पाहिजे एकांत थोडा

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
1 Dec 2008 - 7:17 pm

पाहिजे एकांत थोडा
पाहिजे थोडा अबोला
पाहिजे पहाट थोडी
पाहिजे निशब्द वारा
होउनी मग एक तेव्हा
अंतरी मिसळून जाउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

मिटूनी तू डोळे तुझे ग
काहीशी हरवून जासी
स्पर्शता लाभे दिलासा
तू मला बिलगून जासी
छेडूनी तारा मनाच्या
शब्द तू मी सुर होउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही
त्रुप्ताता देहात ही
त्रुप्ताता विश्वास सार्‍या
त्रुप्ताता श्वासास ही
संपता पहाट थोडी
काहीशी हुरहुर व्हावी
धुसरत्या तारकांना
भेटीचे संकेत देउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

-पुष्कराज

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

राघव's picture

2 Dec 2008 - 3:14 pm | राघव

कवीता सुंदर आहे. लयीत आहे.
अवांतरः
पण मला वाटते थोडी चुकीच्या वेळेस आली आहे. म्हणजे असे करणे चुकीचे आहे असे नाही, पण भावना आत्ता थोड्या प्रक्षुब्ध आहेत. म्हणून असे वाटले.