तू दिलेल्या वेदना

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
1 Dec 2008 - 4:52 pm

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंब-याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

जयश्री अंबासकर

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 Dec 2008 - 5:23 pm | मदनबाण

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही
व्वा.........
कविता आवडली..
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

राघव's picture

1 Dec 2008 - 6:25 pm | राघव

खूप सुंदर!!
आपण बॉ आता तुमच्या कविता/गझलांचे फॅन झालो आहोत.
मुमुक्षु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2008 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उंब-याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

दत्ता काळे's picture

1 Dec 2008 - 7:36 pm | दत्ता काळे

उंब-याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

. . . ग्रेट !

वेताळ's picture

1 Dec 2008 - 7:45 pm | वेताळ

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

छान
जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही


क्या बात है..अगदीच मनातलं
वेताळ

प्राजु's picture

1 Dec 2008 - 9:11 pm | प्राजु

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

जबरदस्त.

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

शेवट खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जयवी's picture

2 Dec 2008 - 12:09 pm | जयवी

तहे दिल से शुक्रिया दोस्तो !! तुम्हा सगळ्यांचे अभिप्राय वाचून छान वाटलं.

लेकिन दिल बहोत भारी है..... :( जे काही सुरु आहे ... खूपच बेचैन करणारं आहे.... :(