मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.
आता पुलिसला सांगतोय मला मरु दया.माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.
अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.
असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.
पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.
अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?
पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.
प्रतिक्रिया
3 Dec 2008 - 9:42 pm | धम्मकलाडू
किती अत्याचार! मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ले थोपवून आता बरेच दिवस उलटले. पण मिपावरील हे अत्याचारसत्र कधी थांबणार:
अब पछतावेसे क्या फायदा ( पूर्वार्ध)पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......Terrorism and Indian Response - एक शिफारस भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळेपाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ
:) :) :)
हैदोस!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
3 Dec 2008 - 10:12 pm | कपिल काळे
मिपावर ट्राफिक वाढला आहे हे खरे आहे. तशी मीच संपादकांना विनंती देखील केली होती की पेपरातील बातम्यांचे दुवे देवून त्याचा धागे होतायत. त्याचे काय ते बघा अशी. किंवा अश्या बातम्यांवरचे आपले विचार मांडावेत.
मी काही ग्लोरीफिकेशन नाही केले आहे.
उत्तरार्ध वाच रे लाडवा.
नाहितर खरेच असे म्हणायची वेळ येइल.
<<"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?">>
http://kalekapil.blogspot.com/
3 Dec 2008 - 10:43 pm | विकेड बनी
सामान्य मिपाकर - अतिरेकी लेखकांतर्फे ओलीस. - अशी बातमी मीही मिपावर टाकतो. अद्याप इतरत्र कुठे आली नाहीये.
अहो, घाबरत घाबरत सांगतो - संपादकच त्यात अग्रगण्य आहेत. तुम्हालाही घाबरून सांगतो की उत्तरार्ध वाचतो.