरीही सद्यकालीन मुसलमानांकडून दिलगिरीचा एकही शब्द काढला जात नाही उलट अगदी परवापरवा घडलेल्या धुळ्यातील दंगलीसारखे प्रकार घडतात. तथाकथित धर्मनिरपेक्ष पत्रकार आणि इतिहास संशोधक डोळ्यावर कातडे पांघरून सतत हिंदूंनाच झोडपायचे ’पुण्यकृत्य’ करतात आणि म्हणूनच हिंदू कट्टरपंथीयांना लोकांचा पाठिंबा मिळतो.

(स्वत:ला हिंदू म्हणवायची लाज न वाटणारा) क्लिंटन

टग्या's picture

5 Dec 2008 - 6:05 am | टग्या (not verified)

सद्यकालीन मुसलमानांकडून दिलगिरीचा एकही शब्द काढला जात नाही

दुवा

क्लिंटन's picture

5 Dec 2008 - 9:17 am | क्लिंटन

टगेजीराव,

आपल्या दुव्याबद्दल धन्यवाद.असे आवाज मुस्लिम समाजातून उठत असतील तर त्याचे स्वागत व्हायलाच हवे.त्याच बरोबर तोंडदेखला निषेध करायचा आणि कोल्हापूर,बीड यासारख्या ठिकाणाहूनही दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी तरूण भरती होणार हे चित्र देखील थांबायला हवे. काही लाखांचे पगार दरवर्षी मिळवणारी सुखवस्तु संगणक अभियंते मंडळी त्यात सामील होत असतील (पुण्यात झाले तसे) तर शिक्षणाचा अभाव आणि गरीबी यामुळे असे तरूण भरकटतात हे म्हणणे १००% योग्य नाही. तसेच ११ जुलै २००६ च्या रेल्वे स्फोटांमध्ये बिहारमधील मधुबनी येथून मुंबईत एका कारखान्यात कामाला असलेल्या एकाला अटक झाली. (दुवा) . गुगलवर random शोध घेतला असता ही माहिती कळली. तेव्हा असे प्रकार पूर्णपणे थांबायला हवेत ही अपेक्षा.

---क्लिंटन

रामदास's picture

4 Dec 2008 - 9:32 am | रामदास

एव्हढेच लिहीण्यामध्ये काहीच लिहीले नाही आहे.
विस्तारपूर्वक लिहा काय बोलणे झाले ? सैन्याची मनस्थिती आता काय आहे ?
देश पेटला आहे हे फारच जनरल स्टेटमेंट झाले. आम्हाला सगळ्यांनाच पेटल्यासारखं वाटतं आहे. आम्ही बरेचजण वैचारीक मार्गानी किती वेगवेगळ्या वाटेनी वाटचाल करतो आहे ते पाहतो आहे.
तरीपण देशप्रेम हा आम्हाला सगळ्यांना बांधणारा समान धागा आहे हे पण आमच्या लक्षात येते आहे.
या साठी एक नम्र विनंती. आम्ही सगळेच वाचू असा एक चांगला लेख लिहा .आपले विचार मांडा.
तुम्ही जे लिहीले आहे त्यात एव्हढेच कळले की तुम्ही वर्षभर व्यस्त होतात. झाल्या प्रकारामुळे मिसळपाव वर काय चालले आहे याची दखल घ्यावीशी वाटली.वगिरेवगैरे.

सुक्या's picture

4 Dec 2008 - 2:59 pm | सुक्या

अजुन थोडी माहीती . .

भाष रावांचे बंधु पूर्वी सैनिकी अधिकारी होते आणि गेले कित्येक पायदळ, नौदल आणि वायुदल प्रमुख त्याचे जिगरी दोस्त आहेत.
वाचुन आनंद झाला.

सुक्या (बोंबील)

आम्ही रस्त्यावर उतरुन गाड्या,दुकाने जाळत फिरु का? काय राव एक वर्ष आला नाही आणि आल्या आल्या पेटवायची भाषा करता.विरोध करण्यासाठी जाळपोळ आवश्यक आहे काय? गांधीवाले सगळे झोपले आहेत काय? उत्तर द्या ह्याना.
वेताळ

अभिजीत's picture

4 Dec 2008 - 10:05 am | अभिजीत

>>मात्र इथल्या लिखाणात तसे जाणवले नाही याचे वैषम्य वाटले ..
हे कै च्या कै लिहिण्यापेक्षा ..
>>त्यामुळे त्याच्याकडून बरीच माहिती मिळाली. ..
यावर जरा लिहा.

- अभिजीत

एकलव्य's picture

4 Dec 2008 - 10:10 am | एकलव्य

संपादन करायचेच तर अतिरेक्यांचा भारतावर हल्ला असे तरी करायचे ... अर्धवट संपादनाने धड काहीच साधले जात नाही.

(संपादनाविषयी न बोलण्याचा संयम आहे हे उगाचच विसरलेला) एकलव्य

मुक्तसुनीत's picture

4 Dec 2008 - 10:16 am | मुक्तसुनीत

आता जे शीर्षक आहे ते सत्याला सोडून आहे किंवा प्रक्षोभक आहे असे मला वाटत नाही. मूळ लेखकाला जे म्हणायचे होते त्याला बाधा आणू न देता बदल करणे अय शीर्षकाने साधले असे मला वाटते.

पण "अर्धवट संपादनाने धड काहीच साधले जात नाही." हे तुमचे विधान खरे आहे. इतके लिखाण इथे होते. अलिकडील लिखाणाचे भडक स्वरूप लक्षात घेता "अर्धवट संपादक" कुठेकुठे पुरा पडणार ? तेव्हा तुमच्या (एरवी दाखवलेल्या) संयमाबद्दल आभार.

एकलव्य's picture

4 Dec 2008 - 10:20 am | एकलव्य

... अंगावर ओढून घेऊ नये. अर्धवट संपादन असे म्हटले आहे अर्धवट संपादक नाही. आपल्याला सांभाळाव्या लागणार्‍या बॅलन्सची कल्पना आहे. असो.... क्षमस्व!

पेटा ? कशासाठी ? केवळ धार्मिक तेढ वाढवु नका

हिंसेच समर्थन हिंसेने योग्य नाहि.........आणि असे चुकिचे पेटवणेहि योग्य नाहि......

मिपा वरील काही सभासद रक्तदान करायला गेले होते, काही पोलीसां साठी काही मदत जमवता येइल का याचा प्रयत्न करत आहेत, काही इंटरनेट च्या माध्यमातून या या आतंकवादा ला कसे सामोरे जाउ शकु या बद्दल जागरुकता निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थीतीत सामान्य माणसांनी आणखी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते ... ? आणि फक्त बंदूका हातात घेउन युद्ध केले म्हणजे देशसेवा आणि बॅनर्स घेउन टि. व्ही कॅमेरा समोर घोषणा दिल्या , किंवा काही प्रक्षोभक लेख लिहिले म्हणजेच देशप्रेम असे आहे का?

भारतात मुसलमान मुळी अस्त्तित्वातच नव्हते. मुसलमान भारतात आले ते आक्रमण करुन. तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी हिंदू राजांनी संघटीत होणे अपेक्षित होते.
पण आपापसातल्या लाथाळ्या आजही आपल्या देशाला घातक ठरत आहेत. तर तेव्हाही हेच होणार होते.

मुळात आक्रमण ही भारतीय संस्कृती कधीच नव्हती , किंबहुना दूरदृष्टीने एकसंध भारताचे स्वप्न फार कमी सम्राटांनी पाहिले आहे.
चंद्रगुप्त - चाणक्य जोडगोळीने भारताचे साम्राज्य पार इराणच्या सरहद्दीपर्यंत भिडवून ठेवले. हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी.
अखंड भारतीय साम्राज्याची ती सरहद्द राखणे पुढच्या राजांना जमले नाही. परिणामी अफगणिस्थान, बलुचिस्तान, इकडे मुसलमानांनी पाय रोवले. नंतर भारताच्या वैभवाने डोळे दिपल्यामुळे मुसलमानी आक्रमणाचा हैदोस सुरु झाला. त्याला खरी वेसण घातली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुढच्या मराठी साम्राज्याने. रजपुतांचे शौर्यही हे करु शकले असते, पण त्यांनी मुसलमानी पायाशी निष्ठा वाहिल्या.

पण या ८००- १००० वर्षांच्या कालावधित मुसलमानांनी काय केले? असंख्य गोष्टी आहेत, पण ठळक चार गोष्टी देतो.
- हिंदूंची हजारो मंदीरे फोडली गेली, लुटली गेली. (हिंदूंवर धार्मिक आक्रमण)
- हिंदू स्त्रियांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बलात्कार इतिहासात क्वचितच झाले असतील.(हिंदूंच्या समाजमनावर पाशवी आक्रमण व सामाजिक भेसळीचे राजकारण)
- जास्तीत जास्त हिंदूंना तलवारीच्या धाकावर मुसलमान बनवले गेले. (हिंदूंवर जबरदस्तीने थोपवलेले धार्मिक स्थित्यंतर)
- फाळणीच्यावेळीही मोठ्या प्रमाणावर हिंदूंची कत्तल आणि स्त्रियांवरचे बलात्कार यांचे विचार आजही अंगाची लाही लाही करतात.

ह्या गोष्टी मुसलमानांबद्दल प्रचंड तिडीक निर्माण करण्यास पुरेशा आहेत.

तरीही सहिष्णुता, प्रेम, क्षमा अशी महान हिंदू संस्कृती असलेला आपला भारत मुसलमानांना आजही सामावून घ्यायला तयार आहे.

फक्त माफक अपेक्षा त्यांनीही पूर्ण केल्या पाहिजेत.
- भारतात राहून स्वतःच्या निष्ठा पाकिस्तानच्या चरणी वाहणे बंद केले पाहिजे,
- धर्मांधपणा सोडून उघड्या डोळ्यांनी धार्मिक दंग्यांना थांबवले पाहिजे.
- पाकिस्तानी कारवायांना आश्रय देणे बंद करुन पोलिसांना योग्य ती माहीती पुरवायला पुढे आले पाहिजे.
- मनात प्रचंड देशभक्ती जागृत केली पाहिजे. आजही मुसलमानी समाज भारतात स्वतःचे वेगळेपण जपताना दिसतो, हे घातक आहे.

हे जेव्हा सर्व मुसलमान करतील तेव्हा हिंदूंच्या डोळ्यांत संशय का बरे येईल?

(अखंड भारतप्रेमी) सागर

टग्या's picture

5 Dec 2008 - 2:05 am | टग्या (not verified)

मुळात आक्रमण ही भारतीय संस्कृती कधीच नव्हती ... चंद्रगुप्त - चाणक्य जोडगोळीने भारताचे साम्राज्य पार इराणच्या सरहद्दीपर्यंत भिडवून ठेवले. हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी.

१. चंद्रगुप्त-चाणक्य ही जोडगोळी भारतीय असावी आणि त्यामुळे आक्रमण हे त्यांच्या संस्कृतीत नसावे असे वाटते. अशा परिस्थितीत एकही आक्रमण न करता, केवळ प्रेमाच्या आणि अहिंसेच्या सामर्थ्यावर भारताचे साम्राज्य त्यांनी वाढवून इराणच्या सरहद्दीपर्यंत कसे भिडवले ते कळले नाही.

२. चाणक्याच्या नंदसम्राटाने केलेल्या अपमानाबद्दल काहीसे ऐकले होते. अशा परिस्थितीत चंद्रगुप्ताच्या मदतीने केवळ प्रेमाच्या आधारावर चाणक्याने नंदसाम्राज्य मौर्यसाम्राज्यात कसे विलीन करवून घेतले ते कळत नाही. बहुधा "माझा अपमान केलास, आता चंद्रगुप्ताचाही कर" असे म्हणून "दुसरा गाल" प्रेमाने पुढे केला होता काय? आणि त्याने विरघळून जाऊन नंदसम्राटाने आपले साम्राज्य चंद्रगुप्त-चाणक्य जोडगोळीस सप्रेम अर्पण केले होते काय?

३. की भारतीयांनी भारतीयांवर / हिंदूंनी हिंदूंवर केलेल्या हल्ल्याला "आक्रमण" असे संबोधत नाहीत?

४. चंद्रगुप्त-चाणक्य ही जोडगोळी इराणच्या सरहद्दीपर्यंत जाऊन का थांबली? यातून "हिंदूंनी कधी मुसलमानांवर आक्रमण केले नाही" हे सिद्ध होते काय? परंतु त्या काळी तर इराणच्या लोकांचा धर्म मुसलमान नव्हता, किंबहुना इस्लामच अस्तित्वात नव्हता असे ऐकिवात आहे. (खरेखोटे तो एक ईश्वर जाणे आणि दुसरा तो अल्लाह जाणे!) म्हणजे इराणच्या सरहद्दीपार जरी चंद्रगुप्त-चाणक्य जात राहिले असते तरी "हिंदूंनी कधी मुसलमानांवर आक्रमण केले नाही" हे "सत्य" (यातून सिद्ध होत असेलच तर) अबाधित राहिले असते. मग ते इराणच्या सीमेपाशी का थांबले?

उगीच इतिहासाला सोयिस्करपणे रंगवून त्याचा दुरुपयोग (आधीच कमी नसलेली) तेढ वाढवण्यासाठी करू नका ही नम्र विनंती.

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 2:11 am | आजानुकर्ण

टगवंतरावांशी सहमत आहे.

धम्मकलाडू's picture

5 Dec 2008 - 12:02 pm | धम्मकलाडू

१. चंद्रगुप्त-चाणक्य ही जोडगोळी भारतीय असावी आणि त्यामुळे आक्रमण हे त्यांच्या संस्कृतीत नसावे असे वाटते. अशा परिस्थितीत एकही आक्रमण न करता, केवळ प्रेमाच्या आणि अहिंसेच्या सामर्थ्यावर भारताचे साम्राज्य त्यांनी वाढवून इराणच्या सरहद्दीपर्यंत कसे भिडवले ते कळले नाही.

२. चाणक्याच्या नंदसम्राटाने केलेल्या अपमानाबद्दल काहीसे ऐकले होते. अशा परिस्थितीत चंद्रगुप्ताच्या मदतीने केवळ प्रेमाच्या आधारावर चाणक्याने नंदसाम्राज्य मौर्यसाम्राज्यात कसे विलीन करवून घेतले ते कळत नाही. बहुधा "माझा अपमान केलास, आता चंद्रगुप्ताचाही कर" असे म्हणून "दुसरा गाल" प्रेमाने पुढे केला होता काय? आणि त्याने विरघळून जाऊन नंदसम्राटाने आपले साम्राज्य चंद्रगुप्त-चाणक्य जोडगोळीस सप्रेम अर्पण केले होते काय?

३. की भारतीयांनी भारतीयांवर / हिंदूंनी हिंदूंवर केलेल्या हल्ल्याला "आक्रमण" असे संबोधत नाहीत?

४. चंद्रगुप्त-चाणक्य ही जोडगोळी इराणच्या सरहद्दीपर्यंत जाऊन का थांबली? यातून "हिंदूंनी कधी मुसलमानांवर आक्रमण केले नाही" हे सिद्ध होते काय? परंतु त्या काळी तर इराणच्या लोकांचा धर्म मुसलमान नव्हता, किंबहुना इस्लामच अस्तित्वात नव्हता असे ऐकिवात आहे. (खरेखोटे तो एक ईश्वर जाणे आणि दुसरा तो अल्लाह जाणे!) म्हणजे इराणच्या सरहद्दीपार जरी चंद्रगुप्त-चाणक्य जात राहिले असते तरी "हिंदूंनी कधी मुसलमानांवर आक्रमण केले नाही" हे "सत्य" (यातून सिद्ध होत असेलच तर) अबाधित राहिले असते. मग ते इराणच्या सीमेपाशी का थांबले?

:):):):):)

उगीच इतिहासाला सोयिस्करपणे रंगवून त्याचा दुरुपयोग (आधीच कमी नसलेली) तेढ वाढवण्यासाठी करू नका ही नम्र विनंती.

टगोजींशी सहमत!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनामिका's picture

4 Dec 2008 - 1:03 pm | अनामिका

सागरला पुर्णतः अनुमोदन.
काल ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकर जमले होते यावरुन लोकांच्या भावना किती तिव्र आहेत याची कल्पना येते.मुंबईतील भेंडिबाजार्,नागपाडा ,गोवंडी,बेहरामपाडा येथिल किती नागरिक या अभियानात सामिल झाले होते तोच कळीच मुद्दा आहे?

इस्लामी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घडवुन आणलेला हा हल्ला होता हे स्पष्ट दिसत ,कळत असुन देखिल कुठल्याही मुस्लिम संघटनेने याचा निषेध वगैरे केल्याचे मला तरी निदान आढ्ळले नाहीं
सर्वधर्मसमभावाच्या व निधर्मिवादाच्या पोकळ गप्पा मारणे सोपे आहे पण मुळात मुसलमान समाज मुख्य प्रवाहात येण्यास तयार नाही त्याला काय करणार?
सर्वसामान्य माणुस त्यांचे वेगळेपण पहायला जात नाही पण त्यांच्याकडे फक्त एकगठ्ठा मतदार याच भुमिकेतुन पाहिले जाते ,आजतागायत गेले आहे .त्यांच्यात वेगळेपणाची भावना रु़जवणारे कोण ते आता मी सांगायला नको?
अनामिका"

टग्या's picture

5 Dec 2008 - 6:37 am | टग्या (not verified)

इस्लामी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घडवुन आणलेला हा हल्ला होता हे स्पष्ट दिसत ,कळत असुन देखिल कुठल्याही मुस्लिम संघटनेने याचा निषेध वगैरे केल्याचे मला तरी निदान आढ्ळले नाहीं

दुवा १
दुवा २

शोधाल तर कदाचित सापडेलही - अर्थात पाहण्याची इच्छा असेल तर! आणि थोडा धीर धरा की - तुमच्या हुकुमाप्रमाणे तुम्ही म्हणाल त्या क्षणी तुमच्यासमोर येऊन आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता निषेध करायला पाहिजे काय? आणि तुमच्यासारख्या अशा किती जणांसमोर येऊन असा 'पर्सनल पर्फॉर्मन्स' देणार?

सर्वधर्मसमभावाच्या व निधर्मिवादाच्या पोकळ गप्पा मारणे सोपे आहे

खरे आहे. आणि सर्वधर्मभावाच्या किंवा निधर्मीवादाच्या गप्पा मारण्याचा आव न आणता आगीत तेल ओतून ती आणखी भडकवणे त्याहूनही सोपे आहे.

मुंबईतील भेंडिबाजार्,नागपाडा ,गोवंडी,बेहरामपाडा येथिल किती नागरिक या अभियानात सामिल झाले होते तोच कळीच मुद्दा आहे?

जमलेल्या मुंबईकरांपैकी प्रत्येकाचे नाव आणि पत्ता यांची आपल्याजवळ खात्रीलायक नोंद आहे काय?

आग भडकलेली आहे. ती विझवता आली तर उत्तम, पण नाही तर निदान त्यात पेट्रोल टाकण्याचे सत्कार्य तरी करू नका ही नम्र विनंती.

सुनील's picture

5 Dec 2008 - 1:44 pm | सुनील

सर्वधर्मभावाच्या किंवा निधर्मीवादाच्या गप्पा मारण्याचा आव न आणता आगीत तेल ओतून ती आणखी भडकवणे त्याहूनही सोपे आहे.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 1:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टग्याशेटशी सहमत.

आग भडकलेली आहे. ती विझवता आली तर उत्तम, पण नाही तर निदान त्यात पेट्रोल टाकण्याचे सत्कार्य तरी करू नका ही नम्र विनंती.
+१

रुपेश सातारकर's picture

5 Dec 2008 - 2:45 pm | रुपेश सातारकर

हिंसेच समर्थन कधीही अयोग्यच

आग विझवा...... वाढवु नका.......आपली घरसुद्धा विनाकारण या आगित येतील..........काळजी घ्या........
आपली......आपल्या राष्ट्राची......आपल्या लोकांची.....

रुपेश

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 7:08 am | आजानुकर्ण

New Delhi, Dec 4 (PTI) Leading Muslim organisations today asked Imams of mosques across the country to condemn the Mumbai terror attacks in their Friday and Eid sermons and appealed to the Muslims to wear black strips on Eid day.
The Coordination Committee of Indian Muslims (CCIM), which comprises of Muslim bodies like the All India Muslim Majlis-e Mushawarat, Jamiat Ulama-e Hind, Jamaat-e Islami Hind, Jamiat Ahl-e Hadees and All India Milli Council, condemned the "beastly" attacks and demanded a high-level probe into the terror strikes.

"The committee demanded a high-level transparent, unbiased and truthful enquiry into these attacks so that the real culprits might be brought to book soon and punished severely," it said in a statement here.

The committee called upon Muslim masses to celebrate Eid with simplicity and wear black strips on the occasion. It also appealed the followers of the faith to help the victims of the incident.

"The leaders of the committee also request Imams of mosques across the country to condemn the terror attacks in their Friday and Eid sermons," it said.

The attacks have brought about a situation of fear and insecurity. The motive of the terrorists is to destabilise the country, hurt its economy and damage national unity, it said.

It asked the government, civil society and media to work together to expose the perpetrators of the attacks. PTI

http://timesofindia.indiatimes.com/Mumbai/Muslim_bodies_to_organise_prot...

http://www.indianexpress.com/news/Muslim-body-calls-for-subdued-Bakr-Eid...

आपला
(बातमीदार) आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 7:52 am | आजानुकर्ण

मराठी अनुदिन्यांवर भटकताना ही एक नोंद सापडलीः

http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/11/blog-post_30.html

ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे अर्थ लावावा.

आपला
(धार्मिक हिंदू) आजानुकर्ण

क्लिंटन's picture

5 Dec 2008 - 1:09 pm | क्लिंटन

आजानुकर्ण साहेब,

या बातमीमध्ये विनोदी काय आहे हे सांगाल तर बरे होईल.लेखकाचे म्हणणे इतकेच आहे की संकटप्रसंगी २००-२५० भारतीय आणि काही परदेशी अतिथी बळी पडले असताना समारंभ साधेपणाने साजरे करावेत. भूजचा भूकंप झाल्यानंतर भारतीय लष्कराने 'बीट द ट्रीट' (अथवा तत्सम काहीतरी नावाचा) मोठा समारंभ २००१ मध्ये साजरा केला नव्हता असे वाचल्याचे पक्के आठवते. तसेच आपल्या कुटुंबियांमध्ये कोणाचे निधन झाल्यास त्या वर्षीची दिवाळी सुध्दा आपण साजरी करत नाही की फराळाचे काही पदार्थ करत नाही. असे असताना लेखकाने समारंभ साधेपणाने साजरे करावेत असे म्हटले तर ते कोणाला मान्य असेल किंवा नसेल पण त्या बातमीमध्ये विनोदी काय आहे हे तरी समजायला मार्ग नाही.

माझ्या 'कुवतीप्रमाणे' मी लावलेला अर्थ असा की लेखकाचा हेतू प्रामाणिक आहे आणि देश संकटात असताना आपल्या बांधवांच्या दु:खात सहभागी व्हावेसे त्याला वाटते हा आहे. त्यात विनोदाचा भाग माझ्या अल्पबुध्दीला तरी जाणवलेला नाही. आपल्या 'कुवतीप्रमाणे' त्यातील विनोद आमच्यासारख्या विनोद न कळणार्‍यांना समजेल अशा पध्दतीने समजावून सांगावा ही विनंती.

क्लिंटन

मराठी_माणूस's picture

5 Dec 2008 - 1:14 pm | मराठी_माणूस

सहमत

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 8:04 pm | आजानुकर्ण

पहिली गोष्ट म्हणजे या लेखकाने लिहिलेले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. मी कोठेही बॅंडबाजा वाजवून नाचण्याच्या प्रकाराचे समर्थन केलेले नाही. किंबहुना असा प्रसंग घडला नसता तरी अशी वाजतगाजत फटाके उडवत मिरवणूक काढायची काहीही गरज नाही.

तो निखळ विनोद नव्हता... त्या लेखाला वाचून मला वैषम्याने हसू आले. थोडा शांतपणे विचार कराः

दोन साधी उदाहरणे घ्याः
१. गेल्या अनेक वर्षांमध्ये 6० हजाराहून जास्त लोक (शेकडो पोलीसांसह) नक्षलवादी कारवायांमध्ये मेले आहेत.
२. भारतात दर वर्षी 1 ते 2 लाख लोक रस्त्यावरील अपघातांमध्ये मरतात. (म्हणजे सामान्यतः रोज 273 ते 547 लोक)
दुवाः http://www.indianexpress.com/news/1-05-749-deaths-india-tops-road-accide...
दुवाः http://74.125.95.132/search?q=cache:lmEqBepP5c8J:ncrb.nic.in/ADSI2005/ac...

[ यात राजेश पायलट, भक्ती बर्वे इनामदार, श्रीकांत जिचकार, साहिबसिंग वर्मा वगैरे सेलिब्रिटी लोकही आहेत. ] या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात महाराष्ट्रात होतात. (सरासरी 18 टक्केः म्हणजे 50 ते 100 लोक दररोज)

ही पूर्णतः अनागोंदीची परिस्थिती आहे. देश दररोजच संकटात आहे. मुंबईतील घटनेने त्याला अधोरेखित केले आहे इतकेच.
माणसाच्या जिवाची भारतात किंमत नाही हे दररोजच अधोरेखित होत असते.

लेखकाने केलेली गावातील शेजाऱ्याच्या घरातील मृत्यूची तुलना चुकीची आहे... एक तर दुसऱ्या गल्लीत कोणाचा मृत्यू झाला तरी त्या गावात लग्न झालेच असते. याउलट या लग्नसमारंभातील लोकांपैकी एखाद्याचे नातेवाईक त्या दुर्दैवी घटनेत अडकले असते तर हा कार्यक्रम शांतपणे केला असता असे मला वाटते..

या आठवड्याच्या लोकप्रभामध्ये या हल्ल्यांच्या दिवशी ताज आणि ओबेरॉय हॉटेलांदरम्यानची ट्याक्सी सेवा जोरात चालू होती आणि दोन विक्रेत्यांनी पेप्सी आणि कुरकुरे विकून भरपूर धंदा केला अशी दोन निरीक्षणे आली आहेत. याबाबत काय म्हणणार?

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 1:58 pm | यशोधरा

खरोखर या बातमीत विनोदी काय आहे ते कळले नाही!

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 8:06 pm | आजानुकर्ण

माझ्या प्रतिसादाचा गैरअर्थ लावू नये म्हणून मी तो प्रतिसाद काढण्याची विनंती केली आहे. कृपया वरील प्रतिसादही उडवावा.

टग्या's picture

5 Dec 2008 - 11:59 pm | टग्या (not verified)
टग्या's picture

6 Dec 2008 - 2:18 am | टग्या (not verified)

दुवा -Muslims have gained nothing from terrorism

एका इस्लामी अभ्यासक-विचारवंताकडून मुसलमानांना उद्देशून असला तरी बरेच मुद्दे आपल्याला - हिंदूंना, मुसलमानांना - सर्वांनाच विचारात घेण्यासारखे आहेत असे वाटले.

एकलव्य's picture

6 Dec 2008 - 2:51 am | एकलव्य

टगेदादा - समाजाच्या वेगवेगळ्या अंगाच्या ह्या प्रतिक्रिया सर्वांसमोर आणण्याचा आपला प्रयत्न स्पृहणीय आहे.

- एकलव्य
(I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily.)

आजानुकर्ण's picture

6 Dec 2008 - 2:53 am | आजानुकर्ण

(I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily.)

स्वाक्षरी आवडली

आपला
आजानुकर्ण

धमाल नावाचा बैल's picture

6 Dec 2008 - 4:41 am | धमाल नावाचा बैल

>>गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते.

बेष्ट. तुमच्यासाठी आणी आमच्यासाठी पन बेष्ट!

आता पुन्हा वर्षभरासाठी कटा. मिपावर तुमच्या भडकाव्यात कोणी सापडणार नाहीत. तेव्हा पेटवा पेटवी करायला आता होळीलाच या.

जय महाराष्ट्र!

बैलोबा

भाष's picture

6 Dec 2008 - 8:08 pm | भाष

मित्रहो,

माझ्या येण्यामध्ये भडकावा अथवा पेटवापेटवी करण्याचा कोठलाही उद्देश नव्हता. तरिही त्यानिमित्तने लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त झाल्या हे बरे झाले.

मी इथे यावे किंवा न यावे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत संचालक माझे सदस्यत्व रद्द नाहीत तो पर्यंत मी माझ्या सोईनुसार येथे येईन याची खात्री बाळगा.

आपल्याकडे "चोर सोडून सन्याशाला सुळी" अशी म्हण आहे. माझा काय अपराध होता आणि इथल्या सभासदांपैकी काही माझ्यावर इतके नाराज का झाले हे मला समजले नाही. या धाग्याची सुरुवात मी नीट परत वाचली आणि अजून माझे असेच मत आहे की इथे आग लावण्याचा माझा कोणताही प्रयत्न नव्हता. अनवधानाने ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांची इथे क्षमा मागून हे भाष्य इथेच संपवितो.

भाष

शंकरराव's picture

12 Dec 2008 - 6:07 pm | शंकरराव

भाष ह्यांनी गैर समज करून घेउ नये त्यांनी लेख लिहिला तर उत्तम
पुढील लेखनास शूभेच्छा.

टग्याशेटशी मी ही सहमत.

आग भडकलेली आहे. ती विझवता आली तर उत्तम, पण नाही तर निदान त्यात पेट्रोल टाकण्याचे सत्कार्य तरी करू नका ही नम्र विनंती.
भाष यानी कृपया राजकारण टाळावे

~ वाहीदा

किसी के मौत पर कोई
सीयासी रोटिया कैसे सेक सकता है
इस चीज का तुम बेहतरीन नमुना है
ना तुम्हारे सीनेमे दील है और नाही वतन के लिये जजबात
क्यु बेवजह प्यार का नकाब ओढे हो ??

वाहीदा's picture

12 Dec 2008 - 4:01 pm | वाहीदा

U remind of me of Ashutosh Rana as Subodh Malgaonkar from film Zakham