कानाखाली जाळ

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
25 Aug 2021 - 11:01 am

काय निवडावं लोकांनी
बॅड कि वर्स ?
कसला लागला आहे हा
महाराष्ट्राला कर्स

कितवा स्वातंत्रदिन आहे
हे विसरणारा मुख्यमंत्री
कि कानाखाली वाजवण्याची
भाषा करणारा मंत्री

तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं,
मिडीयाला चघळायला नवं हाडूक
कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा
सर्वच मूळविषय झाले गूडूप

किती उर्जेचा होतो विध्वंस
मनातल्या हिंसा-द्वेषाने
कीव येते चूकीचे समर्थन
करुन लढणा-यांचे त्वेषाने

दोन पक्षांच्या बेरोजगार गुंडांना
रोजगार मिळाला करण्याचा राडा
जनतेच्या मालमत्तेच्या पहा
काचांचा रस्त्यांवर सडा.

अजाणत्या राजाला म्हणे
हे काही विशेष नाही (?!)
राण्यांची हीच संस्कृती म्हणे
म्हणून काही निषेध नाही.

सुसंस्कृत यशवंत
आता राहीला नाही
असंस्कृत नाशवंत च
आता पाहीला जाई.

अभय-काव्यमुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Aug 2021 - 12:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान संदर्भ लावले आहेत. जमलीये कविता

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 1:35 pm | रामदास२९

छान कविता

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 1:36 pm | गॉडजिला

जादूगर

बाजीगर's picture

25 Aug 2021 - 7:38 pm | बाजीगर

धन्यवाद राजेंद्रजी , रामदासजी 29, गाॅडजिला साहेब.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 7:55 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 7:55 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Aug 2021 - 8:16 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली...
पैजारबुवा,

बाजीगर's picture

26 Aug 2021 - 10:09 am | बाजीगर

सर्वांना कळलेच असेल कि,

सुसंस्कृत यशवंत this line refering to साहित्य,नाट्य व कलाप्रेमी यशवंतराव चव्हाण.

सुक्या's picture

26 Aug 2021 - 11:42 am | सुक्या

छान लिहिली आहे... आवडली...

आपल्या प्रतिसादाने आनंद झाला.

यश राज's picture

26 Aug 2021 - 1:07 pm | यश राज

चपखल जमलीये आजच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर.

कुमार१'s picture

4 Sep 2021 - 11:33 am | कुमार१

छान कविता