अलक (अति लघु कथा)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
1 Oct 2021 - 8:42 am

अलक 1
त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या. अंध शाळेतल्या त्या मुलींनी नुसत्या स्पर्शाच्या अनुभवाने उभा केलेला समुद्र बाईंच्या डोळ्यात पाण्याच्या रूपाने उभा राहिला.

अलक 2
ऑफिसतर्फे सगळे 2 दिवसांच्या कोकण ट्रिप वर आले होते. तो नि ती ही त्यात होतेच. समद्रावर आल्यावर इतर सगळे डुंबायला गेले. ती मात्र किनाऱ्यावर चालत होती. मऊ वाळूचा स्पर्श सुखद होता. मावळतीचा वारा आणि लाटांचा आवाज एकमेकांना साथ देत होता. इतरांपासून जरा लांब एका दगडावर जाऊन बसली ती. समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे एकटक बघण्यात इतकी गुंतली की तो शेजारी येऊन बसला कधी ते जाणवलं देखील नाही. त्याने हलकेच तिचा हात हातात घेऊन तिला भानावर आणलं. आधी ती ओशाळली आणि त्याच्या हातात हात बघून तर चक्क लाजली. त्यालाही ते जाणवलं. इतके दिवस मनात असलेलं आज समुद्राच्या साक्षीने ओठावर आलं आणि नवीन नात्याची सुरवात झाली.

अलक 3
वयाची साठी पार केलेला त्यांचा शाळेचा ग्रुप आज 30 वर्षांनंतर परत त्याच किनाऱ्यावर आला होता. शाळेच्या सुखद आठवणी काढून सगळे गप्पा मारत होते. बहुतेक सर्व गृहस्थाश्रमीच्या जबाबदाऱ्यातून मोकळे झाले होते. ती दोघ पण अर्थात तिथे होती. पण एकमेकांकडे चोरून बघणं, एकमेकांची काळजी करण, मदत करणं इतरांच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच किनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या आणि मित्र मैत्रिणींच्या साक्षीने त्याने परत तिला प्रपोज केलं. यावेळी मात्र तिला अडवायला कोणीही नव्हतं. आई वडिलांच्या इच्छेखातर 30 वर्षपूर्वी दूर केलेला तो आज तिला परत आपला साथीदार म्हणून मिळाला होता. आयुष्यच्या या टप्प्यावर खरंच साथीची गरज होती. आता हा समुद्र उर्वरित आयुष्यभर तिची साथ देणार होता. कारण त्याच नाव सागर होतं आणि त्याच घर समुद्र किनारी होत.
-धनश्रीनिवास

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Oct 2021 - 9:36 am | श्रीरंग_जोशी

तीनही अलक आवडल्या. दुसर्‍या अन तिसर्‍या कथेतला संबंध वाचक म्हणून जाणवला.

गॉडजिला's picture

1 Oct 2021 - 9:47 am | गॉडजिला

सुटसुटीत आणि नेमका भाव व चित्रण उभे करणाऱ्या आहेत. मस्त.

विशेषतः तिसरी कथा क्लिशे वाटत होती तोच आयुष्यच्या या टप्प्यावर खरंच साथीची गरज होती हे वाचले अन् भाव बदलून गेला...

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Oct 2021 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार

तिनही गोष्टी आवडल्या

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2021 - 11:26 am | कर्नलतपस्वी

पहिली कथा न सांगताच खुप काही सांगून गेली. लहानपणी शाळेत जाताना बस मधे दिव्यदृष्टीची दिव्यांग मुले असायची त्यातील काही मीत्र पण झाले. सागरातल्या ओडंक्याप्रमाणे वेगळे पण झाले पण त्यांच्यामुळे जीवना कडे बघायचा दृष्टिकोन सुधारला. दिव्यदृष्टी अशा करता आम्ही बस मधे चढलो की न पहाता त्यानां कळायचे.

सौंदाळा's picture

1 Oct 2021 - 12:29 pm | सौंदाळा

तिन्ही अलक आवडल्या
पण पहिली सगळ्यात जास्त.

श्वेता व्यास's picture

1 Oct 2021 - 12:33 pm | श्वेता व्यास

तिन्ही गोष्टी आवडल्या

लई भारी's picture

1 Oct 2021 - 12:47 pm | लई भारी

तिन्ही कथा आवडल्या!

विवेकपटाईत's picture

1 Oct 2021 - 1:42 pm | विवेकपटाईत

तिन्ही आवडले.

सरिता बांदेकर's picture

1 Oct 2021 - 2:23 pm | सरिता बांदेकर

छान आहेत तिन्ही कथा.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Oct 2021 - 3:32 pm | अमरेंद्र बाहुबली

छान

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा

तीनही कथा अतिशय सुंदर !

💖

वामन देशमुख's picture

1 Oct 2021 - 7:55 pm | वामन देशमुख

आशय आणि शैली, दोन्ही आवडले.

Nitin Palkar's picture

1 Oct 2021 - 8:03 pm | Nitin Palkar

तिन्ही अलक सुंदर. पहिली अधिक आवडली.

बबन ताम्बे's picture

1 Oct 2021 - 10:19 pm | बबन ताम्बे

खूप छान कथा. तीनही कथा खूप आवडल्या.

अभिजीत अवलिया's picture

2 Oct 2021 - 5:28 am | अभिजीत अवलिया

छान लिहीलेय.

पहिली कथा खास आवडली. बाकीच्या दोनसुद्धा खूप छान.

तिन्ही कथा छान आहेत पण पहिली जास्त आवडली

सतिश गावडे's picture

2 Oct 2021 - 10:41 am | सतिश गावडे

समुद्राचा (किनाऱ्यावरील आणि किनाऱ्यापासून थोडासा) सहवास हर्षदायी असतो.

रुपी's picture

3 Oct 2021 - 10:24 am | रुपी

छान आहेत तिन्ही कथा.

मालविका's picture

6 Oct 2021 - 1:24 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

प्रसाद_१९८२'s picture

6 Oct 2021 - 4:54 pm | प्रसाद_१९८२

छान कथा.