ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग १

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
31 Oct 2021 - 9:06 pm

तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेल याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.

या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.

१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.

कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्‍यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.

तेव्हा येणार्‍या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.

२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

प्रतिक्रिया

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल...

https://davandee.com/nawab-malik-has-anonymous-wealth-of-rs-3000-crore-h...

सगळेच गौडबंगाल आहे ....

मुक्त विहारि's picture

6 Nov 2021 - 6:09 pm | मुक्त विहारि

https://www.newsdanka.com/business/edible-oil-prices-reduced-after-crude...

मोदी सरकारने आयात शुल्क घटवल्यामुळे या किंमती कमी झाल्या आहेत.

कुख्यात ड्रग पेडलरकडूनही अनिल देशमुखांची वसूली? भेटीचे फोटो व्हायरल....

https://www.sarkarnama.in/desh/anil-deshmukh-photo-viral-with-drug-peddl...

कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांवर, माझा अजिबात विश्र्वास नाही ....

मुक्त विहारि's picture

6 Nov 2021 - 8:47 pm | मुक्त विहारि

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahmednagar-hosp...

नशिकमध्ये गॅस दुर्घटना घडल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाचेही फायर ऑडिट करण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे....

Rajesh188's picture

7 Nov 2021 - 9:55 pm | Rajesh188

भारतीय मीडिया,विचारवंत हे सर्व लाचार,बटिक आहेत
भारतीय मीडिया मध्ये येणाऱ्या सर्व बातम्या ह्या साफ खोट्या आणि सरकार च्या दबाव खाली आहेत.
इथे सर्व च चोर आहेत.
लोकांनी अत्यंत सावध राहून फक्त आपल्या स्व अनुभव वरूनच देशाची अवस्था ह्या सरकार च्या काळात किती भयंकर आहे त्या वर स्वतःचे मत बनवावे

पेगासस फेम इस्राएली कंपनी एन एस ओ यूएस ने ब्लॅकलिस्ट केली आहे.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/explained/united-...

सर्व सरकार ही ही सत्तेची भुकेली असतात.us नी बंदी घातली म्हणजे us सरकार ची काळी काम ती ओपन करता असणार.
लोकांना सत्तेशी काही देणेघेणे असेलच नाही पाहिजे.
आज च्या काळात लोकांची स्वतः सावध राहणे गरजेचे आहे.
मीडिया ,चमचे ह्यांच्या मताला काही किंमत देण्याची गरज नाही स्व अनुभव हाच महत्वाचा.

तुम्हाला यू एस गव्हर्नमेंट आणि NSO बद्दल स्व अनुभव आहे हे माहित नव्हते.

सुक्या's picture

8 Nov 2021 - 1:21 am | सुक्या

ते सर्वज्ञानी आहेत . . . व्यास महर्षी नंतर हेच . .

एसटी महामंडळ मोडकळीस काढून मंडळ ची अब्जावधी रुपयाची संपत्ती कोणाच्या तरी घशात नक्कीच जाणार आहे.
सोयीस्कर रित्या चालू मीडिया,सत्ताधारी पक्ष,विरोधी bjp हा पक्ष मौन बाळगून आहेत.
दुसऱ्या बाजूला कामगार नी संप करावा म्हणून सर्व राजकीय पक्ष पर्यातंशोल असणार.
एसटी कामगार चा गिरणी कामगार करून त्यांना देशोधडीला सर्व मिळून नक्कीच लावणार आहेत.
स्वार्थ असेल तिथे पक्षभेद विसरून सर्व नेते नेहमीच एक होत असतात.
मूर्ख जनता वेगळ्याच विश्वात जगत असते.
आता अनिल देशमुख तुरुंगात असतील ते फक्त bjp मुळे नाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा पण त्या मध्ये सहभाग असणार.

आत्ता एस.टी. कामगारांचा संप चालू आहे...

ह्या दोन्ही वेळी, महाराष्ट्र राज्यात, कॉंग्रेस सत्तेवर आहे...

Rajesh188's picture

8 Nov 2021 - 8:39 pm | Rajesh188

काँग्रेस च्या हट्ट वादी पना मुळेच देशोधडीला लागले. एसटी महामंडळ काँग्रेस मुळेच डब घाई ला आले आहे.
हे मात्र सत्य आहे.
म्हणून मी बोलत असतो.सरकार कोणत्या ही पक्षाचे असू ध्या सामान्य लोकांचे भले तेव्हाच करतात जेव्हा सामान्य लोक जागरूक असतात.
कोणत्याच राजकीय पक्षाचे आंधळे समर्थक नसतात.

म्हणून तर कॉंग्रेस नकोच....

ST ची सेवा बंद असल्याने, कुणी तरी भरपूर फायदा घेत असणार

Supply vs Demand, आणि ते पण ऐन दिवाळीच्या मोठ्या कालखंडात

https://www.newsdanka.com/politics/yogi-visits-kairana/37339/

पश्चिम उत्तरप्रदेशातील शामलीमधील कैराना जे २०१७ सालच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक मुस्लिम गुन्हेगारी टोळ्यांमुळे हिंदू कुटुंबांच्या स्थलांतरामुळे चर्चेत होते.

Rajesh188's picture

8 Nov 2021 - 8:41 pm | Rajesh188

मुस्लिम ,यादव समीकरण मुळे तिथे ती अवस्था निर्माण झाली असणार.
बिहार ,यूपी मधील यादव शाही बुडाली हे खूप योग्य झाले आहे.
आणि bjp नी तो यादव शाही बुडवली. ग्रेट.

Rajesh188's picture

9 Nov 2021 - 3:26 pm | Rajesh188

मूर्ख भारतीय मीडिया दोन दिवसापासून देत आहे.
ऐका टॅक्सी वाल्याला अंबानी साहेबांचं घर कुठे हे विचारले.
त्या टॅक्सी ड्रायव्हर नी पोलिस ना सांगितले असणे त्यांची सुरक्षा वाढवली.
नशीब फक्त भारतीय भाषेत आणि आणि फक्त भारतात च मूर्ख मीडिया नी ही बातमी दिली असावी.
जागतिक स्तरा वर दिली नसेल.
नाही तर जगा नी डोक्यावर हात मारून घेतला असता.
भारत महासत्ता नाही तर आफ्रिकेतील मागास देश पेक्षा पण मागास आहे ह्या शिक्का मारला असता जगा नी.
गूगल मॅप ,गूगल Earth, गल्ली बोळ दाखवते.
कोण कशाला कोणाचा पत्ता विचारेल.

https://www.loksatta.com/maharashtra/nawab-malik-on-allegations-of-under...
नवाब मलिक उद्या फडणवीस च्या आरोपावर उत्तर देणार आहेत
एक तर महाराष्ट्र मध्ये एक bjp च नेता लायक नाही.
सर्व नमुने आहेत
राज्याच्या विकासात शून्य सहभाग असलेली लोक bjp ची नेते आहेत.
राम कदम,फडणवीस,राणे,चंपा,आणि बकी एक पण लायकीचा नाही ना दूर दृष्टी असणारा आहे.

राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन?; संपावरून सरकार कडक भूमिकेत!

https://www.loksatta.com/maharashtra/suspension-of-376-st-employees-gove...

इथपर्यंत गोष्ट यायलाच नको होती...

एसटी मोडीत काढण्यासाठी च सर्व ताकत लावली असती.
एसटी बुडीत जावी म्हणून सेना,bjp पासून आघाडी सरकार ह्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
त्याचे कारण परत बुद्धीचं नसणारे सामान्य लोक.
एसटी काही ही करून प्रगती पथ वर नेण्याची उर्मी ना कामगार लोकात ना officer लोकात.
आयएएस अधिकारी हे सरकार चे भडवे असतात.
त्यांचे सर्व बेकायदेशीर आदेश आणि सूचना ह्यांना कचऱ्याचा डब्बा दाखवला पाहिजे होता कायदा आणि राज्य घटना ह्यांचा हवाला देवून.
आता वेळ निघून गेली आहे.
मुंबई मधील बस चालक,वाहक,कंट्रोलर ह्यांचे वर्तन बघून एक दिवस बेस्ट पण कचऱ्यात जाणार हे नक्की.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2021 - 3:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एसटीवाल्यांची सेवा फार उत्तम आहे अशी नाही. चालक-वाहकांची अरेरावी काही प्रमाणात असली तरी खेड्यापाड्यात लालपरी जाते हे मान्य. सतत तोट्यात असलेले परिवहन महामंडळ सरकार कसे चालवायला घेईल. एकीकडे सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असतांना ही सेवा शासकीय झाली तर फार फायद्यात येईल असे काही नाही. सरकारी काम आपण सर्वांना माहिती आहे, एस्टी कर्मच्या-यांचे वेतन वेळेवर होतील पण लगेच वेतन दुप्पट तीप्पट होतील असे काही नाही. एस्टी कर्मचा-यांचे वेतन खरंच कमीच आहे त्यात आजच्या काळात घर चालविणे कठीण आहे, त्यामुळे त्याबद्दल सहानुभूती आहे. काहीतरी मार्ग निघावा. असे वाटते.

-दिलीप बिरुटे

जबाबदारी सरकार नी घेतली नाही पण एसटी चा वापर स्वतःच्या राजकीय फायद्या साठी मात्र केला.
१) ज्येष्ठ नागरिकांना का half तिकिट.
२) कॉलेज ,शाळा ह्या मधील मुलांना नगण्य दरात महिन्याचा पास.
३) पत्रकार,आमदार,अपंग,ह्यांना भाड्यात सवलत
हा भार् कोणी सोडायचा एसटी महामंडळ नी .का?
ज्या गावात चार प्रवासी नाहीत तिथे ५२ सीटर बस सोडणार .का?
लहान दहा बारा सीट ची मिनी बस सोडली पाहिजे होती.
ना कर्मचारी ना अधिकारी ह्यांना अक्कल.
पगार मिळतो आहे ना?
झाले तर मग
फायद्याचे जे मार्ग आहेत.
मुंबई,पुणे,नाशिक ,अशा शहारा कडे त्या मार्गावर खासगी वाहतूक करण्यास परवानगी.
सर्व नेत्यांच्या खासगी बस आहेत
सर्व पक्षीय.
एसटी वाचवणे ह्याची सर्वात मोठी जबाबदारी अधिकारी ,कर्मचारी ह्यांची च होती.

सुबोध खरे's picture

10 Nov 2021 - 7:39 pm | सुबोध खरे

काही पायाभूत सुविधा या फायद्यातच चालल्या पाहिजेत हा हट्ट सोडला पाहिजे.

कित्येक दूरवरच्या गावातील लोकांसाठी एस टी हे एकमेव स्वस्त आणि सुरक्षित असे वाहतुकीचे साधन आहे.

जर सरकार लोकांना फुकट रेशन पुरवते, शेतकऱ्यांना कामकर्याना दर महा खात्यात पैसे जमा करून देते, खाते बियाणे याना सबसिडी देते मागासवर्गीयांना फी माफी देतात तर काही प्रमाणात तोटा सोसून का होईना पण सामान्य जनतेला असे स्वस्त आणि सुरक्षित वाहतुकीचे साधन पुरवणे हे सुद्धा सरकारचे कर्तव्य आहे.

परंतु एस टी फायद्यात (किंवा किमान तोट्यात) चालवण्यासाठी उत्तम प्रशासक नेमण्या ऐवजी वर्षानुवर्षे सर्व पक्षांनी आपल्या ताटाखालचे मांजर असणारे प्रशासकीय अधिकारी आणि मर्जीतील मंत्री यांना तेथे नेमले त्यामुळे नवीन गाड्या, सुट्या भागांच्या खरेदीत भरपूर पैसे खाऊन हे महामंडळ डबघाईस आणलेले आहे.

या शिवाय कर्मचाऱ्यांची एकंदर स्थिती सुधारण्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष (ज्यात कर्मचारी देत असलेली सेवा हा सुद्धा भाग येतो) हा हि एक भाग आहे.

एवढा असला तरी महारष्ट्रातील एस टी हि इतर बहुसंख्य राज्यातील सरकारी सेवेपेक्षा जास्त सुरक्षित आणि चांगलीच आहे असे मी अवश्य नमूद करेन.

विशेषतः: एकट्या स्त्रीने प्रवास करायचा असेल तर खाजगी सेवेपेक्षा एस टी किती तरी चांगली आहे.

कॉमी's picture

10 Nov 2021 - 8:03 pm | कॉमी

सहमत आहे.

अनन्त अवधुत's picture

10 Nov 2021 - 11:54 pm | अनन्त अवधुत

.

सुक्या's picture

11 Nov 2021 - 2:42 am | सुक्या

सार्वजनीक वाहतुक सेवा ही जगात अगदी कुठेही गेलो तरी फायद्यात नसतेच. परंतु तिचे अस्तीत्व असल्यामुळे आजुबाजुच्या लोकांचे / समुहाचे / विभागाचे राहणीमान सुधारते. त्यामुळे एसटी फायद्यात असावी हा हट्ट सोडलाच पाहिजे. कित्येक अप्रत्यक्ष रोजगात त्या भवती फिरत असतात.

उत्तम प्रशासक नेमुन आहे ती व्यवस्था ठीक चालली तरी फार झाले.

राहीली बाद आताच्या संपाची . . . सगळीकडे पगार / खर्च वाढत असताना केलेल्या कामाचा पगार न मिळणे / वर्षानुवर्षे पगार वाढ न होणे / तुटपुंजे वेतन या गोष्टी
पण बघितल्या पाहिजे ... ईतर सरकारी / महामंडळाचे कर्मचारी जास्त पगार घेत असतील तर ईतरांनी कमी पगारात काम करावे ही अपेक्षा चुकीची आहे ...

सुक्या's picture

11 Nov 2021 - 2:46 am | सुक्या

आयएएस अधिकारी हे सरकार चे भडवे असतात.

भाषेला थोडा आवर घालावा ही लम्र ईनंती . ..

बेस्ट ही city Bus सेवा देशात सर्वोत्तम असावी असा माझा अंदाज आहे.खूप वर्ष मुंबई मध्ये आहे त्या मुळे बेस्ट शी संबंध रोज च येतो.
बेस्ट चा दर्जा पण घसरत चालला आहे त्या साठी सुद्धा राजकीय हस्तक्षेप हे मोठे कारण आहे.
आता काही महिने सुखद धक्का बेस्ट नी दिला आहे.
मी बेस्ट chya ४०२ मार्गावर प्रवास करतो.अगदी double Dec bus होत्या तेव्हा पासून,आणि waiting time पण त्या वेळी झीरो होता तेव्हा पासून.
मध्ये काही वर्ष waiting time खूप वाढला होता.
आता ac Bus त्या मार्गावर चालू आहेत.तिकीट दर फक्त ६ रुपये.बस साठी बिलकुल वाट बघावी लागत नाही.
खूप मस्त अनुभव आहे.रिक्षा चे प्रवासी परत बस कडे वळले आहेत.
आता चांगल्या गोष्टीची वाट अधिकारी कशी लावतात त्या विषयी.
४०२ आणि ४०१ ह्या दोन बस एकाच ठिकाणी जातात फक्त मार्ग थोडा वेगळा आहे.
ह्या दोन्ही बस प्राथमिक स्टॉप वर एकच ठिकाणी थांबून प्रवासी घेत होत्या.
मस्त चाललं होते .
कोणत्या तरी अधिकाऱ्याचे फास्ट डोकं चाललं .आणि त्यांनी ह्या दोन्ही बस चा प्राथमिक बस थांबा वेगवेगळा केला.
Destination एकच असणाऱ्या दोन्ही बस चा थांबा वेगवेगळा करणारा अधिकारी किती उच्च बुध्दी मत्तेचा असेल ?
ह्या अशा लोकांमुळेच सार्वजनिक बस सेवा संकटात येतात.

“जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस”, काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त विधान, भाजपानं सोडलं टीकास्त्र!

https://www.loksatta.com/desh-videsh/congress-leader-rashid-alvi-stateme...

हिंदत्ववादी शिवसेना, आता काय भुमिका घेणार?, हे बघणे रोचक ठरेल....

मला तरी भाजप शिवाय पर्याय नाही....

वामन देशमुख's picture

12 Nov 2021 - 8:00 pm | वामन देशमुख

प्रभू श्रीरामांबद्धल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी हेही आहेत.

बाकी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे, पण सुमारे आठ वर्षांपासून श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना प्रभू श्रीरामांबद्धल कुणाची असे वक्तव्य करण्याची हिम्मत होते यातच हिंदू लोक, त्यांच्या संघटना, त्यांचे नेते वगैरेंच्या डांगितला दम दिसून येतो.

आपल्या आदराचे स्थान असलेल्यांच्या "शान में गुस्ताखी" करणाऱ्याला कोणती शिक्षा द्यायला हवी हे मागच्या हजार वर्षांत (शांतीप्रिय लोकांनी हजारो वेळा उदाहरणे देऊनही) हिंदू शिकलेले नाहीत म्हणून अनेकांची असे बोलण्याची हिम्मत होते.

हिंदूंच्या दुरवस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

वामन देशमुख's picture

12 Nov 2021 - 8:02 pm | वामन देशमुख

*हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

सहमत आहे ...

कॉमी's picture

12 Nov 2021 - 10:20 pm | कॉमी

Not all those who chant Jai Shri Ram are saints या वाक्याचा अनुवाद "जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस" कसा होईल ?

पण पूर्ण कॉन्टेक्स्ट असा दिसतो-

Laxman's situation was deteriorating.. and it was believed that sanjeevani booti was effective only before the sunrise. Otherwise, it was difficult to save the life. Hanumanji was entrusted with the responsibility of bringing sanjeevani booti from the Himalayas. Ravan sent a demon in the form of a saint to waste Hanumanji's time so that he could not not bring sanjeevani before sunrise...

"The rakshas was chanting Jai Shri Ram.. Nowadays, many people chant this. Hanumanji descended because he was a devotee. The demon wanted to waste his time and asked Hanumanji to take a dip in Manasarovar as without taking a bath, no one should chant Jai Shri Ram. Today however people chant Jai Shri Ram without taking bath. A crocodile who was an apsara and turned into a crocodile by some curse then caught Hanumanji's feet. Taking the form of the apsara, she told Hanuman that the 'saint' chanting Jai Shri Ram is actually a rakshas," the Congress leader said.

सदर वाक्य गलथानपणे फ्रेम केलेले दिसते, धार्मिक उपमा देण्याची हौस सुद्धा समजण्यासारखी नाही.
पण घटना लोकसत्तेत बातमी ज्या खळबळजनक अर्थाने दिलीये तशी खचित वाटली नाही.मालविया कडून तर दुसरी अपेक्षा पण नाही. आयटी सेल प्रमुख आहेत, लिडिंग बाय एक्साम्पल असायलाच हवे.

आग्या१९९०'s picture

12 Nov 2021 - 10:45 pm | आग्या१९९०

गांधीजींच्या तोंडी " हे राम " घुसवल्याचा (?) बदला " राक्षस " टाकून घेत आहेत.

कॉमी's picture

13 Nov 2021 - 9:23 am | कॉमी

तसही मुस्लिम माणसाने जय श्री राम, राक्षस, आणि मुनी तिनी एका वाक्यात वापरलं कि अर्थ,संदर्भ वैगेरे बाजूला टाकून कांगावा करता येतो.

सुबोध खरे's picture

13 Nov 2021 - 10:45 am | सुबोध खरे

The rakshas was chanting Jai Shri Ram.. Nowadays, many people chant this.

तो दहशतवादी अल्ला हू अकबर म्हणत होता. आजकाल बरेच मुसलमान सुद्धा तसं म्हणत असतात.

हे वाक्य तसंच आहे का हो?

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, काही शहरांमध्ये तणाव; अमरावतीतील रॅलीला हिंसक वळण

https://www.tv9marathi.com/maharashtra/muslim-protestants-in-maharashtra...

काय बोलावं ते सुचेना ....

https://www.loksatta.com/desh-videsh/hindutva-and-hinduism-are-two-diffe...

मग अफगणिस्तान येथील शीख, तालिबानचे राज्य, "अफगणिस्तानात" आल्या बरोबर, भारतातच का आले?

मुक्त विहारि's picture

12 Nov 2021 - 9:06 pm | मुक्त विहारि

NCP चा Congress ला आणखी एक धक्का, Parbhani तील Sonpeth नगरपालिका ताब्यात....

https://marathi.abplive.com/videos/news/politics-maharashtra-ncp-capture...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, पाऊल पडते पुढे...

...त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद, रॅलीनंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद...

https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/muslim-activists-students-p...

कठीण आहे ...

अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची आणि दुचाकीची तोडफोड

https://www.tv9marathi.com/videos/video-of-amaravati-muslim-protesters-m...

काय बोलावं ते सुचेना ...

सुबोध खरे's picture

13 Nov 2021 - 10:52 am | सुबोध खरे

काश्मीर मध्यें पंडितांवर अनन्वित अत्याचार झाले म्हणून भारतभर कुठे हिंसक मोर्चे निघाल्याचे आठवत नाहीत.

किंवा अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात हिंदू शिखांवर अन्याय अत्याचार झाले त्यानंतर हिंदूंनी मुसलमान वस्तीवर दगडफेक केल्याचे आठवत नाही.

पण रोहिंग्यांच्या समर्थनासाठी निघालेला मुसलमानांचा मोर्चा "महाराष्ट राज्य व्हावे यासाठी हुतात्मा झालेल्यांच्या स्मारकाचा विध्वंस करतो" (ज्याचा त्या कारणाशी काहीही संबंध नाही) आणि महिला पोलिसांवर अत्याचार करतो.

हा दोन मनोवृत्तीत फरक आहे

पण लक्षात कोण घेतो?

मुक्त विहारि's picture

13 Nov 2021 - 11:42 am | मुक्त विहारि

झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाही

https://www.loksatta.com/mumbai/s-t-worker-seventh-pay-commission-mns-pr...

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह राज ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मंत्री किंवा मुख्यमंत्री, यांची भेट न घेता, माननीय शरद पवार, यांचीच भेट घेतली... असं का झालं असावं?

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Nov 2021 - 11:52 am | चंद्रसूर्यकुमार

मंत्री किंवा मुख्यमंत्री, यांची भेट न घेता, माननीय शरद पवार, यांचीच भेट घेतली... असं का झालं असावं?

ज्या कारणासाठी एनरॉनच्या प्रमुख रेबेका मार्क तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना न भेटता मातोश्रीवर भेट घ्यायला गेल्या होत्या त्याच कारणासाठी.

मुक्त विहारि's picture

13 Nov 2021 - 6:16 pm | मुक्त विहारि

फिरते रिमोट अनुभवले आहेत ..

मुक्त विहारि's picture

13 Nov 2021 - 6:32 pm | मुक्त विहारि

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/shiv-sena-leader-sanja...

ह्या माहिती बद्दल धन्यवाद... मी तर, रझाकार आणि रझा अकादमी, एकच समजत होतो...

नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार...

https://www.esakal.com/desh/cm-yogi-adityanath-will-change-the-name-of-a...

औरंगाबादचे, संभाजीनगर कधी होणार?

तिघाडीचे सरकार गेल्यावर होऊ शकेल ..