ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग १

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
31 Oct 2021 - 9:06 pm

तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेल याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.

या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.

१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.

कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्‍यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.

तेव्हा येणार्‍या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.

२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2021 - 9:01 pm | श्रीगुरुजी

कोण करणार? मनसे की वंचित बहुजन आघाडी?

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Nov 2021 - 11:53 pm | चंद्रसूर्यकुमार

२६ गुणिले १३ बरोबर ३३८. म्हणजे जे.एन.यु मध्ये ३३८ दिवसांचे सुतक लागणार का?

अजूनपर्यंत या मंडळींची कावकाव सुरू झालेली नाही. तरी ती कावकाव जेव्हा सुरू होईल तेव्हा 'मोदी सरकार' कसे निरपराधांना ठार मारत आहे असे बोलले जाईल याविषयी पूर्ण खात्री आहे- आजची चकमक महाराष्ट्र पोलिसांनी केली असली तरी.

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2021 - 7:04 am | श्रीगुरुजी

ठार झालेल्यांमध्ये मिलिंद तेलतुंबडे हे नाव वाचले. हे आनंद तेलतुंबडेंचे कोणी नातलग आहेत का?

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Nov 2021 - 10:16 am | चंद्रसूर्यकुमार

हो आनंद हे मिलिंदचे भाऊ आणि हे दोघेही प्रकाश आंबेडकर यांचे मेहुणे.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Nov 2021 - 10:54 am | चंद्रसूर्यकुमार

२०१० मध्ये छत्तिसगडमध्ये दांतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सी.आर.पी.एफच्या ७६ जवानांना चकमकीत ठार मारले होते तेव्हा जे.एन.यु मध्ये जल्लोष झाला होता अशा बातम्या आल्या होत्या. तर असे काही झाले नव्हते असेही इतर काही ठिकाणी आले होते. खखोदेजा. पण ज्या विद्यापीठात कन्हैय्याकुमार सारखा कम्युनिस्ट (आता काँग्रेसवासी) टोणगा 'विद्यार्थी नेता' असेल तिथे असे काही झाले असले तरी अजिबात आश्चर्य वाटू नये.

सुक्या's picture

16 Nov 2021 - 9:48 pm | सुक्या

मी माझ्या लहानपणापासुन ह्या नक्षल चळवळी बद्दल ऐकतो आहे. ही चळवळ अजुन पर्यंत तग धरुन आहे. सरकार कुठलेही असो त्यांचा त्या सरकार विरोधी कारवाया चालु असतात. ह्या नक्षल लोकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? ही लोक नक्की काय मिळवण्यासाठी धडपडत आहेत?

ह्या बाबतीत मी खुप अज्ञानी आहे .. नक्की काय हवे आहे म्हणजे ही चळवळ थांबु शकते?

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Nov 2021 - 10:01 am | चंद्रसूर्यकुमार

नक्षलवादी हे टोकाचे डावे आहेत. मुळच्या कम्युनिस्ट तत्वात कामगार-कष्टकर्‍यांचे राज्य स्थापन व्हावे असे ध्येय आहे. त्यात शेतकर्‍यांना कामगारांबरोबर (प्रोलेटॅरिएट) धरलेले नाही तर जमिन या 'कॅपिटल' चे मालक म्हणून बूर्झ्वा असे धरले आहे. चीनमध्ये माओने स्वतःचे थोडे वेगळे व्हर्जन आणले आणि शेतकर्‍यांची क्रांती घडवून आणली. तेव्हा डाव्यांचे ध्येय कामगार-कष्टकरी (आणि माओ समर्थकांच्या दृष्टीने शेतकरी सुध्दा) यांचे राज्य स्थापन व्हावे असे आहे. सध्याची राजवट ही या वर्गावर अन्याय करणारी असल्याने ती उलथवून लावली तरच आपले राज्य स्थापन करता येऊ शकेल असे या गटाचे म्हणणे आहे. आता सध्याची राजवट कशी उलथवून लावायची? तर कम्युनिस्ट राजकीय पक्षांच्या मते निवडणुकीच्या मार्गाने तर कट्टर डाव्या नक्षलवाद्यांच्या मते सशस्त्र क्रांतीने.

तसे स्वातंत्र्यानंतर अगदी सुरवातीला भारतात भाकपवर बंदी होती (त्यावेळी माकपची स्थापना झाली नव्हती). ए.के.गोपालन वगैरे कम्युनिस्ट नेते सुरवातीला तुरूंगात होते. याचे कारण देशाला मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे- गोरे जाऊन देशी लोकांची सत्ता आली असली तरी या कष्टकरी वगैरे वर्गाच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही आणि या राजवटीत पडणारही नाही. ये आझादी झुठी है ही त्यांची घोषणा होती. तेव्हा हिंदुत्ववादी वर्गाचा नेहरूंचे सरकार उलथावून लावायचा उद्देश होता (गोपाळ गोडसे यांच्या एका मुलाखतीत तो उल्लेख होता) त्याप्रमाणेच या डाव्या वर्गाचाही तोच उद्देश होता. या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते हे रामचंद्र गुहांसारख्यानेही मान्य केले आहे. पण नंतरच्या काळात (१९५० च्या सुमारास) भाकपच्या नेत्यांनी भारतीय राज्यघटना मान्य करून मुख्य प्रवाहात यायची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी पहिल्या लोकसभा निवडणुकाही लढवल्या आणि भाकप सगळ्यात मोठा विरोधी पक्ष बनला.

सुरवातीला कम्युनिस्ट जगतात रशिया आणि चीन मित्र होते. पण नंतरच्या काळात त्यांच्यात दुरावा उत्पन्न झाला. त्याप्रमाणे १९६२ मध्ये चीन युध्दानंतर भारतातही रशियावादी कम्युनिस्ट आणि चीनवादी कम्युनिस्ट अशी फूट पडली. मुळातला भाकप रशियावादी तर नव्याने स्थापन झालेला माकप चीनवादी होता. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधात राहिला. माकपमध्ये कट्टर डावी मंडळी होती. त्यांच्या मते पक्ष संसदीय राजकारणात गुरफटला आहे आणि मूळ ध्येयापासून भरकटत आहे. चीन युध्दानंतरच्या परिस्थितीत आता सशस्त्र क्रांती करून आपले ध्येय साध्य करायला योग्य परिस्थिती आहे असे या गटाचे म्हणणे पडले. या गटाने उत्तर बंगालमध्ये सिलिगुडीजवळ नक्षलबारी या ठिकाणी १९६७ मध्ये स्थानिक पातळीवर सशस्त्र उठाव केला. तिथे जमिनदार वर्गाकडून श्रमिकांची पिळवणुक होत होती त्यामुळे या वर्गाकडून त्या उठावाला समर्थनही मिळाले. चारू मजुमदार हा या उठावाचा नेता होता आणि हा उठाव नक्षलबारी या ठिकाणी झाल्याने त्यांना पुढे नक्षलवादी असे म्हटले जाऊ लागले. याच कट्टर डाव्या गटाने माकप मधून बाहेर पडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट- लेनिनिस्ट) हा आपला नवा पक्ष स्थापन केला. नंतरच्या काळात या सीपीआय(एम-एल) मधीलही सौम्य लोक निवडणुका लढवू लागले. १९९५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमारांनी याच सौम्य गटाबरोबर युती केली होती.

पुढे या कट्टर गटातूनही अनेक वेगवेगळे गट स्थापन झाले. महाराष्ट्रात गडचिरोली, छत्तिसगडमधील दांतेवाडा-बस्तर, झारखंड वगैरे राज्यांमधील जंगल भागात हे गट आपला लढा चालू ठेवतात. मूळच्या जंगलच्या रहिवाशांच्या हक्कांसाठीचा सशस्त्र लढा अशास्वरूपाचे त्याचे स्वरूप आहे. ज्या बंगालमध्ये सगळी सुरवात झाली तिथे मात्र हा गट तितकासा प्रभावशाली राहिलेला नाही. याचे कारण १९७२ मध्ये सिध्दार्थ शंकर रे यांचे शेवटचे काँग्रेस सरकार बंगालमध्ये आले होते. या सरकारने नक्षलवाद्यांविरोधात अगदी कडक भूमिका घेतली आणि खर्‍याखोट्या चकमकीत नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. काही प्रमाणात ज्योती बसूंच्या सरकारनेही तेच केले.

श्रीरामसेना वगैरे कट्टर संघटनांना पाठिंबा असल्याचा आरोप हिंदुत्ववाद्यांवर नेहमी होत असतो. त्याप्रमाणेच डाव्या विचारवंत-राजकारण्यांना या कट्टर डाव्यांविषयी सहानुभूती आहे का हा प्रश्न तद्वतच निर्माण होत असतो- विशेषतः जनेयुमधील घटना लक्षात घेता.

प्रतीसादाबद्दल धन्यवाद. नक्षलवादी नक्की काय मागत आहेत व त्याना काय करायचे आहे हा मला खुप दिवसांचा प्रश्न होता. माहीतीपुर्ण प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2021 - 11:16 am | मुक्त विहारि

अमरावती हिंसाचार : पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला केले स्थानबद्ध

https://www.esakal.com/vidarbha/amravati-violence-update-bjp-leader-anil...

सुरूवात कुणी केली?

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन

https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/shiv-senas-agitation-a...

इतकीच जर काळजी असेल तर, राज्य सरकारने, इंधन दर कमी करावेत....

रात्रीचे चांदणे's picture

14 Nov 2021 - 12:17 pm | रात्रीचे चांदणे

2018 साली झालेल्या भारत रशिया करारानुसार रशियाने भारताला S400 चा पुरवठा करायला चालू केला आहे. राफेल करार असो किंवा S400 चा करार मोदी सरकार संरक्षण क्षेत्रांतील अनुशेष झपाट्याने भरून काढत आहे. s400 करारानंतर अमेरिकेचे व्यापारी निर्बंधाची टांगती तलवार भारतावर आहे. मोदी सरकार ह्यातून कसा मार्ग हे बघणे रोचक ठरेल.

Nitin Palkar's picture

14 Nov 2021 - 1:59 pm | Nitin Palkar

मोदी है तो मुमकिन है .. कुणी अंध भक्त म्हणा, कुणी नमो भक्त म्हणा.. आजवर प्रत्येक समस्येला मोदींनी यशस्वीपणे उपाय शोधला आहे हे सत्य आहे. घटनेतील कलम ३७० एवढ्यात जाऊ शकेल असे कुणाला तरी वाटले होते का?
राष्ट्र प्रथम या वाचनानुसार ते वागत आहेत हे सर्वसामान्य सुज्ञ भारतीयला जाणवते. मोदीद्वेषाने ग्रस्त लोकांची गोष्ट वेगळी आहे.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2021 - 4:36 pm | मुक्त विहारि

संघटन में शक्ती है....

ह्यासाठीच भाजप हवा...

सुबोध खरे's picture

15 Nov 2021 - 11:21 am | सुबोध खरे

भारत सरकारने अमेरिकेच्या धमक्यांना अजिबात भीक न घालता S -४०० या क्षेपणास्त्र प्रणालीचा करार केला.

त्यामुळे अमेरिकेने काहीही निर्बंध घालू द्या भारताला फारसा फरक पडत नाही हे त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले गेले आहे.

सद्य सरकार संरक्षण क्षेत्रात अजिबात बोटचेपेपणा करत नाही हे अमेरिकी सरकारला माहिती आहे.

त्यामुळे अमेरिका फारसे काहीही करणार नाही.

https://www.loksatta.com/desh-videsh/buddha-never-imposed-war-on-the-wor...

परमपूज्य राहुल गांधी, यांच्या समर्थकांना, हा इतिहास जाणून घ्यायची कधीच गरज भासत नाही...

“हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात भागवतांनी आंदोलन करत नरेंद्र मोदींना जाब विचारावा”; संजय राऊतांचं आव्हान

https://www.loksatta.com/mumbai/mohan-bhagwat-should-ask-question-to-mod...

मते मागतांना, हिंदू आणि मराठी, आणि आता मात्र ढकलंपंची ....

बरे झाले की, मी योग्य वेळीच शिवसेना सोडली...

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2021 - 10:48 pm | श्रीगुरुजी

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व एमआयडीएम यांच्यात युती झाल्याची बातमी आहे.

शिवसेनेने आतापर्यंत मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, स्वतंत्र भारत पक्ष, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्व पक्षांशी युती केली आहे. आता युतीसाठी एमआयएम हा एकमेव पक्ष शिल्लक होता. आता ही युती झाल्याने ती कमतरता सुद्धा भरून निघाली.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 10:07 am | मुक्त विहारि

ह्या माहिती बद्दल धन्यवाद

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2021 - 8:20 am | श्रीगुरुजी

बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली!

अशी रत्ने आता अत्यंत दुर्मिळ झाली आहेत.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 10:09 am | मुक्त विहारि

ह्यांची व्याख्याने ऐकली आहेत

वामन देशमुख's picture

15 Nov 2021 - 10:57 am | वामन देशमुख

शिवशाहिरांना विनम्र श्रद्धांजली.

_/\_

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Nov 2021 - 5:16 pm | अमरेंद्र बाहुबली

बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार, शिवसेनेची धगधगती बुलंद तोफ, विरोधकांचा कर्दनकाळ, महाविकासआघाडीचे किंगमेकर, सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Nov 2021 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

श्री.रा.रा. संजय राऊत यांना ६०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम.

raut

शिवसेनेचा पाया मुळापासून खणून काढायचे त्यांनी हातात घेतलेले व्रत लवकरात लवकर पूर्ण व्हावे याबद्दल त्यांना शुभेच्छा.

म्हणजे नक्की काय आहे?

हे ह्यांच्या मुळेच इतर सामान्य जनतेला समजले...

शिवाय, शाकाहारी कोंबडी आणि द्रोणाचार्य यांनी आणलेली संजीवनी विद्या, ही अमुल्य माहिती देखील समजली. दस्तूरखूद्द संपादकच इतके मौलिक ज्ञान देत असल्याने, अशा वाचकांच्या अफाट बौद्धिक क्षमते बद्दल, मी कधीच शंका घेत नाही...

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2021 - 6:04 pm | श्रीगुरुजी

तथास्तु! शिवसेना संपत आली तर भाजपने पुन्हा एकदा युती करून शिवसेनेला प्राणवायू पुरवू नये ही अपेक्षा व्यक्त करून आसनस्थ होतो.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 6:38 pm | मुक्त विहारि

सध्या तरी डोंबिवलीत हीच परिस्थिति आहे....

मनसेचे मंदार हळबे, आता भाजप बरोबर आहेत...

डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने, पुढे मागे, संपूर्ण जगांत पण, हीच परिस्थिति होण्याची शक्यता नाकारता येत नाही ...

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Nov 2021 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. ह्या तत्वावर सेनेचा ठाम विश्वास आहे असं वाटतंय.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2021 - 7:36 pm | श्रीगुरुजी

शिवसेना स्वतःच कपटी मित्रांच्या यादीत चपखल बसते आणि ते दिलदार शत्रू सुद्धा नाहीत.

महाविद्यालय परिसरात नमाज पठणावरून वाद ; हनुमान चालीसा म्हणत ‘अभाविप’ने दर्शवला विरोध!

https://www.loksatta.com/desh-videsh/controversy-over-namaz-recitation-i...

शिकायला जातात की धार्मिक प्रार्थना करायला?

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral...

https://www.tv9marathi.com/maharashtra/four-persons-go-viral-after-makin...

नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडल्याचे समजते. आझादनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या आहेत.

हिंदूत्ववादी शिवसेना आता काय कारवाई करणार, हे बघणे रोचक ठरेल .... राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कडून, माझ्या तरी काहीच अपेक्षा नाहीत...

कितीही आवाज दाबला तरी आता हिंदू मार खाणार नाही’, अटकेनंतर अनिल बोंडेंची संतप्त प्रतिक्रिया....

https://www.tv9marathi.com/politics/amravati-violence-anil-bondes-angry-...

सुरूवात कुणी केली?

मदनबाण's picture

15 Nov 2021 - 7:18 pm | मदनबाण

शिवशाहिरांना विनम्र श्रद्धांजली. _/\_
============================

श्री.रा.रा. संजय राऊत यांना ६०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम.
साठी बुद्धी नाठी अशी म्हण आहे, पण इथे बुद्धीचा काही संबधच येत नाही, तेव्हा राऊत सरांना १५० वर्ष तरी आयुष्य लाभावे अशी प्रभुचरणी प्रार्थना !
त्यांनी पुढील आयुष्यात संपूर्ण जोर लावुन नॉटी सेना [ शिवसेना बाळा साहेबां बरोबरच संपली. ] लवकर संपवावी. मुंबई आणि महाराष्ट्र नॉटी सेने पासुन मुक्त करण्यासाठी त्यांनी जी कंबर कसली आहे त्यावर आयोडेक्स चोळुन, नविन सेना भवाना समोर देखील खंबीरपणे वाचाळ वीरता दाखवत खिंड लढवत रहावे.

हिंदूत्ववादी शिवसेना आता काय कारवाई करणार, हे बघणे रोचक ठरेल
अजान स्पर्धा भरवणार्‍या आणि सुंता करुन बसलेल्या कडुन तुमच्या भलत्याच अपेक्षा दिसतात ! :))) यांची माता इटालियन आणि पिता बारामतीचा ! :))) नॉटी सेना आहे ती ! ढाण्या वाघ वगरै वल्गना करत, शेपटी आत घालुन बिळात बसणारे उंदीर आहेत ते !

जाता जाता :-

मदनबाण.....

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2021 - 7:40 pm | श्रीगुरुजी

वर लिहिले तेच पुन्हा लिहितो.

शिवसेना संपत आली तर भाजपने पुन्हा एकदा युती करून शिवसेनेला प्राणवायू पुरवू नये. शिवसेना शून्य असताना १९८९ मध्ये विनाकारण युती करून भाजपने शिवसेनेला स्वतःची किंमत देऊन मोठे केले.

नंतर शिवसेना जवळपास पूर्ण संपलेली असताना २०१९ मध्ये भाजपने पुन्हा एकदा युती करून शिवसेनेला प्राणवायू पुरविला.

भविष्यात हीच घोडचूक भाजपने परत करू नये.

https://www.loksatta.com/mumbai/bombay-high-court-stay-on-metro-shed-in-...

भिजत घोंगडे आणि लटकती प्रजा.... हे राज्य सरकार म्हणजे, ढकलंपंची सरकार आहे...

https://www.loksatta.com/maharashtra/sharad-pawar-slam-bjp-leader-over-a...

सुरूवात कुणी केली हो?

------
त्रिपुरात अटक केलेल्या दोन महिला पत्रकारांना जामीन...

https://www.loksatta.com/desh-videsh/two-women-journalists-arrested-in-t...

राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली 'बबली', मित्रांच्या मदतीने चोरल्या 11 गाड्या!

https://lokmat.news18.com/amp/maharashtra/two-arrested-along-with-women-...

काय बोलावं ते सुचेना ...

अनिल बोंडे म्हणाले, “मलिक साहेब, हिंदुंना एकत्र करण्यासाठी दारुच्या पैशांची गरज पडत नाही. हर्बल गांजाची तर अजिबात नाही.”

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-anil-bonde-criticize-ncp...

आमच्या सारखे हिंदू,दारू साठीच कशाला, कुठलाही स्वार्थ मनांत न ठेवता, एकत्र येतात...

हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र फडणवीस

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-anil-bonde-criticize-ncp...

नेहमीचेच आहे... हिंदू एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकत नाहीत...

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2021 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदूहीतासाठी फडणवीसानी सेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवे होते. अजूनही वेळ गेलेली नाही, सत्तेचा मोह सोडून हिंदूहीतासाठी सेनेला पाठींबा द्यायला हवा.

निदान, आमच्या सारख्या हिंदूंना, भाजप शिवाय पर्याय नाही, हे तरी समजले

बाय द वे,

ज्याचे आमदार जास्त, त्याचा मुख्यमंत्री, हा फंडा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पण मान्य केला होता....

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2021 - 7:29 pm | अमरेंद्र बाहुबली

बिहारात मात्र ऊलटय.

निवडणुकी आधीच मुख्यमंत्री कोण होणार? हे बिहारच्या बाबतीत ठरले होते ....

सामना वाचून मी माझी मते ठरवत नाही .... इतरांचे मला माहिती नाही ...

श्रीगुरुजी's picture

17 Nov 2021 - 7:50 pm | श्रीगुरुजी

ज्याचा जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फंडा मान्य करणारे ६०% अधिक जागा लढवित होते. त्यामुळे त्यांचेच जास्त आमदार येणार हे नक्की होते. मुळात आपला मताधार जास्त असूनही अशी दुय्यम भूमिका भाजपने तब्बल २५ वर्षे का घेतली होती? १९८५ मध्ये भाजपचे १६ तर सेनेचा फक्त १ आमदार होता. पण १९९० मध्ये कोणतीही गरज नसताना युती करून सेनेला १८३ जागा देणे व स्वत:ला फक्त १०५ जागा घेणे हा बिनडोकपणाचा कळस होता.

२०१९ मध्ये युती केल्यानंतर वाटाघाटीत जे जे ठरले होते ते माध्यमांसमोर जाहीर न सांगता गुपित ठेवायचं आणि आम्ही सेनेला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंच नव्हतं, आमचे आमदार जास्त म्हणून आमचाच मुख्यमंत्री हवा असं रडत बसायचं हा पुन्हा एकदा केलेला बिनडोकपणा आहे.

मोदी द्वेषाने ग्रस्त असलेल्याना बरनॉल लावण्यासाठी अजून एक निमित्त. पूर्वांचल एक्सप्रेस मार्गावर पंतप्रधान मोदींचे वायुदलाच्या विमानातून आगमन. मुंबईकरांना याचे भारीच कौतुक वाटलेले आहे. 'मुंबई विमानतळावरील धावपट्टी देखील दुरुस्तीसाठी बंद' अशी बातमी अधून मधून वाचायची मुंबईकरांना सवय आहे.
मुंबईतील रस्ते कधीही खड्डेमुक्त नसतात, दर पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या नावाने शिमगा होतो . तरीही नेहमीच्या कंत्राटदारांना दरवर्षी कंत्राटे मिळतात. नगरसेवकांच्या गाड्या आणि माङया वाढत जातात आणि रस्ते तसेच राहतात. त्यामुळे विमान उतरु शकेल असा रस्ता हे मुंबईकरांच्या स्वप्नात देखील येणार नाही.
घरोघर शौचालय ते धावपट्टी समान महामार्ग हे गेल्या सात वर्षांतच बघायला मिळाले.
https://youtu.be/VTNL59ybOa4
या वरील डाव्यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया...
https://www.hindustantimes.com/india-news/desperation-to-please-voters-s...

मोदी द्वेषाने ग्रस्त असलेल्याना बरनॉल लावण्यासाठी अजून एक निमित्त. पूर्वांचल एक्सप्रेस मार्गावर पंतप्रधान मोदींचे वायुदलाच्या विमानातून आगमन. मुंबईकरांना याचे भारीच कौतुक वाटलेले आहे. 'मुंबई विमानतळावरील धावपट्टी देखील दुरुस्तीसाठी बंद' अशी बातमी अधून मधून वाचायची मुंबईकरांना सवय आहे.
मुंबईतील रस्ते कधीही खड्डेमुक्त नसतात, दर पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या नावाने शिमगा होतो . तरीही नेहमीच्या कंत्राटदारांना दरवर्षी कंत्राटे मिळतात. नगरसेवकांच्या गाड्या आणि माङया वाढत जातात आणि रस्ते तसेच राहतात. त्यामुळे विमान उतरु शकेल असा रस्ता हे मुंबईकरांच्या स्वप्नात देखील येणार नाही.
घरोघर शौचालय ते धावपट्टी समान महामार्ग हे गेल्या सात वर्षांतच बघायला मिळाले.
https://youtu.be/VTNL59ybOa4
या वरील डाव्यांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया...
https://www.hindustantimes.com/india-news/desperation-to-please-voters-s...

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 5:42 pm | मुक्त विहारि

आपले राज्य सरकार मात्र अद्यापही मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकलेले नाहीत ....

10-15 लाख लोकांना असेच लटकत ठेवले आहे ...

मदनबाण's picture

17 Nov 2021 - 7:31 pm | मदनबाण

आपले राज्य सरकार मात्र अद्यापही मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकलेले नाहीत
बाटगी सेना प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर निर्माण करण्यासाठी सत्तेत आलेली आहे.

10-15 लाख लोकांना असेच लटकत ठेवले आहे
लोकांचे कोणाला पडले आहे ? स्वतःचे खिसे भरले ना ? मग बस्स !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.

श्रीगुरुजी's picture

17 Nov 2021 - 7:41 pm | श्रीगुरुजी

बाटगी सेना प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर निर्माण करण्यासाठी सत्तेत आलेली आहे.

आपण ५ वर्षे काहीतरी प्रचंड काम केलंय असं वारंवार सांगणाऱ्यांनी अशा संपत आलेल्या पक्षाला खूप जास्त जागा देऊन स्वतःच्या जागा कमी करून स्वत:चे नुकसान का करून घेतले?

मुळात सेना मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगू शकेल इतके सेनेचे आमदार निवडून आणण्यासाठी कोणी व का मदत केली?

सेना व भाजपत जे काही ठरले होते ते दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन जाहीर का केले नव्हते?

भविष्यात पुन्हा एकदा सेनेशी युती करून स्वतःच्या पायांवर पुन्हा एकदा कु-हाड मारून घेण्यास भाजपचे नेते एका पायावर तयार असतील याची मला खात्री आहे.