कसेतरी कुठेतरी जगायला पाहिजे
म्हणूनच थोडीतरी प्यायला पाहिजे!
हजारो उठतात या अंतरंगी वेदना,
वेदना विसरायला प्यायला पाहिजे!
हजार प्रश्न लाखो चिंता, हजारो कारणे,
साऱ्यांना एक उत्तर प्यायला पाहिजे!
नकोशी कुणा असते उन्मनी अवस्था
कधीतरी कारणाविना प्यायला पाहिजे!
पडो कुणी प्रेमात, डोळ्यात जावे गुंतुनी..
वारुणीच रमणी आम्हा प्यायला पाहिजे!
वोडका, रम ब्रँडी स्कॉच वा असो व्हिस्कीही,
दर्जा सांभाळून मात्र प्यायला पाहिजे!
घडीभर सुख हे मजबुरी होऊ नये,
तिने नव्हे आपण तिला प्यायला पाहिजे!
-राव पाटील
प्रतिक्रिया
7 Aug 2021 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2021 - 8:13 pm | गॉडजिला
पण आता महिना सुरू झाला ना... ;)