ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग १

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
31 Oct 2021 - 9:06 pm

तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेल याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.

या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.

१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.

कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्‍यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.

तेव्हा येणार्‍या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.

२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

31 Oct 2021 - 10:17 pm | उपयोजक

https://youtu.be/pOphIpddRAk

अनेक अमेरिकन्स नोकर्‍या सोडत आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Nov 2021 - 12:03 am | माईसाहेब कुरसूंदीकर

१९९५-१९९९ चा काळ परत येतोय की काय?
कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग वगैरे मध्ये खूप पैसा ओतला जातोय पण कुशल तंत्रज्ञ मिळत नाहीत अशीही तक्रार आहे.
भारतात किंवा अमेरिकेत आय.टीची पुन्हा जोरात चलती आहे असे दिसतेय.

माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत.
गोव्यात मंगेशी देवळात पुजार्‍याने दिलेले तिर्थ ममता दीदींनी प्राश्न न करता ते टाकुन / शिंपडुन देत त्याचा अवमान केला !

हिंदू असुन देखील इतका मूर्खपणा कोण कसं करु शकतो ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भारतीय नौसेना को मिला पहला P15B गाइडेड-मिसाइल विध्वंसक, दुश्मन के होश उड़ाने की ताकत

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Nov 2021 - 12:59 am | रावसाहेब चिंगभूतकर

बै त्या तीर्थाचं काय करायचं या बाबतीत कन्फ्युज झालेली दिसली.मुळात हिला मंगेशीच्या देवळात प्रवेश का दिला? या साठी मला वाटतं की भारताच्या शंकराचार्यांनी आता "फतवे" जाहीर करून राजकारणात ढवळाढवळ सुरू करावी. शंकराचार्य सांगतील तो हिंदू धर्माचा कायदा इतकं हे सोपं असावं.

चौकस२१२'s picture

1 Nov 2021 - 6:42 am | चौकस२१२

गोव्यात एकेकाळी सत्तेत असलेल्या "महाराष्ट्रवादी गोमंतक" पक्षाचे काय झाले? कोणी सांगू शकेल काय ?

माझा अंदाज असा
१) जसे गोवे राज्य म्हणून पररिपकव होऊ लागले / वयात येऊ लागले तसे कदाचित यातील "महाराष्ट्रवादी" हा शब्द जनतेला आणि पक्षाला सुद्धा खटकू लागला !
२) समर्थकांनी काँग्रेस नको म्हणून भाजपाला साथ द्यायला त्यात पर्रीकरांसारखा नेता भाजपकडे होता !

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Nov 2021 - 4:25 pm | चंद्रसूर्यकुमार

गोव्यात एकेकाळी सत्तेत असलेल्या "महाराष्ट्रवादी गोमंतक" पक्षाचे काय झाले? कोणी सांगू शकेल काय ?

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष अजूनही गोव्यात आहे. २०१२ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी तीन जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये ११% पेक्षा जास्त मते पक्षाला होती.

१) जसे गोवे राज्य म्हणून पररिपकव होऊ लागले / वयात येऊ लागले तसे कदाचित यातील "महाराष्ट्रवादी" हा शब्द जनतेला आणि पक्षाला सुद्धा खटकू लागला !
२) समर्थकांनी काँग्रेस नको म्हणून भाजपाला साथ द्यायला त्यात पर्रीकरांसारखा नेता भाजपकडे होता !

माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी याविषयी लिहिलेले इथे कॉपी-पेस्ट करतो.

एका अर्थी गोव्यात भाजपला हातपाय पसरायला मदत केली महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षानेच.

गोव्यात १९७० च्या दशकाच्या शेवटापर्यंत महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष सत्तेत होता.पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांची पक्षावर आणि सरकारवर चांगलीच पकड होती.पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या शशीकला काकोडकर मुख्यमंत्री झाल्या.त्यांची पक्ष आणि सरकार या दोन्हींवरची पकड ढिली झाली.त्यातून सर्वप्रथम प्रतापसिंह राणे पक्षातून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये जाऊन १९८० मध्ये मुख्यमंत्रीही झाले.नंतरच्या काळात म.गो.पक्षातून काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रीपदे मिळविणे हा नित्यक्रम झाल्यासारखेच झाले.१९९१ मध्ये रवी नाईक पक्षातून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले.त्याचवेळी संजय बांदेकर आणि रत्नाकर चोपडेकर यांनी पक्षातून बाहेर पडून मंत्रीपदे मिळवली.अनेकदा म.गो.पक्ष म्हणजे काँग्रेसचा बफर पक्ष अशी परिस्थिती झाली म्हणजे काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी आमदार कमी पडले की म.गो.पक्षाचे आमदार फोडून ती कमी भरून काढली जात असे.तरीही काँग्रेसला दुसरा पर्याय नाही म्हणून राज्यातील काँग्रेसविरोधी मते म.गो.पक्षालाच मिळत असत.

१९९४ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे पक्षासाठी कलाटणी देणार्‍या ठरल्या.एक तर म.गो.पक्ष-भाजप आणि शिवसेना अशी युती विरूध्द काँग्रेस विरूध्द चर्चिल आलेमावचा युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पक्ष अशी लढत होती.त्यात म.गो.पक्षाला १२ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाला १८ जागा मिळाल्या (४० पैकी). सरकार स्थापनेची वेळ येताच म.गो.पक्षाच्या १२ पैकी ४ आमदारांनी पक्षांतर करून काँग्रेसला पाठिंबा दिला.म्हणजे लोकांसमोर असे चित्र उभे राहिले की म.गो.पक्षाला मत देणे म्हणजे मागच्या दाराने काँग्रेसलाच मत देणे!!त्यातून या युतीमुळे राज्यात भाजपचा शिरकाव झालाच आणि मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक हे पक्षाचे चांगले नेते लोकांपुढे आले.त्यामुळे नंतरच्या काळात म.गो.पक्षाची पडझड झाली आणि काँग्रेसविरोधी मते भाजपला जायला लागली. एके काळी रमाकांत खलप, डॉ.काशीनाथ जल्मी, सुरेंद्र शिरसाट, प्रकाश वेळीप असे चांगले नेते देणार्‍या पक्षाची अवस्था अगदीच दयनीय झाली.आज पक्षाचे नेते सुदिन आणि दीपक ढवळीकर गोवा विधानसभेवर आरामात निवडून येतात पण ते स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर.त्यांनाही म.गो.पक्षाच्या नावाचा फारसा फायदा होत असेल असे वाटत नाही.२०१२ मध्ये परत भाजपशी युती करून पक्षाने आणखी एक जागा मिळवली. अन्यथा ती पण मिळालीच असती याची खात्री नाही.

काँग्रेसचे आतापर्यंत गोव्यात जे मुख्यमंत्री झाले त्यापैकी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंग राणे आणि रवी नाईक मुळचे म.गो.पक्षातलेच. म.गो.पक्षाला मत देणे म्हणजे काँग्रेसला मागच्या दाराने मत देणे असे लोकांचे मत स्वतःच्या आमदारांच्या कर्तृत्वातून या पक्षाने सिध्द केले आणि त्यातून पक्षाची प्रचंड पडझड झाली. त्यामुळे काँग्रेसविरोधी पक्षांची जागा पूर्वी म.गो.पक्षाने व्यापली होती ती त्या पक्षाने आपण होऊन मोकळी केली आणि त्या जागेत भाजपचा आपसूक शिरकाव झाला.

http://www.misalpav.com/comment/914739#comment-914739

सततच्या पक्षांतरांमुळे हा पक्ष खंगला. त्यानंतर पक्षाचे काँग्रेसविरोधी मतदार भाजपकडे गेले. प्रतापसिंग राणे १९८० च्या निवडणुकांपूर्वीच पक्षाबाहेर पडले हे लिहिले आहे. तरीही रमाकांत खलप पक्षात होते तोपर्यंत पक्षाला काहीतरी आशा होती. पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाल्यावर ते पण काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ढवळीकर बंधूंच्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या जोरावर तीनेक जागा मिळतात. अजून ३-४ जागांवर २०%+ मते पक्षाला मिळतात. पण निवडणुक जिंकायला ती पुरेशी नसतात. पक्षाने शेवटची निवडणुक जिंकली होती १९७७ मध्ये. त्यानंतर एकही निवडणुक न जिंकताही ४४ वर्षे पक्षाचे अस्तित्व टिकले आहे आणि अजूनही ११% मते म्हणजे बर्‍यापैकी मते मिळतात ही पण त्यामानाने मोठी गोष्ट आहे.

जे आपल्याला समजते ते त्यांना नक्कीच समजते. त्यामुळे वाद निर्माण करण्याचा एक प्रयत्न असे अशा गोष्टींकडे पाहिले पाहिजे. नेत्यांना सकारात्मक/नकारात्मक अशी कोणतीही प्रसिद्धी चालते. सतत नाव चर्चेत येत राहणे महत्त्वाचे.

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Nov 2021 - 11:04 pm | चंद्रसूर्यकुमार

हिंदू असुन देखील इतका मूर्खपणा कोण कसं करु शकतो ?

याचे कारण असे करूनही हिंदू आपल्याला मते देतील हा फाजील आत्मविश्वास असावा. किंवा २०१३ मध्ये मोदींनी जाळीची टोपी नाकारली त्याप्रमाणे असे काहीतरी करून अहिंदू कॉन्सॉलिडेशन आपल्यामागे करावे असा बेत आहे का?

बै आता चर्चात जाऊन काय "दिवे" लावति ते बगूया !

कपिलमुनी's picture

1 Nov 2021 - 2:05 pm | कपिलमुनी

पेट्रोल - डिझेल चे दर उच्चांकी !

व्यावसायिक वापराच्या गॅस मध्ये २६५ रुपयांची दरवाढ !

ll

जेम्स वांड's picture

1 Nov 2021 - 8:55 pm | जेम्स वांड

कपाळावर लावून ताटीवर आडवं पडण्याच्या कामाचा का असला तरी त्याला किंमत आहेच को हो,

₹ २६६/ सिलेंडर झालं व्यावसायिक, आता परत वडापाव महाग होणार, बाराचा चौदा, चौदाचा १८-२०₹ झालाय वडापाव, बाकी काय बोलायला नकोच, गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये डिझेल महागडे , त्यामुळे इकडे त्याचा असर दिसणारच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2021 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महागाईचा आणि त्यावरुन होरपळणा-या जनतेच्या प्रश्नांचा आणि त्यांचा काही संबंध उरला नाही. तो केवळ सत्तेत येण्यापूरताचा विषय होता, आता हेही जनतेला कळलं आहे. बाकी, जनतेला जात-धर्मावर भिडवत ठेवणे. यातच त्यांचं सौख्य सामावले आहे. हेच असं करतात असे नव्हे, पण यांनी त्याची हाइट केलेली आहे. शेठ जगात नंबरवन कसे आहेत, कोणत्या तरी पेप्रात छापून आलेलं असतं, त्यावर काही मंद जनता खुश असते. भक्त नावाचे अनुयायी डिझेल-पेट्रोलच्या झळ बसल्यामुळे पायी फिरत आहेत आणि गॅस दरवाढीमुळे चुलीकडे वळले हा त्यांच्या दृष्टीने भारताचा विकास झालेला असतो. गमतीशीर आहे सगळं. =))

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Nov 2021 - 5:24 pm | चंद्रसूर्यकुमार

ममता बॅनर्जी गोवा विधानसभा निवडणुकांसाठी विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करणार असे दिसते. परवाच ममतांच्या गोवा दौर्‍याच्या वेळेस त्याविषयी चर्चा झाली. या निमित्ताने गोवा फॉरवर्ड पक्षाविषयी आणि २०१७ नंतर घडलेल्या घटनांविषयी लिहितो.

विजय सरदेसाई हे एकेकाळचे युवा काँग्रेसचे नेते होते. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा फातोर्ड्यातून भाजप उमेदवाराने पराभव केला. २०१२ मध्येही त्यांना
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि ते जिंकले. २०१२ नंतर विधानसभेत ते भाजप विरोधातील एक महत्वाचा चेहरा झाले. २०१४ मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री झाले. त्यांच्याविरोधात विजय सरदेसाई अगदी आक्रमक झाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी गोवा फॉरवर्ड या आपल्या पक्षाची स्थापना केली आणि ४ जागा लढवल्या. त्यापैकी ३ जागा (विजय सरदेसाईंच्या स्वतःच्या फातोर्ड्याच्या जागेबरोबरच आणखी दोन) त्या पक्षाने जिंकल्या. २०१७ मध्ये गोव्यात त्रिशंकू विधानसभा स्थापन झाली. ४० पैकी काँग्रेसला १७, भाजपला १३, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांना ३, अपक्षांना ३ तर राष्ट्रवादीला १ (चर्चिल आलेमावांची बाणावली) अशा जागा मिळाल्या. खरं तर काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी होती. काँग्रेसकडे बहुमत नव्हते पण १७ चा आकडा २१ वर कसा नेता येईल याविषयी पक्षाने दोन दिवस कोणताच प्रयत्न केला नाही. दरम्यान भाजपने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षांशी बोलणी सुरू केली. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मांद्रे मतदारसंघातून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव झाला होता. तेव्हा ते परत मुख्यमंत्री व्हायची शक्यता कमी होती. तसेच पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यास आपण भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत असे विजय सरदेसाई आणि मगोप या दोघांनीही म्हटले. त्यामुळे मग पर्रीकर दिल्लीहून गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत आले. त्यांच्या सरकारमध्ये विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री झाले तर अन्य दोन आमदार मंत्री झाले. मगोपच्याही सुदिन ढवळीकर आणि मनोहर आजगावकर यांना मंत्रीपद मिळाले.

मार्च २०१९ मध्ये पर्रीकरांचे निधन झाल्यानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. पर्रीकरांनंतर प्रमोद सावंत म्हणजे थोडेसे small man in big man's shoes अशाप्रकारचे होते. पर्रीकरांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पणजी विधानसभा मतदारसंघासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांबरोबर पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्यात भाजप उमेदवार सहज विजयी होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण तिथून काँग्रेस उमेदवार म्हणून वादग्रस्त चारित्र्याचा बाबूश मोन्सेराट विजयी झाला. या मनुष्यावर बलात्काराचाही आरोप होता. पणजी हा भाजपचा बालेकिल्ला होता. १९९४ नंतर प्रथमच तिथून भाजप उमेदवार हरल्यामुळे तशी खळबळ उडाली. त्यानंतर दोन महिन्यातच म्हणजे जुलै २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले. या आमदारांमध्ये हा बाबूश मोन्सेराटही होता. काँग्रेसचे चंद्रकांत कवळेकर
विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते त्यांना प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्याचप्रमाणे मगोपच्या ३ पैकी २ आमदारांनाही भाजपने फोडले. मुळचे मगोपचे मनोहर आजगावकर हे पण दुसरे उपमुख्यमंत्री झाले. अशाप्रकारे स्वतःचे बहुमत मिळाल्यानंतर भाजपला विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाची गरज भाजपला राहिली नाही. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरून आणि मंत्रीमंडळातूनही काढले गेले.

त्यानंतर गोव्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नाही अशी स्थिती आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला जवळपास दोन तृतियांश जागा मिळाल्या (५० पैकी ३२). काँग्रेसला ४ तर मगोपला ३ तर राष्ट्रवादी आणि आपला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. या पोकळीत आपला शिरकाव करता आला असता. पण नेमकी तृणमूलने या पोकळीत अनपेक्षितपणे आपली दावेदारी सांगितली आहे. लुईझिनो फालेरोंसारखा एक नावाजलेला नेताही तृणमूलला मिळाला आहे.

मला वाटते की विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्डने तृणमूलशी युती केल्यास ती त्या पक्षाची चूक ठरेल. एक तर आपल्याला भाजपविरोधी पक्ष असे लोकांपुढे प्रोजेक्ट करून पक्षाने भाजपविरोधी मते घेतली होती. मग परत भाजपला पाठिंबा देणे, आणि भाजपला गरज न राहिल्यावर भाजपने त्यांना काढून टाकणे यातून त्यांची विश्वासार्हता नक्कीच वादात आली आहे. १९९४ मध्ये भाजपबरोबर युती करून मगोपने जी चूक केली तीच चूक गोवा फॉरवर्ड पक्ष करणार का? म्हणजे भाजपविरोधी मतांना तृणमूल हा अधिक बळकट पर्याय म्हणून लोकांपुढे आल्यास त्यातून त्या पक्षाचेच नुकसान होईल.

Rajesh188's picture

1 Nov 2021 - 10:18 pm | Rajesh188

Bjp च जिंकेल.पण bjp पक्षाला नाही bjp chya निती का ममता पहिल्याच वेळी गोवा राज्यात विरोध करत आहे.
का?आज पर्यंत ममता नी गोवा राज्यात जा रस घेतला नव्हता?..आता च का?

आप गोव्याची विधानसभा निवडणुक जिंकल्यास इच्छुकांना सरकारी खर्चाने अयोध्या, अजमेर शरीफ, शिर्डी वगैरे ठिकाणी तीर्थयात्रेला पाठवायची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. https://www.indiatoday.in/india/story/free-pilgrimage-ayodhya-religious-...

कोण आहे रे तिकडे? कोणीतरी म्हणत होते की आप शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेला प्राधान्य देते. मागच्या वर्षी अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन झाल्यावर आपल्या समाजाला मंदिरांपेक्षा हॉस्पिटल्सची जास्त गरज आहे वगैरे गोष्टी आप समर्थक विचारवंत बोलत होते. आता हॉस्पिटल्स आणि शाळांपेक्षा तीर्थयात्रा गरजेच्या झाल्या तर.

असो.

पेट्रोल ,डिझेल,गॅस जितका महाग तेव्हढी देशाची अर्थ व्यवस्था प्रगत.
वरील तिन्ही इंधन जेवढी महाग तेव्हढी जनतेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास योग्य वातावरण.
असे नव तज्ञ सांगत होते आणि काही लोकांना पटत पण .
पण सरकार ल जनतेचे सुख बघवले नाही.
टॅक्स कमी करून पेट्रोल ,डिझेल चे भाव थोडे कमी केले.
धिक्कार आहे अशा सरकार च जे जनतेला श्रीमंत होवू देत नाही.

आग्या१९९०'s picture

4 Nov 2021 - 9:38 pm | आग्या१९९०

केंद्र सरकारच्या कणखरपणाचा फुगा फुटला.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Nov 2021 - 2:02 pm | अमरेंद्र बाहुबली

*Raut Vs BJP : 'भाजपचा पराभव केला तरच पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल'*

https://pudhari.news/national/62823/sanjay-raut-criticized-modi-governme...

समुद्रात बुडायला निघालेले Enron पण बाहेर आले

फारच जादूगार मंडळी आहेत

...... ठाकरे सरकारला बोचरा सवाल!

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/vikhe-patil-cri...

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर....

Rajesh188's picture

4 Nov 2021 - 10:05 pm | Rajesh188

नावाची माणसे खरी काँग्रेस चीच bjp मध्ये ते पाहुणे आहेत.
दोन दिवस यजमान चे कौतुक करावे लागते.

Bjp च हिमाचल,आणि बंगला मध्ये भीषण पराभव झाला .
2024 चा हा ट्रेलर होता.
महाराष्ट्र मध्ये पण पोटनिवडणुकीत हरले.बंगाल मध्ये तर deposite जप्त झाले.

महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष...

https://marathi.abplive.com/news/maharashtra/petrol-diesel-rate-nine-sta...

केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आता तुलनेने स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.

Rajesh188's picture

4 Nov 2021 - 10:19 pm | Rajesh188

केंद्र सरकार नी कर कमी केला की पेट्रोल च्या किमती कमी होणार आणि आपोआप राज्य सरकार चा vat पण कमी होणार.त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही.

मग केंद्राने किंमत वाढवली तर राज्यांना vat चे जास्त पैसे मिळणार ना? मग जास्त किंमतीवर प्रॉब्लेम काम आहे? तसेही महाराष्ट्र राज्य काहीही करत नाही ... हे बाकी खरे . . .

आमचे सध्या एकच ब्रीद आहे, आले अंगावर तर ढकल केंद्रावर ...

शिवाय डब्बल ढोलकी आहेच, महागाई वाढली तरी केंद्र जबाबदार आणि महागाई आटोक्यात आणायचा केंद्राने प्रयत्न केला तर, त्याचे श्रेय आपल्याकडे घ्यायचे....

ह्या सरकारच्या बोलण्यावर माझा तरी विश्र्वास नाही, इतपत विश्र्वासार्हता ह्या सरकारने नक्कीच कमावली आहे ...

सुक्या's picture

5 Nov 2021 - 12:34 am | सुक्या

तसंही VAT काय आहे, त्याचे दर राज्यागणीक कसे बदलतात हे त्यांना शष्प माहीत नाही ... त्यांचे समुपदेशन करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही ...

फक्त आपले बिळासाहेब काय करतात ते बघायचे आहे. वर वर त्यांना खुप पुळका आहे सामान्य लोकांचा .. आता बघु पैसा सोडवतो का ते ?
बाकी कटोरा तयारच असेल .. भीक मागायचा ... किंवा बारामतीकर निर्णय घेतील ... तसेही सारे निर्णय बारामतीत घेतले जातात ...

मातोश्रीच्या ऐवजी बारामती, इतपत प्रगती झाली आहे

पुर्वी रिमोट मातोश्री कडे होता

अजून काही वर्षे गेली की ह्यांचा रिमोट दिल्लीकडे हस्तांतर होणार

.... तरी साधी चौकशीही नाही....

https://www.newsdanka.com/politics/man-commited-suicide-names-mva-minist...

आता हे पण केंद्रावर ढकलायची शक्यता नाकारता येत नाही...

सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक....

https://www.newsdanka.com/politics/akshay-jogs-new-book-about-mercy-peti...

कुणी कितीही सिद्ध करायचा प्रयत्न केला तरी, परमपूज्य राहुल गांधी, यांना नेते मानणारे, ही गोष्ट स्वीकारायला तयार होणार नाहीत, असेच वाटते...

...अन्यथा राज्यात असंतोषाचा उद्रेक होईल : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा....

https://www.sarkarnama.in/maharashtra/raj-thackerays-letter-to-chief-min...

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत....

मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं! डिझेल 19 तर पेट्रोल 13 रुपयांनी स्वस्त

https://www.sarkarnama.in/desh/karnataka-cm-basavraj-bommai-slashes-vat-...

महाराष्ट्र राज्य सरकार, आता काय करते? हे बघणे रोचक ठरेल ....

Rajesh188's picture

5 Nov 2021 - 12:07 pm | Rajesh188

सडकून मार मिळाल्या मुळे केंद्राने पेट्रोल डिझेल वर चा कर कमी केला आहे.
पण हे bjp सरकार चे मगरीचे आश्रु आहेत हे लोकांस माहीत आहे.
खरे स्वभाव गरीबांना लुटणे हाच आहे.
जनता सब जाणती है.
2024 मध्ये हे परत आले तर महागाई च आगडोंब उसळलेा हे माहीत आहे.
उत्तम ,जनतेच्या सुखासाठी सरकार बदलणे गरजेचे आहे.

दर 25 रुपयांनी कमी करायला होते, इंधन दर कपातीवर संजय राऊतांचा निशाणा....

https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sanjay-raut-on-fuel-...

राज्य सरकारने टॅक्स कमी न करता, नेहमी प्रमाणे, केंद्रावर ढकलले.... अशिक्षित माणसांना जे समजते, ते सुशिक्षित आणि घराणेशाहीची पुजा करणार्या मतदारांना, समजेलच असे नाही...

राज्य सरकार इंधनावरील कर कमी करणार का? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

https://www.sarkarnama.in/mumbai/ncp-chief-sharad-pawar-says-people-can-...

रिमोट गेला बारामतीकडे .... माननीय शरद पवार यांना स्वतः स्पष्टीकरण द्यावे लागत आहे ..

https://www.sarkarnama.in/desh/17-bip-ruled-state-decrees-vat-on-petrol-...

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.... महाराष्ट्र राज्यात, जितक्या लवकर इंधन दर कमी होतील, तितके उत्तम...

पेट्रोल ,डिझेल जितके महाग तितकी त्या देशातील जनता श्रीमंत,आणि सरकार आर्थिक बाबतीत मजबुत.
असे भक्त सर्व समाज माध्यम,टीव्ही,paper मध्ये सांगत होते
इथे पण सांगत होते.
महाराष्ट्र नी कर कमी करण्याचे काही कारण नाही तो पहिलाच कमी आहे लूट केंद्र सरकार नी केली आहे.
राज्याची सर्व देनी जोपर्यंत केंद्र सरकार देत नाही तो पर्यंत केंद्र सरकार ला सहकार्य करण्याची काही गरज नाही.

आग्या१९९०'s picture

5 Nov 2021 - 1:57 pm | आग्या१९९०

एक्साइज कमी केला की राज्याचा VAT महसूलही कमी कमी होतो. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर पाच रूपयांपेक्षा कमी त्यामुळेच झाले आहेत. केंद्राने २०१४ च्या पातळीवर एक्साईज आणून ठेवली तर आताच्या VAT दराने राज्याला प्रत्येक लिटरमागे काही पैशात महसूल मिळेल.

वानखेडे कडून तपास काढून घेतला .अशी मीडिया न्यूज आहेत.
असे पण सरकारी अधिकाऱ्यांना हिरो बनायची खूप हौस असते.कर्तव्य नको असते. ज्यांची जास्त कडक अधिकारी आहेत अशी प्रतिमा मीडिया बनवते तेच अधिकारी सर्वात जास्त भ्रष्ट असतात.
वानखेडे पण त्याच catagory मधील असण्याची पूर्ण शक्यता आहे.

मोदी सरकार ड्रग्जसंदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत; रामदास आठवलेंचा खुलासा

https://www.loksatta.com/desh-videsh/ramdas-athawale-says-government-is-...

“मला वाटतं समीर वानखेडे हे दलित आहेत. त्यांनी ड्रग्जमुक्त मुंबईची मोहीम हाती घेतलीय. त्याचसंदर्भात त्यांनी कारवाई केलीय. यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत फायदा नाहीय. जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातून समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारत सरकार सांगतंय असा काही विषय नाहीय. समीर वानखेडेला थोडी आम्ही सांगतिलं होतं. पुराव्यांच्या आधारे क्रुझवर छापा टाकून १९ जणांना अटक केली. २२ दिवस जामीन मिळाला नाही म्हणजे एनसीबीकडे मोठे पुरावे होते, असा याचा अर्थ आहे,” असं आठवले म्हणाले....

“मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल”, जितेंद्र आव्हाडांकडून २ मोठ्या घोषणा

https://www.loksatta.com/mumbai/jitendra-awhad-announce-important-decisi...

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपली झोपडपट्टीची मर्यादा २००० पर्यंत आहे. ही मर्यादा मोफत घर देण्याची आहे. त्यापुढे २००० ते २०११ या काळातील पात्र ठरलेल्या झोपडपट्टी धारकांना आम्ही दुसरी एक दिवाळीची गोड भेट देत आहोत. त्यांना दिल्या जाणाऱ्या घराची किंमत केवळ अडीच लाख रुपये असेल. त्या घराचं क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असेल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय करण्यात आलाय. यामुळे मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल.”

https://www.newsdanka.com/politics/aryan-khans-case-handed-over-to-ncb-d...

मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे.....दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सांगितलं जात आहे....

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?

https://www.tv9marathi.com/maharashtra/bullock-cart-race-in-pune-vadgaon...

मुख्यमंत्री आता काय कारवाई करणार, हे बघणे रोचक ठरेल ...

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?

https://www.tv9marathi.com/maharashtra/bullock-cart-race-in-pune-vadgaon...

मुख्यमंत्री आता काय कारवाई करणार, हे बघणे रोचक ठरेल ...

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?

https://www.tv9marathi.com/maharashtra/bullock-cart-race-in-pune-vadgaon...

मुख्यमंत्री आता काय कारवाई करणार, हे बघणे रोचक ठरेल ...

मुक्त विहारी जी वेलकम बॅक...

या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील! मोहीत भारतीय यांचा खळबळजनक दावा!

https://www.loksatta.com/mumbai/bjp-mohit-bhartiy-kamboj-claims-sunil-pa...

वन शाॅट, नावाची कादंबरी आठवली...

https://en.m.wikipedia.org/wiki/One_Shot_(novel)